जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोकळ्या मनाने अभिनंदन करूया पाकिस्तानचे. त्यांनी आनंद लुटावा असे बर्‍याच दिवसांनी काही घडलेय >>> त्यांच्या आनंदाशी आपल्याला काय करायचे आहे Uhoh

त्यांनी आनंद लुटावा असे बर्‍याच दिवसांनी काही घडलेय.... >>> हो न Happy यंदा सर्वांच्या टीव्ही चे पैसे वाचले की (न फोडावे लागल्याने...हाही एक आनंदच पाकिस्तानात)

२०११ मध्ये थोर साहेबांच्या भेटीचा योग्य आला , साहेब तेव्हा क्रिकेट क्षेत्रात बऱ्या पैकि कार्यरत होते ,
मुंबई मधील वानखेडे नामक मैदानाची पाहणी करत होते , विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर. आमच्या एक जवळच्या मित्रांमुळे तिथे जाणे झाले .
त्यांचे काही काम होते साहेबांकडे (आमचे मित्र उच्य शासकीय अधिकारी आहेत ). भेट तशी अनऔपचारीक होती (काही बदली वैगरे साठी काम होते ).
तेव्हा नेहमीचे बोलणे झाल्यावर, साहेब आमच्या मित्रांना बोलले कि अंतिम सामान्यचे तिकीट घेऊन ठेवा, भारतीय संघच अंतिम सामन्यात येणार आहे आणि तसेच घडले ,

तेव्हा पासून मी तर बाबा क्रिकेट पाहणे सोडले.

जडेजा : अश्विन मला एक सांग की लेका
अश्विन : बोल की र
जडेजा : पांड्या मला लय मारील व्हय
———-
हवामान खात्याचा ईशारा…
हार्दिक पांड्या सोडुन कोणीही पंधरा दिवस भारतात येवु नये…..
जडेजाने तर दीड वर्ष तोंड दाखवू नये आणि इंग्लडमध्येपण आठवडाभर जपून रहावे…….
——–
‘हॉकी’ तारी त्याला ‘क्रिकेट’ कसलं मारी
———
ब्रेकिंग न्युज….
भारतीय क्रिकेट संघ हडपसर पासून वारीत सामील होणार…
—–
मॅच हरल्यावर
BCCI चा नवीन आदेश
पांड्या फक्त विमानाने येणार
बाकीचे रेल्वेने
आणि बुमरा ST ने
पण
जडेजा चालत
——–
पटकन UTV movies चॅनल लावा तिथे “बॉर्डर” पिक्चर लागलाय..त्यात आपण जिंकतोय
——-
Breaking news
जडेजा बाथरूममध्ये बंद
पंड्या बॅट घेऊन बाहेर ऊभा
———-
Har baap chahta he k ek din uska beta usse bhi age badhe..
Aaj shayad wo din he..
—–
Other Options
Sony Max – Jurassic Park
Star Gold – Jolly LLB 2
Movies OK – Terminator 3
Sony Max 2 – Munnabhai MBBS
or watch Aastha.
मॅच हरल्यावर
—–
साला जेवढे दुःख INDIA हारल्या मुळे नाही झाले….
त्या पेक्ष्या HARDIK PANDYA आउट झाल्याने …..झाले..
——–
पाकिस्तान 9 six 6 बॅट्समन
पंड्या one man army 6 six
अरे भावा एकटाच नडला पण वाघासारखा भिडला!!

If Pakistan can beat India, remember, you can clear CA, CS and any damn course in this world.
———-
कधी कधी पोराच्या विजयात पण बापाचे समाधान असते। IND vs PAK
——–
अरे त्या आजीला देव पाण्यात घेऊन बसायला सांगा…
————
जाडेजा ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे!
#तुला_नाय_मला_घाल_कुत्र्याला
#IndvsPak
———
प्रत्येक बापाची एकच इच्छा असते
आपला मुलगा जिंकला पाहिजे
आज फादर डे आहे
मुलांच्या आनंदासाठी आज बाप जरी मॅच हारला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नये #indvspak
कधी कधी पोराच्या विजयात पण बापाचे समाधान असते। IND vs PAK >>>>>> लोकसत्ता मधून साभार. धन्यवाद लोकसत्ता!

त्यांच्या आनंदाशी आपल्याला काय करायचे आहे
>> +1
नाहीतर काय त्यांना भारतीय सैनिकांना मारून आनंद मिळतो
भारतात बाॅम्ब फोडून पण आनंद मिळतो.

झोपी गेलेला जागा झाला....!
भारतीय संघ, पाकीस्तान संघ, आणि आपण.
एकंदरीत सर्वांच्या तब्येतीसाठी व खेळाच्या भल्यासाठी हे बरं असतं.

बाकी- पूर्वी खेळाडूंच्या घरावर दगडफेक होत असे, आता वॅप वरून मार मिळतोय. एकूणात राग व्यक्त करण्यात प्रेक्षक मॅच्युअर झाला असे म्हणुयात. "पाक च्या आनंदात आपण सहभागी होवुयात.." हे जरा अती होतय.. इतकही दुसरं टोक गाठायची गरज नाही.
Happy

केदार, समहाऊ, मी तुमच्याशी यावेळेस तरी सहमत होऊ शकत नाही.
उठसुठ अशी शंका घेतली जात नाही, निदान माझ्याकडुन तरी, पण कालची मॅच अथपासुन इतिपर्यंत बघता माझ्याही मनात हीच शंका बळावली.
अन त्यास इतरही अनेक कारणे आहेत, जशी की मिडियामधुन बातम्यांद्वारे "सट्ट्याच्या आकड्यांची केलेली" जाहिरात... मुलाखती, अन इतर अनेक बाबी.
माझ्यामते आयसीसी काय की बीसीसी काय, दोन्ही संघटना हल्ली केवळ "धंदा" करायला बसलेल्या आहेत.
आयपीएल तर सरससकट करमणूकीचा धंदा आहे. अन म्हणूनच मला डब्ल्युडब्ल्युएफ कुस्त्यांची आठवण झाली.

>> क्रिकेट ( खरतर कुठलाही खेऴ ) शेवटी Momentum चा खेळ आहे . When things go your way , they go your way . मलाही धोनीचा शॉट किंवा अश्विनची लेगस्टंप लाईन आवडली नाही , पट्ली नाही , पण मी तो मूर्खपणा होता म्हणेण , फिक्सिंग नाही .

खेळात जिंकणे हारणे चालूच असते परंतू लोकांचा राग भारत ज्या पध्दतीने अक्षरशः लोटांगण घेऊन हारला त्यावर जास्त आहे. ऐरवी २८० वगैरे धावा करून हारला असता तर लोकांनी ते ही अ‍ॅक्सेप्ट केले असते. पण तुम्ही अजिबात लढत न देता एकतर्फी मॅच हारतात तेव्हा लोकांना जास्त वाईट वाटते.
कोहलीने ऐतिहासिक घोडचूका यात केल्या आहे. जे सरळ सरळ जगभरातील लोकांना स्पष्ट कळले आहे.
एकीकडे अश्विन आणि जाडेजा अजिबात चालत नसताना देखील कोहली ने त्यांच्याकडून १०-१० षटक करून का घेतली हे सगळे विचारत आहे.
मागच्या सामन्यातील जोडी फोडणारा केदार जाधव याला ४०व्या ओवर नंतर गोलंदाजीला आणले. तो पर्यंत पाकिस्त्तानचे बॅट्समन एकदम सेट होऊन धावा प्रचंड काढल्या होत्या. मागच्या सामन्यात जाधवला बॉलिंग दे हा सल्ला धोनी ने दिला होता. आणि त्याचे कौतूक सुध्दा धोनीला मिळाले. बहुदा त्याचा राग कोहलीच्या मनात भरला. कारण मिडीयामधे धोनीला प्रचंड क्रेडीट मिळाले. कोहलीला ते पचले नसेल आणि अंतिम सामन्यात धोनीचा सल्ला त्याने रागात धुडकावला असेल. यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना मधल्या ओव्हर मधे ६ च्या आसपास धावगती आरामात राखता आली. या मधल्या ओव्हर मधे जाडेजा, अश्विन यांनी त्यांच्यावर अंकुश लावला नाही. अश्विन ने ६० चेंडूंपैकी किमान ५२-५४ चेंडू ने फलंदाजांच्या पायावर लेगसाईडला टाकले होते. अशाप्रकारच्या बॉलिंगमधे तो विकेट कसा मिळवणार होता? हे केवळ अश्विनच जाणे. मुळात मागच्या सामन्यात एकाही बांग्लादेशी फलंदाजांना त्याला आउट करता आले नव्हते तरी त्याला उमेश यादवच्या जागी अंतिम सामन्यात का घेतले? सामीला तर फक्त लंडन फिरवून आणायचे होते का?
१५व्या ओव्हर पासून ते ४० व्या ओवर पर्यंत कोहलीने एकदाही धावा रोखण्यासाठी अथवा विकेट घेण्यासाठी कुठलीही क्लुप्ती केली नाही.
जाधवला आणल्याबरोबर त्याने विकेट काढली. हेच जर त्याला २२-२३ व्या ओव्हर पासून लावला असता तर किमान एक दोन विकेट तरी मिळाली असती. कॉमेंटेटर पासून ते गल्लीत टिव्हीवर बघणार्‍या शेंबड्या पोरगा सुध्दा जाडेजा-अश्विन चालत नाही तु केदारला ओव्हर देऊन बघ असे टाहो फोडून बोलत होते. माझ्या मते पाकिस्तानी बॅट्समन सुध्दा तेच मनात म्हणत असतील. परंतू कोहलीचे काल मॅच मधे अजिबात लक्ष नव्हते. त्याने केदार नाही युवराज नाही कुणालाच वापरून बघितले नाही. त्याचा हट्टी स्वभाव त्यालाच नडला.
बॅटींग मधे ही तेच केले. एकदा जीवदान मिळाले तर दुसरा चेंडू शांतपणे खेळायचा सोडून त्याला सुध्दा अ‍ॅक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. ६ वर दोन आउट . मॅच मधे शांत उभे राहून ५० ओव्हर तरी खेळा असा सल्ला त्याने कुणाला दिला नसेल. जो तो "मीच बाजीराव" च्या आवेशात खेळायच्या मुड मधे होता. ओव्हलच्या खेळपट्टीवर या आधीही ३००+ धावांचा पाठलाग झाला आहे. पण कोणी खेळपट्टीवर उभे राहून खेळला तर. इथे लढवय्या फक्त हार्दिक पांड्या होता. संपुर्ण पाकिस्तानी संघाने ६ षटकार मारले होते. या पठ्ठ्याने एकट्याने ६ षटकार आणि ४ चौकार मारून पाकिस्तानच्या बॉलिंगच्या चिंधड्या उडवल्या. जाडेजाने ऐनवेळेस धावबाद करून उरलीसुरली आशा सुध्दा संपुष्टात आणली. खर तर त्यावेळी जाडेजाने स्वत;हून धावबाद झाला पाहिजे होता परंतू अत्यंत स्वार्थीपणा जाडेजाने त्यावेळेस दाखवला. पांड्या १५२ धावावर आउट झाल्यानंतर अवघ्या ६ धावांमधे ३ विकेट भारताने गमावल्या. त्यात जाडेजाचे कर्तुत्व अवघ्या ३ धावांचे होते. मग जाडेजाने स्वतःची विकेट वाचवून कोणता मोठा तीर मारला? हा प्रश्न जाडेजाला संघाने विशेषतः कोहलीने विचारायला हवे.
हे मान्य आहे कि पांड्या एकटा मॅच त्यावेळेस अजिबात वाचवू शकला नसता परंतू किमान संन्माननिय स्कोर तरी बोर्डावर लागण्याची एक आशा निर्माण झाली होती. हारलो परंतु फाईट देऊन हारलो हे एक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात बिंबले गेले असते.

जाउ द्या. झाले गेले गंगेस सिंधू नदिस मिळाले

खेळात जिंकणे हारणे चालूच असते परंतू लोकांचा राग भारत ज्या पध्दतीने अक्षरशः लोटांगण घेऊन हारला त्यावर जास्त आहे. ऐरवी २८० वगैरे धावा करून हारला असता तर लोकांनी ते ही अ‍ॅक्सेप्ट केले असते. पण तुम्ही अजिबात लढत न देता एकतर्फी मॅच हारतात तेव्हा लोकांना जास्त वाईट वाटते.
>> +१

अच्छा, तर,"तुम्हला क्रिकेटमधले काय कळते?" हा प्रश्न आपण विराट कोहलीला विचारु शकतो तर...

>>खेळात जिंकणे हारणे चालूच असते परंतू लोकांचा राग भारत ज्या पध्दतीने अक्षरशः लोटांगण घेऊन हारला त्यावर जास्त आहे. ऐरवी २८० वगैरे धावा करून हारला असता तर लोकांनी ते ही अ‍ॅक्सेप्ट केले असते. पण तुम्ही अजिबात लढत न देता एकतर्फी मॅच हारतात तेव्हा लोकांना जास्त वाईट वाटते.
अगदी.
खेळात जर तर या प्रश्णांना जागा नसते पण या पाकीस्तान संघा पेक्षा सर्वार्थाने महाप्रचंड अनुभव गाठीशी असलेल्या या भारतीय संघाकडून फारच बाळबोध चुका झाल्या हे पटत नाही, किंवा त्याची खंत आहे. मग त्या यादीत-
१. नाणेफेक जिंकल्यावर प्रतहम गोलंदाजी करणे... तेही अंतीम सामन्यात, तेही पाक फलंदाज पहिल्या फेरीत आपल्या वि. व सहसा, धावांचा पाठलाग करताना गडबडले होते.. गडबडतात..
२. अश्विन ची कारकिर्दी मधील सर्वात वाईट्ट गोलंदाजी सुरू असताना ईतर कसलेही प्रयत्न नकरणे- जाधव, युवी, ...? (खोचक मांजरेकर म्हणाला- अश्विन ने १० ओवेर्स मधील त्याचा शेवटचा चेंडू ऑफ स्पिन टाकला...!) Happy
३. देहबोली त्या एका नो बॉल नंतर जी नकारात्मक झाली ती अगदी स्समन्याचा शेवटचा चेंडू खेळेपर्यंत.
४. सर्व फलंदाज (पंड्या सोडून) अक्षरशः टी २० असल्यागत खेळत होते...
५. ज्या चेंडूवर धवन, जडेजा, जाधव बाद झाले ते चेंडू या लेव्हल ला फलंदाजांनी (सावधपणे) खेळून काढणे अपेक्षित आहे.
६. पहिले तीन गळल्यावर युवी, धोनी यांच्या ऊतार वयातील मर्यादा स्पष्टच होत्या... टी २० मधिल फटकेबाजी चार दिवसाची चांदनी आहे हे जाधव ला ऊमगले असावे.
७. संपूर्ण पाक चा संघ करो या मरो या भावनेने खेळत होता हे प्रत्येक चेंडूत दिसत होते... याऊलट आपला संघ (भुवी, पंड्या, शिखर, वगळता) बिना प्लॅन, बिना योजना, दिशाहीन खेळ करत होता.
८. दोन दिवस ऊन्हाने तावून सुलाखून निघालेल्या व कोरड्या खेळपट्टीवर ऊमेश यादव ला न घेता अश्विन ला घेणे तेही पाक विरुध्द हा निर्णय ज्याच्या डोक्यातून आला असेल त्या महाभागाबद्दल भयंकर कुतूहल आहे. (हा निर्णय कोहली चा नसावा आणि म्हणून मुद्दामून अश्विन ला १० षटके देण्याचा कूतडाव त्याने खेळला असावा अशी एक शंका आहे.... अश्विन ला हे ऊमगले असावे आणि परिणाम त्याने सर्व गोलंदाजी अक्षरशः बचावात्मक केली... दोघांमधील संवाद कुठेच दिसला नाही. तो आपला सिएस्के मधे असल्या सारखा धोनी बरोबर मसलत करत होता...
९. अश्विन, जडेजा कसोटि मधील परिणाम्कारक्र गोलंदाज असले तरी एकदिवसीय मधे ते ओव्ह रेटेड आहेत हे सत्य आहे.

मुळात आफ्रिका व बांगला विरुध्द सुमार गोलंदाजी च्या विरुध्द आपण जिंकलो होतो. तेच लंकेने आपल्या सुमार गोलंदाजी ची लक्तरे काढलीच होती... नेमकी हीच बाब पाक वि सामन्यात ऊघड झाली. ऊत्कृष्ट नाही तरी दर्जेदार गोलंदाजी विरूध्द फलंदाजांचे पानिपत... आणि सुमार गोलंदाजांची पाक ने काढलेली पिसे.

वर कोहली ने नंतर कर्णधारी आवेशत नंतर सांगितले: "अंतीम सामन्यात पोहचलो म्हणजे आम्ही चांगला खेळ केला याचा अभिमान आहे... "काय राव, एरवी स्पष्ट वक्ता व कठोर असलेल्या कोहली कडून इतक्या फाल्तू गुळचट ऊत्तराची अपेक्षा नव्हती.

खरे तर हा चषक जिंकल्यावर (तरी) युवी (निश्चीतच) व धोणी (कदाचित) एक दिवसीय मधून निव्रुत्ती जाहीर करतील अशी आशा होती. आता सगळेच मुसळ केरात.

ताकः रहाणे चे सांत्वन करणे राहूनच गेले... Happy

>>>> पण तुम्ही अजिबात लढत न देता एकतर्फी मॅच हारतात तेव्हा लोकांना जास्त वाईट वाटते. <<<< नक्कीच.
पण त्याहीपेक्षा झास्त खुपले/झोंबले ते म्हणजे, पंड्या एकतर्फी बॅटींग करतो नि ४३ बॉल मधे ७० रन करतो, तिकडे भुवनेश्वर इकॉनॉमी बॉलिंग करतो , बोलिंगला अति उशिरा बोलावुनही जाधव विकेटही घेतो मग बाकीच्यांनाच "कसली सामुहिक भितीची भ्रांती" वगैरे झाली होती, नाठ लागला होता, यावर मजसारख्या सामान्यजनाचा विश्वास बसत नाही.

खेळात जिंकणे हारणे चालूच असते परंतू लोकांचा राग भारत ज्या पध्दतीने अक्षरशः लोटांगण घेऊन हारला त्यावर जास्त आहे. ऐरवी २८० वगैरे धावा करून हारला असता तर लोकांनी ते ही अ‍ॅक्सेप्ट केले असते. पण तुम्ही अजिबात लढत न देता एकतर्फी मॅच हारतात तेव्हा लोकांना जास्त वाईट वाटते + १११

खरतर भूशन ह्यांची पुर्ण पोस्ट पटली.

>>Angry Pandya at Jadeja's Home
https://www.youtube.com/watch?v=ANsZ7-fQwzA&feature=share

भारीच.... Happy
जडेजा रन घ्यायला नक्कीच पुढे धावला होता... आणि ऊलट धावचीत झाल्यावर पंड्याला सुनवत होता... गल्ली मध्ये पोरं स्वताची विकेट जपतात तसे केवीलवाणे दृष्य होते ते. आयपिल, कॉन्ट्रॅक्ट्स, प्रसिध्दी, यामूळे हे जडेजा टाईप खेळाडू इतके डोक्यावर चढवेल जातात की खेळापेक्षा व संघापेक्षा त्यांना स्वताचे स्थान व भूमिका अधिक महत्वाची वाटू लागते...
काल चार भारतीय संघ खेळले असे वाटले:
धोनी, जडेजा, अश्विन
कोहली, पंड्या, भुवी
बाकी ऊर्वरीत मैदानावर
आणि ड्रेसींग मधिल 'थिंक टँक'
रहाणे ईतेही राहूनच गेला की... Happy

मी काय म्हणतो की एकदा जर्सीचा रंग बदलून ऑरेंज करून का बघत नाही ? किमान त्यांच्यामधे स्पुरण, वीररस काय ते तरी येईल. असेही देशात त्या रंगाचे फॅड आले आहे.
ऑरेंज नही अरेंज होत असेल तर खाकीही चालेल म्हणा.

ऑरेंज नही अरेंज होत असेल तर खाकीही चालेल म्हणा.

>>तुम्हाला सॅफ्रोन म्हणायचे काय? पाकिस्तानसोबत खेळतांना कम्पल्सरी सॅफ्रोन वगैरे पाहिजे असे निवेदन द्यायला हवे.

हो. साउथ आफ्रीका, ऑस्ट्रेलिया यांना दोन रंगाचे गणवेश आहे तसे काहीसे भारतीय टीम साठी असावे. बांग्लादेश, पाकिस्तान यांच्या विरुध्द खेळताना तो ' स्पुरण वीररस येण्यासाठी मंतरलेला विशिष्ट गणवेश" आणि इतर टीम सोबत खेळताना नेहमीचा निळा गणवेश.

भूषण योग, छान पोस्ट !

मॅचफिक्सिंग ही कमी अधिक प्रमाणात असतेच. पण दरवेळी सामन्याचा निकाल ठरवणारी असते असे नसते. पण आपण हरतो तेव्हाच आपल्याला ती ईत्र तित्र सर्वत्र दिसू लागते.
जेव्हा शंभर ओवरचा सामना खेळला जातो तेव्हा दोन्ही बाजूंकडून कैक चुका घडल्या जातात. जो संघ हरतो त्याकडून काही चुका जास्त घडतात. अर्थात म्हणूनच तो संघ हरतो. फकत हरल्यानंतर त्या मनस्थितीत असताना त्या अश्या पद्धतीने दाखवल्या गेल्या तर मॅच फिक्सिंगच आहे हे सहज पटते. म्हणजे अमावस्येच्या रात्री एखाद्याला काळोखात नेऊन कानामध्ये भूताच्या गोष्टी सांगितल्या तर परतताना तो आपल्या सावलीलाही भूत समजू लागतो तसेच काहीसे हे असते.

कमॉन आता तरी मान्य करा... पाकिस्तान्यांनी आपल्यापेक्षा सरस खेळ केला.
कमॉन आता तरी मान्य करा... मी भवानेच्या आहारी न जाता माझ्या क्रिकेटच्या ज्ञानावर आधारीत बांधलेला अंदाज खरा ठरला.

तो मोहम्मद आमीरने मागेही २०-२० आशिया चषकात आपल्या तीन विकेट स्वस्तात काढलेल्या. तेव्हा त्याला चारच ओवर असल्याने आणि टार्गेट ८०-८५ असल्याने वाचलेलो.
या मालिकेतही पहिल्याच सामन्यात पहिल्याच ओवरला शर्मा पुर्णपणे चाचपडत खेळत होता. नशिबाने तेव्हा विकेट पडली नाही, पण फायनलच्या प्रेशरमध्ये चेस करताना ती पडणारच होती. आणि ती पडताच मागोमाग आणखी काही धडाधड पडल्याच.
तसेच मी आधीच म्हटल्याप्रमाणे फकहर झमान! त्याची मोठी खेळी मास्टरस्ट्रोक ठरणार होती आणि तो चालता आपण हरणारच होतो. (मास्टरस्ट्रोक वरून आठवले, मी कोहलीच्या जागी असतो तर आश्विन किंवा जडेजाच्या जागी कुलदीप यादवला मास्टरस्ट्रोक म्हणून खेळवला असता, असो!)
कबूल करा आतातरी की पाकिस्तानच डिजर्व्हिंग टीम होती. आपण काही बांग्लादेश वा झिम्बाब्वेकडून हरलोय, अपसेट झालाय असे रिअ‍ॅक्ट करू नका. स्पोर्ट्समन स्पिरीट दाखवा आणि त्या दिवसाच्या सुरुवातीलाच पाकिस्तान संघ आपल्यापेक्षा चांगल्या लयीत होता आणि संतुलित होता हे कबूल करा.

बाकी पाकिस्तानी जनतेच्या आनंदात सहभागी व्हा वगैरे मलाही नाही पटले. अर्थात हे चूक की बरोबर हे माहीत नाही, पण ईतना बडा दिल नही है अपना. फक्त मला कल्पना होती की त्या सामन्यात पाकिस्तानी संघच फेव्हरेट होता म्हणून त्रास कमी झाला ईतकेच.

२०१९ च्या विश्वचषकाची तयारी म्हणून एकदिवसीयमध्ये कोहलीची कप्तानी काढा आणि धोनीला द्या.
धोनी हा कप्तान आणि यष्टीरक्षक म्हणून या फॉर्मेटमध्ये ईतका उपयुक्त आहे की त्याची फलंदाजी बोनस समजली तरी तो २०१९ सालाच्या अंतापर्यंत अकरात स्थान मिळवू शकतो. पण त्या आधी तो आपल्याला आणखी एक वर्ल्डकप मिळवून देईल हे महत्वाचे.
तरी तो कोण्या रिषभ पंतची जागा अडवून बसलाय असे वाटत असेल तर त्याला निव्वळ फलंदाज म्हणून खेळवा, पण किपिंगमध्ये धोनी स्टंपकडे पाठ करून उभा राहिला तरी त्यासारखे चपळ यष्टीरक्षण कोणाले जमणार नाही.
मला तर किव येतेय ज्या कोणाचे हे डोके आहे त्याची, धोनीसारखा खेळाडू तुमच्या संघात असताना तुम्ही कर्णधारपद ईतर कोणाला देऊच कसे शकता? कोहली एक आक्रमक खेळाडू आहे हे त्याला कप्तानी देण्यासाठी खरेच पुरेसे आहे???

>>कमॉन आता तरी मान्य करा... पाकिस्तान्यांनी आपल्यापेक्षा सरस खेळ केला.<<

चूक. आपण कागदावर्/मैदानावर त्यांच्यापेक्षा सरस असुनहि बकवास खेळलो असं म्हण हवंतर. पहिली बॅटिग घेउन ३००/३५० चं लक्ष त्यांना दिल्यावर त्यांनी तो स्कोर चेस करुन मॅच जिंकली असती तर तुझं वरचं वाक्य बरोबर होतं...

कमॉन आता तरी मान्य करा... पाकिस्तान्यांनी आपल्यापेक्षा सरस खेळ केला. >> ते मान्य करण्यासाठी तुमच्या परमिशनची गरज नाही.

कमॉन आता तरी मान्य करा... मी भवानेच्या आहारी न जाता माझ्या क्रिकेटच्या ज्ञानावर आधारीत बांधलेला अंदाज खरा ठरला. >>> तुम्ही हा धागा ऊघडून जे केले त्याच्या अगदी ऊलटे विधान आहे हे.... चोराच्या ऊलट्या बोंबा टाईप्स.
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy >>>> पाकिस्तान जिंकेल असे वाटणे आणि पाकिस्तान जिंकावा असं वाटणे ह्यात फरक आहे ऋन्मेष भाऊ.

पाकिस्तानी सुद्धा ज्याला विश्वास वाटत असेल भारताची स्ट्राँग टीम जिंकेल त्याने सुद्धा पाकिस्तानला सपोर्ट करणं सोडलं नसेल, अगदी शिव्या देत का होईना.
मुलगा नापास होणार असेल तर त्याला डिसओन करणारा बाप त्या बाप-मुलगा नात्यावर कलंक असेल. तसेच तुम्ही तुमच्या कृतीतून ईथे दाखवून दिले आहे.

तुम्ही 'पाकिस्तान जिंकेल' असे म्हंटला असता तर त्याचे अ‍ॅनालिसिस देण्यासाठी क्रिकेटचा चालू असलेला धागा पुरेसा होता. पण सनसनाटी स्टेट्मेंट करत ईथले पाणी गढूळ करणे ही तुमची नेहमीची सडकी मानसिकता तुम्ही धागा काढला तेव्हाच दाखवून दिली . वरती जे अ‍ॅनालिसिस दिलेले आहे ते ब्रेनलेस आहे असे पाकिस्तानातल्या कुणीही मॅचच्या आधी सुद्धा सांगितले असते. तुम्ही सांगितले म्हणून मॅचच्या आधी पाकिस्तान जिंकायचा चान्स वाढला नाही तो तेव्हाही ५०% च होता आणि आज, ऊद्या केव्हाही मॅच झाली तरी तो ५०% च असणार आहे.

भारत कितीही वाईट प्रकारे हरणार असेल, हरत असेल किंवा हरला असेल तरीही सच्चा भारतीय फॅन सपोर्ट करीतंच राहिल, मग समोर पाकिस्तान असो वा विंडिज वा न्यूझीलंड. तो त्रागा करेल, शिव्या शाप देईल, तटस्थ राहिल पण भारताची टीम खेळत असतांना दुसर्‍या टीमला सपोर्ट करणार नाही.
ऊगा मला मनातून भारत जिंकावा वाटत होते म्हणून पुन्हा 'गिरे भी तो' ताईप लिहू नका.
आधी म्हंटले तसे तुम्हाला कुणाला सपोर्ट करायचे ती तुमची मर्जी.. पण फार वाईट वाटते तुमच्यासारख्या मानसिकतेचे लोक बघून.

Pages