जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सांगितले म्हणून मॅचच्या आधी पाकिस्तान जिंकायचा चान्स वाढला नाही तो तेव्हाही ५०% च होता आणि आज, ऊद्या केव्हाही मॅच झाली तरी तो ५०% च असणार आहे.
>>>>>>

ही प्रोबॅबिलिटी टॉसला लागू होते, जिथे छापा किंवा काटा पडायची संधी समान असते. दोन संघातील क्रिकेट सामन्याला नाही. आणि म्हणूनच तर ईथे नेमका अंदाज बांधायला क्रिकेटींग ब्रेनची गरज लागते. अन्यथा निव्वळ जुगार राहिला असता Happy

मी बोल्लो म्हणून पाकिस्तान जिंकायची संधी वाढली नाही, मला माझे क्रिकेटचे ज्ञान सांगत होते की पाकिस्तान सामन्याआधी फेव्हरेट आहे. अर्थात मी काही मायबोलीवर एकटाच किंवा सर्वात श्रेष्ट क्रिकेट तज्ञ नाही. किंबहुना माझ्यापेक्षा शंभरपट क्रिकेट समजणारे ईथेच त्या पलीकडच्या क्रिकेटच्या धाग्यावर सापडतील. त्यांनाही हे सत्य आतून माहीत असणारच. फक्त मला भावना न्यूट्रल करून विचार करणे आणि तो इथे मांडणे जमले ईतकेच.

बाकी मला तर अंबानीची मुंबई ईंडियन्स जिंकली तरी आनंद होतो कारण मी मुंबईकर आहे, तर भारताचाच संघ जिंकला तर का नाही होणार. राष्ट्रप्रेम तर फार मोठी भावना झाली. माझा महाराष्ट्र, आमची मुंबई, आपली गल्ली, आपली कॉलनी वगैरे वगैरे प्रांतवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या अंगात भिनलेला असतोच. तर समोर पाकिस्तान वा ईंग्लंड नामक शत्रू असो वा आफ्रिका ऑस्ट्रेलिया नामक मित्र असो, प्रत्येकाला आपलाच भारतीय संघ जिंकल्यावर आनंद होणे स्वाभाविकच आहे. मलाही तो होतोच. आणि हरल्यावर दुख. मात्र मी सपोर्ट नेहमीच डिजर्व्हिंग संघाला करतो. गरज असते ती खेळभावना देशभावनेच्या वरचढ न्यायची. अर्थात देशभावना महत्वाची की खेळभावना महत्वाची हा ईथे चर्चेचा / वादाचा विषय होऊ शकतो. यावर चर्चा करायची असल्यास स्वागत आहे Happy

नानाकळा, नक्की काय घुमवत आहे? ईथे तुम्ही लोकं शून्य पुरावा देत मॅचफिक्सिंगचे आरोप करत आहात ते योग्य आहे का? मी मुद्दाम आरोप हा शब्द वापरला आहे कारण बरीच विधाने शंका व्यक्त करणारी नाहीत तर फिक्सिंग झालीय हे खात्रीच आहे अश्या टोनमध्ये आहेत.

एखादा भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध पैसे खाऊन हरेल हे शक्य आहे???
तुम्ही त्या खेळाडूंना देशद्रोही बोलत आहात..

राज,
>>>>>
चूक. आपण कागदावर्/मैदानावर त्यांच्यापेक्षा सरस असुनहि बकवास खेळलो असं म्हण हवंतर. पहिली बॅटिग घेउन ३००/३५० चं लक्ष त्यांना दिल्यावर त्यांनी तो स्कोर चेस करुन मॅच जिंकली असती तर तुझं वरचं वाक्य बरोबर होतं...
>>>>>>>

हे काय लॉजिक आहे मला समजले नाही. बॉलीवूड हिण्दी फिल्म मेण्टेलिटी झाली ही. म्हणजे आधी व्हिलनने हिरोला बुकलून काढावे. मग हिरोने उसळून त्याची धुलाई करावी. मगच तो हिरो. पहिल्यापासूनच बुकलला तर हिरो ग्रेट नाही तर व्हिलनच फुसका होता समजावे.

त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आपल्यापेक्षा सरस खेळ केला हे मान्य करा. बहोत बडा कलेजा लगता है सर, शत्रूचे कौतुक करायला Happy

एखादा भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध पैसे खाऊन हरेल हे शक्य आहे???

>> ऋन्मेष, हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय ना, यात जो विश्वास व्यक्त केलाय ना, त्यावरच ह्या लोकांचा धंदा चालु आहे. एकदा का हा विश्वास डळमळीत झाला की क्रिकेटचा धंदा बंद.

आपल्याला शक्य वाटत नाही अशा अनेक गोष्टी होतात जगात, आपण विश्वास ठेवतो तेवढ्यात आणि तशाच गोष्टी घडत नसतात. घटना आपण विश्वास ठेवतो की नाही यावर अवलंबून नसतात.

जे घडते ते तुमच्यापर्यंत पोचलं तर तुम्ही कशाला क्रिकेटची भक्ती कराल? हे लोक काय जाहिरात करुन सांगतील बघा बघा, मला इतके पैसे मिळाले आणि हा मी असा कॅच दिला म्हणुन....

बाकी देशद्रोही वगैरे फारफेच्ड संकल्पना आहे. ह्या बीसीसीआयच्या टीम असतात, देशाच्या नव्हे. बीसीसीआय तद्दन धंदेवाईक कंपनी आहे. आयसीसी सुद्धा. बडे भांडवलदार चालवतात ती, राजकारणी सामील आहेत.

-----------------------
तरी खरोखर जाणून घ्यायची तळमळ असेल तर बेटींग करायला सुरुवात करा. सट्टा खेळा, मग तुम्हाला ते सट्ट्यावाले लोक भेटतील, ते लोक भेटले की थोडीफार ओळख होइल पडद्यामागील जगाची.

आणि क्रिकेटच्या फॅन्स ना ज्यांना ह्या फिक्सिंग चा राग येतो, त्यांनी क्रिकेटसंघ व त्यांचे सामने यांच्यापलिकडे जाऊन सगळ्या क्रिकेट संघटना व एकूण व्यवस्था याबद्दल पण अभ्यास वाढवावा.

<<<<<कमॉन आता तरी मान्य करा... पाकिस्तान्यांनी आपल्यापेक्षा सरस खेळ केला. <<<<
हे कसे काय मान्य करु? माझ्या गल्लीतील पोराटोरांचा खेळ बघता अन मॅच मधिल पाकिंची बॉलिंग निरखुन बघता, आमच्या गल्लीतील पोराटोरांनीही पाकिस्तान्यांची बॉलिंग झोडपुन काढली असति याची मला खात्री आहे ! Proud
अगदी पंड्या स्टाईलने नाही, पण धुतली असती नक्की.
पूर्वी अकराजणांच्या संघात, आठ/नऊ पंड्या-भुवनेश्वर-जाधव असायचे..... बाकीचे २/३ अपवाद
काळ बदलला....
हल्ली अकराजणांच्या संघात एखाददोनतिन पंड्या-भुवनेश्वर-जाधव असतात ! ... बाकीचे ८/९ अपवाद
असा माझा नि:ष्कर्ष आहे.

ऋम्न्या, आधीच पनवती लावलेलीस ना तु Angry
काल मी इथे नव्हते बरीच धुमशान झालीय.
पण एकदम भिकार खेळ होता आपल्या खेळाडुंचा.
दोन्ही वेळी. काय ते नोबॉल वर नो बॉल ट्कत होते.

नंतर आम्ही आम्च्या वॉअ‍ॅप ग्रुपांमधे कोट टाकलेली
' एक नो बॉलकी किमत तुम क्या जानो विराट बाबु' Lol

इथे लाईनीच्या बाहेर पाय टाकला तर अख्खे रामायण घडले, मग मॅचचे काय घेऊन बसलात! इती कस्सकाय सौजन्य पोस्ट.

अझरुद्दीन माझा जाम आवडता खेळाडु, पण त्याने फिक्सींग केलय हे बघुन फार वाईट वाटले. मला वाटते की त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला होता. हॅन्सी क्रोनिए तर फिक्सींगचा कबुली जवाब देताना ढसाढासा रडला होता असे लोकप्रभात वाचले होते. ( हॅन्सीच्या अपघाता आधी ती मुलाखात होती)

काल एका न्युज चैनेल वर दाखवलं जेव्हा आपली सर्व टिम ड्रेसिंग रुम मध्ये जात होते त्यावेळि एक पाकिस्तानि समर्थक त्यांना काहितरि बडबडत होता विराट, रोहित व बाकिच्यांनि त्याच्याकडे लक्ष दिले नाहि मात्र महम्मद शामि त्याला डायरे़क्ट जाऊन भिडला. धोनिने मध्यस्थि करुन शामि ला आत नेले. पण त्या पाकिस्तानि समर्थकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला. त्यामुळे शामि हि हार्दिकसोबत विमानाने येणार आणि बाकि सगळे चालत .... Lol

काल एका न्युज चैनेल वर दाखवलं जेव्हा आपली सर्व टिम ड्रेसिंग रुम मध्ये जात होते त्यावेळि एक पाकिस्तानि समर्थक त्यांना काहितरि बडबडत होता विराट, रोहित व बाकिच्यांनि त्याच्याकडे लक्ष दिले नाहि मात्र महम्मद शामि त्याला डायरे़क्ट जाऊन भिडला. धोनिने मध्यस्थि करुन शामि ला आत नेले. >>>>> दोघांचा निषेध आणि दोघांचे समर्थन

मुळात "बाप है तुम्हारे" असे डोक्यात हवा गेलेले न्युज टिव्ही अँकर , सेहवाग सारख्या वाचाळवीरांनी पसरवले आहे. पहिल्या मॅच नंतर सेहवाग आणि त्याची वाचाळकंपनी यांनी अगदी कहर केला होता. टिव्ही शो, डिबेट, कॉमेंट्री (मग ती कुठल्याही सामन्याची असो अगदी ऑस्ट्रेलिया - न्युझीलंडची का असेना) नको तिथे सतत स्वतःची लाल करून घेण्यासारखा प्रकार सेहवाग आणि इतरजण करत होते. पाकिस्तान आपल्याला हरवू शकतच नाही असा काहीसा गर्व अश्या "बाहेरच्या लोकांचा" झाला होता. त्यामुळे जेव्हा पलटवार करण्याची वेळ आली ती वेळ त्या पाकिस्तानीने अचूक साधली परंतू चुकिच्या व्यक्तीवर साधली असे म्हणावे लागेल.

दोन्ही टिम मधल्या खेळांडूंमधे वैयक्तिक काहीही भेदभाव दिसले नाही. मैदानावर अग्रेशन कितीही दाखवले तरी ड्रेसिंग रुम मधे वातावरण वेगळे असते. ज्या विराटने आमिरला स्वतःची बॅट भेट केली तो आमिर "मी याची विकेट स्वस्तात काढून दाखवतो" असे जाहीर आव्हान करतो. जो सर्फराज मैदानावर भारतीय फलदांजाची विकेट कशी मिळेल , कशा प्रकारे स्लेजिंग करायचे इ. विचार करत असतो तोच सर्फराज ड्रेसिंग रुम मधे स्वतःचा मुलगा बिंधास्तपणे धोनीच्या हाती सोपवतो. तर सामन्याच्या शेवटी "मी तुझा कॅच कसा सोडला?" याचे प्रात्यक्षित अली खुद्द विराट कोहलीला हसत हसत दाखवत होता. हा एक प्रकारचा प्रत्येक खेळाडूंमधे बाँड आहे. मग ते खेळाडू कुठल्याही देशाचे असो.

पण हा बाँड मैदानाच्या बाहेरच्या लोकांना दिसत नाही अथवा ते कळून घेत नाही. त्यांच्या मते कोहली ने कॅच घेतल्यावर मुश्कफिकूर याला जिभल्या दाखवल्या म्हणजे दोघांमधे प्रचंड शत्रुत्व आहे. आणि त्याचा बदला आमिर ने कोहलीची विकेट घेतल्यावर घेतला. कारण दोघे मुसलमान. अशी काहीशी खुळचट कल्पना बाहेरच्या दोन्ही बाजुंच्या लोकांची झालेली आहे. जे सेहवाग, अख्तर यांनी बीयांना रुजवले त्याची फळे संघातील खेळाडूंना मिळत आहे.
हीच मॅच जर भारताने जिंकली असती तर भारतीय लोकांनी सुद्धा पाकिस्तानी खेळाडूंना अशाच प्रकारे विचारले असते. पुढच्या मॅचच्या वेळीस असा किंबहूना याहून जास्त वात्रट प्रकार होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. या बाहेरच्या लोकांनीच खेळाला एका युध्दाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे ज्या वेळेस आपण जिंकू तेव्हा आपण त्यांची खिल्ली उडवणार आणि ज्या वेळेस ते जिंकतील तेव्हा ते खिल्ली उडवतील. याला काही पर्याय सध्याच्या वातावरणात तरी दिसत नाही.

लिंबूटिण्बू, गल्ली क्रिकेटचे सांगू नका. गल्ली क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये आजवर मी अपवादानेच बाद झालोय. सगळे दक्षिण मुंबईतील बॉलर माझ्यासमोर गुडघे टेकून झालेत. ऋन्मेष ओपनिंगला जाणार आणि 15-20 ओवरची जी काय मॅच आहे ती नाबाद फटकावून येणार, यापेक्षा काही वेगळे घडले तर ती न्यूज बनायची आणि मुंबई चौफेर मध्ये यायची. मला दमुचा सचिन, दादा, ते धोनी आणि लेटेस्ट कोहली अशी सारी नावे पडून झाली आहेत. पण मी कधी स्वत:ची तुलना त्यांच्याशी नाही केली. कारण गल्ली क्रिकेट वेगळे आणि आंतरराष्ट्रीय वेगळे, हे मॅच्युरटी येताच समजते. तुम्हाला लांबून बघताना त्यांची फटकेबाजी तुफान वाटली तरी त्या गल्लीतल्या पोरांना स्वताला आपली मर्यादा माहीत असतेच. नाहीतर या मायानगरीत चला मुरारी हिरो बनने फिल्मसिटीत लाईन लागतात तश्या आयपीएल मालकांच्या दरबारी लाईन लागल्या असत्या..

असो,

नानाकळा, आपले उत्तर जरा वेळाने देतो...

>>हे काय लॉजिक आहे मला समजले नाही.<<

ते "त्यांनी सरस खेळ केला" या तुझ्या निष्कर्षावरचं उत्तर आहे.

नोबॉल्सची उधळण करणे, मोक्याचा वेळी क्लच बोलर न आणने, लाइफ मिळाल्यावर दुसर्‍याच बॉलला पॉइंटला हलवा देणे, इ. गोष्टी त्यांनी सरस खेळ केला ऐवजी यांनी बकवास खेळ केला या कॅटेगरीत मोडतात. आणि चूक म्हणावी तर टॉस जिंकुनहि बॅटिंग विकेटवर प्रथम बॅटिंग न घेणे, या मागचं कारण काय असावं बरं?

कुठे?

पण हि शंका उद्भवायला बॉय्कॉट असणं जरुरी नाहि... फिदी:

ओव्हल वर ५-६ वेळा ३२५+ धावांचा पाठलाग झाला आहे. त्यामुळे टॉस जिंकून बॉलिंग घेतली असेल. आणि जेव्हा तुमच्याकडे स्ट्राँग बॅटींग असेल तेव्हा पाठलाग करणे केव्हाही सोपे पडते

हो, पण कागदावर बर्‍याच वेळा मजबूत असलेली भारतीय फलंदाजी प्रत्यक्षात कशी फोल ठरते हे बर्‍याच वेळा सिद्ध पण झाले आहे. हार्दिक पंड्याने राहुल द्रविडची उणीव भरुन काढली.

हो, जेफ्री असणे जरुरी नाही हे खरे आहे. पण आपण सामान्य प्रेक्षक तर जेफ्री अनूभवी क्रिकेटर, बरोबर ना? काय आहे की सोनारानेच कान टोचलेले बरे असतात.

, पण कागदावर बर्‍याच वेळा मजबूत असलेली भारतीय फलंदाजी प्रत्यक्षात कशी फोल ठरते हे बर्‍याच वेळा सिद्ध पण झाले >> म्हणून विश्वास ठेवायचाच नाही असा काही नियम तर नाही उलट या स्पर्धेत आपली ओपनिंग १००+ ३-४ वेळा झाली होती. त्यामुळे मागील फलंदाजांना स्वींग कमी मिळत होता. त्याचा फायदा उचलून विराट युवी यांनी चांगली फटाकेबाजी केली.
उलट सकाळच्या वातावरणात स्विंग असल्यामुळे तिथे पाकिस्तानचे बॉलर जास्त चालण्याची भिती कोहलीला असेलच.

नानाकळा,

{{{ बाकी देशद्रोही वगैरे फारफेच्ड संकल्पना आहे. ह्या बीसीसीआयच्या टीम असतात, देशाच्या नव्हे. बीसीसीआय तद्दन धंदेवाईक कंपनी आहे. आयसीसी सुद्धा. बडे भांडवलदार चालवतात ती, राजकारणी सामील आहेत. }}}

हे तुम्ही मध्य प्रदेश पोलिसांना सांगाल का?

http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhya-pradesh-15-arrested-for-...

दुसर्‍या राष्ट्रचा विजय साजरा केल्यावर डायरेक्ट द्रेशद्रोही कलम ? Uhoh एमी अजब है सबसे गजब है.

नशिब आयपीएलमधे मध्यप्रदेशची टीम नाही अन्यथा कोलकता, बंगलोर, मुंबई यांच्या टीम जिंकल्यावर तर अर्ध्या मध्यप्रदेशावर देशद्रोहाचा आरोप लागेल.

---------------------
तरी खरोखर जाणून घ्यायची तळमळ असेल तर बेटींग करायला सुरुवात करा. सट्टा खेळा, मग तुम्हाला ते सट्ट्यावाले लोक भेटतील, ते लोक भेटले की थोडीफार ओळख होइल पडद्यामागील जगाची. >>>>>>> +11111

हे तुम्ही मध्य प्रदेश पोलिसांना सांगाल का?

>>> बिपिन, देशाचा आणी आमचा काहीही संबंध नाही असे स्वतः बीसीसीआय ने कोर्टात सांगितले हो, मी कशाला वेगळे सांगू पोलिसांना. नैका?

आणि ते लोक जे पकडलेत ती बातमी खरी असली तरी कोर्टात टीकणार नाही. कोण्या दुसर्‍या देशाचा (?) खरेतर दुसर्‍या बोर्डाच्या क्रिकेटटीमचा विजय साजरा करणे देशद्रोह मानला जाणार नाही. ह्या तथाकथित नुकत्याच उगवलेल्या देशभक्तांनी देशद्रोह शब्दाचे काही महत्त्व होते ते घालवल्याने असे वाटणे तुम्हाला साहजिक आहे. पण कोर्टात टिकणार नाही.

मला नाही आवडलेले पाकचा जल्लोष भारतात केलेला...
हेच जर पाकिस्तानमधील कोणी केले असते तर बातमी आणि माणुस दोन्ही दिसले नसते...
मी मुस्लिम किंवा पाकिस्तान विरोधी नाही पण भारत समर्थक आहे. त्यांच्या विजयाचं वाईट वाटावं ईतक्या कोत्या मनाची मी नाही पण त्यांचा जल्लोष इथे का? हे मला रुचणारे नाही.

नानाकळा,

संघ जरी बीसीसीआयचा असला तरी भारतातर्फे आणि कुठला दुसरा संघ खेळायला जात नसल्याने त्यालाच "भारतीय संघ" / "टीम इंडिया" संबोदधले जाते. याच लॉजिकने "फेमिना मिस इंडिया" देखील "मिस इंडिया" ठरते.

विराट =माज
धोनी = केव्हाच संपलेला एक फलंदाज
युवराज = अपरिपक्वता
शिखर धवन = आत्तापर्यंत खेळलो ना? मग आता काय?
रोहित शर्मा = आपण संघात का आहोत, आपल्याला ओपनिंगला का पाठवतात ह्याबद्दल अनभिज्ञ असलेला खेळाडू

बुमराह - "आज लक दिसत नाही"
अश्विन = फलंदाज तीन फूट डावीकडे किंवा उजवीकडे का उभे राहत आहेत? तेही स्टंपच्या बरोब्बर पुढे??

मीडिया = पाकिस्तान बच्चा है

आम नागरीक = हरतोय का आपण? चला, भाजी आणायला जाऊ

संघ जरी बीसीसीआयचा असला तरी भारतातर्फे आणि कुठला दुसरा संघ खेळायला जात नसल्याने त्यालाच "भारतीय संघ" / "टीम इंडिया" संबोदधले जाते. याच लॉजिकने "फेमिना मिस इंडिया" देखील "मिस इंडिया" ठरते.

>> लेम लॉजिक. फॅक्ट्स समोर ठेवल्या की असे टूकार तर्क देणार काय? एक काहीतरी फिक्स करा. एकतर फॅक्ट्स वर बोला नाही तर भावनेवर. इतके जनतेला देशाचेच पडलेले असते तर इतर खेळांमध्येही जिथे कुठे आपण देश म्हणून खेळतोय त्यालाही सपोर्ट मनापासून केला असता. आधी क्रिकेटचा बाण मारायचा आणि मग तो जिथे लागेल त्याला गोल करुन देशप्रेम म्हणायचं अशी बेगडी देशभक्ती क्रिकेटभक्तांची... नका सांगू कौतुक.. लोल!

क्रिकेटप्लेयर्स ना वर्ल्डकप आणला म्हणून डॉक्यावर घेणार्‍या जनतेच्या देशात कबड्डीप्लेयर वर्ल्डकप घेऊन येतात तेव्हा देशभक्ती उचंबळून येत नाही कोणाची, तेव्हा मात्र वर्ल्डकप हातात घेऊन तासंतास रिक्षाची वाट पहावी लागते, कोणी रिसिव करायलाही जात नाही या देशभक्तांनी ठासून भरलेल्या देशात. सानिया मिर्झा देशाची मान उंचावते तेव्हा हेच देशप्रेमी तिला वाह्यात नावे ठेवत असतात. इतकेच देशाबद्दल प्रेम असते तर सुनिल छेत्री ला लोकांनी डोक्यावर घेऊन नाचवले असते. काल भारत क्रिकेट मध्ये हरला म्हणून नाहीतर ह्या बेगड्या देशप्रेमींना नाइलाजाने हॉकीतला विजय साजरा करायची वेळ आली नसती. त्यांना ते माहितही नसते झाले. श्रीकांतने काय कारनामे केले ते बाप-बेटा जोक्सपेक्षा जास्त प्रमाणात व्हॉट्सप ट्विटरवर फिरले असते.

या लोकांची भक्ती फक्त क्रिकेटवर आहे, उगाच देशप्रेमाची झूल पांघरुन आपल्या टूकार क्रिकेटप्रेमाची बाजू सावरायला देश देश आळवत असतात.

बाकी राहिला फेमिना मिस इंडियाचा प्रश्न. तर अशी स्पर्धा तुम्ही मी कोणीही सुरु करु शकतो. फेमिनाची मालकी नाहीये देशातल्या मुलींवर... काहीही? आणि फेमिना मिस इंडीया म्हणजे भारतातली सर्वात सुंदर मुलगी असते का? भारतातली सर्वात सुंदर मुलगी कुठेतरी नांगर हाकत असते बांधावर, तिला या फेमिना मिस इंडियामध्ये जागा नाही. सो डोन्ट टेक थिन्ग्स फॉर ग्रान्टेड.

Pages