जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस खरंच आहे ??? ऑसीज, न्युझीलंड, वेस्ट इंडीज बाकी टीम काय फुकट आहेत का ?????>>>>>>
टिम आहेत, पण त्या आर्थिक दृष्ट्या पूर्ण पणे भारतीयांच्या क्रिकेट क्रेझ वर अवलंबुन आहेत. भारत जर आयसिसि मधुन बाहेर पडला तर आयसिसि बंद पडेल.
वेस्ट इंडीज च्या खेळाडुंना पैसे मिळत नाहीत म्हणुन तिथले क्रिकेट कमी होत चालले आहे, ते त्यांच्या संघाच्या दर्जातुन दिसतेच.
अधुन मधुन भारत पाक मॅच झाल्या नाहीत तर आयसिसि बँकरप्ट होइल.

एखद्या शत्रूराष्ट्राबद्दल देशाची पॉलिसी आणि आपली भुमिका जर विरुद्ध टोकाची असेल तर ते बंड वा देशद्रोह समजावा का?

कुठल्या गोष्टीवर, समस्येवर दोघांच्या टोकाच्या भूमिका आहेत यावर देशाची पॉलिसी राबविणारे किंवा तुम्ही देशद्रोही ठरता अगर नाही हे निर्भर असेल असं माझं मत आहे.
उदा. जर देशाच्या संरक्षणाबाबत, अखंडतेबाबत, सार्वभौमत्वाबाबत तुमच्या भूमिका टोकाच्या असतील तर तुमच्या दोघांपैकी एक (म्हणजे पॉलिसी राबविणारं सरकार आणि तुम्ही यांपैकी) देशद्रोही ठरेल..
पण हीच गोष्ट इतर सर्वच बाबतीत सरसकट लागू करता येणार नाही...

[माझं हे मत अंतिम नाही]
डोन्टोरी ऋ, आपण रविवारी पाकिस्तान ला सपोर्ट करू शकाल..आपल्याला कोणी देशद्रोही ठरविणार नाही. Wink

माझी मतं काही नाहीत कारण मला असे बालिश प्रश्न पडत नाहीत तुझ्यासारखे. आणि पडलेच तरी माझ्या पातळीवर मी त्यांची उत्तरं शोधते, उगिचच असे पब्लिक फोरमवर प्रतिसाद मोजत स्वतःचा आणि इतरांचा अमूल्य वेळ वाया घालवत नाही. पाकिस्तान हा इतर देशांसारखाच एक देश आहे, क्रिकेट मॅच आपल्या जागी आणि युद्ध आपल्या जागी, मी उगिच कोणत्याही दोन गोष्टींचा बादरायण संबंध जोडून वरून त्याचा संबंध देशहितासाठी लावत नाही.
तु असे धागे उघडून तुला काय वाटते की फार ग्रेट काम करतोस का? आता पर्यंत उघडलेल्या धाग्यामुळे एक तरी जनहिताचं काम झाल्याचं प्लिज मला सांग, मी माझे सर्व शब्द मागे घेईन.

>>एखद्या शत्रूराष्ट्राबद्दल देशाची पॉलिसी आणि आपली भुमिका जर विरुद्ध टोकाची असेल तर ते बंड वा देशद्रोह समजावा का?<<

उत्तर सोप्पं आहे. तुझी भुमिका तु कुठे किंवा कोणासमोर व्यक्त करतोस त्यावर अवलंबुन आहे.
उदा: १. गर्लफ्रेंड समोर बोललास तर एखादा तुच्छ्कटाक्ष, मानेला झटका वगैरे मिळेल...
२. भेंडीबाजारात बोललास तर शीरकुर्मा किंवा बडेका पाया वगैरे मिळेल...
३. पार्कात किंवा सेनाभवनाच्या समोर बोललास तर तुझा मारुती होईल...
४. आणि माबोसारख्या संस्थळावर बोललास तर "येडा बनके पेडा खारेला है" असं समजुन काहिजण सोडुन देतील... Happy

भारतीय संघ जेव्हा परकीय संघाशी आणि परदेशातील भूमीवर खेळतो, तेव्हा सरकारच्या दहा पंधरा खात्यांच्या परवानगीशिवाय ते होत नाही. तक्तालीन सरकारच्या कोणत्याही धोरणाशी विसंगत असेल तर अशी परवानगीच मिळणार नाही.
त्यात सरकार ने स्वतः राजनैतिक संबंध तोडलेले नाहीत. सरकारी भेटीगाठी सुरूच आहेत. त्यात काहीच चूक नही. सीमेवरचे टेन्शन कमी झाले तर अतिरिक्त सैन्यही कमी करता येते. अशा हेतूनेच इतर राजनैतिक गोष्टीही सुरू असतात. मग जनरल लोकांनी सरकारच्या धोरणांशी विसंगत का वागावे?>>>> हे पटले Happy

अरे राज, नाम तो सुना ही होगा आणि राहुल, नाम तो याद रहेगा एकाच वेळी माझ्या धाग्यावर Happy
तुम्ही सांगितलेत ते अगदी अचूक. पण ते परीणाम झाले. माझा प्रश्न वेगळा आहे.

@ दक्षिणा,
जनहिताच्या कामाची आपली व्याख्गा काय आहे त्यावर अवलंबून आहे. बाकी मला तर माझ्या धाग्यावरचे प्रतिसाद (धागा नाही हा, त्याखालचे प्रतिसाद) वाचून जर कोणाचे अंमळ मनोरंजन झाले, चार लोकं हसले, त्यांचा मूड चांगला झाला तरी त्यात जनहित वाटते.

अर्थात हा धागा काढायचा मूळ हेतू कोणाचा मनोरंजन करणे नव्हता. पण तरीही एखद्याची वृत्ती असते ना की तो कश्यातही आनंद शोधतो. आपलंही साधारण असेच आहे. जे टाळता येणे शक्य असेल ते टाळा. जे नाही टाळता येत त्यात काहीतरी चांगलंच शोधा. आयुष्य खूप सिंपल आहे आपण उगाच कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. आपण योग्यच म्हणालात हा प्रश्न खरेच बालिश आहे. पाकिस्तानबाबत आपली क्रिकेटसंदर्भात भुमिका काय असावी याचे पॉलिटीकल कर्रेक्ट उत्तर शोधण्यापेक्षा लहान मुलासारखाच विचार करणे गरजेचे आहे. करून तर बघा सर्वांनी एकदा आणि आपापली उत्तरे मला सांगा.

आता पर्यंत उघडलेल्या धाग्यामुळे एक तरी जनहिताचं काम झाल्याचं प्लिज मला सांग, मी माझे सर्व शब्द मागे घेईन.
>>
प्रश्न ऋ ला आहे तरीही हा धागा युजफुल होता गं :- http://www.maayboli.com/node/62585
(अर्थात हा एकच होता Proud )

अरे व्वा!!!
ऋ चे भरपूर हितचिंतक माबोवर आहेत तर...

>>पण ते परीणाम झाले. माझा प्रश्न वेगळा आहे.<<

मिळालेल्या परिणामावरुन उत्तर काय असेल हे समजलं नाहि? अरे इंजिनियर आहेस ना तु?

आता पर्यंत उघडलेल्या धाग्यामुळे एक तरी जनहिताचं काम झाल्याचं प्लिज मला सांग, मी माझे सर्व शब्द मागे घेईन.
-->
अवो रूनमेश चा सायबर वला धागा होम पेज वर आहे की माबो च्या... खूप चांगली माहितीय त्यात...
आता शब्द घ्या मागे...हा हा

क्रिकेटचे मैदान देशभक्ती दाखवण्यासाठीची चुकीची जागा आहे तसेच दुष्मनी काढण्यासाठीची सुद्धा! तो खेळ आही आणि खेळासारखाच खेळला जावा. ऋन्मेशला पाकिस्तान डिझर्विंग वाटते आहे आणि पाकिस्तानला सपोर्ट करायचा आहे त्याची मर्जी ..
पण जो पर्यंत तो त्याला पाकिस्तान भारतापेक्षा डिझर्विंग का वाटते आहे हे ह्याचे क्रिकेटच्या भाषेत ऊत्तर लिहिणार नाही तो पर्यंत त्याच्या बाकी धाग्यांसारखाच हा धागासुद्धा प्रोवोक करून प्रतिसाद जमवणे ह्या क्रुकेड मानसिकतेनेच बरबटलेला आहे असेच समजणार.

मंडेलांनी मोठ्या खुबीने रग्बी खेळाचा ऊपयोग अफ्रिकेतला टोकाचा वर्णद्वेष कमी करण्यासाठी केला होता... भारत पाकिस्तान सामन्यातून मैत्रीचा संदेश खेळाडू आणि क्रिकेट मंडळं देत असतील तर सामने होत रहावे असे मला वाटते. पण खेळाचे मैदान आणि खेळाडून वापरून सियासती कारभारात देणेघेणे वा मत नसलेल्यांना प्रोवोक केले जात असेल तर हा खेळही बंदच व्हावा.

<माझी मतं काही नाहीत कारण मला असे बालिश प्रश्न पडत नाहीत तुझ्यासारखे. आणि पडलेच तरी माझ्या पातळीवर मी त्यांची उत्तरं शोधते, उगिचच असे पब्लिक फोरमवर प्रतिसाद मोजत स्वतःचा आणि इतरांचा अमूल्य वेळ वाया घालवत नाही.

तु असे धागे उघडून तुला काय वाटते की फार ग्रेट काम करतोस का? आता पर्यंत उघडलेल्या धाग्यामुळे एक तरी जनहिताचं काम झाल्याचं प्लिज मला सांग, मी माझे सर्व शब्द मागे घेईन.
Submitted by दक्षिणा on 16 June, 2017 - 17:20>

दक्षिणा, मायबोलीवरच्या वावराच्या सध्याच्या संकेतांच्या माझ्या आकलनानुसार तुमचा हा प्रतिसाद वेबमास्तरांनी लक्ष घालण्याजोगा आहे.

माझ्या आठवणीनुसार, ऋन्मेषने काढलेल्या सायबर हल्ल्याबद्दलच्या धाग्याबद्दलही तुम्ही असाच आक्षेप नोंदवला होता. की जी माहिती गुगल करून शोधता येते, त्यासाठी मायबोलीवर धागा कशाला काढायचा?
तो धागा आज मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर आहे हे तुमच्या लक्षात आलंय का? त्या धाग्यामुळे अनेकांच्या ज्ञानात भर पडली असेल. (तुमचा तो प्रतिसाद त्या धाग्यावर आता दिसत नाहीए. अ‍ॅडमिननी साफसफाई केली असावी किंवा तुम्ही तो प्रतिसाद अन्यत्र दिला असावा.)

गंमत म्हणजे असा आक्षेप घेतल्यानंतर काही दिवसांतच तुम्ही स्वतःच बिटकॉइनबद्दल धागा काढलात.

<पाकिस्तान हा इतर देशांसारखाच एक देश आहे, क्रिकेट मॅच आपल्या जागी आणि युद्ध आपल्या जागी, मी उगिच कोणत्याही दोन गोष्टींचा बादरायण संबंध जोडून वरून त्याचा संबंध देशहितासाठी लावत नाही.>

तुम्ही नसाल, पण असा संबंध लावणरे लोक आहेत हे या धाग्यावरच दिसलंय.

विषय भरकटलाच आहे, तर तुमच्या आणखी एका प्रतिसादाची आठवण करून देतो.

"अजून कुणितरी लिहिलंय की तुझे धागे आवडत नाहीत तर वाचतात आणि टिआर्पी कशाला वाढवतात? त्यांना मी सांगू ईच्छिते की मी हा जो काही वरिल प्रतिसाद दिला आहे तो आशुचॅंप च्या धाग्यावर दिला आहे. तुझ्या धाग्यावर येऊन मी कधीही माझा वेळ वाया घालवत नाही. काल कुणितरी मला तु माझ्या वक्तव्यावर धागा उघडल्याचं सांगितलं तेव्हा कळलं की तुझ्या या धाग्याला काय 'अर्थ' आहे ते.

ऋन्मेष माझं तुझ्याशी वैयक्तिक असं काहीही वैर नाही, पण प्रामाणिक पणे सांगू इच्छिते की तुझ्या भारंभार धागे काढण्याला काही मर्यादा नाही आणि त्यातून त्यांना दर्जा नसतो. (हे माझं वैयक्तिक मत आहे) ज्यांना त्यात टाईमपास दिसतो, मनोरंजन मूल्य दिसतात त्यांनी ती जरूर जपावीत आणि त्याचा आनंद घ्यावा माझे काही म्हणणे नाही. पण तुझ्यामुळे अनेक चांगले लिहिते लोक इथे येणं आता टाळू लागले आहेत."

प्रत्येकाच्या टाइमपासच्या, आनंदाच्या, मनोरंजनाच्या कल्पना वेगळ्या असतात हे तुम्हाला खरंच मान्य आहे असं वाटत नााही. याबद्दल आणखीही लिहिण्यासारखं आहे, पण इतक्यात तरी नाही लिहीत.

सायबर हल्ल्याचा धागा जरि ऱुन्मेष ने उघडला असला तरि त्याचे श्रेय त्याला जात नाहि.ते त्यावरिल प्रतिसादकर्त्यांना जाते.उगाच् फुकट चे श्रेय् देउ नका

ज्या तळमळीने, त्वेषाने सैनिक डोळ्यात तेल घालून आणि जिवावर उदार होऊन देशाच्या सिमांचे संरक्षण करतात,प्रसंगी मरणही पत्करतात अगदी तेवढ्याच तडफेनं आपले क्रिकेटर्स मैदानावर पाकिस्तान बरोबर क्रिकेट लढतात. (लक्षात घ्या मी लढतात म्हणतोय, खेळतात नव्हे)

हे जरा अतीच झाले.
सैनिकाची एक जरी चूक झाली तरी स्वतःचे नि कधी कधी इतरांचेहि प्राण जातात!
ते नि, क्रिकेटमधे चूक झाल्याने कॅच सुटला, विकेट गेली,
हे सारखेच का?
अत्यंत कठीण डोंगर दर्‍यातून, उन मुसळधार पाउस कशाचीहि पर्वा न करता सैनिक आपले काम करतच रहातात.
आणि क्रिकेट मधे उंदीर मुतल्यासारखा पाउस पडला तरी धावत तंबूत परत फिरणे हे सारखेच का?

जवळच्या गोळ्या संपत आल्या, बंदूक अडली तर युद्ध थांबवा - लगेच तंबूतून कुणितरी नवीन बंदूक, नि गोळ्या घेऊन येईल मग आपण पुनः लढू असे सैनिकांना करता येते का?
नि क्रिकेटमधे बॅट बदलायची आहे, खेळ थांबवा - लगेच तंबूतून दोन लोक दोन तीन बॅटी घेऊन येतात हे सारखेच का?
तुम्हाला मनोरंजन आवडते तर तुम्ही पहा मॅच - फार तर सिनेप्रेमी, गानप्रेमी, नागड्या बाईचे चित्र काढून तिला सरस्वती नाव देणार्‍या हुसेनच्या चित्रांची प्रशंसा करणार्‍या चित्र कला प्रेमींशी करा.
उगाच सैनिकांशी तुलना करू नका!! !!
नि अश्या लोकांचे आय क्यू काढले की मायबोलीवरील आय डी उडवा अशी तक्रार करायची किंवा मी आता लिहितच नाही जा - तुम्ही सगळे दुष्ट आहात असे म्हणून एक लांबलचक लेख लिहायचा.
व्वा मायबोली!

ऋन्मेशला पाकिस्तान डिझर्विंग वाटते आहे आणि पाकिस्तानला सपोर्ट करायचा आहे त्याची मर्जी ..
पण जो पर्यंत तो त्याला पाकिस्तान भारतापेक्षा डिझर्विंग का वाटते आहे हे ह्याचे क्रिकेटच्या भाषेत ऊत्तर लिहिणार नाही तो पर्यंत त्याच्या बाकी धाग्यांसारखाच हा धागासुद्धा प्रोवोक करून प्रतिसाद जमवणे ह्या क्रुकेड मानसिकतेनेच बरबटलेला आहे असेच समजणार.
--- सहमत

धाग्याच्या विषयाशी निगडित नसलेले प्रतिसाद उडवायचे असे प्रशासनाने ठरवले तर कोणकोणते प्रतिसाद उडतील हेही पाहणे मनोरंजक ठरेल.

अवांतराबद्दल क्षमस्व!

दृष्टिकोन १ - भारत - पाक पारंपारीक प्रतिस्पर्धी आहेत मानणारे भारताच्या बाजूने बोलतील

दृष्टिकोन २ - हा केवळ एक खेळ आहे असे म्हणणारे 'मे बेटर टीम विन' म्हणतील.

दृष्टिकोन ३ - क्रिकेट हा सट्टा आहे म्हणणारे 'मॅच आधीच फिक्स झाली आहे' असे म्हणतील.

दृष्टिकोन ४ - हा केवळ एक खेळ आहे असे म्हणणारे व क्रिकेटवर थोडा अधिक विचार करणारे 'भारताचा संघ उजवा आहे' हे लिहून 'त्यामुळे भारत जिंकेल' असे म्हणतील.

दृष्टिकोन ५ - भारत व पाकिस्तान हे एकमेकांचे 'रिअल लाईफ' मधील शत्रू आहेत ह्या बाबीला प्राधान्य देणार्‍यांपैकी 'क्रिकेट सामना होत आहे तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्याच' असे म्हणतील.

दृष्टिकोन ६ - भारत व पाकिस्तान हे एकमेकांचे 'रिअल लाईफ' मधील शत्रू आहेत ह्याच बाबीला केवळ प्राधान्य देणारे 'सामना खेळताच कसा' म्हणतील.

दृष्टिकोन ७ - तथाकथित भक्त आणि तथाकथित अंधभक्त ह्यातील दोघेही 'हा केवळ खेळ आहे' आणि 'आता तुम्ही त्यांच्याशी खेळताच कसे' ह्यावरून भांडतील.

दृष्टिकोन ८ - ऋन्मेष पॉप्युलर विषयावर धागे काढून पहिल्या पानावर राहतो ह्याबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक बोलतील.

दृष्टिकोन ९ - सामना होण्यासाठी किती एजन्सीजच्या आणि न होऊ देण्यासाठी किती एजन्सीजच्या परवानग्या लागतात ह्यावर अभ्यासूपणे लिहितील.

दृष्टिकोन १० - वरच्यापैकी कोणत्यातरी एका दृष्टिकोनाने लिहिणार्‍यांचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे हे संदर्भासहित सिद्ध करण्यासाठी आपला अमूल्य वेळ, उर्जा आणि कदाचित पैसेही वाया घालवतील.

प्रश्न हा आहे की एवढे सगळे होऊनही बाह्य जगाला काही फरक पडत नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. म्हणजे सामना (अनफोरसीन गोष्टी सोडल्या तर) होणारच आहे. काहीतरी निर्णय लागणारच आहे. सीमेवर कोणीतरी तेव्हाही मरणारच आहे. लोकं इथे तेव्हाही दोन्ही बाजूंनी बोलणारच आहेत.

त्यामुळे मला इतकेच कळते की इथल्या चर्चा वाचून रक्तदाबावर परिणाम करून घेणे किंवा दुसर्‍याच्या रक्तदाबावर परिणाम व्हावा असे लिहिणे हे चुकीचे आहे. पण म्हणून हा धागाच असायला नको का? तर तसे नाही. हा धागा सर्वांना मनापासून व्यक्त होण्यास प्रवृत्त करणारा धागा आहे. ऋन्मेषचे काही धागे असेच असतात. ऋन्मेषच्या अश्या प्रकारच्या काही धाग्यांमुळे प्रत्यक्ष आयुष्यातील डॉक्टर्सचा व्यवसाय वाढत आहे हा एक वेगळाच परिणाम आहे. डोके दुखू लागलेले, धडधड वाढलेले असे अनेक रुग्ण ह्यामुळे निर्माण होऊ शकतात. एखादा मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह करू शकणार नाही ते काम अश्या धाग्यांमुळे होते. ह्या माझ्या म्हणण्याला 'प्रशासनाने लक्ष घालण्याच्या पात्रतेचे म्हणणे' असे म्हंटले जाईलही.

पुढेमागे कधी 'मायबोलीचा स्वतःच्या मनोरंजनासाठी सर्वात खुबीने वापर करणारा सदस्य' असा एखादा पुरस्कार सुरू झाला तर ऋन्मेष हा तहहयात निर्विवाद विजेता असेल आणि ते कळल्यावर गंभीरपणे चर्चा करणारे कदाचित असे धागे कसे काढायचे ह्याचे क्लासेस त्याच्याकडेच लावतील.

-'बेफिकीर'!

दृष्टिकोन ११ - ऋन्मेषच्या धाग्याचे 'मजेशीर अ‍ॅनालिसिस' मांडायच्या नावाखाली प्रोवोकेशनला बळी पडणार्‍यांची मजा पाहण्याच्या त्याच्या कुत्सित मानसिकतेचा ऊदोऊदो करून स्वतःची कुजकट मानसिकता 'तटस्थ' म्हणवत गौरवून घेण्यासाठी आपला व्यासंग पणाला लावतील.

ईतरांना मोजतांना स्वतःला धरायचे विसरलात की काय Lol

@नंद्या४३, मी सैनिकांशी क्रिकेटर्स ची तुलना केलेली नाहीये तर दोन्ही ठिकाणी असलेल्या 'जिंकायचंच' या प्रबळ भावनेवर/वृत्तीवर फोकस करून वरील वाक्य लिहीलं आहे.
सैनिकांचे महत्व हे कुठलाही काळ, स्थळ आणि परीस्थिती यात असाधारणच आहे.त्यांची तुलना (त्याग, निष्ठा, धैर्य, शौर्य इ. बाबतीत) कुणाबरोबरही होऊ शकत नाही.

>>>>ईतरांना मोजतांना स्वतःला धरायचे विसरलात की काय Lol<<<<

नाही, जे वाटले ते लिहिले. Happy

कोणी विशिष्ट व्यक्ती दुखावली जाणार नाही ह्याचा आटोकाट प्रयत्न केला, फसला बहुधा. Happy

ऋन्मेषच्या अश्या प्रकारच्या काही धाग्यांमुळे प्रत्यक्ष आयुष्यातील डॉक्टर्सचा व्यवसाय वाढत आहे हा एक वेगळाच परिणाम आहे. डोके दुखू लागलेले, धडधड वाढलेले असे अनेक रुग्ण ह्यामुळे निर्माण होऊ शकतात. >>>>
बेफिकीरजी, असंही होत असेल ना, ऋ चे धागे वाचून त्यांच्यावरील प्रतिसाद वाचून मनोरंजनामुळे अनेकजणांचा रक्तदाब सामान्य होत असेल, धडधड बंद होत असेल, डोकेदुखी थांबत असेल...

>>>>ऋ चे धागे वाचून त्यांच्यावरील प्रतिसाद वाचून अनेकजणांचा रक्तदाब सामान्य होत असेल, धडधड बंद होत असेल, डोकेदुखी थांबत असेल...<<<<

असे व्हावे म्हणून धागे निघत असतील तर आरोग्य विभागात निघाले तर उत्तम!

अवांतराबद्दल क्षमस्व!

भरत यांच्याशी सहमत...बिटकोईन वाला मुद्दा बरोबर आहे...

सायबर हल्ला होम पेज वर आला.. बीकॉईन वाल्या धाग्याला डिमांड नई म्हणून जळफळाट... आणि मग रूनमेश वर वैयक्तिक हल्ले... मला कळत नाही आवडत नाही त्याचे लिखाण तर येतात कशाला रुंम्या च्या धाग्यावर... येऊ नका ना..

रुमणेश भाऊ तुम्ही चिदु नका... तुमचे फॅन्स आहेत भरपूर... सपोर्ट आहे आमचा... तुमचे लेख येऊ देत राहा..

बेफिकीर यांचा लेखनाचा मी पंखा आहे...

पण रूनमेश भाऊ यांचे लेख खरच timepass असतात... मजा येते... नक्कीच टेन्शन कमी होत लाईफ मदले

पण जो पर्यंत तो त्याला पाकिस्तान भारतापेक्षा डिझर्विंग का वाटते आहे हे ह्याचे क्रिकेटच्या भाषेत ऊत्तर लिहिणार नाही..........
>>>>>

पाकिस्तान पहिलाच सामना हरली. त्यानंतर कात टाकून सातत्याने विजय मिळवलेत.
याऊलट भारताचा परफॉर्मन्स चढऊताराचा आहे. पहिला जिंकले तर दुसरा हरले. तिसरा जिंकले तर चौथा हरूही शकतात. आता यात चौथा बांग्लादेशशी झालाय आणि तो जिण्कलाय पण तो मी यात काऊण्ट करत नाही. क्रिकेटच्या भाषेत बांग्लादेशला का काऊण्ट करू नये याचे ऊत्तर देण्याची गरज असेल तर देतो.
असो, तर भारत बांग्लादेशला हरवत फायनलला पोहोचला, त्याऊलट पाकिस्तानने या स्पर्धेआधी सर्वात फेव्हरेट समजले जाणारया ईंग्लण्डला त्यांच्या घरात मात दिली. ते सुद्धा एखाद्या बाण्ग्लादेश वा झिम्ब्वाब्वेला बुकलून काढावे तसे बुकलून काढले. आणि ईंग्लंड त्या सामन्याच्या आधी एकूण एक जिण्कलेला. अगदी ऑस्ट्रेलियालाही त्यांनी फोडून काढलेला. किंबहुना त्यांचे फलण्दाज अशक्य फॉर्मात होते. पाकिस्तानने नेमके त्यांनाच जमिनीवर आणले.

भारताने आफ्रिकेला हरवले. पाकिस्ताननेही आफ्रिकेला हरवले. पण आफ्रिकेला नॉक आऊट म्हणजेच करो या मरो स्थितीत हरवण्यात फार कष्ट नाही कारण त्यांची वर्ल्डफेमस चोकर्सगिरी हे क्रिकेटची भाषा समजणारयांना वेगळे सांगायला नको. पाकिस्तानने मात्र स्वत:साठी करो या मरो स्थितीत त्यांना हरवले.

पाकिस्तान पहिलाच सामना भारताशी हरली तेव्हा जुनैद खान नव्हता. तसेच त्यानंतर फखर नावाचा एक सेन्सेशनल ओपनर सुद्धा आत आलाय. एक नवीनच कात टाकलेला संघ वाटतोय. आफ्रिका, लंका, ईंग्लंड यासारख्या संघांना सलग मात देत फायनलला पोहोचलेला पाकिस्तानच मला याक्षणाला सरस वाटतोय. याऊलट भारताची कसोटी अशी या स्पर्धेत लागलीच नाहीये. लंकेच्या सामन्याला लागली आणि वेरीएशन्सचे कौतुक होणारया गोलंदाजीच्या मर्यादा उघड्या पडल्या. ते पाहता कोहली टॉस जिंकून पहिली फलण्दाजी घेणे अवघड वाटतेय. तो चेसच करायला बघणार. किंबहुना आफ्रिका आणि बांग्लादेशशी हेच केले. पण तेव्हा टॉस जिंकलेलो. फायनलला हरलो तर अवघड होऊन जाईल. सुरुवातीला एखाद दुसरा झटका आणि त्यानंतर विकेट टेकिंग फॉर्ममध्ये असलेला हसन. मिडल ऑर्डर कधी कोलॅप्स होईल हे समजणारही नाही. त्यामुळे मला तरी सध्या टॉस जिंकण्या न जिंकण्यावर पाकिस्तानपेक्षा भारतच जास्त अवलंबून आहे असे वाटते.

येनीवेज,
रात्रीचे साडेतीन वाजत आल्याने तुर्तास ईतकेच. आगे क्या होगा ये तो अब आनेवाला वक्त ही बतायेगा Happy

अतिशय थोडक्या अवधीत मायबोलीकरांच्या गळ्यातील ताईत बनलेला ऋन्मेष हा आतापर्यंत मायबोली वरचा एकमेव आयडी असेल असे वाटते. ऋन्मेष चे धागे मायबोलीवर नसले तर मायबोली मध्ये काहीच मज्जा नाही बुवा असा एक ऋन्मेष चा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर मायबोलीवर तयार होतो आहे /झाला आहे Happy

ऋनम्या, पाकिस्तान ह्याव नी पाकिस्तान त्याव करुन उगा पनवती लाउ नको आधीच. गबस जरा.
रविवारी बघु काय होतंय ते.

अतिशय थोडक्या अवधीत मायबोलीकरांच्या गळ्यातील ताईत बनलेला ऋन्मेष हा आतापर्यंत मायबोली वरचा एकमेव आयडी असेल असे वाटते. ऋन्मेष चे धागे मायबोलीवर नसले तर मायबोली मध्ये काहीच मज्जा नाही बुवा असा एक ऋन्मेष चा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर मायबोलीवर तयार होतो आहे /झाला आहे >> यामुळे काहीजणांना झालेली अ‍ॅसिडीटी दृष्य स्वरुपात दिसते आहेच

Pages