जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ जेफ्री बॉयकॉट आणि टॉस जिंकून गोलण्दाजी घेणे....
एकदा सामन्याचा निकाल लागल्यावर सर्वांचे लेख येतात. आधी जो सामन्याबद्दल अंदाज वर्तवतो आणि साधारण तसेच घडते तो सरस!

राहिला प्रश्न टॉसचा, तर पहिली फलंदाजी घेत 300 मारायचा जमाना सचिन दादाच्या काळातील होता. कोहलीच्या राज्यात आपण चेस करूनच बरेच सामने जिंकलो आहोत. अगदी या स्पर्धेचा पॅटर्न पाहिल्यास आफ्रिकेला, बांग्लादेशला मॉडरेट टारगेटवर रोखून जिण्कलो आहोत. तेच लंकेविरुद्ध 300+ मारूनही हरलो आहोत. आपणच कश्याला, न्यूझीलण्डला सुद्धा बांग्लादेशने चेस करतच मात दिलीय. एकदा फलंदाजी झाली की मग आपल्या दिग्गज फलंदाजांसाठी सामना संपला असता. त्यानंतर बॉलर्सवरच अवलंबून राहावे लागले असते. म्हणून तुम्ही आधी काय ते मारा मग आम्ही त्यापेक्षा एक जास्त बनवतो हा भरवसा फॉर्मातल्या बॅटींग लाईनवर दाखवायचाच होता.

याऊलट पाकिस्तानी विजयांचा पॅटर्न बघा. आफ्रिका, ईंग्लण्ड, श्रीलंका तिघांनाही सलग चेस करत जिण्कले होते. त्यांना पुन्हा तीच सिच्युएशन देणेही चुकीचेच होते. त्यापेक्षा फायनलचे प्रेशर वगैरे डोक्यातून काढून आपल्या तगड्या फलंदाजीवर भरवसा टाकण्यात फार काही चुकीचे नव्हते.

मग चुकी कुठे झाली?

डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ पाक आदमी!
शत्रूल कधीच कमी लेखू नका. तो जेव्हा फायटींग मूडमध्ये असलेला पाकिस्तान असेल तर चुकूनही नाही.
आपण नेमके तेच केले. संपूर्ण भारतात हेच वातावरण होते. पण भारतीय संघानेही तेच चूक करावी याचे आश्चर्य वाटले. एकदा सामन्याआधी कोहली माझ्याशी बोलला असता तर बरे झाले असते. लोकांना मैदानावर झालेल्या नो बॉल वगैरे चुका दिसतात. पण मुळात जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी कुठे होती? ही चूक कोण बघणार? कारण ती मैदानावर त्या दिवशी झाली नाही आणि प्रत्यक्ष दिसण्यात येत नाही. चूक संघनिवडीपासूनच झालेली. विनिंग कॉम्बिनेशन बदलू नये हे आजोबांच्या काळातली मेथड कप्तानी कराल तर असेच व्हायचे होते. दोन स्पिनर पाकिस्तानसमोर ते देखील फारशी चमक न दाखवू शकलेला आश्विनसह काही कामाचे नव्हते. शमीला न घेण्याची चूक नडली. घ्यायचेच असते तर मी कुलदीप यादवला घेतले असते आणि तो मास्टरस्ट्रोक ठरला असता असे मी सामब्याच्या आधीही आमच्या व्हॉटसपग्रूपवर बोल्लेलो. याऊलट पाकिस्तानची स्ट्रॅटेजी बघा. नेहमीसारखे फकहर झमानने पहिला एटेक न करता समोरून झाला आणि त्याने आपली इनिंग योग्य पद्धतीने बिल्ड केली. झाले आपल्याक्डे काहीच प्लान बी नसल्याने आपण त्यांना गेन आपल्या पद्धतीने ड्राईव्ह करू दिला आणि जे होतील ते आता मारू म्हणून वाट बघत राहिलो.
आणखी एक समज असाअ की फायनलला चेस करतानाच काय ते प्रेशर असते. चूक आहे हे. सर्वात जास्त प्रेशर सुरुवातीच्या काही षटकात चांगली सुरुवात मिळवायचे असते. पाकुस्तानने सरस खेळ दाखवत ती सुरुवात मिळवली. आपल्यावर प्रेशर टाकले. आणि मग चुका घडायच्याच होत्या. तर या चुकांमागेही त्यांचाच सरस खेळ कारणीभूत होता.

जेव्हा दोन्ही संघ बरेच चुका करतो आणि कमी चुका करणारा संघ जिण्कतो तेव्हा असे म्हणून शकतो की जिण्कणारे सरस खेळ न करता जिण्कले. ईथे पाकिस्तानच सरस खेळले हे कबूल करा रे Happy

http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhya-pradesh-15-arrested-for-...

पाकच्या विजयाचा जल्लोष भोवला, मध्य प्रदेशात १५ जणांना अटकदेशद्रोहाचा गुन्हा दाखल

भोपाळ | Updated: June 20, 2017 2:45 PM

तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणे मध्य प्रदेशमधील १५ तरुणांना महागात पडले आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे, पाकच्या विजयानंतर रस्त्यावर फटाके फोडल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी १५ तरुणांना अटक केली आहे. यासर्व तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रविवारी पार पडली होती. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. पाकिस्तानच्या विजयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष करण्यात आला होता. आता मध्य प्रदेशमध्येदेखील १५ मुस्लिम तरुणांनी पाकच्या विजयाचा जल्लोष केल्याचे समोर आले आहे. हे सर्व तरुण २० ते ३५ वर्ष या वयोगटातील आहेत. बुरहानपूरमधील मोहाद गावात या तरुणांनी विजयाचा जल्लोष केला. पाकच्या विजयानंतर या तरुणांनी पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच फटाकेदेखील फोडले. मोहाद हे गाव मुस्लिमबहूल असून गावातील एका हिंदू ग्रामस्थाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

‘आम्ही १५ तरुणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात देशद्रोह आणि फौजदारी स्वरुपाचा कट रचणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. आम्ही यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवणार असून या तरुणांना मिळणारे सरकारी अनुदान थांबवण्याची विनंती त्यांना करणार आहोत’ असे तपास अधिकारी रामश्रय यादव यांनी सांगितले.

पाकिस्तान विजयाचा जल्लोष एकवेळ देशद्रोह असो वा नसो, पण भारतीय पराभवाचा जल्लोष हा नक्कीच देशद्रोह नाही का?

भारतीय पराभवाचा जल्लोष हा नक्कीच देशद्रोह नाही का?

>>> सिम्प्ली....... नो! Happy

कसं सिद्ध करणार?
१. पराभव भारतीय आहे. २. जल्लोष पराभवाचा आहे. ३. देशद्रोहाच्या सरकारी न्यायालयीन व्याख्येत खेळातील पराभावाचा आनंद व्यक्त करणे बसते.
-----
ही पण जेएनयु तल्या खोट्या घोषणांच्या विडिओसारखी घटना होऊन राहिल... बस! पण आता हिंदू-मुस्लिम पोलरायजेशन होऊन एकमेकांबद्दल द्वेष वाढवण्याचे काम जोरात सुरु आहे. तुम्हीपण हातभार लावा.

यात मुस्लिम द्वेष कसाकाय आहे...? ईथे भारत आणि पाकिस्तान बद्दल बोलणे होत आहे.. देश आणि धर्म या दोन पुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत

काल एका न्युज चैनेल वर दाखवलं जेव्हा आपली सर्व टिम ड्रेसिंग रुम मध्ये जात होते त्यावेळि एक पाकिस्तानि समर्थक त्यांना काहितरि बडबडत होता विराट, रोहित व बाकिच्यांनि त्याच्याकडे लक्ष दिले नाहि मात्र महम्मद शामि त्याला डायरे़क्ट जाऊन भिडला. धोनिने मध्यस्थि करुन शामि ला आत नेले. पण त्या पाकिस्तानि समर्थकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला. त्यामुळे शामि हि हार्दिकसोबत विमानाने येणार आणि बाकि सगळे चालत ....
<<<
तो पाकिस्तानी समर्थक नाही दिसत कुठल्या व्हिडीओ मधे, बहुदा तो व्हिडीओ त्यानीच स्वतः घेतलाय !
शामी जिथे किल्लर खुन्नस देत मागे वळला, तो ऑरेंज कलरच्या ड्रेस मधल्या सिक्यिरिटी पर्सनने थांबवले त्याला, सिक्युरिटी गार्डचाच चेहरा दिसला मला तरी.
असो, त्या पाकि फॅन्सच्या कॉमेंट्स ऑबव्हियस होत्या.. सेहवाग आणि इतर काहींनी फार म्हणजे फार मारा केला होता काही दिवस , "बाप " जितेंगे चा, रशिद लतिफ सारख्या नमुन्यांने मग सेहवागच्याही पुढे जाऊन अतिशय चीप कॉमेंट्स केल्या.
ये तो होनाही था :).

जे व्हॉटसपवर नॉनवेज जोक्स चालणार्‍या ग्रूप्सचे सदस्य असतील त्यांना "आफ्रिदी" चे काय केलेय गेले दोनेक वर्षे हे ठाऊक असेलच.
असो, मलाही हे कसलाही निखळ आनंद न देणारे असे चीप विनोद वा टिप्पणी आवडत नाही.

कसं सिद्ध करणार?
>>>>>
नानाकळा, तुमची गुन्हेगाराची व्याख्या कोर्टात कायद्याच्या आधार घेत एखाद्याने केलेल्या कृत्याला गुन्हा सिद्ध करता येते का नाही यावर ठरते.
माझी तशी ठरत नाही.
तरी बरे तुम्ही काहीही पुरावे नसताना मॅच फिक्सिंगच्या वावड्या उठवत आहात. हा अंतिम सामना फिक्स होता हे कोर्टात सिद्ध केले तर मानतो. नाहीतर पाकिस्तानने भारतापेक्षा सरस खेळ केला हे तुम्ही मान्य करा Happy

{{{ नानाकळा, तुमची गुन्हेगाराची व्याख्या कोर्टात कायद्याच्या आधार घेत एखाद्याने केलेल्या कृत्याला गुन्हा सिद्ध करता येते का नाही यावर ठरते.
माझी तशी ठरत नाही.
तरी बरे तुम्ही काहीही पुरावे नसताना मॅच फिक्सिंगच्या वावड्या उठवत आहात. हा अंतिम सामना फिक्स होता हे कोर्टात सिद्ध केले तर मानतो. नाहीतर पाकिस्तानने भारतापेक्षा सरस खेळ केला हे तुम्ही मान्य करा }}}

ऋन्मेषशी सहमत. नानाकळा, सोयीचं असेल तिथे कोर्टाचा आधार आणि गैरसोयीचं ठरेल तिथे तुमचं शेमडं लॉजिक असं चालत नाही.

ubmitted by ऋन्मेऽऽष on 21 June, 2017 - 00:42>>>>
रस्त्यावर जाऊन जाळपोळ करण्यार्यांपेक्षा असे (अफ्रिदिचा माहित् नाहि ) जोक्स् वाचुन् आपल्या मनातिल राग शांत् करनारे काधिहि उत्तम जर भारतिय फॅन्स असाच खिलाडु व्रुत्ति दाखवत राहिला तर चांगलेच आहे. भारतियांनि जे बाप असल्याचे जोक्स् केलेले ते काहि आजकालचे नाहियेत आणि याचे समर्थन् हि करत नाहि पण ज्याअर्थि हे जोक इतके फिरतायेत त्यावरुन् असे दिसुन येते कि हा पराभव् भारतियांच्या जिव्हारि लागलाय

नानाकळा, सोयीचं असेल तिथे कोर्टाचा आधार आणि गैरसोयीचं ठरेल तिथे तुमचं शेमडं लॉजिक असं चालत नाही.

>> लॉजिक सोय किंवा गैरसोय बघत नाही. निदान माझी तरी नाही. इतरांचे माहित नाही. बेटींग सत्य आहे, बेटींगनुसार फिक्सिंग सत्य आहे, कोर्ट सत्य आहे, कोर्टातले बीसीसीआयचे जबाब सत्य आहेत, फिक्सिंगसाठी झालेल्या केसेस आणि शिक्षा झालेले खेळाडूपण आहेत. अजूनही तुम्हाला पुरावेच हवे असतील तर धन्य आहे बापहो! अपनी दुनियामें मगन रहो. आमचे काय जाते? आम्हाला असे भक्त लोक्स डिफेण्ड करतात ते बघुन स्पेश्यल मनोरंजन होते. कीप इट अप. Happy

{{{ बेटींग सत्य आहे, बेटींगनुसार फिक्सिंग सत्य आहे, कोर्ट सत्य आहे, कोर्टातले बीसीसीआयचे जबाब सत्य आहेत, फिक्सिंगसाठी झालेल्या केसेस आणि शिक्षा झालेले खेळाडूपण आहेत. }}}

जे सिद्ध झालंय ते नाकारण्याचा प्रश्नच नाही. ज्या पर्टिक्युलर मॅचचा विषय चाललाय तिथे फिक्सिंग झाल्याचं अजुन तरी सिद्ध झालेलं नाही. प्रत्येकच मॅच फिक्स झाली तर बेटींग करणारे तरी बेटींग करतील का?

बेटींगची मॅच फिक्स करुन हरायची असेल तर ती १८० धावांनी हरली जात नाही. फिक्सिंग इतक्या कौशल्याने केले जाते की ते फिक्सिंग वाटले नाही पाहिजे. बेटींग करणारे त्यामुळेच शेवटच्या ओवरपर्यंत पैसे लावत असतात. या फायनलमध्ये तसं काही शक्य तरी होतं का? तुम्ही सरसकट कुणालाही भक्त ठरवताय ते कशाच्या आधारावर? निदान मी तरी आपल्या क्रिकेट टीमचा भक्त नाही. डोळे उघडे ठेवून पाहिलं तर दिसेल की ऋन्मेषने लिहिलंय त्याप्रमाणे आपला संघ त्यांच्यासमोर फारच कच्चा होता. अशांची काय भक्ती करायची? उलट आपली टीम जिंकली असती तर मात्र फिक्सिंगचा वास आला असता.

असो. कुठली टीम जिंकणार आणि कुठली हारणार इतक्या बाळबोध निकालावरच आजकाल बेटींग होतं असं मानणारे तुमच्यासारखे लोकच आमचं जास्त मनोरंजन करतात. हल्ली कोण किती चौकार मारणार, किती षट्कार मारणार, कुठल्या ओवरला आऊट होणार, विकेट जाणार की कॅच आऊट होणार की एल्बीडब्लू की रनआऊट असल्या मायन्यूट डिटेल्सवर बेटींग आणि त्या अनुषंगाने फिक्सिंग होत असते. साधारणपणे जास्त प्रेक्षकवर्ग मिळावा म्हणून फायनलपर्यंत भारत पोचावा याकरिता आधल्या मध्यल्या मॅचेस या फिक्स केल्या जातात. पाकिस्तानच्या विरोधात भारताचा आणि तोही अंतिम सामना फिक्स होणे हे फार रिस्की आहे खेळाडूंकरिता. त्यातही १८० धावांनी ठरवून कोणी हरत असेल तर एकतर अशा प्रकारे ठरवून हरणारे तरी मूर्ख असले पाहिजेत किंवा मग ते तसे नसतील तर तशी कल्पना करणारे तरी. भारतीय क्रिकेटर्सचा स्मार्टनेस पाहता दुसरी शक्यताच जास्त वाटते.

कुठली टीम जिंकणार आणि कुठली हारणार इतक्या बाळबोध निकालावरच आजकाल बेटींग होतं असं मानणारे तुमच्यासारखे लोकच आमचं जास्त मनोरंजन करतात. हल्ली कोण किती चौकार मारणार, किती षट्कार मारणार, कुठल्या ओवरला आऊट होणार, विकेट जाणार की कॅच आऊट होणार की एल्बीडब्लू की रनआऊट असल्या मायन्यूट डिटेल्सवर बेटींग आणि त्या अनुषंगाने फिक्सिंग होत असते. साधारणपणे जास्त प्रेक्षकवर्ग मिळावा म्हणून फायनलपर्यंत भारत पोचावा याकरिता आधल्या मध्यल्या मॅचेस या फिक्स केल्या जातात

>> लो कल्लो बात... बरे झाले तुम्हीच बोललात. मला आता काही बोलायची गरज उरत नाही.

अर्ध्या प्रतिसादाबद्दल मत नोंदवू नका. पूर्ण प्रतिसाद वाचा आणि रविवारची मॅच फिक्स होती की नव्हती त्याबद्दल तुमचं मत लिहा.

नानाकळा, क्रिकेटमध्ये फिक्सिंग होते हे कोर्टात आधीच सिद्ध झाले आहे. हे तुम्हालाही ठाऊक आहे आणि मलाही ठाऊक आहे. पण प्रत्येक सामना फिक्स असतो असे बोलून तुम्ही अझर, जडेजा आणि सचिन, दादा, कोहली यांना एकाच पिंजरयात उभे करू शकत नाही. ईथे ही फायनल फिक्स होती का यावर चर्चा चालू आहे. ते तुम्ही कोर्टात सिद्ध करू शकता का? प्रश्न एवढाच आहे. तुम्ही आपले कामधंदे सोडून कोर्टाच्या फेरया माराव्यात अशी अपेक्षाही नाही. पण जर तुम्ही या धाग्यावर योग्य ते पुरावे दिलेत तर मी स्वत: ऋनम्या एलेलबी बनून सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींतर्फे कोर्टात केस लढायला तयार आहे.

बिपिनचंद्र ,आधीचे सामने, लहान सहान गोष्टी फिक्स होत्या, तर त्या फायनलला तरी काय अर्थ राहिला? तुम्ही म्हणताय कोण किती चौकार मारणार हेही फिक्स असतं, तर भारतीय संघ किती धावांत आटोपेल हेही असेल ना?
तुमचा प्रतिसाद वाचून मला वाटू लागलेय की ते नो बॉल्स, जडेजाने रनाउट करणं हे सगळं फिक्स्डच होतं.

बेटींगची मॅच फिक्स करुन हरायची असेल तर ती १८० धावांनी हरली जात नाही. फिक्सिंग इतक्या कौशल्याने केले जाते की ते फिक्सिंग वाटले नाही पाहिजे. बेटींग करणारे त्यामुळेच शेवटच्या ओवरपर्यंत पैसे लावत असतात. +11111

निल्सन आभार.

भरत. तुम्ही निल्सन यांचा प्रतिसाद वाचा तुमचं शंकानिरसन होईल.

http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/india-in-west-indies/a...

आणि कुंबळे साहेबांनी राजीनामा दिला आहे...!
(या वर आता पुढचे काही दिवस दळण दळले जाईल मिडिया मधून..)

आपल्या भारतीय संघाचा इतीहास बघता देशी कोच पेक्षा बाहेरचे कोच जास्त 'चालतात' असे दिसते. कारणे काहीही असेनात. (तो एक वेगळ्या बाफ चा विषय होईल). गॅरी कर्स्टन बद्दल मात्र सर्व खेळाडू, संघ या सर्वांना प्रचंड आदर होता... २०१९ विश्वचषकासाठी पुन्हा त्याला पाचारण करण्यात येऊ शकते का?
एक मात्र नक्की- कसोटी व एकदिवसीय साठी वेग वेगळा कोच ठेवावा असे वाटते... कुंबळे च्या खाली १२/१८ कसोटी सामने सलग जिंकण्याचा विक्रम आपल्या संघाने केला हे सत्य आहे. पण एक दिवसीय मध्ये मात्र चित्र निराशाजनक आहे. कोहली सारख्या कप्तानाला व ईतर गरम जोश असलेल्या खेळाडूंना 'कोच' करणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हेच... त्या साठि बहुढंगी, धूर्त, प्रसंगी पडते घेणारा, उत्तम डावपेच आखणारा, असा चतुरस्त्र कोच अपेक्षित आहे. शास्त्री ने ती भूमिका अलिकडे चांगली पार पाडली होती.
आता पुन्हा सर्व ये रे माझ्या मागल्या....!

कोहली सारख्या कप्तानाला व ईतर गरम जोश असलेल्या खेळाडूंना 'कोच' करणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हेच... त्या साठि बहुढांगी, धूर्त, प्रसंगी पडते घेणारा, उत्तम डावपेच आखणारा >>> +११११

विंडीज मध्ये रहाणे, ऊमेश, शमी हे सर्व सामन्यात खेळतात का अश्विन जडेजा पुन्हा संघात दिसतात यावरून पडद्यामागील बर्‍याच गोष्टींचा संदर्भ लागू शकेल.
किंबहुना भविष्यातील संघ आकारणीच्या दृष्टीने युवी, धोनी, अश्विन, जडेजा या चौकडीला बसवून त्या जागी ईतरांना (पंत, कुलदीप यादव, रहाणे, कार्तिक, जाधव) वाव द्यावा... भले मालिका हरले तरी चालेल..

>>नको हो धोनी आणि युवी ला राहुदेत ना..
अशा निर्णयांकडे सकारात्मक नजरेने पाहणे ही काळाची व भविष्याची गरज ठरते.
किंबहुना धोनी सारखा उत्कृष्ट 'कोच' भविष्यात दुसरा नसेल असे मला वाटते.
सचिन पासून आता कोहली व पंड्या या पिढीच्या नेत्रूत्वाचा अनुभव, जवळ जवळ सर्व मोठया जागतिक मालिका व स्पर्धांचा अनुभव, आजच्या पिढीच्या मानसिकतेचे अचूक आकलन, परिस्थिती नुसार धोरणे व डावपेच बदलण्याची दैवी देणगी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी अभावानेच नकारात्मक विचार व देहबोली प्रदर्शन. फक्त थोडासा अ‍ॅडमिनीस्ट्रेशन चा अनुभव गाठीशी आला तर धोनी हा आजवरचा सर्वोत्क्रूष्ट कोच बनू शकतो यात तीळमात्र शंका नाही.
युवी चे असेही सर्वार्थाने आयुष्यात पुनरागमन झाले... संधी मिळाली... अगदी आयपिल च्या पाट्यावरही फार काही करू शकला नाही...पण आता त्याने सन्मानाने आपली मधल्या फळीतील मोक्याची जागा ईतर नवोदीतांना द्यायला हवी.
जुने- नवे-जुने-नवे.... ही जगरहाट चालूच राहणार. विशेषतः सद्य स्थितीत आपली मधली फळी पूर्णपणे मोडलेली आहे हे मान्य कराय्ला हवे.
(परवाच्या पाक वि. च्या सामन्यात सचिन, सेहवाग आणले असते तरी निक्काल वेगळा लागला नसता हे जसे सत्य आहे तसेच वरील सत्य कबूल करायला हवे.)
विंडीज मालिकेसाठी संघाला शुभेच्छा देउयात आणि आगामी सर्व बदलांचे सकारात्मक्तेने स्वागत करुयात. संघ व देश जिंकणे महत्वाचे, कुणी जिंकून दिले हे दुय्यम आहे. जे खेळाडू स्वतःला संघापेक्षा मोठे समजतात त्यांना वेळीच डच्चू दिलेला बरा.
Todays' games and tournaments are won by 'horses for the courses' strategy. In fact with such great bench strength at disposal we should be feeling quite good about options available for such 'changes'.

बाकी, हे मी नाही राहुल द्रविड (देखिल) म्हणतो आहे:
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/india-in-west-indies/d...

नविन कोचच्या शोधात असतानाच बीसीसीआयने विराटला कप्तानपदापासुन निवृत्त करावे. भयंकर इगो असलेला, गरम डोक्याचा कॅप्टन काहि कामाचा नाहि. रहाणेला ग्रुम करावे...

योग तुम्ही किती व्यवस्थित एक्प्लेन केलयं...तुमचे सगळे मुद्दे १००% बरोबर आहे आणि मी सहमत ही आहे .. Happy

तुम्ही जे लिहिलय ते 2019 world cup च्या द्रुष्टीने लिहिलय जे योग्य ही आहे..नविन खेळाडूंना संधी दिली तरच ते world cup साठी प्रिपेर होऊ शकतात..पण त्या टीम मधे धोनीसारखा अनुभवी बॅट्समन असण ही केव्हाही फायद्याच च ठरेल नै का?? सगळेच यंगस्टर्स कसे चालतील ???
आता आपल्या टीमची स्थिती पाहता बेस्ट ओलरांऊडर ची गरज आहे (हार्दिक १ ऑपशन होऊ शकतो ) ,आश्विन्,जडेजा च्या जागी त्यामुळे नं. ६ व ७ साठी ऑपशन विचारात घ्यायला हवं..
मला वाटत रहाणेला जास्तीत जास्त संधी मिळावी...रोहित / धवन च्या जागी...
बाकी येणार्या टूर्नामेंट्स मधील परफॉर्म पाहून्च निर्नय घेतला जाईल..

बाकी, हे मी नाही राहुल द्रविड (देखिल) म्हणतो आहे: >> हो तुमचा प्रतिसाद वाचून मला वाटलेलं द्रविड चा तो विडीओ पाहून्च तुम्ही लिहिलय कि काय..पण बरोबरच आहे म्हणा Happy

वाह वा... नेमी रूनमेश इतरांचं धागे हायजेक करतो... आज रुंम्याचाच धागा हेयजेक झालाय... जमलंयना ना..

>>पण त्या टीम मधे धोनीसारखा अनुभवी बॅट्समन असण ही केव्हाही फायद्याच च ठरेल नै का?? सगळेच यंगस्टर्स कसे चालतील ???
जेव्हा धोनी कं ने पहिला ट२० विश्वचषक जिंकला तेव्हा त्यात 'जुने कोण होते? Happy
खेरीज, हे पहा: रिशभ पंत (विकेट कीपर बॅट्स्मन)
http://www.espncricinfo.com/india/content/player/931581.html

जडेजा हा कायमस्वरूपी जुगार आहे... अश्विन ने ठरवले तर तो नक्की पुन्हा परिणाम्कारक ठरू शकतो...
शेवटच्या काही षटकांमध्ये ठोकाठोक करायला धोनी नक्कीच उपयुक्त आहे,.. पण ते काम क्र. ७, ८ चे आहे.... ईथे ४, ५, ६ चा प्रश्ण आहे. रहाणे, पंड्या, पंत हे योग्य ठरतील असे मला वाटते.
असो.
आगामी काह दिवसात चित्र स्पष्ट होईलच...

नविन कोचच्या शोधात असतानाच बीसीसीआयने विराटला कप्तानपदापासुन निवृत्त करावे. भयंकर इगो असलेला, गरम डोक्याचा कॅप्टन काहि कामाचा नाहि. रहाणेला ग्रुम करावे... >>>>> रहाणेच आधी टिममधे स्थान पक्क तर होउदेत ...
विराटला थोदी समज आणि वेळ देण्याची गरज आहे... होइल व्यवस्थित ..

Pages