मायबोलीवरच्या पाककृती विभागासाठी आवाहन

Submitted by mi-anagha on 26 July, 2017 - 12:39

मायबोलीवर हवी असलेली पाककृती शोधायची सवय झाली आहे. आणि सगळ्या पाककृती एकाच जागी आणि तिथे असलेल्या अनेक प्रतिक्रिया , मदतीची देवाणघेवाण यामुळे माझ्यासाठी हा एक महत्वाचा रिसोर्स आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इथल्या अनेक पाककृतीं दिसत नाही. त्याची कारणे मला ठाऊक आहे आणि त्या कारणांवर चर्चा करण्यासाठी हा धागा नाही. कृपया त्या टाळा.

पाककृती ज्याने शोधल्या , ज्याने लिहल्या त्याने त्याचे काय करावे मी सांगणार नाही.

पण अनेक रेसीपी या पारंपारिक पाककृती होत्या. त्यावर कोणाचाच मालकी हक्क असू शकत नाही. दुर्देवाने त्याही गायब आहेत. घागा लिहणार्‍यानेही अनेकदा त्या पारंपारिक आहेत किंवा जालावरून इतरत्र घेतल्या आहेत असे अनेकदा लिहिले होते.
उदा
उकडपेंडी
https://www.maayboli.com/node/61900

घुटं - एक मराठमोळा प्रकार
https://www.maayboli.com/node/34956

आपण या परत आणू शकतो का? म्हणजे त्यातल्या काही जालावर उपलब्ध आहे. काही आपण घरातल्या इतरांना विचारून मिळवू शकतो.

मायबोलीबाहेर त्या असतीलही पण इथे मायबोलीवर एकत्र मूळ प्रतिक्रियांसोबत त्या असाव्यात यासाठी हे आवाहन आहे. अमूक ठिकाणि जाऊन पहा हे मला करता येते पण तो त्रास वाचण्यासाठी त्या इथेच असाव्यात असे मला वाटते

माझी अशी कल्पना आहे की अशा काही धाग्यांची मालकी ( Technically कसे ते माहिती नाही) मायबोलीने आपल्या हातात घ्यावी , आपण सगळे मिळून तिथे असलेली पारंपारिक रेसिपी पुन्हा लिहून काढू. शक्य असेल तर काही जणांकडून फोटोही मिळेल. आणि त्या त्या धाग्यांवर असलेल्या प्रतीक्रियाही तशाच राहतील.

फक्त कुठलाही प्रताधिकार भंग होणार नाही अशा पारंपारिक पाककृतीबद्दल हे आवाहन आहे. मूळ लेखकाच्या कुठल्याही मालकी हक्काचा भंग व्हावा अशी माझी इच्छा नाही. यात मी मला सर्व तितकी मदत करण्यास तयार आहे. मूळ लेखकांने मदत केली तर त्याचेही स्वागत आहे.
यात तुम्हाला मदत करणे शक्य असेल तर कृपया खाली लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकडपेंडीच्या दोन पाककृती आल्याने नुकसान काहीच होत नाही. दुसरी लिहा, अन पहिल्या धाग्याची लिंक तिथे द्या. ज्यांना इच्छा आहे ते तिथे जाऊन प्रतिसाद वाचतील.

आधीचे मूळ लिखाण कायदेशीररित्या पुन्हा आणता येईल किंवा कसे, याबद्दल मला शंका आहे.

मूळ लिखाणाचा स्वामित्वहक्क संपूर्णतः स्वाधीन करून घेण्यासाठीच नव्या टाईमलिमिटेड संपादनसुविधा आलेल्या आहेत हे यानिमित्ताने समजून घ्या. Happy

मूळ लेखकाला त्याने लिहिलेलं कुठलंही साहित्य जर मायबोलीवर नको असेल आणि मायबोलीवरून साहित्य उडवायची सोय असेल तर कोण काय करू शकणार?

पारंपरिक कृती तर सर्वत्र सारख्याच असतात म्हणून तर त्यांना पारंपरिक म्हणतात. अमुक लेखकाने लिहिलेली वेगळी असेल तर मग ती पारंपरिक नाही होणार. जर मूळ लेखक स्वतःच मीही नेटवरून घेतली म्हणत असेल तर तुम्हीही कुठून तरी आधार घेऊन करून बघा व चांगली झाली तर इथे नवा धागा काढून लिहा. यामुळे अजून चांगल्या, अजमावलेल्या पाकृ इथे गोळा होतील.

ज्यांनी स्वतःचे धागे संपादन करून त्यावरचा मजकूर काढलाय त्यांची ती स्वतःची मर्जी समजून सोडून द्या ना. तो धागा परत जिवंत करून तिथे जे काही लिहिले होते ते इकडून तीकडून शोधून आणून परत त्यावर लिहिणे म्हणजे मूळ लेखकाच्या मर्जीविरुद्ध जाणे हेमावैम. असे करता येते का हा भाग वेगळा.

पाकृचे व इतर साहित्याचे इतर लोकांनी लिहिलेले धागेही त्डिलीटलेले आहेत. मायबोलिवर आधी धागा पूर्ण काढायची सोय धागा कर्त्याच्या हातात होती, नंतर फक्त संपादनाची सोय राहिली. याहून पुढे तीही सोय नसेल. मायबोलीवर जे छापले जाते त्याची मालकी मायबोली प्रशासनाकडे राहणार. यात चुकीचे काही आहे असे मला वाटत नाही.

पारंपरिक पाककृती जालावर आणि त्याही मायबोलीवर असल्या(च) पाहिजेत आणि त्यासाठी मायबोलीने एक उपक्रम हाती घ्यावा, अशी कल्पना असेल, तर ते ठीक. प्रिंट माध्यमातून असे उपक्रम होताहेत. पण त्याला मर्यादा असतात. जालावरही असे करणारे अनेक आहेत. टीव्हीवरचे कुकरी शोज आणि आता तर त्यासाठीची खास चॅनेल्सही आहेत. फेसबुकवर अनेक ग्रुप असतील.

गंमत म्हणजे जालावरच्या आणि कुठे छापील्/नियतकालिंकातल्या पारंपरिक म्हटलेल्या पाककृती रुचिराची सेम टु सेम कॉपी असल्याचे पाहून गंमत वाटलेली.
जे लोक खरंच असे पदार्थ करतात, ती परंपरेने त्यांच्यापर्यंत पोचलीय किंवा त्यांनी मागोवा घेऊन करून पाहिलीय, त्यांनी अशा रेसिपीज दिल्या तर बरे असे वाटते.

मायबोलीचा फायदा हा की इथे अडलेल्या गोष्टी हक्काने विचारता येतात.

बाकी त्या पाककृती आता दुसर्‍या कोणी करून त्याच धाग्यावर पुन्हा लिहिणे पटत नाही. हवे तर वेगळा धागा काढून द्याव्यात. इथून उडवलेल्या पाककृती अन्यत्र आहेत. तिथे जाऊन पाहणेही कठीण नाही.

मायबोलिवर आधी धागा पूर्ण काढायची सोय धागा कर्त्याच्या हातात होती, नंतर फक्त संपादनाची सोय राहिली. >>
यामुळेच धागा दिसतोय पण आत काही नाही असं होतय...
माबो संपादक असे आत काहीच नसलेले धागे उडवु नाही शकत का ?
तसं झालं तर त्याच नावाने पारंपारीक पाकृ चे नवीन धागे काढता येतील...

माबो संपादक असे आत काहीच नसलेले धागे उडवु नाही शकत का ? >> तसे केले तर प्रतिसाद, त्यातले काही नुस्खे, कोणी पाकृ करून टाकलेले फोटो सगळेच उडेल. हे चालणार असेल तर उडवावेत ते धागे.

तसं झालं तर त्याच नावाने पारंपारीक पाकृ चे नवीन धागे काढता येतील... >> त्याच नावाने नवीन धागा आत्ताही काढता येईलच की.

वेगळा धागा काढण्याचा पर्याय आताही उपलब्ध आहे आणि तो शेवटचा पर्याय आहेच.
मला मूळ लेखकाच्या पाककृती हव्या यासाठी हे नाही. किंवा त्या नवीनच असतील हे गृहीत धरले आहे. मायबोलीवर त्या पारंपारिक पाककृती असाव्यात (ज्या आता नाहीत) म्हणून हे सुचवले आहे.
त्या धाग्यांवर असलेले इतरांचे प्रतिसाद तितकेच महत्वाचे आहेत. वेगळा धागा काढल्यास त्या जुन्या प्रतिसादांमधली माहिती सहजा पाहिली जाणार नाही.
जर मूळ लेखकाला त्या धाग्यावर आता काही ठेवायचे नसेल तर त्या धाग्याची मालकी , त्या लेखकाकडे तरी का तशीच ठेवायची?
पाककृती आणी इतर लेखांवरच्या प्रतिक्रिया यात फरक आहे. कथा काढून टाकली तर प्रतिक्रियांना तितका अर्थ राहणार नाही. पण पाककृती काढली तरी इतरांचे अनुभव, त्यांचे फोटो, इतर माहिती तितकीच महत्वाची असू शकते.

तिथे इतरांना नवीन माहीती लिहून तो धागा सुरु ठेवता येईल. अनेकांनी तो बुकमार्क केल असेल त्याना परत नवीन शोधाशोध करावी लागणार नाही. काही धागे १०-१२ वर्षे जुने आहेत आणि माझ्यासारख्या अनेकांना ते एकत्र असणे सोपे वाटतेय.

<दुसरी लिहा, अन पहिल्या धाग्याची लिंक तिथे द्या. ज्यांना इच्छा आहे ते तिथे जाऊन प्रतिसाद वाचतील.>

हे आ रा रांनी लिहिलंय आधीच. सगळं जग एका क्लिकच्या अंतरावर आहे.

<जर मूळ लेखकाला त्या धाग्यावर आता काही ठेवायचे नसेल तर त्या धाग्याची मालकी , त्या लेखकाकडे तरी का तशीच ठेवायची?>

हा तांत्रिक मुद्दा आहे. आधी मायबोलीवर आपण काढलेले धागे स्वतःच उडवता यायचे, अप्रकाशित ठेवता यायचे. पण आता तसं करता येत नाही, त्यामुळे मजकूर उडवण्याची वेळ आली. म्हणजे एकापरीने धाग्यावरचे लेखकाचे मालकीहक्क किंवा किमान संपादनहक्क कमी कमी होत गेले. आता संपुष्टातच आलेत.

तुम्ही पुढे जाऊन म्हणताय की त्या धाग्यावरचा मजकूर बदलायचाही हक्क मायबोलीलाच देऊन टाकायचा हे अति होतंय. लिहिणार्‍याच्या बाजूने विचार कराल, तर आधीचे बदल अन्यायकारक वाटतात. ते तांत्रिक कारणासाठी आहेत की धोरणात्मक आहेत याची कल्पना नाही. इतक्या मोठ्या बदलांसाठी प्रशासनाकडून त्यांची भूमिका सांगितली गेली असती, तर बरं झालं असतं.

याआधी धागा उडवण्यासाठी प्रशासनाकडे जावं लागे. आता बदलासाठीही जावं लागेल. आणि ते होतीलच की नाही याची कल्पना नाही. धागा उडवण्याच्या लेखकाकडून आलेल्या प्रत्येक विनंतीवर कृती होते की नाही याची कल्पना नाही. असं होत नाही, असंही पाहिल्याचं आठवतं. विशेषतः कोतबोतल्या एक दोन धाग्यांबाबत.

>तुम्ही पुढे जाऊन म्हणताय की त्या धाग्यावरचा मजकूर बदलायचाही हक्क मायबोलीलाच देऊन टाकायचा हे अति होतंय.
अहो भरत , तुम्ही एकदम टोकालाच गेलात. ज्या धाग्यावरचा मजकूर लेखकाने स्वतःहून काढून टाकलाय त्याबद्दल त्या बोलत आहेत. सगळ्या धाग्यांबद्दल नाही आणि तशातही त्यांनी फक्त पारंपारिक पाककृती असलेल्या धाग्यांबद्दल विचारणा केलीय. ज्या पानांवर लेखकाने स्वतःचे प्रयोग करून पाककृती लिहली आहे त्याबद्दल त्याना काहीच म्हणायचे नाही हे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. पारंपारिक पाककृती या कथा, लेख आणि कविता या सारख्या लेखनप्रकारापेक्षा वेगळ्या आहेत. उद्या त्या मी मायबोलीवर पहिल्यांदा लिहिल्या म्हणून माझ्या मालकीच्या होत नाहीत.

म्हणजे ज्या धाग्यांवरचा मजकूर मुळातच पारंपारिक पाककृती असल्याने कुणाच्याही मालकीचा नव्हता
जिथे आलेल्या प्रतिक्रिया आणि इतर टीपा , फोटो इतर मायबोलीकरांचे होत्या
जो मुळात स्वतःचा मालकीहक्क नसलेला मजकूर, मूळ लेखकाने कायमचा काढून टाकला
आता त्या उरलेल्या पानावर लेखकाचा कुठला हक्क पोहोचतो? खरं तर तो आधीही नव्हता आणि आता तर लेखन ही नाही. (तुम्हाला लेखकाच्या प्रतिक्रिया म्हणायचे असेल तर त्याही काढून टाकता येतील)

पारंपरिक पाककृतीवर कोणाचा स्वामित्वहक्क नसतो हे माहितीय, मान्य आहे. पण इथे आपण मायबोलीवरच्या धाग्याबद्दल बोलतोय.

लेखक जो धागा काढतो त्या लेखकाचा तो धागा होतो. उद्या लेखकाने त्यात पारंपरिक ओव्या लिहिल्या म्हणून मायबोली प्रशासन त्या धाग्याला सर्व जनतेला संपादनासाठी खुला नाही करू शकत.

बाकी लेखिकेला पारंपारिक रेसिपी इथे एकत्र हव्या असतील तर त्या परत लिहून काढाव्यात व तिथेच जुन्या लिंक्स द्याव्यात असा एक पर्याय आधीच वर मांडलेला आहे. जुन्या
हितगुज वरच्या अनेक रेसिपीज आशा परत आणलेल्या आहेत.

त्या ऎवजी मूळ धागा संपदानाचा पर्याय हवाय ज्यासाठी मायबोली प्रशासनाला त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करावे लागतील.

पण आपण इथे मायबोलीच्या कुठल्याही धाग्याबद्दल बोलत नाही. निदान तसे mi-anagha यांनी स्प्ष्ट केले आहे.
ज्या गोष्टींबद्दल मला काही हक्क नाही , ती इथे मी लिहली आणि नंतर काढून घेतली तर उरलेल्या धाग्याबद्दल मी मालकीहक्क सांगू शकत नाही असे माझे म्हणणे आहे.कारण मुळात तो मला नव्हताच. मी फक्त मायबोलीची सुविधा वापरली इतकेच.
उद्या मी इथे गणपतीची आरती टाईप केली (सुखकर्ता दुखहर्ता) आणि नंतर ती काढून घेतली म्हणून ज्या पानावर/धाग्यावर लिहली त्या पानावर माझा काहीच हक्क लागत नाही.
मला बाकी धोरणांबद्दल (चूक्/बरोबर) काहीच बोलायचे नाही. मी फक्त एका specific गोष्टीबद्द्ल बोलतो आहे ज्या वर mi-anagha यांनी लिहल्या आहेत.

अगदी आता काय करता येईल-
१) धाग्यातला मजकूर जिथे लेखकाने काढला आहे तिथे वेबमास्टरनेच -
"लेखकाने मजकूर काढला असल्याने अशाप्रकारची पाककृती "इथे /या धाग्यात/प्रतिसादात/ &&&" वाचा" हे टाकता येईल.
नवीन शेफांनी या कृती करून लिहिण्याचे आव्हान स्विकारावे. जालावर अमुक ठिकाणी वाचून मी स्वत: केल्यावरच देत आहे असे असावे.
२) सर्वच पाककृतींना शोधण्याचे योग्य टॅगज् कुणी माहितगारांनी टाकण्याचे काम अंगावर घ्यावे.

अहो नवा धागा उघडणं इतकं कठीण आहे का?
तिसऱ्यांदा सांगतोय. नवा धगा उघडा. रेसिपी लिहा. जुन्य धाग्याची लिंक द्या.

ज्या गोष्टींबद्दल मला काही हक्क नाही , ती इथे मी लिहली आणि नंतर काढून घेतली तर उरलेल्या धाग्याबद्दल मी मालकीहक्क सांगू शकत नाही असे माझे म्हणणे आहे.कारण मुळात तो मला नव्हताच. मी फक्त मायबोलीची सुविधा वापरली इतकेच.
उद्या मी इथे गणपतीची आरती टाईप केली (सुखकर्ता दुखहर्ता) आणि नंतर ती काढून घेतली म्हणून ज्या पानावर/धाग्यावर लिहली त्या पानावर माझा काहीच हक्क लागत नाही.≥>>>>>>

इथे लेखकाच्या हक्कांबद्दल बोलत नाहींयोत. लेखक धागा बंद करून, मायबोलीला टाटा बाय बाय करून गेलाय. त्याच्या धाग्यावर त्याने काही ठेवले नसले तरी शीर्षक तसेच राहिलय व प्रतिक्रियाही तशाच राहिल्यात.

इथे चर्चा आहे असे धागे, सर्व नाही तर फक्त पारंपरिक रेसिप्या लिहिलेले धागे, मायबोलीने लोकांना संपादनासाठी उघडून द्यावेत, लोकांनी मिळून तिथला उडवलेला मजकूर पुन्हा लिहावा.

पण त्याच धाग्यावर लिहायचा आग्रह का नवीन धागे काढण्यावर बंदी आहे का?
द्राविडी प्राणायाम कशासाठी?
अशी तांत्रिक सोय फक्त विशिष्ट धाग्यांपुरती द्यायची आणि बाकीच्यांपुरती नही, तसंच ती संपादनाची सोय कोणाकोणाला देणार? मायबोँलीचा विकिपिडिय होणार का?
इथे मी तांत्रिक बाबींबद्दल बोलतोय. तात्त्विक द्रुष्ट्याही माझा विरोधच आहे.
मायबोलीवर एकदा लिहिलेला मजकूर काढून घ्यायची सोय नाही, म्हणजे माझा याबाबतीतला स्वामित्वहक्क गेला. त्यामुळे माझं स्वतं:चं असं काही इथे लिहिताना मला विचार करावा लागेल.

भरत बरोबर. परंतू रिकाम्या धाग्यात काही सूचना वेमाने टाकावी म्हणजे " अमुक धाग्यातला मजकूर मलाच दिसत नाही का?" विचारणारे पिल्लं धागे येणार नाहीत.
२)सगळंच लटकलं. प्रतिसादांतही काही लेखन असल्याने रिकाम्या पानांचा प्रश्न सुटत नाही.