विज्ञानवाद आणि आस्तिकता

Submitted by नानाकळा on 12 August, 2017 - 23:27

या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.

अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?

त्यावर माझे उत्तरः
मला म्हणायचे होते की विचारसरणीने विज्ञानवादी - जसे अमितव यांनी म्हटले की रॅशनल विचार - असणे आणि व्यवसायने संशोधक/वैज्ञानिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडगेबाबा हे अशिक्षित असून विज्ञानवादी विचारांचे होते, तेच बालाजीच्या पुढे नतमस्तक होणारे इस्रोचे तंत्रज्ञ हे विज्ञानवादी नाहीत. प्रोफेशन म्हणून वैज्ञानिक आहे म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असे नाही. नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. मी स्वतः एक अज्ञेयवादी आहे.

नास्तिक, अज्ञेयवादी हे विज्ञानवादी 'असू' शकतात, (असतीलच असे नाही) पण 'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच' असे माझे स्पष्ट मत आहे. यावर पुढे चर्चा झाल्यास इतर सदस्यांची मते जाणून घेण्यास आवडेल...

भारताची मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांसारखी प्रचंड प्रगती न होण्याचे कारण हीच मूलभूत अविज्ञानवादी भूमिका आहे. मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही. कारण आपला सामाजिक विचार ठेविले अनंते तैसेचि राहावे असा आहे. याच समाजातून येणारे व्यावसायिक संशोधक्/वैज्ञानिक, यांच्यावर कुठेतरी हा पगडा असतोच. त्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधकिय मानसिकतेला मर्यादा पडतात. आपण जे 'सरकार मदत करत नाही', 'आपल्या देशात संशोधनाला महत्त्व नाही' हे जेव्हा म्हणतो त्याच्या मुळाशी हीच मानसिकता कारणीभूत असते. एक समाज म्हणून आपल्याला येणार्‍या समस्यांवर समाधान शोधण्यापेक्षा "चलता है, हे असंच असतं, आपण काय करणार,. सिस्टीमच अशी आहे" हे जे विचार उद्भवतात हे पण यातुनच येतात.

हे संपूर्ण उत्तर नाहीये. पुढे चर्चा होइल तसे अधिक लिहित जाईन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> काय सिंजी, जगातल्या सगळ्या कला थोतांडच असतील मग?
अध्यात्म हि कला आहे. मान्य. पण कसली कला आहे हे पहायला हवे.

असो. सिंथेटिक जिनियस यांच्या मताशी सहमत. मुळात धाग्याचा विषयच एका ओळीत संपण्यासारखा आहे. पण इतके चघळणे सुरु आहे इथे. इतके चऱ्हाट लावण्याचा हा विषय नाही. अरे विज्ञानवादी हा नास्तिक असतोच. नसेल तर त्याला विज्ञानवादी व्हायची गरज काय? आणि आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच. असेल तर तो आस्तिक राहीलच कसा? इतके साधे गणित आहे. पण काय जर भोंदूगिरीच करायचीय तर मग काय कोणत्याही अशक्य विषयावर रवंथ करता येते.

पूर्वेला जाणारा प्रवासी पश्चिमेला जात नसतोच असे आहे का?
किंवा
तीन अधिक दोन याचे उत्तर पाचच येते ते सहा येउच नये असे आहे का?

चला सुरु करा चर्चा. अरे काय?

जे कोणी म्हणतात कि मी विज्ञानवादी आहे पण माझी श्रद्धा आहे ते एकतर भोंदू आहेत किंवा भोळसट आहेत. (अर्थात, मानसिक स्वास्थ्यासाठी वगैरे जर कुणाला देव आवश्यक वाटत असेल तर मग तो भागच वेगळा. तसे मग काहींना मानसिक स्वास्थ्यासाठी दारू सुद्धा लागते)

मी एक उदाहरण सतत देत असतो. विषाणूंचा शोध लागण्यापूर्वी देवीचा कोप म्हणत असत. काय गरज होती हो त्या लोकांना विज्ञानाची? एखाद्याला आजार झाला कि गावकरी त्याला देवीचा देवळात आणायचे. अंगारे धुपारे करायचे. विषय संपला. पण ज्यांना तो मार्ग चुकीचा वाटतो त्यांनी विज्ञानाचा मार्ग पकडला. तरीही एखादा डॉक्टर जर विज्ञानाचे धडे घेऊनही ऑपरेशनपूर्वी देवाचे दर्शन घेत असेल तर त्याची वृत्ती त्या गावकऱ्यांच्या वृत्तीपेक्षा जराही वेगळी नाही. अशा डॉक्टरने सरळ पेशंटलाच देवासमोर आणून अंगारे धुपारे करावेत ना मग. काय फरक आहे?

@इनामदार, चिडू नका हो.

>> अध्यात्म हि कला आहे. मान्य. पण कसली कला आहे हे पहायला हवे.

अध्यात्म ही कला नाही. कला हा अध्यात्माचा प्रकार आहे. (ते कसे ते नंतर सांगेन)

अध्यात्म म्हणजे गूढरम्य, अनाकलनीय असे काही नसते. देव-दैववाद, धर्म, पंथ, आस्था, श्रद्धा, अंधविश्वास, भोंदूगिरी (जे सगळे थोतांड आहेच) याचा काही संबंध नाही.

बाकी नंतर.

मुळात अध्यात्म वा स्पिरीच्युअलीटी यात आत्मा वा स्पीरीट यांचे अस्तित्व मान्य केलेले असते.माझ्याच एका लेखात मी क्वांटम सोल वर लिहीले आहे.पण जाणिव सर्वत्र असावी(panpsycism)या मताशी मी काही अंशी सहमत आहे.पण ही जाणिव (consciousness)minusculeआहे/असावी.त्यामुळे आत्मा या संकल्पनेला थेट काही अर्थ उरत नाही.
electric charge प्रमाणे कॉम्प्लेस काँप्युटेशन जिथे होते तिथे जाणिव उत्पन्न होते.याअर्थी इंटरनेटही काही प्रमाणात कॉन्शस असू शकते.सध्याची integrated information theoryमला जास्त योग्य वाटते.मेंदू हा माहीती गोळा करणारा अवयव आहे.त्याची काँप्युटेशनल पावर संपल्यावर काही उरत नाही/नसावे.त्यामुळे अध्यात्म थोतांड आहे हे निखालस सत्य आहे.

सिंथेटिक जिनियस यांच्या मताशी सहमत. मुळात धाग्याचा विषयच एका ओळीत संपण्यासारखा आहे. पण इतके चघळणे सुरु आहे इथे. >>>>> Lol असं म्हणत ८-१० ओळी स्वतःच प्रसवल्या. आणि येवढा त्रास कशाला करुन घेताय? त्या पेक्षा काही बोलूच नका ना? Proud

सिंजी, छान रोख ठोक आणि एकदम अथॉरिटीनी एकसेएक बेसलेस वाक्य फेकत आहात. कीप इट अप. Lol
लाथाळी मेंब्र आले म्हणजे आता संयत सोडून वाह्यात सुरु होईलच.

नानबा, थोड्यावेळानी लिहितो. Happy

>> आत्मा या संकल्पनेला थेट काही अर्थ उरत नाही
बरोबर आहे. कारण मुळात सजीव आणि निर्जीव यातली फरक रेषा खूप धूसर आहे हे "आत्मा" वाल्यांच्या गावीही नसावे. आत्म्याची नक्की व्याख्या नाही. तशी देवाचीही नाही. कारण मुळातच व्याख्या म्हणजे काय हेच त्यांना माहित नसते. इथे मायबोलीवरच त्या कुठल्या एका धाग्यावर लोकांनी गाई म्हशींची पण भुते पाहिल्याचे लिहिले आहे. मान्य आहे. माणसांचे आत्मे मग जनावरांचे का असू नयेत. आणि असतील तर सूक्ष्मजिवाणूंचे सुद्धा असायलाच हवेत ना? कारण जीवच ते. कोट्यावधी सूक्ष्मजिवाणू पेशींबरोबर लढताना रोज आपल्या शरीरात मरत असतात. काय होते त्या आत्म्यांचे?

>> असं म्हणत ८-१० ओळी स्वतःच प्रसवल्या. आणि येवढा त्रास कशाला करुन घेताय?
सर, एका ओळीत सांगितले आहे मी "इतके साधे गणित आहे" म्हणून. बाकीच्या ओळी इथली चर्चा किती बाष्कळ आहे यासाठी लिहिल्या आहेत. आणि त्रास यासाठी कि देव आस्तिकता वगैरे अवैज्ञानिक (आणि प्रगत देशांमध्ये कालबाह्य ठरवल्या गेलेल्या) धार्मिक कल्पनांची विज्ञानाशी तुलना करून व चर्चा करून त्यांना इथे हेतुपुरस्सर उजळवले जात आहे.

देव आस्तिकता वगैरे अवैज्ञानिक (आणि प्रगत देशांमध्ये कालबाह्य ठरवल्या गेलेल्या) धार्मिक कल्पनांची विज्ञानाशी तुलना करून व चर्चा करून त्यांना इथे हेतुपुरस्सर उजळवले जात आहे.

>>> In God we trust???

@वैद्यबुवा,आपणाला मी कुठलाही प्रश्न क्वेरी प्रतिवाद या धाग्यात केलेला नाही तरीही मला आडवे चालायची गरज काय आहे.हा धागा वेगळा आहे,टिपापा नाही एवढे लिहतो आणि खाली बसतो(परत उभं राहण्यासाठी)

>> In God we trust???

जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी धर्मसत्तेने राजसत्तेवर येनकेन प्रकारे अंकुश ठेवायचा नेहमीच प्रयत्न केला आहे. इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. In God we trust हा त्यातलाच एक प्रकार. कि सरकार कुणाचे असले तरी धर्म देव म्हणजे सर्वात वरची शक्ती हे नेहमी जनमानसावर बिंबवायचे! पण गेल्या काही वर्षात त्याविरुद्ध बरेच जनजागरण झाले आहे व सुरु आहे.

देव आस्तिकता वगैरे अवैज्ञानिक (आणि प्रगत देशांमध्ये कालबाह्य ठरवल्या गेलेल्या) धार्मिक कल्पनांची विज्ञानाशी तुलना करून व चर्चा करून त्यांना इथे हेतुपुरस्सर उजळवले जात आहे.
>> really?
On coursera there is a course on topic.
U will find stats amusing!

इनामदार, प्रश्न अ‍ॅटिट्युड आणि समोरच्याच्या ईन्टेलिजन्सला थोडा तरी रिस्पेक्ट देणे ह्याचा आहे. तुम्ही यायच्या आधी आधी धार्मिकता, अस्तिकता आणि पुढे मग अध्यायत्म अशी रितसर प्रोग्रेस झाली, ती सुद्धा संयत चर्चेतून. आता तुम्ही आलात अन सरळ एका वाक्यात सोक्ष मोक्ष लावाय्च्या पोस्टी करत आहात.
हा अ‍ॅटिट्युड असेल तर, who gives a shit what you have to say?
धार्मिक कल्पनांची विज्ञानाशी तुलना करून व चर्चा करून त्यांना इथे हेतुपुरस्सर उजळवले जात आहे.>>>> पोस्टी वाचल्या असत्या तर, किंवा वाचल्या तरी कळाल्या असत्या तर हे वाक्य लिहिलं नसतं तुम्ही. असो.

सिंजि,टिपापा काय माझी गल्ली/इलाका आहे का? त्याचा काय संबंध? Lol जे वाटलं ते लिहायला काय आपली गल्ली आहे का ते बघावं लागतं का?

आस्तिकता न् देव, दैवी शक्ती बाजूला ठेवूयात.
आध्यात्म न् योगशास्त्र नाकारणार्या इथल्या कट्टर सन्माननीय सदस्यांना खुलं आव्हान देतो, "दररोज पंधरा मिनिटे ते अर्धा तास (किमान कालावधी) नियमितपणे योगसाधनेला अन् मेडिटेशन ला देऊन अडिचतीन वर्ष प्रामाणिकपणे साधना करा. आणि त्यानंतर तुमचे आज जे विचार आहेत तेच कायम राहतील का त्यावेळी सांगा...

पटत नसलं तर मला बावळट म्हणून सोडून द्या. Happy

पटत नसलं तर मला बावळट म्हणून सोडून द्या.
नवीन Submitted by र।हुल on 19 August, 2017 - 11:33>>>
वरचे वाक्य वाक्य वाचायच्या आधीच सोडून देण्यात आले आहे.
म्हणे योग करा.योगा म्हणजे पण बायोमेकॅनिक्सच्या अगेंस्ट जाऊन काहीतरी फालतुपणा करणे आहे.

Raa hul, tumache anubhav liha na asatil shakya tar.

Kahi lokanchya nadi na lagalel uttam. Tyanna rada karanya vyatirikta kahich karayach nasel tar ignore kelelach uttam nahi ka?

@नानबा ज्यावेळी मला अगदी नि:संदिग्ध अनुभव येतील त्यावेळी ह्याच फोरमवर नक्की लिहील.प्रयत्न न सोडता चालत राहणं आपल्या हातात असतं. बाकी कुणी काहिही म्हणो. व्यक्तिगत जिवनात कुणाच्या बोलण्याला किती महत्व द्यायचं याची सांगड घालणं महत्वाच.मी दुर्लक्ष करतो. Happy

एव्हढं सगळं वाचण्याचं बळ माझ्याकडे आत्ता नाही. पण हे वाचण्यासारखे आहे.

गुरूमास शरण जावे.

Pages