उकडपेंडी

Submitted by दिनेश. on 6 March, 2017 - 05:02
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
पारंपरीक पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. पण आम्ही वैदर्भीय पद्धतीने करतो. दाणे नाही घालत. तेल जरा सढळ हस्ते! आंबट दही मस्ट! साखरेची चव घालतो.
रागावलेल्या नवर्‍याला मनविण्याचा हमखास उपाय! Happy

मस्तच !

मस्तच आहे रेसिपी . जाडसर कणीक आहेच घरात त्यामुळे लगेचच करून बघते .>> झाल्यावर खायला बोलावणार की नाही ??

मस्तच पाकृ. करुन बघेन. माझी आई झुणका बनवते असा.
दिनेशदा हॉटेल कधी सुरू करताय तुम्ही म्हणजे आम्हाला पदार्थ बनवायचा त्रास नाही. Wink

तयार फोटो छान दिसतोय. Happy
यात थोडेतरी शेंगदाणे हवेतच पण. चिंचेच्या पाण्यात नाही शिजवली तरी चालते. आंबटपणाकरता वरून लिंबाचा रस घालायचा. वर म्हटलंय तसं दही घालून सुद्धा छान लागते.
लई तेल लागते याला त्याशिवाय चांगली लागत नाही. ज्वारीच्या पिठाची जास्त चविष्ट होते कणकेपेक्षा. कुठलही पीठ असो, नीट आणि खमंग भाजल्या जायल्या हवंच त्याशिवाय हवी तशी मोकळी नाही होत उकडपेंडी.

सकाळी न्याहारीमध्ये खाल्ली तर पोट पार गपगार होतं दुपारपरेंत.

मस्त! आजीची आठवण आली. ती करत असे.
आई आमसुलाचं पाणी किंवा आगळ वापरून मोकळी भाजणी जास्त करत असे, त्याची पण पद्धत साधारण अशीच ना?

मस्तच. फोटोपण भारीच.

कांदा घालून मोकळी भाजणी करतात आमच्याकडे पण दाणे नाही घालत. ताकातली जास्त करुन करतात.

तोंपासुये रेसिपी आणी फोटो.... बापरे अजिबात विस्मरणातच गेला होता हा पदार्थ!! मी पण लहानपणीच खाल्लेली आठवतीये दाणे न घालताच करायची आई..

आम्हीपन शेंगदाणे नाही घालत..दही मस्ट..तेपन आंबटच पाहिजे..
योकु म्हणतात तसं कणकेपेक्षा ज्वारीचं पिठ जास्त मस्त लागते...आणि तेल पण पाहिजेच..आणि वरुन बारीक चिरलेला कांदा..
मला पन मोकळीच जास्त आवडते..स्वतः केलेल्या उकडपेंडीपेक्षा आईच्या हातची सुपर्ब लागते..खरतरं तिनं काईपन बनवलं तरी मस्तच लागते Wink
हा माझा झब्बु..
फोटो काढला तेव्हा कांदा नव्हता टाकला वरुन..
.

अगदी माझ्या घरचे लहानपणीचे दिवस आथवले. माझ्या वडलान्चा आवडता अमळनेरी पदार्थ आणि आईचा कन्टाळा आल्यावरचा झटपट उपाय!

परवा माझ्या मैत्रिणीने जवसाच्या तेलातली खाऊ घातली.
छान लागते मी प्रथमच जवसाचे तेल खाल्ले. पण मी स्वतः नाही वापरू शकत जवसाचे तेल ... मलाही आवडते पण पोटात बस ते क्चिवतच करते

आभार सर्वांचे.. मी वर साजूक तूप घालून खाल्ली, तशी छान लगली. इथले दही थोड्या वेगळ्या चवीचे असते. त्याची जोड नाही जमत आपल्या पदार्थांची.