जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला वाटत असेल की मी का एवढा भांडतोय वा ताणून धरतोय, तर यामागचे कारण तुम्ही करत असलेले फिक्सिण्चे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आरोप माझ्या लाडक्या खेळाडूंवर आणि माझ्या श्रद्धास्थानांवर आहेत. थोडा त्रास होतोय ईतकेच Happy

>>http://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/kohli-ch...

आता ईथे ३३९ च काय ५०० पण होतील...!
(तरिही आपण सामना जिंकलो असतो तर ? कितीतरी खुसखुशीत चर्चा, बातम्या, व ईतर बरच काही ला मुकलो असतो नाही? ) Happy
हे राजिनामे, जेंटलमन एक्सिट वगैरेचं एक बरं असतं... मूळ मुद्दा व सत्य लपवून ठेवलं जातं.... आणि मग मागाहून मिडीया च्या हाती बरं लागतं.

गंमत म्हणजे द्रविड सकट बर्‍याच अनुभवी लोकांचे (सामनापूर्व) अ‍ॅनलिसीस सदोष होते. किंबहुना विराट कंपनी ने पाठलाग करणेच उचीत असे त्याचे म्हणणे होते. पहिले खेळल्यास २८०+ धावा पाक ला भारी पडतील हे त्याचे मत तसे जगजाहीर आहे त्यात विशेष काही नाही. पण द्रविड ने देखिल पंड्या व जाधव या दोघांना युवी व धोनी च्या आधी फलंदाजीला खेळवायची सूचना केली होती, जी नक्कीच विशेष होती:

http://www.firstpost.com/sports/india-vs-pakistan-rahul-dravid-suggests-...

'या' भारतीय फलंदाजी बद्दल सर्वच महाभागांना ईतका भयंकर विश्वास होता की बर्‍याच एक्सपर्ट नी मोहम्मद आमीर नाव्याच्या गोलंदाजाकडे दुर्लक्ष केले., आणि rest as they say is the history!
In cricket, it takes only one ball to get the wicket of (any) King of Chasing, this is now official. Happy

तुम्ही करत असलेले फिक्सिण्चे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आरोप माझ्या लाडक्या खेळाडूंवर आणि माझ्या श्रद्धास्थानांवर आहेत. थोडा त्रास होतोय ईतकेच

>>> तेच तर सांगितले राव पहिल्याछूट आधीच. तुम्हाला त्यांची वकिली केल्याबद्दल काही मिळत नाही, पण तुम्ही व तुमच्यासारखे त्यांची फुकट वकिली करत असतात त्यावर त्यांचे पोटपाणी चालले आहे. अशा प्रामाणिक चाहत्यांना अंधारात ठेवून हे लोक पडद्यामागे काय काळे धंदे करतात ते बाहेर येत नाही म्हणून चाहते टिकून आहेत. दॅट्स ऑल!

आणि साहेब बोलले:
https://sports.ndtv.com/cricket/is-asking-to-take-50-more-catches-in-pra...

तरिही ईथल्या प्रसिध्द क्रिकेट्पटू x.y.दमुकर यांनी सांगावे की ५० जास्त झेल घेण्याचा सराव करण्याची अपेक्षा 'हे जरा अतीच होतय' सदरात मोडते का? Happy तरि बरय आपल्या संघातील बहुदा सगळ्यांना करोडो मधे 'अधिकृत' मानधन मिळते...
आणि प्रसिध्द x.y.दमुकर नसले तरी गल्ली क्रिकेट खेळलेल्या सर्वांनाच माहित आहे, विशेषतः गोलंदाजाला आपण नो बॉल टाकला आहे हे पूर्णपणे माहित असते. राव त्या अख्ख्या पिच, पाटा, गल्ली, रस्त्या वर एकच रेष असते की जी नो बॉल किंवा रन आउट हे ठरवते.
तरिही म्हणे Bumrah was pushing the envelope all the time... even in IPL... he has done that.. असे महभाग सांगत होते.
अता अशी खोड जिरवायची असेल तर कोच ने सरवा दरम्यान 'रेषा पार केलीस तर पार्श्वभागावर वेताचे फटके' असे काहि केले तर ते जरा अतीच होईल? Happy (किंबहुना हे असे आधीच केले असते तर आज कप आप्ल्या हातात असता हा मुद्दा विचारानीय आहे.)

बाकी, बेटींग व फिक्सिंग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चार चौघात दमुकरांनी प्रेयसी ला पटवायला लावलेली पैज वेगळी आणि करोडोंच्या संख्येने अब्जावधी डॉलर्स चा सट्टा वेगळा. जितका पैसा आप्ल्या खेळाडू व बोर्डाला मिळतो त्याच्या अर्धा देखिल पाक संघ्/बोर्डा ला मिळाला तर ते फिक्सींग च्या वाटेला जाण्याची शक्यता कमी आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालानुसासार आपल्या बोर्डाला एकूण icc च्या खजिन्यापैक्की भक्कम २८% रेवेन्यु शेयरींग आहे.. नंतर ईंग्लंड, ऑसी, न्युझी ७% आणि मग पाक, व ऊर्वरीत ३%. आता बोला.

अशा प्रामाणिक चाहत्यांना अंधारात ठेवून हे लोक पडद्यामागे काय काळे धंदे करतात ते बाहेर येत नाही म्हणून चाहते टिकून आहेत. दॅट्स ऑल!
....

अरे काय दॅटस ऑल Lol

ते पडद्यामागे काळे धंदे करतात की नाही हाच तर प्रश्न आहे.
तुम्ही देखील या जगात एखाद्या महापुरुषाला मानत असालच. मग तो महापुरुष काय लगेच तुमच्या या प्रेमाचा फायदा उचलत काळे धंदे सुरू करतो का? Happy

अशा प्रामाणिक चाहत्यांना अंधारात ठेवून हे लोक पडद्यामागे काय काळे धंदे करतात ते बाहेर येत नाही म्हणून चाहते टिकून आहेत. दॅट्स ऑल!
....

अरे काय दॅटस ऑल Lol

ते पडद्यामागे काळे धंदे करतात की नाही हाच तर प्रश्न आहे.
तुम्ही देखील या जगात एखाद्या महापुरुषाला मानत असालच. मग तो महापुरुष काय लगेच तुमच्या या प्रेमाचा फायदा उचलत काळे धंदे सुरू करतो का? Happy

जितका पैसा आप्ल्या खेळाडू व बोर्डाला मिळतो त्याच्या अर्धा देखिल पाक संघ्/बोर्डा ला मिळाला तर ते फिक्सींग च्या वाटेला जाण्याची शक्यता कमी आहे.
>>>>>

एक्झॅक्टली!

म्हणून तर आपले खेळाडू निव्वळ पैश्यासाठी फिक्सिंगच्या वाटेला जाणार नाही. कारण पकडले गेले तर मेली सोन्याची कोंबडी Happy

बाकी वर कोणी कोणी बरेच लिंक दिल्या आहेत. सावकाश घरून वाचतो.

पण मि काय म्हणतो, एखादा प्रॉजेक्ट गंडला किंवा कस्ट्मर हातून निसटला तर आपल्या अप्रेझल ची आकडे मोड करतात... ईथे अख्खा कप घालवला राव, तरी यांना मानधन पूर्ण मिळणार... त्या बद्दल कुणीच काही बोलत नाहीये!
'हटकेश्वर'... Happy

तुम्ही देखील या जगात एखाद्या महापुरुषाला मानत असालच.

>>>> क्रिकेट खेळणारे केव्हापासून महापुरुष झाले? नका हो स्टॅन्डर्ड घसरवू इतकं. Happy

आपले खेळाडू निव्वळ पैश्यासाठी फिक्सिंगच्या वाटेला जाणार नाही. कारण पकडले गेले तर मेली सोन्याची कोंबडी >>> अझर, श्रीशांत, जाडेजा. इ. लोकांना बहुदा हे ज्ञान माहीती नसावे

क्रिकेट खेळणारे केव्हापासून महापुरुष झाले? नका हो स्टॅन्डर्ड घसरवू इतकं. Happy
>>>>>
दुसरे ज्या महापुरुषाला मानतात त्यावर टिका करणे फार सोपे असते. तसे बनणे सोपे नसते Happy
हे ईन जनरल वाक्य / सुविचार आहे

ईथे अख्खा कप घालवला राव, तरी यांना मानधन पूर्ण मिळणार... त्या बद्दल कुणीच काही बोलत नाहीये!
>>>
Happy
सिंपल आहे हो, त्यांनी जी फिक्सिंग केली त्यात बोर्डालाही आपला वाटा पोहोचला असेल Happy

अझर, श्रीशांत, जाडेजा. इ. लोकांना बहुदा हे ज्ञान माहीती नसावे
>>>>>>
त्यांनी ठेच खाल्ल्यानेच हे ज्ञान जगाला प्राप्त झाले Happy

>>सिंपल आहे हो, त्यांनी जी फिक्सिंग केली त्यात बोर्डालाही आपला वाटा पोहोचला असेल Happy
हे म्हणजे विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले तर त्यात बोर्डाचा हात होता असे म्हणण्या सारखे आहे... 'लातूर' पॅटर्न, आठवतय का काही? Happy

>>अझर, श्रीशांत, जाडेजा. इ. लोकांना बहुदा हे ज्ञान माहीती नसावे
त्ञांना सोन्याच्या कोंबड्यांनी फसवले होते... Happy

दुसरे ज्या महापुरुषाला मानतात त्यावर टिका करणे फार सोपे असते

>> बात को घुमाना आपकी फितरत है साहिब, थोडा लॉजिक रहें तो मजा आये... Happy

मला माहित असलेले महापुरुष महापुरुष बनण्यात पैसा-धंदा याचा काही संबंध नव्हता. टिका वगैरे टोटली डिफ्रंट सब्जेक्ट आहे. घुमवू नका राव. माहित आहे तुम्हाला लै अनुभव आहे, गोष्टी फिरवायचा. पण मला मुद्द्यांवर टिकून राहायची भारी खोड आहे.

अझर नंतर जाडेजा नंतर श्रीशांत नंतर सलमान बट नंतर आमिर. >>>>> तुम्ही भारतीय खेळाडूंवरून पाकिस्तानी खेळाडूंवर गेलात. तिथे पैसा नाहीयेच त्यामुळे मूळ मुद्दा सोन्याच्या कोंबडीचा लागू नाही

मला माहित असलेले महापुरुष महापुरुष बनण्यात पैसा-धंदा याचा काही संबंध नव्हता.
>>>>>>
गल्लत होतेय का?
सचिन मोठा झाला म्हणून त्याच्याकडे पैसा आला. त्याच्याकडे पैसा आला म्हणून तो मोठा नाही झाला. सचिनचे महापुरुष बनण्यात क्रिकेटचा वाटा आहे, पैश्याचा नाही. हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्याबद्दलही तोच आदर आहे, त्यांनी कुठे पैसा कमावलेला.

माहित आहे तुम्हाला लै अनुभव आहे, गोष्टी फिरवायचा. पण मला मुद्द्यांवर टिकून राहायची भारी खोड आहे.
<<<<<<<<<
मूळ मुद्दा फिक्सिंग आहे आणि ती तुम्ही सिद्ध करू शकत नाही आहात Happy

ऋन्मेष मुद्दा पटला व आवडला.
थोडंफार फिक्सिंग होत असावं असं माझंही स्पेक्युलेशन आहे विशेषकरून कोकणी माणूस यांची कमेंट वाचा व इतर जुन्या न्यूज आठवा. पण याही मॅच मध्ये फिक्सिंग झाली होती हे प्रूव्ह करणे अशक्य तसेच आधीच्या फिक्सिंगमध्ये सारेच्या सारे प्लेयर्स सामील होते हेही सिद्ध करणे अशक्य. द्रविडने कधी पाच पैश्याचंही cheating केलं असेल अस वाटत नाही.

तू ज्या प्रकारे पेशन्स ठेवून योग्य बाजू मांडतो आहेस ते अमेझिंग आहे.

एखादा क्रिकेटर पैसा कमावतो ते बरेच लोकांना ईजी मनी वाटते,
पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येतेय का या करोडोंच्या अस्ताव्यस्त पदरलेल्या देशात केवळ अकराच खेळाडू संघात खेळू शकतात.
आणि या खेळात पैसा आहे म्हटल्यावर साहजिकच स्पर्धाही तितकीच असणार. कित्येकांना मागे टाकून त्या अकरात यावे लागत असेल हा विचार करा. जिथे गल्लोगल्ली मुलगा रांगायला लागताच हातात बॅट पकडतो त्या देशात.

आता कोहली बोलतोय - वॉटेवर हॅपन्स इन ड्रेसिंग रुम, स्टेज इन ड्रेसिंग रुम. (जाओ क्या उखाडना है वो उखाडो - हा थोडा माझा मसाला)

आणि शास्त्रीबुवा तर म्हणताहेत कि कोच बनवायचं असेल तर डायरेक्ट नेम्णुक करा, मी अर्ज वगैरे करुन लाइनीत उभं रहायच्या भानगडीतच पड्णार नाहि - मेरी औकात/उसुलोंके खिलाफ हय ये... Lol

द्रविडने कधी पाच पैश्याचंही cheating केलं असेल अस वाटत नाही.
>>>>>
एक्झॅक्टली! एखाद्याच्या देहबोलीत आत्मविशासात समजतो त्याच्या प्रामाणिकपणा..

अझर जडेजाच्या वेळी मी फार लहान होतो, पण मला माहीत आहे हॅन्से क्रोनिए किंवा या अझर जडेजाची प्रकरणे बाहेर यायच्या आधीच आमच्या गल्लीतल्या पोरांना हे लोकं सामने फिक्स करण्यात गुंतले आहेत याचा ठाम विश्वास होता. तो त्यांनी मलाही दिला. त्यामुळे यांची प्रकरणे फुटताच मला फारसा धक्का वगैरे बसला नाही. गेली क्रिकेटमधील घाण म्हणून बरेच वाटले. सांगायचा मुद्दा हा की फिक्सर ओळखले जातात. जसे ड्यू आयडी ओळखले जातात तसेच आहे हे.. कायद्यापासून पुरावे नसल्याने सुटू शकतात मात्र क्रिकेटरसिकांच्या नजरेपासून या गोष्टी लपत नाहीत..

आणि शास्त्रीबुवा तर म्हणताहेत कि कोच बनवायचं असेल तर डायरेक्ट नेम्णुक करा,
>>>>
त्याला कोच नाही ईवेंट मॅनेजर बनायचे आहे. परदेश दौरयात मजा आहे पोरांची तो कोच झाल्यावर Happy

>>द्रविडने कधी पाच पैश्याचंही cheating केलं असेल अस वाटत नाही.

सचिन ला विचारा- मुलतान डिक्लेरेशन:
https://www.sportskeeda.com/cricket/multan-declaration-sachin-tendulkar-...

बाकी, भारतीय संघाचा कप्तान झाल्यावर भल्या भल्यांना अहंकार नियंत्रण होत नाही... कोहली तर नुकताच वयात आलेला फलंदाज आहे. त्यातही मातीचा गुण असतोचः
मराठी: हट्टी
बंगाली: अहंकार
पंजाबी: टशन
दाक्षिणात्यः नको इतकी शिस्त
मध्य प्रदेशः कल्पना नाही... कर्णधार अजून झाला नाही?

या मुलभूत गुणांना ओळखून कप्तान व संघा बरोबर काम करणारा कोच यशस्वी ठरू शकतो असे वाटते.

>>त्याला कोच नाही ईवेंट मॅनेजर बनायचे आहे. परदेश दौरयात मजा आहे पोरांची तो कोच झाल्यावर
शास्त्री बुवा व पोरांचे मस्त जमते.. ही खरे तर जमेची बाजू आहे. मग ते पार्ट्या करेनात वा ईतर काही... सामने जिंकणे महत्वाचे. तेव्हा ऊगाच ईतरांच्या मजेवर जळू नये. Wink

मूळ मुद्दा फिक्सिंग आहे आणि ती तुम्ही सिद्ध करू शकत नाही आहात
>> तेच तेच परत टायप करण्यात काय मजाय? तो मुद्दा केव्हाच तुमच्यावर सोडून दिलाय. इथे जालावरच्या चर्चेत काही सिद्ध बिद्ध होत नसतं. अनुभव घ्या असे थेट बोललोय, ते टाळून इतर बाकी गप्पा चालल्यात त्यात मला इन्टरेस्ट नाहीच असे अल्रेडी सांगून झालंय.

सामने जिंकणे महत्वाचे. तेव्हा ऊगाच ईतरांच्या मजेवर जळू नये.  
>>>>>
नाही हो जळतोय कसला. आपलीच पोरं आहेत ती. मी फक्त सांगितले मजा आहे त्यांची. बाकी सामना जिंकणे महत्वाचे याबाबत सहमत. पण जिंकताहेत की हरताहेत हे येणारा काळच सांगेल.

नानाकळा तुम्ही आस्तिक आहात.
मी नास्तिक आहे.

तुम्ही म्हणत आहात देव आहे.
मी म्हणत आहे देव नाहीये,

असल्यास सिद्ध करा.

तुम्ही म्हणत आहात, बारा वर्षे हिमालयात जाऊन तपस्या कर देव दिसेल.

मी विचारले, तुम्ही ती तपस्या केली आहे का?

तर तुम्ही म्हणत आहात, माझा विश्वास तपस्या न करताच आहे. तुच जा.

मी म्हणतोय तुम्हीच जाऊन देवाची भेट घेऊन या, सोबत माझा विश्वास बसेल अशी देवाकडून भेट घेऊन या.

यावर तुम्ही पुन्हा म्हणत आहात, मी नाही जा, तूच जा...

मग मी म्हणतोय, माझा विश्वासच नाही तर मी माझ्या आयुष्यातील बारा वर्षे तपस्या करण्यात का वाया घालवू?

तुम्ही म्हणत आहात बारा वर्षे वाया जायच्या भितीने तू काही न करता देव नाहीये अशी पळवाट काढतोयस.

प्रत्यक्षात बारा वर्षे तपस्या न करता तुम्हीच देव आहे यावर विश्वास ठेवून मोकळे होत आहात.

हे आपले असे चालू आहे Happy

Pages