जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा 91

बोअरिंग..
धागाकर्ता निगरगट्ट ह्या एका विशेषणा खाली दिसतो मला..
अडेलतट्टु हे पण लागु होइल..
स्वतःच्या मनोरंजना साठी किती फाल्तु बोलावं..किती बिन बुडाची अव्हाने करवी .. काही प्रमाणच नाही.
सलमान.. पाकिस्तान अशा गोष्टींना समर्थन करायच .. आलेल्या विचार्पुर्वक प्रतिसादांना मनाला हव तस गोल गोल भल मोठ उत्तर द्यायच
जिथे छान चर्चा व्हायला
हव्या तिथे तिथे बकवास दळण..
बहुधा रोमात असते आज अतीसंताप झाला

ह्या बाफवर प्रतिसाद देणार नव्हते खरतर... पण देते,
मला एक कळत नाही ..ज्यांना ऋन्मेषचे धागे बोअरिंग्,टाइमपास वाटतात.. ती लोकं सरळ सरळ तो धागा इग्नोर का नाही करतं??? पटत नाही तर लक्ष च देऊ नका..आणि त्रास करूनही घेऊ नका...कोणता ही धागाकर्ता(मग तो कोणीही असेल) धागा काढतो तेव्हा अस कुठेही लिहित नाही कि, प्लिज सर्वांनी माझ्या धाग्यावर येऊन प्रतिसाद द्याच , ज्यांना आवडतं ते वाचतात प्रतिसाद देतात..

अर्थहिन , बोअरींग धागे काढतो ...हा एकच मुद्दा घेऊन किती वेळ चर्चा करणार आहात?? तेही प्रत्येक धाग्यावर....
मला हा धागा काढण्यामागे काय हेतु असावा हेच कळलंनाही / काय साध्य करायच्य हे कळलं नाही... त्यामूळे मी इग्नोर केलं.. सिंपल ....

अवांतर : पाकिस्तान कितिही डिजर्वींग टीम असली तरी...मी मात्र इंडियाला सपोर्ट करणार नेहमी....मग प्रतिस्पर्धी कोणताही देश असू देत....

अवांतर : पाकिस्तान कितिही डिजर्वींग टीम असली तरी...मी मात्र इंडियाला सपोर्ट करणार नेहमी....मग प्रतिस्पर्धी कोणताही देश असू देत....>>>>>>>>>>>>>.

हेच वाक्य त्यांनी उलटं लिहिलय म्हणुन राग.. धागे शंभर काय हजार काढो नो प्रॉब्लेम .. पण कधी क्धी स्वतःच्या धाग्यावर आणि दुसर्याच्याहि धाग्यावर जो गोंधळ घालातात त्याने बोअर होते..
धागे काढने तर चांगल्च आहे आपण ते वाचण्यासाठी च तर येतो ना इथे ... जिथे तिथे कमेंट कएल्याने
इग्नोर पण नाही करु शकत...

हेच वाक्य त्यांनी उलटं लिहिलय म्हणुन राग.. >>> अहो ताई करूदेत कि कोणालाही सपोर्ट... आता समोरच्याव्यक्तीने काय विचार करावा... हेही आपणच ठरवायच का...
हे अस लिहिलय मी कारण्,
मला १ सांगा माझ्या सपोर्ट करण्याने भारत जिंकणार आहे का? तर नाही...जिंकणार आहे ते मैदानावर केलेल्या मेहनतीने.... पाक खेळाडू चांगले खेळले तर ते जिंकतील Angry (पण अस नको होउ दे ...रडायला येते ...नकोच) ... (पाक आहे म्हनून राग अस नाही...दुसरा कोणताही देश असता आणि तो जिंकला तरी राग , वाईट वाटनारच)

मला अजिब्बात अस वाटत नाही कि ऋन्मेष पाक् ला सपोर्ट करेन म्हनून... , कुठल्याहि देशवासियाला अस कधीच वाटनार नाही कि ,माझा देश हारावा.... मग ऑपोजिट टीम कितीही डिजर्वींग असू देत..शक्यच नाही...बस लिहायच म्हनून लिहिलयं, एक धागा काढायचा म्हणून काढलाय,हो ना रुन्मेश ?? ... म्हणुन्च मी इग्नोर केलेला हा धागा.... Happy ...

धागे शंभर काय हजार काढो नो प्रॉब्लेम .. पण कधी क्धी स्वतःच्या धाग्यावर आणि दुसर्याच्याहि धाग्यावर जो गोंधळ घालातात त्याने बोअर होते..
धागे काढने तर चांगल्च आहे आपण ते वाचण्यासाठी च तर येतो ना इथे ... जिथे तिथे कमेंट कएल्याने
इग्नोर पण नाही करु शकत...
..............................................................

ह्याला +१२३४५६७८९

आजवर रोमात असलेले लोकही फक्त ऋन्मेषला आणि त्याच्या धाग्याअंना शिव्या घालायला लॉगिन करुन एवढाले प्रतिसाद टाइप्तात. गहिवरले की ओ मी.
ऋ, लेका, माबोचा सुप्पर्र्स्टार्र झालास की रे तु Lol

मला एक कळत नाही ..ज्यांना ऋन्मेषचे धागे बोअरिंग्,टाइमपास वाटतात.. ती लोकं सरळ सरळ तो धागा इग्नोर का नाही करतं??? पटत नाही तर लक्ष च देऊ नका..आणि त्रास करूनही घेऊ नका...कोणता ही धागाकर्ता(मग तो कोणीही असेल) धागा काढतो तेव्हा अस कुठेही लिहित नाही कि, प्लिज सर्वांनी माझ्या धाग्यावर येऊन प्रतिसाद द्याच , ज्यांना आवडतं ते वाचतात प्रतिसाद देतात..
अर्थहिन , बोअरींग धागे काढतो ...हा एकच मुद्दा घेऊन किती वेळ चर्चा करणार आहात?? तेही प्रत्येक धाग्यावर....
>>> because you can hate ऋन्मेऽऽष or you can love ऋन्मेऽऽष but you can't ignore ऋन्मेऽऽष. Wink

संशोधक तुम्ही असे प्रतिसाद देऊन , ज्यांना रुन्मेशचे धागे आवडत नाही त्यांच्या रागात भर घालताय.. Proud
बाकी चालुद्या...

धागे उचकवनारे असतात यामुळे इग्नोर नाहि करु शकत काहिजण आणि धागाकर्त्याचा हि तोच उद्देश असतो
१०० पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन

अंबज्ञजी Lol
अहो इथे जोक नका बर करू तुम्ही...आपल्यासाठी आहे ना सेपरेट विनोदाचा धागा Proud

भारताचा परफॉर्मन्स चढऊताराचा आहे. पहिला जिंकले तर दुसरा हरले. तिसरा जिंकले तर चौथा हरूही शकतात.>>> फ्क्त तिन सामन्यात भारताचा परफोर्मन्स चढ-उताराचा आहे हे ठरविणे चुकिचे भारत पाकिस्तान चा ४ जुन चा सामना जर पाहिला तर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान ला जिंकायला वाव होता. १७७ रन्स होउपर्यंत तिनदा पाउ़स आला भारताचा डाव २५० पर्यंत जाईल असे सर्वांना वाटत होते. पण भारतिय फलदा़जांनि पाकिस्तान गोलंदाजांच्या नाकावर टिच्चुन (ज्या गोलंदाजांमुळे पाक इंग्लंड विरुद्ध जिंकले) ३१९ धावा केल्या. आणि भारतिय गोलंदाजांनि पाकिस्तान च्या फलंदाजांना सळो कि पळो करुन सोडले. ज्या फलंदाजांनि इंग्लंड्चे आव्हान लिलया पेलले ते भारतिय गोलंदाजांसमोर टिकाव धरु शकले नाहित. त्यामुळे भारतिय संघच डिझर्व्ह टु विन आहे Bw

जिथे छान चर्चा व्हायला
हव्या तिथे तिथे बकवास दळण..

पण छान चर्चा व्हाव्यात असे फार थोडे विषय इथे असतात, शोधून काढावे लागतात.
आणि विषय चांगला असला तरी त्यातहि विषय बदलून, फालतू मुद्दे मांडून, नाहीतर विनोदाच्या नावाखाली कुणावर तरी वैयक्तिक टीका करून तो धागा बंद पाडतात इथले लोक.

म्हणून आ़जकाल मायबोलीचा उपयोग काय वाट्टेल ते मनात आले तरी ते लिहून टाकून मन मोकळे करायचे या साठीच करतात. उगीच गंभीर नि विचारप्रवर्तक धागे इथे मिळणार नाहीत. हवे असेल तर वेगळ्या साईट्स शोधायला किंवा चालू करायला पाहिजेत.

उगीच ऋन्मेष किंवा इतर कुणा व्यक्तीवर वैयक्तिक टीका कधीहि करू नये. त्याचे धागे आवडत नसतील तर प्रतिसाद देऊ नका. म्हणजे आपोआप धागे काढणे कमी होईल. ज्या अर्थी प्रतिसाद मिळतात त्या अर्थी बरेच लोक त्या निमित्ताने आपले मन मोकळे करून घेतात - नाहीतरी मुद्देसूद लिहीणे या साठी आ़जकाल मायबोली उरलीच नाहीये.

<ऋन्मेषचे काही धागे असेच असतात. ऋन्मेषच्या अश्या प्रकारच्या काही धाग्यांमुळे प्रत्यक्ष आयुष्यातील डॉक्टर्सचा व्यवसाय वाढत आहे हा एक वेगळाच परिणाम आहे. डोके दुखू लागलेले, धडधड वाढलेले असे अनेक रुग्ण ह्यामुळे निर्माण होऊ शकतात. एखादा मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह करू शकणार नाही ते काम अश्या धाग्यांमुळे होते>

याचा सुद्धा सर्व्हे केला का? सँपल साइझ काय होतं?

किती ती जळजळ आणि आकस! Proud

आणि हे म्हणे वैयक्तीक बोलत नाहीत आणि म्हणे इतरांची ह्यांना आता कीवही येत नाही. Happy

@अंबज्ञजी...
कित्ती विशेषणं द्याल बिच्चार्याला... Wink

महान भारतीय गोलंदाजांनी ऋ ची भविष्यवाणी खरी ठरवली. त्यात आमचे मॉडेल वीर रोहीत शर्मा व विराट कोहली "" आल्या आल्या जाऊ नका, भाव फुक्कटचा खाऊ नका"" असे गाणे ऐकत घरी गेले. इतक्या वर्षापासुन क्रिकेट बघतेय, पण एवढी घाणेरडी, गचाळ गोलंदाजी आजच पहायला मिळाली. या मुर्खांनी जरा कपिल देव, इम्रान, बोथमचे जुने व्हिडीओज बघायला हवे होते. भुक्कड कुठले, एवढा पैसा खाऊन त्याच्या बरोबर माती पण खातात.

Pages