जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॠन्मेष तसा फार चिवट आहे. तो शेपूट ताणुन ताणुन कुठे पण नेऊ शकतो. नाना येऊ देत नाही तर अण्णा, अप्पा, गोलगप्पा येऊ देत. तो रात्री ३ पर्यंत जागुन तुम्हाला उत्तरे देत बसेल.:दिवा:

जो पर्यंत नानाकळा फायनलच्या सामन्यावर केलेला मॅचफिक्सिंगचा आरोप मागे घेत नाहीत, आणि पाकिस्तान मी अंदाज वर्तवल्याप्रमाणेच सरस खेळ करून जिण्कली आहे न की कुठल्या मॅच फिक्सिंग की बदौलत हे सिद्ध होत नाही तो पर्यंत मी तरी या खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहणार. सामन्याचा निकाल महत्वाचा. वैयक्तिक शतक झाले म्हणून खुश होणारयातला मी नाही.

तुम्ही म्हणत आहात, बारा वर्षे हिमालयात जाऊन तपस्या कर देव दिसेल.
>> बरोबर.

मी विचारले, तुम्ही ती तपस्या केली आहे का?
>> बरोबर.

तर तुम्ही म्हणत आहात, माझा विश्वास तपस्या न करताच आहे. तुच जा.
>> चूक. मी तपस्या केलीये, मला देव दिसलाय, तीच तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही 'मला देव दिसल्या'चे पुरावे मागताय. ज्याचा त्याचा देव त्याने त्याने तपस्या करुन बघावा लागतो हेच मी सांगतोय. अध्यात्म चर्चेचा किंवा विश्वासाचा नाही अनुभवाचा विषय आहे.

Happy

ओके..
म्हणजे कोर्टातही तुम्ही तेच बोलणार, न्यायाधीश महोदय. माझ्याकडे पुरावा आहे, पण तुम्हाला हवा असेल तर अमुक तमुक बारा वर्षांची तपस्या स्वत: करा.. बरोबर ना ..
मग त्या केसशी संबंधित वकीलांनाही केस लढवण्यासाठी खरे काय ते जाणून घ्यायला ती तपस्या करायला लागणार.. मग न्यायाधीशाने ती तपस्या करत पुरावा मिळवून निकाल देताच केस वरच्या कोर्टात जाणार..
मग त्या कोर्टाच्या नायाधीशाला पुन्हा स्वत: पुरावे मिळवायला पुन्हा पहिल्यापासून तपस्या करायला लागणार.. पुन्हा त्या केसशी संबंधित सर्व लोकांन तपस्या करावी लागणार..
मग पुन्हा केस वरच्या कोर्टात जाणार...
असे करता राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज जाणार.. मग राष्ट्रपतींना ती तपस्या करावी लागणार..
कारण मॅच फिक्सिंगचा पुरावा हा स्वत: घ्यायचा अनुभव आहे Happy

काही चुकत असेल तर पुन्हा कर्रेक्ट करा

कोर्टात कुणाला जायचंय? कोण बोललं होतं की मी कोर्टात जाईन....?

'कोर्टात जायचं असेल तर पुरावे स्वतः गोळा करा' असे म्हणलो. पुरावे नाहीत असे बोललोच नाही मी. पुरावे आहेत, ज्याला कोर्टात जाऊन लढेन बिढेन ची खुमखुमी आहे त्याने खुशाल पुरावे गोळा करावे आणि जावं कोर्टात. इथे कोर्ट चालू आहे का मायबोलीवर...? काहीही?

नुसत्या फुकाचा राणा भीमदेवी गर्जना करायला कुणाचं काय जातंय?

बरं कोर्टात मी जाईन. जातील शे चारशे रुपये गाडीभाड्याचे. पण माझा मुद्दा असा आहे की मॅच फिक्सिंगचे पुरावे जर अश्या स्वरुपात मिळत असतील की जे आपल्याला मिळाल्यावर समोरच्याला देता येत नसतील, ज्याचा त्याचा अनुभव ज्याने त्यानेच घ्यायचा असतो, तर मग मी ते पुरावे जमवून कोर्टात गेलो तरी ते त्यांना देता येणार नाहीच..... पुढे आता वरची पोस्ट पुन्हा वाचा.

फक्त एक प्रश्न पडलाय, हे असे असताना आधी ज्यांनी फिक्सिंग केलीय त्यांना शिक्षा कशी मिळाली?

अवांतर - सामान्य माणसांनी कोर्टात जाणे म्हणजे काहीतरी धाडस करण्यासारखे आहे असे जे काही आपल्या काही वाक्यात दिसतेय ते चुकीचे आहे. भारतीय पोलिसांची आणि कोर्टाची प्रतिमा आपणच उगाच अशी मलिन करून ठेवली आहे. ते सामान्य माणसाच्या मदतीला आहेत, त्रास द्यायला नाहीत Happy

नानाकळा,
तुमच्या कपाळाचा फोटो टाका इथे. पाया पडीन मी. Happy
इतर कोणी असते तर हजारो शकले झाली असती.

आधी ज्यांनी फिक्सिंग केलीय त्यांना शिक्षा कशी मिळाली?

>> कारण ज्यांना वाटलं काहीतरी करावं ते तुमच्यासारखे किबोर्ड बडवत 'पुरावे द्या, पुरावे द्या' करत नाही बसले, त्यांनी संशोधन केले, पुरावे गोळा केले आणि कोर्टात किंवा जिथे कुठे सादर करायचे तिथे करुन त्यांना शिक्षा होइपर्यंत बाजू लावून धरली. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या प्रश्नात मिळतील आता. Happy

तुम्ही इथे न्यायालय उघडून बसला आहात, तुम्हाला कसलीही तोषीस न लागता तय्यार रेडीमेड सगळं काही सिद्ध करणारे पुरावे गर्मागर्म हातात हवेत, मग तुम्ही कोर्टात जाणार, आयत्या बिळावर नागोबा करायला... धन्य आहे.

बस करा रे आता कंटाळा आला,
टीम इंडिया पुढच्या सामन्यासाठी रवाना झाली सुद्धा, तरी तुम्ही मागचा सामना उगाळत बसला आहात

बॅटींग कोच, बॉलिंग कोच, फिल्डींग कोच...
टीम मॅनेजर

ईतके सगळे असताना खरे तर कुंबळे वा ईतर कुठल्याही कोच ची गरज काय?
Happy
त्यातही मैदानावर कॅप्टन बॉस आहे असं खुद्द गावसकर साहेब म्हणतात, मग या वेगळ्या कोच साठी काय शिल्लक राहिलं आहे? फक्त प्रत्येक सामन्या साठी रणनिती.. वि. संघा मधिल खेळाडूंविरुध्द अभ्यास व प्लॅन करणे.. आपल्याच संघातील खेळाडूंचे कच्चे दुवे हेरून सुधारणा करण्यास मदत करणे (मदत- कान पिळणे नव्हे!). हेच असेल तर मग कुंबळे पेक्षा ईतर बरेच लायक व योग्य ऊमेदवार ऊपलब्ध असावेत.

मग शास्त्री बुवा बरे आहेत की, खेळा व्यतिरीक्त खेळाडूंची मौज, मजा, मस्ती याची काळजी घेतात. ज्यामुळे खेळाडूंची मानसिक स्थिती व पर्यायाने खेळ यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. Happy

बिना कुठलाही वेगळा कोच विंडीज दौरा जर संघाने जिंकला तर वरील चर्चेला ऊधाण यायला हरकत नाही. फक्त वेगळा बाफ ऊघडा म्हणेज झालं.

अशा प्रकारे

पाकिस्तान चँपिअन ट्रॉफी जिंकला आहे.
भारत हारला आहे.
भारत वेस्ट इंडीजला ५ वनडे खेळायला गेला आहे.
पाकिस्तान विजय साजरा करत आहे
मॅच फिक्स होती नाही होती याचे कारण एक्स्पर्ट शोधत आहे

धाग्याचा हेतू पुर्ण झालेला असल्याकारणाने मी अ‍ॅडमिन आणि वेमा यांना विनंती करतो की धागा बंद करून टाकावा. (असे ही आजकाल विषयांतर करण्यास परवाणगी नाही आहे)

धाग्याचा मात्र सेहवाग झाला...
300

याचसाठी केला होता सगळा अट्टहास! Wink

मी तपस्या केलीये, मला देव दिसलाय, तीच तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही 'मला देव दिसल्या'चे पुरावे मागताय. ज्याचा त्याचा देव त्याने त्याने तपस्या करुन बघावा लागतो हेच मी सांगतोय. अध्यात्म चर्चेचा किंवा विश्वासाचा नाही अनुभवाचा विषय आहे.
हे मात्र खरंय! Happy

नानाकळा तुमच्याकडे पुरावे असून तुम्ही कोर्टात जात नाही आहात. मी तुम्हाला म्हणतोय, मला द्या ते पुरावे मी कोर्टात जातो तर मलाही नाही म्हणत आहात. आपला हेतू नक्की काय समजावा?

Pages