आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहातच तुम्ही ऑलराउंडर
नेत्रदानाचा फॉर्म ??
तेरे चेहरे पे अपनी नजर छोड जाऊंगा............साठी

१३८७,हिन्दी,२०१०-२०१७
अ व ह द र ज म ध क अ,
म छ छ य फ अ ग,
अ श्र त ग फ त ह अ,
ग ड भ ख ग ख स फ...

सिनेमातलं नाही ...

मि पाहिलं
आता एक क्लु द्या बक्षिस म्हणुन

थांकू बंती... Happy
पण क्ल्यु काय देऊ ???
जाऊदे मला एक सांगा, क्रिकेट आवडतं का तुम्हाला...२०११ चा वर्ल्डकप आठवतो का???

हळूहळू कावेरी पण ऑलराउंडर होतीय बरं ग्रोथ चांगली आहे कुबड्या घेऊन का होईना जुनी गाणी ओळ्खतीय आणि नवीन गाण्यात ती किंग आहेच फक्त मराठीचा लोचा आहे.

आणि हो अजुन एक् हे जी जी नका करू मला बंती...५०० वर्षाची बुढ्ढी असल्याच फिलिंग येत हो मला.. Sad

अक्षय एवढी पण तारिफ नको हो..
कुबड्या घेऊन... Lol हि तारिफ आहे कि ...........
मराठी गाण्यांचा खरचं लोचा आहे .. बरोबर पकडलं..

हे गाण जे आधी आणेल ना..ती व्यक्ती खरच ग्रेट आहे.. कामाला लागा...

हळूहळू कावेरी पण ऑलराउंडर होतीय बरं ग्रोथ चांगली आहे कुबड्या घेऊन का होईना जुनी गाणी ओळ्खतीय आणि नवीन गाण्यात ती किंग आहेच >>> +१११ अगदि सहमत Happy

पुरे आता..डायबेटिज होईल मला.. Lol

एवढा फुलटॉस टाकलाय तरी अजुन उत्तर येईना...

कोनी पोहचतय कि नाहि...मी क्ल्यु दिलाय हो एवढा...

आया वर्ल्डकप म्हारे देस रे जितेगि मेरि धोनि कि ईडिया
अरे छे छ्क्के युवराज फोडे अछे गेंदबाज
अरे श्रिशांत तेज गेंदबाज फटाका तिखा है अंदाज
गुगलि डाले भज्जि खास गंभिर खेले सुपर फास्ट

Happy
बरोबर...
जेवढ दिलय तेवढ लिहायचं...
आणि वर म्हटल्याप्रमाणे ग्रेट आहात हं अगदी.... पण या गाण्याला इतका वेळ लावला...

बंती,अक्षय्, हे माहित नाही तुम्हाला.....
सत्यजीत जी जवळ जवळ पोहचलेच होते....

बंती उगी उगी रदु नका.... Happy

पंदितजी आजच्या दिवस लिहितील ना की उद्याची वाट बघाय्ची ????????/

येस्स करेक्ट! Happy
आया वर्ल्डकप हमारे देस रे...जितेगी मेरी धोनी की ईंडीया.....

पंडितजी आता सकाळीच येतील तोपर्यंत हे ओळखा
कोडे क्र १३८८ मराठी (२०१२-२०१७)
श श श
र ख द छ
ल छ न ब
त म चा त ग न
अ त म च
च-न च-न च-न
श श श

महाराष्ट्रात अशी व्यक्ती नाही ज्याने हे गाणं ऐकलं नाही ह्या गाण्यावर टीका करणारे चोरून हेडफोनमध्ये ऐकायचे अशी माहिती सूत्रांकडून आहे ओळखाल त्याची एक ओळ ग्राह्य धरली जाणार नाही किमान कडवं लिहावं लागेल.

शांताबाई,शांताबाई,शांताबाई
रूपाची खाण दिसती छान,
लाखात छान, नजरेचा बाण,
तिरकमाण मारीती चकरा तुझा ग नखरा,
इकडुन तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
तेरा ये जलवा,
माहीमचा हलवा,
जिवाचा कालवा,
मनाला भूलवा,
मामाला बाेलवा,
“कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा”
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
अटक मटक चवळी चटक,
लटक मटक वा-यानं उडती केस झटक,
“लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक”
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
गिरकी घेतीया गरा गरा,
पदर उडताेय भरा भरा,
हिराेनी दिसती जरा जरा,
तरर रारी रराररा,
शांताबाई,शांताबाई,शांताबाई

१३८९ हिंदी
अ च ज व ज त भ स च ज
क ह क ह व ह र ख ल

Pages