जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बाकी, हे मी नाही राहुल द्रविड (देखिल) म्हणतो आहे: >> हो तुमचा प्रतिसाद वाचून मला वाटलेलं द्रविड चा तो विडीओ पाहून्च तुम्ही लिहिलय कि काय..पण बरोबरच आहे म्हणा Happy
हरकत नाही.... ईथल्या काही मंडळींएव्हडा मी क्रिकेट 'एक्सपर्ट' नसेन पण विचार व निरीक्षण 'ओरीजीनल' आहे.. Happy
(ही खेळ असा आहे की ईथे रातोरात एक्स्पर्ट चे एक्स पार्ट होवू शकतात.... ज्यांना काहीच जमत नाही ते मग मॅच फिक्सींग थियरी चा आधार घेतात ) Wink

जेव्हा धोनी कं ने पहिला ट२० विश्वचषक जिंकला तेव्हा त्यात 'जुने कोण होते? >>> तुम्ही पुन्हा एकदा चेक करा बर कोण होतं ते..त्यात जे होते त्यांना बर्यापैकि अनुभव होताच....

अर्थात इथेही नविन लोकांना संधी दिली तरच अनुभव येइल(खेळवलच नाही तर कसा येणार??) , पण धोनी ला रिप्लेस करण योग्य वातत नाही ... पंतकडे ऑपशन म्हणुन पाहू शकतो आपण..

हरकत नाही.... ईथल्या काही मंडळींएव्हडा मी क्रिकेट 'एक्सपर्ट' नसेन पण विचार व निरीक्षण 'ओरीजीनल' आहे.. Happy >>> मी तरी कुठं एक्सपर्ट आहे Lol ... जे वाटत ते लिहिते बस्स!
(ही खेळ असा आहे की ईथे रातोरात एक्स्पर्ट चे एक्स पार्ट होवू शकतात.... ज्यांना काहीच जमत नाही ते मग मॅच फिक्सींग थियरी चा आधार घेतात ) Wink>>> आता हे फिक्सिंग कुठुन आणलत मधेच...मला नाही कळत काही त्याबद्दल...जाऊदे...

पण जर तुम्ही या धाग्यावर योग्य ते पुरावे दिलेत तर मी स्वत: ऋनम्या एलेलबी बनून सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींतर्फे कोर्टात केस लढायला तयार आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 21 June, 2017 - 13:38

>>> ॠन्मेषभौ, महाभारतात एक कथा आहे उत्तरराजाची, 'बायकांत बहु बडबडला' वगैरे... तसलं काही फिलिंग आले ही तुमची गर्जना ऐकून. 'जर मी पुरावे दिलेत तर..." ह्या गोष्टीवर तुमची भीमगर्जना अवलंबून आहे. म्हणजे मी पुरावे देऊ शकत नाही ह्यावर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणून स्वतःच अट ठेवली की 'तुम्ही' पुरावे द्या तर 'मी' अमुक-तमूक करेन. स्वतःच अट ठरवून 'पण' जिंकायचा नसतो राजे!

मी तर खूप आधीच सांगितले आहे की तुम्हाला फिक्सिंग होतं की नाही हे शोधण्याबद्दल खरोखर तळमळ असेल तर काय करायला पाहिजे ते. पाहिजे तितुके पुरावे स्वतः तुम्हालाच मिळतील आणि मग खुशाल छाती काढून कोर्टात लढायला जा की.... इकडे जालावर फुसके बार तीसमारखान च्या आविर्भावात टाकून काय उपेग...!

@बिपिन, सगळ्या मॅचेस कशा फिक्स होतात हे साग्रसंगित सांगितले की तुम्ही, आता बरोबर हीच म्याच फिक्स नव्हती ह्याबद्दल इतका कॉन्फिडन्स कुठून आला? बेटींगवाल्या म्याचेस, फिक्सिंग वाल्या म्याचेस साठी बुकींचे रुलबुक असते का? ते रुलबुक नसण्यातच सट्टेबाजीच्या मालकांचा फायदा असतो. फायनल पर्यंत सगळ्या म्याच फिक्स होतात हे तुम्हीच सांगितले, शिवाय वरच कोणीतरी जाणत्याराजाने स्वतःच्या तोंडाने भारत जिंकणार वर्ल्डकप फायनल म्हणून सांगितांना प्रत्यक्ष पाहिले आहे. हे म्हणजे गीरे तो भी टांग उपर प्रकार चालला आहे. धन्य आहे बॉ. शब्दांचे खेळ करुन काय उपयोग नाही.

नानाकळा,

{{{ आता बरोबर हीच म्याच फिक्स नव्हती ह्याबद्दल इतका कॉन्फिडन्स कुठून आला? }}}

तुमच्याच आधीच्या प्रतिसादात तुम्ही फिक्सिंग सिद्ध झाले आहे, कोर्टात केसेस झाल्या आहेत वगैरे विधाने केली आहेत. मग ही मॅचही फिक्स असेल तर कोर्टात तसे यथावकाश सिद्ध होईलही. तोपर्यंत तरी १८० धावांनी हरली जाणारी मॅच फिक्स असण्याची शक्यता नसते गृहीतक हे नीट विवेचन मांडून लिहिले तरी पुन्हा हा बालिश प्रश्न कशाला?

बाकी ऋन्मेषला राजकुमार उत्तराची उपमा देत तुम्ही स्वतःची गणना अंतःपुरवासियांमध्ये करताय हे लक्षात घ्या.

तोपर्यंत तरी १८० धावांनी हरली जाणारी मॅच फिक्स असण्याची शक्यता नसते गृहीतक हे नीट विवेचन मांडून लिहिले तरी पुन्हा हा बालिश प्रश्न कशाला?

>> म्हणजे तुमचा हट्ट आहे ना? तुमचा हट्ट कुठे अमान्य केलाय मी.. चालु द्या की. मैनु की फर्क पैंदाये? Happy

बाकी ऋन्मेषला राजकुमार उत्तराची उपमा देत तुम्ही स्वतःची गणना अंतःपुरवासियांमध्ये करताय हे लक्षात घ्या.
>> लोल, लेम लॉजिक अगेन अ‍ॅन्ड अगेन.... ट्राय बेटर!

बाकी, मी इथे जे काही बोलतो त्याला माझ्या कामातून आलेला स्वतःचा अनुभव आहे बॅकिंग करायला, नुसता टीवीसमोर बसून असे असेल, तसे असेल गावगप्पा मी करत नसतो, काही शंका असल्यास ऑफलाइन भेटा, मस्तपैकी कॉफी पाजेन.... किंवा तुम्हाला पायजे ते! Happy

>>एकाचढ एक प्रतिसाद देत योग सिक्सर मारु राहिले आणि योगायोग म्हणजे आज योग दिवस आहे.

मी फक्त ईथला धावफलक ३३९ वर न्यायला हातभार लावतोय...

{{{ बाकी, मी इथे जे काही बोलतो त्याला माझ्या कामातून आलेला स्वतःचा अनुभव आहे बॅकिंग करायला, नुसता टीवीसमोर बसून असे असेल, तसे असेल गावगप्पा मी करत नसतो, }}}

तुमच्या क्षमतांचा आणि पात्रतांचा आदर आहे. इतरांविषयीदेखील असाच आदर आणि विश्वास असू द्या. बाकी तुमचं ऑफलाईन भेटण्याचं आणि 'बसण्याचं' आमंत्रण स्वीकारत आहे. परस्परांची सोय आणि सवड पाहून स्थळकाळ ठरवुयात. आय अ‍ॅम ७२. तुम्ही माझ्या निम्म्या वयाचे असाल असा अंदाज तुमचं लेखन वाचून होतोय. (गणपती दूध पित असताना तुम्ही शाळेत होतात असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय). तेव्हा पार्टी सिनीयरीटीनुसार माझ्यातर्फे.

सेहवाग कोच बनण्याच्या रेस मधे पुढे आहे असे बातमी मधे वाचले.
सेहवागचा फलंदाज म्हणून जितका जास्त आदर आहे तितकाच तो अत्यंत फाजिल वाचाळवीर म्हणून अनादर आहे. तो जर कोच बनला तर शांत होत असलेला कोहलीच्या डोक्यात त्याच्या वर्तनात फार वाईट बदल होतील. जी एक संघ म्हणून अजिबात चांगली गोष्ट नाही. सेहवाग हा भारतीय ग्रेग चॅपल बनेल यात शंका नाही. जितका कोहलीला स्वतः बद्दल माज आहे त्याहून कित्येक पटीने सेहवागला स्वतःबद्दल आहे. सेहवाग + कोहली ही जोडी संघातील इतर खेळाडूंना नक्कीच डोकेदुखी देतील.

कुठेतरी वाचल्याचं आठवतंय). तेव्हा पार्टी सिनीयरीटीनुसार माझ्यातर्फे.
नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 21 June, 2017 - 19:11
>>> सुप्परलाइक! डन डिल!

म्हणजे मी पुरावे देऊ शकत नाही ह्यावर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणून स्वतःच अट ठेवली
>>>>>
एक्झॅक्टली! हेच तर तुम्हाला सांगतोय. आपण जी विधाने करतोय ती आपल्यालाच पुराव्यानिशी सिद्ध करता येत नसेल तर त्या मुद्द्याला रेटण्यात काय अर्थ आहे? माझ्या मते फिक्सिंग नव्हती, तुमच्यामते होती. पण जर ती तुम्हाला सिद्ध करता येत नसेल तर त्या अनुषंगाने चर्चा करण्यात काय अर्थ आहे?

मला अजूनही समजले नाही की पाकिस्तान सरस खेळलाय हे कबूल करायला का आपण चुळबूळ करत आहोत...
अरे आफ्रिका, लंका, ईंग्लंड, भारत या सारख्या बलाढ्य संघाना सलग चार सामन्यात चार विविध खेळपट्ट्यांवर कधी टॉस जिंकत तर कधी टॉस हरत चारही सामन्यात करो या मरो स्थितीत हरवणे हे केवळ योगायोगाने, फ्लूकने होऊ शकते का? नेहमीच त्यांच्याविरुद्धच्या संघाने खराब खेळ केला म्हणून ते जिंकत गेले का? मला पाकिस्तानचा काही पुळका नाहीये, माझ्यासाठी क्रिकेटबाबत जे ऑस्ट्रेलिया, ईंग्लंड, बांग्लादेश वगैरे तेच आणि तेवढेच पाकिस्तान. पण जो संघ डिजर्व्ह करत होता, जे मी आधीच म्हटले होते, तो संघ जिंकला. म्हणजे क्रिकेट जिंकले. एवढे सोपे आहे हे...

कुंबळे गेला ! जाणारच होता .... जाता जाता आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून गेला. मला तर वाटते या संघाला कोच नाही तर शास्त्रीसारखा ईवेंट मॅनेजर हवाय. परदेश दौरे मस्त धमाल पार्ट्या अरेंज करायला... कोहली त्याच्या खेळामुळे मनात बसलेला मधल्या काळात,जे आधी त्याच्या अ‍ॅटीट्यूडने आवडत नव्हता, आता पुन्हा त्याचे ये रे मा झ्या मा गल्या सुरू झालेय..

एक काळ होता माझ्या बालपणीचा, जेव्हा अनिल कुंबळेला एकहाती पाकिस्तानच्या दहा विकेट काढताना पाहिलेले... आज पाकिस्तानने कुंबळेची विकेट काढली.. कारण आपलाच कोहली गद्दार निघाला.

मला अजूनही समजले नाही की पाकिस्तान सरस खेळलाय हे कबूल करायला का आपण चुळबूळ करत आहोत...
अरे आफ्रिका, लंका, ईंग्लंड, भारत या सारख्या बलाढ्य संघाना सलग चार सामन्यात चार विविध खेळपट्ट्यांवर कधी टॉस जिंकत तर कधी टॉस हरत चारही सामन्यात करो या मरो स्थितीत हरवणे हे केवळ योगायोगाने, फ्लूकने होऊ शकते का? नेहमीच त्यांच्याविरुद्धच्या संघाने खराब खेळ केला म्हणून ते जिंकत गेले का? मला पाकिस्तानचा काही पुळका नाहीये, माझ्यासाठी क्रिकेटबाबत जे ऑस्ट्रेलिया, ईंग्लंड, बांग्लादेश वगैरे तेच आणि तेवढेच पाकिस्तान. पण जो संघ डिजर्व्ह करत होता, जे मी आधीच म्हटले होते, तो संघ जिंकला. म्हणजे क्रिकेट जिंकले. एवढे सोपे आहे हे... >>>><<<<< एक्झॅक्टली! हेच तर तुम्हाला सांगतोय. आपण जी विधाने करतोय ती आपल्यालाच पुराव्यानिशी सिद्ध करता येत नसेल तर त्या मुद्द्याला रेटण्यात काय अर्थ आहे?

ऋन्मेष, शाब्दिक कोलांट्या घेण्यापेक्षा, आणि सगळी चर्चा ह्या एकाच म्याच वर केंद्रीत करण्यापेक्षा जरा ब्रॉड विचार करुन मी सांगितलं त्या मार्गाने (जो अगदी पॉसिबल आहे, इथे तोंडाची, आयमीन बोटांची वाफ दवडण्यापेक्षा) आपल्या भीमगर्जनेवर अंमलबजावणी केलीत तर बरे होइल. हीच काय, आजवरच्या सगळ्या म्याचेसचे सगळे पुरावे स्वतःचे स्वतः तुमच्या हातात आपणहून येतील मग तुम्ही कोर्टात जातांनाचा छानसा फोटो टाका इकडे, नाही टाकला तरी चालेल, बातम्यांमधून कळेलच तुम्ही केस टाकली ती.

केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे. हां, आता फिक्सिंग होतच नाही, झालीच नाही, असा नन्नाचा पाढा पढत राहिले की काहीही करायची जबाबदारी अंगावर पडत नाही आणि शब्दांचे बॅडमिंटन विनासायास चालू राहते जे तुमच्यासारख्यांचे असे धागे काढण्याचे मूळ उद्दिष्टं आहे. जालावर बडबड, राणा भीमदेवी गर्जना करणार्‍या अनेकांना असली मैदानात उतरायची हिंमत नसते, तुमच्यात असेल तर दाखवा करुन. दॅट इज अ रिअल चॅलेन्ज.

नानाकळा,
तुमचे दोन मूलभूत कन्सेप्ट ईथे चुकत आहेत.

१) बेटींग आणि फिक्सिंग हे परस्परपूरक शब्द असले तरी समानार्थी शब्द नसून दोन भिन्न संज्ञा आहेत. एखाद्या सामन्यावर करोडोंची बेटींग खेळली गेली याचा अर्थ फिक्सिंग झालीच असे होत नाही.

२) माझ्यामते फायनलच्या सामन्यात फिक्सिंग झालीच नाही. माझ्यामते दर दुसर्‍या सामन्यात उठसूठ फिक्सिंग होत नाही. तसेच ज्या सामन्यात फिक्सिंग झाली आहे ती पकडली गेली आहे. तर मी कोर्टात नक्की कश्यासाठी जाऊ? आणि तिथे जाऊन काय सांगू? आमच्या मायबोलीवर एकाला शंका आहे की फायनलच्या सामन्यात फिक्सिंग झाली आहे, पण त्यांच्याकडे पुरावे नाहीत तर न्यायाधीश महोदय तुम्ही जरा आपली माणसे पाठवून चौकशी करता का?

अहो, फिक्सिंगचा विषय तुम्ही काढला आहे, शंका तुम्हाला आहे, काही पुरावे असतील तर कोर्टात घेऊन तुम्ही जा, मला जराशीही शंका असती तर ईथे ते लोकांना समजावत बसलो नसतो तर स्वत: खोदून पुरावे बाहेर काढले असते आणि काय तो फैसला केला असता. पण मला शंकाच काय लघुशंकाही नाही तर मी कसले पुरावे शोधत फिरू? तुम्हाला शंका आहे म्हणून मी पुरावे शोधायला बाहेर पडू हे कसले आव्हान देत आहात. मला त्या कामाला पिटाळून मायबोलीवरचे धागे कमी करायचा प्लान तर नाही ना तुमचा Happy

एखाद्या सामन्यावर करोडोंची बेटींग खेळली गेली याचा अर्थ फिक्सिंग झालीच असे होत नाही.
>> असे म्हणायला पुरावा लागेल की नाही? नाही, पुरावा पुरावा करतांय म्हणून....

मला जराशीही शंका असती तर ईथे ते लोकांना समजावत बसलो नसतो तर स्वत: खोदून पुरावे बाहेर काढले असते
>> हे तर मी आधीच म्हटले ना, 'असे काही झालेच नाही' म्हटले की काही करायची जरुरच पडत नाही. Happy 'फिक्सिंग झाले आहे' म्हणायला पुरावा लागतो आणि 'फिक्सिंग झाले नाही' म्हणायला फक्त तोंडाची वाफ इतके तर मलाही ठावूक आहे. बेसिक आहे ते.

माझे म्हणणे आहे की 'अजिबात फिक्सिंग झाले नाही' हे तुमचे मत प्रामाणिकपणे तुम्हाला '१००% खरे आहे' हे जाणून घ्यायचे असेल तर मार्ग उपलब्ध आहे. अर्थात त्या मार्गाने सत्य माहित झाल्यावर तुम्ही काय कराल हे तुमच्या प्रामाणिकतेवर अवलंबून आहे. इथे किबोर्ड आपटून काही होणार नाही. फिक्सिंग झाले असावे या बाजूनेही अनेकांनी अभ्यासू मत व्यक्त केले या धाग्यावर, त्याला काउंटर करायला क्रिकेटींग ब्रेन वगैरे गोष्टी तुम्ही मांडत आहात. जालावरच या गोष्टींचा चर्चेतून सोक्षमोक्ष लावायचा असेल तर महाभारत मालिकेत जसे दोन बाण येऊन एकमेकांना टकरावून फुस्स होतात तसे हे आता होत आहे. देअर इज नो पॉइन्ट गोइन्ग फॉरवर्ड. आपण गोल गोल एकाच ठिकाणी फिरत राहू. मला यात रस नाही.

इति लेखनसीमा. माझे आणि बिपिन यांचे पार्टीचे ठरले आहे, येताय का तुम्ही, दमुचे तेंडुलकर?

नानाकळा, मला अजूनही समजत नाही की फिक्सिंगची शंका तुम्हाला आहे, ती तुम्ही ईथे खात्री असल्यागत बोलून दाखवत आहात, तुम्ही स्वत: तशी शंका असूनही पुरावे शोधायला जात नही आहात. तर उलट ज्याच्या मनात शंकाच नाही त्यावर जबरदस्ती शंका घेच आणि पुरावे शोधच पण मी माझ्या मनात शंका असूनही ते शोधणार नाही अशी भुमिका घेत आहात. नक्की काय समजायचे याला?

तुम्ही हवे तर असे म्हणा की पुरावे शोधताना माझ्य जीवाला धोका आहे म्हणून मला रिस्क घ्यायची नाहीये. यात कसलाही कमीपणा नाहीये. बरेचदा छोट्या छोट्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतानाही मी स्वत:ला काय किती धोका आहे हे चाचपूनच काय करायचे ते ठरवतो.

यावरून पडलेला एक प्रश्न!
त्या अंतिम सामन्यात फिक्सिंग होती हे जर उघड झाले, एखादा खेळाडू पाकिस्तान विरुद्ध मुद्दाम पैसे खाऊन खराब खेळला हे क्रिकेटप्रेमींना समजले तर त्याच्या जीवाला किती धोका असेल?
तेच एखाद्या पाकिस्तानी खेळाडूने खाल्ले असतील तर टीव्ही फोडणारे पाकिस्तानी त्याला नाही का फोडणार?

मला शंका आहे असं कुठे म्हटलं मी....?
>>>>

तुमच्याकडे पुरावे नाहीत याचा अर्थ ती शंकाच ना.. खात्री कसे बोलणार त्याला?

हे तुम्हीच ठरवले आहे सगळे..
>>>>>
अहो मी नाही तर तुम्ही ठरवले आहे, की रैवारच्या सामन्यात फिक्सिंग झाली. पण ते कोर्टात सिद्ध करायचे तर पुरावे हवेत. तसेच पब्लिक फोरमवर माण्डायचे तर किमान तर्क हवेत. तुम्ही तर्कही मांडत नाही आहात. या आधी अमक्या ढमक्या सामन्यात फिक्सिंग झाली म्हणून या सामन्यातही झाली असेल हा काही पटणारा तर्क नाही. तसेच करोडोंची बेटींग झाली म्हणून फिक्सिंग असेलच हे देखील पटणारे नाही.

Pages