विज्ञानवाद आणि आस्तिकता

Submitted by नानाकळा on 12 August, 2017 - 23:27

या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.

अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?

त्यावर माझे उत्तरः
मला म्हणायचे होते की विचारसरणीने विज्ञानवादी - जसे अमितव यांनी म्हटले की रॅशनल विचार - असणे आणि व्यवसायने संशोधक/वैज्ञानिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडगेबाबा हे अशिक्षित असून विज्ञानवादी विचारांचे होते, तेच बालाजीच्या पुढे नतमस्तक होणारे इस्रोचे तंत्रज्ञ हे विज्ञानवादी नाहीत. प्रोफेशन म्हणून वैज्ञानिक आहे म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असे नाही. नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. मी स्वतः एक अज्ञेयवादी आहे.

नास्तिक, अज्ञेयवादी हे विज्ञानवादी 'असू' शकतात, (असतीलच असे नाही) पण 'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच' असे माझे स्पष्ट मत आहे. यावर पुढे चर्चा झाल्यास इतर सदस्यांची मते जाणून घेण्यास आवडेल...

भारताची मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांसारखी प्रचंड प्रगती न होण्याचे कारण हीच मूलभूत अविज्ञानवादी भूमिका आहे. मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही. कारण आपला सामाजिक विचार ठेविले अनंते तैसेचि राहावे असा आहे. याच समाजातून येणारे व्यावसायिक संशोधक्/वैज्ञानिक, यांच्यावर कुठेतरी हा पगडा असतोच. त्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधकिय मानसिकतेला मर्यादा पडतात. आपण जे 'सरकार मदत करत नाही', 'आपल्या देशात संशोधनाला महत्त्व नाही' हे जेव्हा म्हणतो त्याच्या मुळाशी हीच मानसिकता कारणीभूत असते. एक समाज म्हणून आपल्याला येणार्‍या समस्यांवर समाधान शोधण्यापेक्षा "चलता है, हे असंच असतं, आपण काय करणार,. सिस्टीमच अशी आहे" हे जे विचार उद्भवतात हे पण यातुनच येतात.

हे संपूर्ण उत्तर नाहीये. पुढे चर्चा होइल तसे अधिक लिहित जाईन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy हाब!

--------------------

असो. मला वाटतं, बरेचसे मुद्दे सविस्तर आणि योग्य पद्धतीने मांडले गेलेत. अश्विनी के, हर्पेन, व्यत्यय, इनामदार, टवणेसर, हाब, वैद्यबुवा, राहुल, सुमुक्ता, पेशवा, अमितव आपण सगळ्यांनी चर्चेत मोलाची भर घातली. संयत व संतुलित अशी ज्ञानवर्धक चर्चा आपणा सर्वांमुळे अनुभवता आली. अनेक नवीन मुद्दे कळले, हाब यांचे डेल्टाचे उदाहरण खूप आवडले. कुठेही कट्टर न होता सगळ्यांनीच एकमेकांचा आदर राखून ज्या तर्‍हेने योगदान दिलेत ते लाजवाब आहे, त्यासाठी आपणा सर्वांचेच खूप खूप आभार!

या विषयावर नवीन मुद्दे, मतं येण्याची शक्यता आता दिसत नसल्याने चर्चेचा समारोप घोषित करतो, धन्यवाद!

Submitted by र।हुल on 18 August, 2017 - 19:47

>> मी समारोपाचा प्रतिसाद लिहित असतांना आपला हा प्रतिसाद आला. काही दिवसांनी यावर चर्चा करुयात. गणपती झाले की... प्रॉमिस!

गल्ली चुकली राहुल साहेब.

(वैज्ञानिक लोकांनी ह्या विज्ञानवादी म्हणून आणि अभ्यास करून ह्या योगविज्ञानाचा किस पाडून शास्त्रीय भाषेत त्याचं विश्लेषण जरूर करावं त्यामुळे प्रचलित विज्ञान खुप पुढे जाण्यास मदतच होईल.) >> अंनिस करते हे काम.

भगवान विष्णु, भगवान शंकर वैगरे ज्या देवांच्या प्रतिमा आपण (समाजानं) निर्माण केल्या ते लोकं हे योगविज्ञानात कल्पनातीत प्रगती केलेली माणसं असावीत. त्यामुळेच त्यांना योगेश्वर वैगरे उपाध्या लावल्या गेलेल्या असतील. ज्या पुराणकथा आहेत ती रूपकं असतील किंवा सहज कुणाच्या काही हाती लागू नये यासाठी गोलमटोल भाषेचा वापर करून निर्मिलेलं साहित्य असेल. पुर्णपणे खोटंही नसेल आणि पुर्णपणे खरंही नसेल. >> Lol ईथे ऊपलब्धं आहे ते विज्ञान कितीही सोप्या भाषेत करून बालवाडी ते ईंजिनियरिंग ठोकून डोक्यात घण घालून सुद्धा लोकांना ऊमगत नाही आणि तुम्ही म्हणत आहेत की त्या विज्ञान्वादी लोकांनी गोलमटोल भाषेचा वापर करून सहज कुणाच्याही हाती लागून नये म्हणून अजून क्लिष्टं करून ठेवलेल ज्ञान तुम्हाला समजले.
जय हो!

हाब आपण गल्लंत केलींत!
पण असो. माझा पुर्णविराम Happy
बायदवे, अंनिस तोंडावर आपटल्याचेही उदाहरणे सापडतील आणि त्यांनी ते आपल्या आवाक्याबाहेरचं आहे असं कबूल केल्याचेही पुरावे सापडतील....

नाना, कधीतरी कुठेतरी आपला आध्यात्माकडे असलेला कल वाचलेला.
आपल्याला त्या मार्गासाठी मनापासून शुभेच्छा Happy

नाना, कधीतरी कुठेतरी आपला आध्यात्माकडे असलेला कल वाचलेला.

>> आहेच, फक्त मी त्याबद्दल चर्चा करत नाही. अध्यात्म हे चर्चेचा विषय नाही असे माझे अनुभवांती मत झाले आहे.

शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!

>>अध्यात्म आणि विज्ञान यावर वेगळा धागा जरा वेळाने काढेन, इथे चर्चा नको<<

इथे का बरं नको? अध्यात्म हि आस्तिकतेची नेक्स्ट लॉजिकल स्टेप आहे, मग त्याला तुम्ही भक्तिमार्ग म्हणा किंवा आत्म्याचा अभ्यास म्हणा. पुढची (लॉजिकल) चर्चा इथेच होऊन जाउद्या. ठ्ळक केलेल्या वाक्याशी सहमत नसाल तर ते खोडुन दाखवा...

>>> अध्यात्म हि आस्तिकतेची नेक्स्ट लॉजिकल स्टेप आहे
१. नॉट नेसेसरीली. अनेक आस्तिक लोक अध्यात्माची (अध्यात्म = आत्मोन्नती) वाटचाल सुरूच करत नाहीत कितीतरी काळ किंवा कधीच.
२. अध्यात्मवादी (याला चांगला शब्द सुचला तर हा बदलेन) आस्तिक असतातच असं काही नाही. मी स्वत: नाही.

र ते खोडुन दाखवा...>>> हे तर आव्हान झालं राज. Lol

अध्यात्म हि आस्तिकतेची नेक्स्ट लॉजिकल स्टेप आहे>>>> Absolutely not. You can say, the type of spirituality you know is the next logical step to believing in god. Check out the meaning of spirituality if you can. There are a few traditions in India that don't include any dogma. If you follow those, you could still be spiritual but not dogmatic.
Some streams of advaita and some dnyan marga followers are totally free of any concept of god. In fact, they are free of any concepts because any concept is created and/or understood by the mind and their goal is to go beyond it.
Also, going beyond the mind is nothing supernatural. When you think about it, your mind or the sense of "I" which uses the faculties of mind is not first. Your sense of being or in other terms your consciousness comes first. If you can just stabilize in your consciousness then you have transcended the mind.
वर नानाकळांना मी म्हणालो तसं तुम्हालाही सांगतो राज. This is something you need to investigate yourself because asking the right question is important. I will explain with my own example.
There was a phase, where I fell head over heels into the realm of spirituality (with its dogmas and all). Learnt a lot of good things that made a huge difference in my life. (Mayboli and thoughts of some mayboli members were actually responsible for the beginning of my journey there Happy but I'll keep that story for some other day.
All was good but there was still a little spark of the rational thinking left. And then, one day when I was reading an article which talked about how the consciousness we have is not independent of us. That just blasted a lot of theories that were underlying the brand of my spirituality. I felt flabbergasted because I lost faith in something that I thought was going to be with me for life. I started investigating again and that is when I found out about spirituality without dogma. Now I am comfortable with a lot of spiritual practices because I know I don't have to believe the underlying dogma and can still reap its benefits. Happy

>>१. नॉट नेसेसरीली. अनेक आस्तिक लोक अध्यात्माची (अध्यात्म = आत्मोन्नती) वाटचाल सुरूच करत नाहीत कितीतरी काळ किंवा कधीच.<<
ती नेक्स्ट स्टेप आहे, काहि आस्तिकांनी घेतली नाहि याचा अर्थ ती अस्तित्वात नाहि असा होत नाहि...

>>२. अध्यात्मवादी (याला चांगला शब्द सुचला तर हा बदलेन) आस्तिक असतातच असं काही नाही. मी स्वत: नाही.<<
अध्यात्मातला आत्मा हाच देव/दैववादावर आधारीत आहे. तुमची अध्यात्माची डेफिनिशन द्या...

सांगितलं ना - आत्मोन्नती. देवाच्या कल्पनेचा संबंधच येत नाही त्यात.
Pursuit of सत्-चित्-आनंद.

>>Some streams of advaita and some dnyan marga followers are totally free of any concept of god. <<

एखादं उदाहरण द्या. आणि माझ्या वरच्या प्रश्नात आव्हान वगैरे काहि नाहि... Happy

इथे का बरं नको? अध्यात्म हि आस्तिकतेची नेक्स्ट लॉजिकल स्टेप आहे, मग त्याला तुम्ही भक्तिमार्ग म्हणा किंवा आत्म्याचा अभ्यास म्हणा. पुढची (लॉजिकल) चर्चा इथेच होऊन जाउद्या. ठ्ळक केलेल्या वाक्याशी सहमत नसाल तर ते खोडुन दाखवा... >> आस्तिकता जशी देवाप्रती असू शकते तशीच सैतानाप्रतीही असू शकते..... देव आणि सैतान ह्या फक्तं हायपोथेटिकल (संकल्पनाधिष्ठित) सुपरनॅचरल पावरबँक्स आहेत पावर सोर्स नाहीत.

अध्यात्म, देव आणि सैताना परेच्या आत्मिक शक्तीला (पावरसोर्सला) समजून घेण्याचे शास्त्रं आहे त्यासाठी देव आणि सैतानाप्रती आस्तिक असणे जरूरी नाही.

देव जीव जन्माला घालतो, सैतान जीव घेतो.... पण जीव म्हणजे काय ते देवही ठरवत नाही आणि सैतानही नाही.

Google Nisargadutta Maharaj if you can Raj. Ramana Maharshi is also another one.

१. सांख्य दर्शन आस्तिक्यवादी नाही.
२. वेदांमध्ये देवता आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी होमहवन इ. विधींबद्दल चर्चा असली तरी उपनिषदं मुख्यतः आत्मोन्नतीबाबतच चर्चा करतात.
३. पातंजलीचं योग दर्शन (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि असा अष्टांगयोग). यात 'नियमां'मध्ये ईश्वर-प्रणिधान असा एक नियम येतो, पण तो मन दैनंदिन ताणतणावांतून काढून अन्यत्र चित्त एकाग्र करण्याचं एक साधन - इतक्याच माफक अर्थाने)

हे आठवलं तसं लिहिलं आहे, तपशिलांतील चुभूद्याघ्या.

dzogchen is another one.
राज म्हणतील आता माराच सुरु केला तुम्ही. Lol
हे प्रश्न मला वाटतं चर्चे पेक्षा स्वतः शोध घेऊन मगच सुटतात.

मंडळी, अध्यात्म आणि देव यांचा संबंध नाहि वा सांगड घालता येत नाहि - हा जो मुद्दा तुम्ही आणलाय त्याचं उत्तर/स्पष्टिकरण मला अजुन मिळालेलं नाहि. वर वैद्यबुवांनी उल्लेखलेले निसर्गदत्त बाबा यांच्यासकट झाडुन सगळे स्पिरिच्युअल लिडर्स देवाच अस्तित्व मानतात, नाकारत नाहित. पतंजली आणि इतर योगसाधना हि यात सामील आहे. पतंजली/योगसाधनेत अवतरणारा "परमात्मा" म्हणजे कोण?..

राज, माझ्या वाचनात योगसाधनेत परमात्मा अवतरतो असं आलेलं नाही. (अनुभवात त्याहून आलेलं नाही. Proud )
सांख्य दर्शनाचं उदाहरण मी दिलंच आहे.
ध्यानधारणा, प्राणायाम, योगाभ्यास, तसंच कृतज्ञता, क्षमाशीलता, संयम इत्यादींचे सुपरीणाम विज्ञानाने मान्य केलेले आहेत - यातल्या कशाचाही तुम्ही देव मानता का याच्याशी काहीही संबंध नाही.
उपनिषदांत जो 'ब्रह्मा'चा संदर्भ येतो तो देव(देवता)/पूजाअर्चा इ.इ.पेक्षा फारच निराळा आहे. ते विश्वाच्या उत्पत्तीचा कारक/कारण, अविचल अनादिअनंत तत्त्व अशा अर्थाने येतं. तुम्हाला बिग बॅन्ग थिअरी 'शास्त्रीय' म्हणून मान्य असेल तर एखाद्याला ती कॉन्सेप्ट मान्य असू शकते हेही समजेलच.
याहून आणखी काय एक्स्प्लेनेशन हवं आहे आणि का हवं आहे हे मला नीटसं कळलेलं नाही, नीट सांगता का?

>>राज, माझ्या वाचनात योगसाधनेत परमात्मा अवतरतो असं आलेलं नाही.<<

ओके, अवतरतो म्हणजे उल्लेख केला जातो या अर्थे. परमात्मा/ईश्वर योगसाधनेतच येतात ना?

वेल सेड बाई.
ह्या उपर राज, अद्वैताची स्वतःची टर्मिनॉलॉजी आहे. तुम्ही थोडं वाचन कराल आणि नीट काँटेक्स्ट मध्ये बघाल तर लक्षात येइल की त्या पद्धतींचा देव ह्या संकल्पनेशी संबंध नाहीये.

I guess Dharmik ani adhyatmik (religious vs spiritual) madhe gallat hotey ka?
I know people from ecological/nature study background who do not believe in God and not religious but are highly spiritual.
Prof. Gole from ecological society used to say - such study (of nature and being in nature) ought to create spirituality in ones mind.

The one who gets closer to nature.. Understands its functioning.. Understand how the fabric is woven.. Would not and can not remain the same person. You realize you are part of it and how you depend on it. Anthropocentric view which dominates everyday world suddenly can be seen the way it should be seen. If you understand ur position and dependency in this system - you become humble. You respect other beings who are equal or more partners in running the show..

Its a journey from has to is.. Journey from questions to acceptance. Journey from गreeds to ur needs..
Such Spirituality is way different than religiousness.

आस्तिकतेच्या धाग्यावर अध्यात्माची पुंगी वाजवायला लोक येणार हे लक्षात आलेच होते.अध्यात्म हे देव/धर्म प्रमाणेच आणखी एक थोतांड आहे.

अध्यात्म हे देव/धर्म प्रमाणेच आणखी एक थोतांड आहे. >>>
सिंजी, धन्यवाद!! कित्ती मोजक्या शब्दांत आपण समजावलंत!! पटलं! मी तर अगदी धन्य झालो. Lol

Pages