म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात ब्रोकरेज लागेल. तसंच तुम्ही युनिट्स डिमॅट फॉर्म मध्ये घेत असाल तर त्याचेही चार्जेस लागतील. पण यात कन्व्हेनियन्स = सुविधा आहे. तुम्हाला एकच अकाउंट, एकच पासवर्ड इत्यादी पुरेल.
फंड हाउसकडे डायरेक्ट (कोणाही ब्रोकर /एजंट शिवाय) ऑनलाइन खरेदी विक्री करायला प्रत्येक फंड हाउसकडे इ-ट्रेडिंग अकाउंट उघडावा लागेल. पण इथे कॉस्ट कमी असेल. नो ब्रोकरेज, नो कमिशन , नो डिमॅट चार्जेस

सध्या कुठला 'नवीन' व सध्याच्या परिस्थितीत चांगले भवितव्य आहे असे वाटत असलेलां म्युच्वल फंड आहे कां?

सध्या कुठला 'नवीन' व सध्याच्या परिस्थितीत चांगले भवितव्य आहे असे वाटत असलेलां म्युच्वल फंड आहे कां?

http://epim.bsebti.com/

हा कोर्स करायचा विचार करते आहे. चांगला वाटतोय का? अजून दुसरा चांगला असेल तर तो सुचवला तरी चालेल. पूर्वी बँकेत असताना गरज म्हणून AMFIआणि NCFM certification केलेले आहेत. तसेच Symbiosys चा 2yrs PGDBM पण केले आहे.

मी खालील म्युच्वल फंड मध्ये सीप करायचा विचार करत आहे.
HDFC MIP-LTP
ICICI prudential dynamic plan
SBI Balanced fund
ICICI prudential balanced advantage fund.
DSP black rock small and midcap fund.

काही सजेशनस??

HDFC equity
HDFC top 200
ICICI Blue chip
Franklin Templeton blue chip

हे ट्राय करा

सतीश,

कुठल्या MF मधे इन्वेस्ट करावे हे तुमचे वय आणि तुमची Risk taking Ability किती आहे यावर अवलंबुन असते.
थंब रुल म्हणजे.. (१०० - तुमचे वय) इतके टक्के Equity आणि उरलेले Debt funds मधे.
त्यातही Large cap Equity Funds हे कमी रिस्की आणि Mid and Small Cap Funds हे जास्त रिस्की असतात.

कृपया www.valueresearchonline.com वर जाउन आपल्या Funds चे रेटिंग पहा. शक्यतो त्या साईटवरील ५ स्टार किंवा ४ स्टार फंड निवडावे. त्यात फडाचा ३. ५ वर्षाचाही performance दिलेला असतो.

शुभेच्छा!

H

http://epim.bsebti.com/

हा कोर्स करायचा विचार करते आहे. चांगला वाटतोय का? अजून दुसरा चांगला असेजरातर तो सुचवला तरी चजरलेल. पूर्वी बँकेत असताना गरज म्हणून AMFIआणि NCFM certification केलेले आहेत. तसेच Symbiosys चा 2yrs PGDBM पण केले आहे.>>

अभ्यासक्रम चांगला आहे पण किती खोलवर शिकवणार ते महत्त्वाचे आहे. जर जुने विद्यार्थीचे नाव देत असतील तर त्यांना विचारा किंवा त्यांचे प्रत्येक विषयाचे छोटे अभ्यासक्र्म आहे त्यापैकी एक करुन अनुमान काढा.

राजसी प्रोग्राम डिटेल्स पाहिलेत का?
मला तर कंटेंट्स आवडलेत. मीही तुमच्याप्रमाणेच NSE चं अ‍ॅफी सर्टिफिकेशन केलेलं. डेरिव्हेटिव्ज चं मॉड्युलही केलेलं. इथे डेरिव्हेटिव्ज आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिसला जास्त वेटेज दिलेलं दिसतंय.

Earlier the fund was good but now the fund is not performing at all. You can check valueresearchonline site so many large cap good funds. First decide your allocation to different types of funds like large cap,midcap,,small cap then decide funds take help of various sites to know past performance.

म्युचुअल फंडाचे आणि उसगाव/कॅनडातील रहिवाश्यांचे नेमके कशात बिनसलेले आहे?

म्युचुअल फंडाचे आणि उसगाव/कॅनडातील रहिवाश्यांचे नेमके कशात बिनसलेले आहे?>>>>>
गजानन,
(कशी नशिबाने थट्टा आज मांडली Happy )
अमेरिकेने FATCA या कायद्याद्वारे भारतातील किंवा भारताबाहेरील अमेरिक्न्स च्या गुंतवणुकीची माहिती आय आर एस (अमेरिकेचे अर्थ खाते) याना देणे बंधनकारक केले आहे. आणि तसे न केल्यास मोठा दंड आकारला जातो त्यामुळे म्युचुअल फंड यु एस पर्सन (म्हणजे अमेरिकन नागरीक, ग्रीन कार्ड होल्डर्स, एन आर आय यांचे पैसे स्वीकारत नाहीत).
अमेरिकेची टॅक्स रेसिडेन्सी ही नागरिकत्वावर आधारीत आहे (म्हणजे अमेरिकन नागरीक पृथ्वीवर कुठेही राहिला तरी त्याला त्याचा ग्लोबल इन्कम दाखवावा लागतो) आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे.

गंमतीची गोष्ट म्हणजे जे लोक अमेरिकन नागरीक आहेत पण भारतात परत आलेले आहेत यांचेही पैसे त्यांना वर्ज्य आहेत. आणि अशा लोकांचे पैसे अमेरिकेतही म्युचुअल फंड स्वीकारत नाहीत, त्यामुळे घर का न घाट का अशी त्यांची परिस्थिती आहे.

मला कोणी खालील म्युच्युअल फंडस् बद्दल सांगू शकेल काय ?

मी पहिल्यांदाच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे. जास्त माहिती नाही. इंटरनेट वर थोडे फार वाचन करून खालील इक्विटी फंडसची लिस्ट केली आहे.

१. स्मॉल मिड कॅप सेक्टर

डि एस पी ब्लॅक रॉक मायक्रो कॅप फंड:- http://m.moneycontrol.com/mutual-funds/nav/dsp-br-micro-cap-fund-direct/...

किंवा

एस बी आय स्मॉल मिड कॅप फंड:- http://m.moneycontrol.com/mutual-funds/nav/sbi-small-midcap-fund-direct/...

2. फार्मा सेक्टर

एस बी आय फार्मा  फंड:- http://m.moneycontrol.com/mutual-funds/nav/sbi-pharma-fund-direct/MSB497

३. लार्ज कॅप फंडस्:-

एस बी आय ब्लु चिप फंड:- SBI bluechip http://m.moneycontrol.com/mutual-funds/nav/sbi-blue-chip-fund-direct/MSB532

किंवा

कोटक सिलेक्ट फोकस फंड:- http://m.moneycontrol.com/mutual-funds/nav/kotak-select-focus-fund-direc...

४. Thematic Infrastructure:-

फ्रँकलिन बिल्ड इंडिया:- http://m.moneycontrol.com/mutual-funds/nav/franklin-build-india-direct/M...

या फंडस् शिवाय कोणते दुसरे चांगले फंडस् किंवा दुसर्या सेक्टर मधील  फंडस् माहीत असतील तर सुचवा प्लिज.

अतरंगी,

तुमचा शेअर मार्केटचा नियमीत अभ्यास असेल तरच सेक्टर फंड घ्या शक्यतो. त्यात जास्त परतावा मिळू शकतो पण जोखिम पण जास्त असते,

बुल रन मध्ये मिड्कॅप / स्मॉलकॅप मस्त परफॉर्म करतात पण बेअर मार्केटमध्ये सडकून आपटतात. लार्ज कॅप कमी नुकसान करतात पण फायदाही कमी देतात. मी त्या दोघांपेक्षा मल्टीकॅप फंड घ्या असे सुचवीन. यात पैसे कुठल्या कॅपमध्ये वळवायचे हे फंड मॅनेजर ठरवेल आणि तुम्हाला मीडकॅपच्या जवळपास (तेवढा नाही) फायदा मिळेल. आणि जोखिम बरीच कमी होईल

Franklin India Prima Plus
SBI Magnum Multicap
Franklin India Flexicap

हे काही चांगले फंड आहेत.

बॅलन्स्ड फंड हा पण एक चांगला पर्याय आहे. यात इक्विटीबरोबर डेट मार्केट्मध्येही पैसे गुंतवले जातात. परतावा थोडा कमी मिळेल पण जोखिम बरीच कमी होईल. यात कमीतकमी ६५% इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारा फंड निवडला आणि कमीतकमी ३ वर्षे गुंतून राहिलात ( Happy ) तर टॅक्स लागणार नाही. यात TATA Balanced Fund हा एक चांगला पर्याय आहे.

धन्यवाद माधव,

मला टॅक्स बसत नाही आणि अजून दोन ते तीन वर्षे बसणार नाही म्हणून टॅक्स सेव्हिंग च्या दृष्टीने काही विचार केला नाही.

शिवाय जास्त रिस्क घ्यायची तयारी असल्याने डेबीट फंड / बॅलन्स फंड वर जास्त भर दिला नव्हता.
तुम्ही दिलेले फ्लेक्सी कॅप बघतो

म्युच्युअल फंड मध्ये जर आपण गुंतवणूक करत असाल मॅच्युरिटीचा कालावधी जास्तीत जास्त ठेवावा.
सध्या हे दोन निवडक म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवणूक करू शकता...

1. Motilal Oswal Most Focused Multicap 35 Fund-High Risk
2. Motilal Oswal Most Focused Midcap 30 Fund-Low Risk

अनुभवी लोक मदत करा.
मी पहिल्यांदा म्युचवल फंड मधे गुंतवणुक करण्याचा विचार करत आहे.काही प्र्श्न,
१) लग्नाआधीच्या नावाने गुंतवणुक केली तर चालते का ??? पॅन कार्ड अजुन सासर च्या नावाने नाही आहे.फंड घेताना दोघांच्या नावे हवा आहे.
२)माझी सुरुवात असल्याने महिना १००० sip मधे टाकावे का ?? कुठला फंड चांगला असेल?? सिप साठी डीमॅट ओपन करावे लागते का ???
३)pension plan म्युचवल फंड मधे कुठला असतो का ?? असल्यास कसा करावा ?? अजुन किमान ३० वर्षे नोकरी आहे तर आता किती ने सुरुवात करावी??

हा धागा अजुन पुर्ण वाचला नाही.वाचते आहे.आधीच जर ह्या बाबत पोस्ट असतील तर पान क्रं सांगा.धन्यवाद.

Pages