आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, सोडवा की कुणीतरी....माझे डोळे आसुसलेत कोडे सुटलेले बघण्यासाठी....
हो बरोबर कृष्णा...
अजून क्ल्यू हवेत का?

ओके ..
चला मीच प्रयत्न करते आता...द्या मला एखादा क्ल्यु ...

हो, बरोबर
गीतकार -- महाभारतात १००% आहे, रामायणात ५०% आहे, मायबोलीवर पण ५०% आहे
नायिका -- स्मारक सम्राज्ञी
नायक -- गाण्यात बिनदोरीच्या उड्या मारणे, लंगडी घालणे इ करणारा
हो तूच सोडव मेघा... मस्का नकोच लावू.... कोणाला फिकीरच नाहीये आपल्या उत्तरासाठी आसुसलेल्या डोळ्यांची... !!

आंखिया तरसन लगी आंखिया तरसन लगी
मैं जो पी के दरस कि प्यासी
पी के लगन की मेहन्दी रचाई
लाज के कजरे से आँखियां सजरिया

नायिका मुमताज़
उड्या मारणारा नायक जितेन्द्र
भरत व्यास
बूंद जो बन गये मोती

हे वरचे कोडे कावेरि यांनी सोडविले आहे! >>>> हो बरोबर मला पण क्रुश्नाजिंच्या नावाच्या जागि कावेरि दिसत आहे Lol

हे उत्तर आल्यावर कळलं ..ताई सारख आपली फिकिरच नाही अस का बोलत होत्या ते.... Happy
क्रुश्नाजी द्या आता.. Happy
मी नाही सोदवलं ते ..तुम्हीच सोदवलयं..........

पंदितजी तुम्ही हसू नका हं...नाहीतर नाव सांगेन मी तुमचं..सारख आपलं Lol काय करताय... Sad
माहितीये मी काही पंडीत वगैरे नाही ते...पण प्रयत्न करते ना...

बरोबर ..... Happy
कोडे १३८४ कृष्णा, स्निग्धा, पंडितजी, मेघा. यांनी सोडवले असे जाहीर करण्यात येत आहे...... द्या प्रत्येकी १-१ कोडे...
पहिली ओळ क्ल्यूत देऊन पण फायदा नाही.... Happy

१३८५

सोप्पे घ्या
हिंदी

व च ख व त ह
य र अ म ह
स व स ग ह
न स न स व अ ह

सोप्पे एकदम कसलाही क्ल्यु नको! आणि देणार पण नाही!

वो चांद खिला वो तारें हसीं
ये रात अजब मतवाली है
समझनेवाले समझ गये है
ना समझे,जो ना समझे वो अनाडी है

दुसरी ओळ वाचावीही लागली नाही

१३८६.हिन्दी (१९९०-२०००) सोप्पे
अ त अ क अ छ ज
त च प अ न छ ज

बहुतेक पंडितजी ओळखतील हे गाणं एका मिनिटात!
ओळखा लवकर कुणीतरी,कारवीजींनी घेतली तेवढी अवघड परीक्षा नाही काही!

अय्यो... १३८४ अवघड परीक्षा.....?? सॉरी मग...
कृष्णा जुनी ओळखतात... स्निग्धांना रागदारी टाईप हमखास येतात....पंडितजी ऑलराउंडर....
बाकीच्यांसाठी मी पहिली ओळ दिली;
मेहंदी रचायी, चुनरी सजायी साठी ब्राईडल मेकप क्ल्यू दिला.....
पण अडकलेच अपेक्षा नसताना... सॉरी...

अहो साॅरी कशासाठी?? क्ल्यु आहे त्यात,म्हणून बोललो तसं!
सोडवा बरं आता लवकर आणि द्या पुढचे कोडे!
>>>नेत्रदानाचा फॉर्म भरलाय का इथे कोणी...>>>मस्त!!!

असं होय .... मला खरंच वाटले... कृष्णा पण तसेच... अवघड म्हणाले ना...
आनि म्या पन कुलूच देतोय की..... लोकांचे स्टार्टर बदलायला झालेत Happy

अवघड परिक्षा वरून सहज इम्तिहान टाईप केलं तर खरच ह्या नावाचा मुव्ही होता..मग साँग पाहिले.. :
कुमार सानु

इस तरह आशिकी का असर छोड जाऊंगा,
तेरे चेहरे पे अपनी नजर छोड जाऊंगा..

होप माझ्याआधी कोणी पोहचल नसेल... Sad

Pages