जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबासाहेब यांना +१
सगळे इंग्लडलाच सपोर्ट करत होते. हा कुठल्या जगात राहतो देव जाणे जिथे रिऍलिटीपेक्षा वेगळं घडतं!

सद्यस्थितीत पाकिस्तान अतिशय टुकार आणि फालतू टीम असून फायनलपर्यंत गेली हेच आश्चर्य. असो, रविवारचा सामना पाहू शकणार नाही. तरी भारतीय संघास १०० टक्के पाठींबा.

ईथे भारत-पाक वा कुठल्याही दोन देशांमधील शत्रुत्वाबाबत हे लागू होते का ही मला शंका आहे.>>>मग तर तू खरेच नक्की तिकडे बॉर्डर वर काय घडते, युद्ध होते कि नाही, आतंक-दहशत कोण माजवत आहेत, जनतेचे हाल होतात कि नाही, कि फक्त जुजबी भांडणे चालू आहेत याची माहिती मिळव.

(शेकजारच्या घरातल्या माणसाने माझ्या घरात घुसून माझ्या घरातल्या एका माणसाला मारले तरी मला काय त्याचे? मी तर बाबा त्यांच्या घरातल्या लोकांशी मॅच खेळणार, असेच ना?)
माझा कुटुंबप्रमुख म्हणतोय का.खेळू नका त्याच्याशी?तोतर शेजारच्या कुटुंबप्रमुखाची प्रेमाने चौकशी करतोय. त्याच्या वाढदिवसाला न बोलवता जातोय.
त्याने सांगवे, खेळू नका। खेळच नसेल तर बघणार काय?

१९७४ साली भारताने डेव्हीस कपची फायनल.सोडली होती तत्त्वासाठी. आता तसं काही आहे का?
In the Inter-Zonal Zone, South Africa defeated Italy and India defeated the Soviet Union. The final was scratched and South Africa was awarded the Davis Cup after India refused to travel to South Africa for the final in protest of the South African government's apartheid policies.

सोनाली, युद्ध होतेय, चकमकी होताहेत. माणसं मारली जाताहेत हे मी नाकारतच नाहीये. प्रश्न वेगळा विचारलाय.
देशातली एखादी व्यक्ती त्या शत्रुत्वाला नाकारत असेल आणि तुमचे तुम्ही करा युद्ध मी यात नाही म्हणून तटस्थ राहत असेल तर तो तसे करू शकतो का? त्यात काही गैर आहे का?

चला मला सांगा...
आपल्याकडे पर्याय तरी आहे की सामना बघायचा की न बघायचा. आपल्याकडे पर्याय आहे आपली देशभक्तीची व्याख्या ठरवण्याचा आणि त्यानुसार वागण्याचा.
पण जे क्रिकेट सामना खेळत आहेत त्या खेळाडूंकडे हा पर्यायही नाही. जे कोणी आता बोलत आहेत की आम्ही भारतपाक सामन्यावर बहिष्कार टाकतो आम्ही बघणार नाही. ते लोकं जर आज भारतीय क्रिकेट संघात असते तर त्यांनी काय केले असते? खेळायला नकार दिला असता का? उत्तर हो असेल तर या संघातील एकाही खेळाडूला तसे वाटत नाही का? मग तुम्ही नक्की पैश्यासाठी खेळत आहात की देशासाठी?

भारतीय संघ जेव्हा परकीय संघाशी आणि परदेशातील भूमीवर खेळतो, तेव्हा सरकारच्या दहा पंधरा खात्यांच्या परवानगीशिवाय ते होत नाही. तक्तालीन सरकारच्या कोणत्याही धोरणाशी विसंगत असेल तर अशी परवानगीच मिळणार नाही.

त्यात सरकार ने स्वतः राजनैतिक संबंध तोडलेले नाहीत. सरकारी भेटीगाठी सुरूच आहेत. त्यात काहीच चूक नही. सीमेवरचे टेन्शन कमी झाले तर अतिरिक्त सैन्यही कमी करता येते. अशा हेतूनेच इतर राजनैतिक गोष्टीही सुरू असतात. मग जनरल लोकांनी सरकारच्या धोरणांशी विसंगत का वागावे?

मला पाक बद्दल अजिबात सहानुभूती नाही. सरकार व मिलीटरीने युद्ध करायचे ठरवले तर गोष्ट वेगळी. पण सध्या तसे नाही.

आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे...... Mumbai madhe Rahun Pakistan la support karnaar ki Lahor LA janar aahes

पाकिस्तानला नाही, पाकिस्तानी क्रिकेट टीमला सपोर्ट करणार आहे. दोघांत फरक आहे जरी आपण बोलताना फक्त पाकिस्तान बोलत असलो तरीही.. हे क्लीअर करणे गरजेचे वाटले. आणि हो मुंबईमध्येच राहून. लाहोरला जाण्यात मजा नाही. कारण तिथे बहुतांश लोकं पाकिस्तानला सपोर्ट करत असतील ना..

असो, अजून एक गोष्ट मी ऑबजर्व्ह केली. म्हणजे साधेच निरीक्षण आहे, हायझेनबर्ग यांची मर्डरकेस वगैरे सॉल्व्ह नाही केलीय, तुमच्याही निरीक्षणात आले असेन की भारत-पाक सामने हे नेहमी मुद्दाम रविवारी वा सुट्टीच्या दिवशी ठेवले जातात. त्यांची जाहीरातही एखद्या ब्लॉकबस्टर सिनेमासारखी केली जाते. मौका मौका जाहीराती खास त्यासाठी बनवल्या जातात. म्हटले तर खेळ आणि म्हटले तर चित्रपटांसारखाच व्यवसाय आहे हा. पुढच्यावेळी "चला हवा येऊ द्या" मध्ये विराट कोहली आणि शोएब मलिक (सानिया मिर्झासह जोडीने) आले आणि म्हणू लागले येत्या रविवारी आमचा सामन्याला यायचं हं.. तरी नवल वाटणार नाही.

आणखी एक निरीक्षणाची
गोष्ट म्हणजे आयसीसी चषकात भारत पाक सामने आले तर नाईलाज आहे, खेळावेच लागणार, आणि ते खेळताहेत तर आपल्यालाही देशाला सपोर्ट करायला बघावेच लागणार.. असा युक्तीवाद करणारे काही जण ईंग्लंड-पाकिस्तान सामन्याचाही आनंद लुटताना सापडले आहेत.

देशभक्ती सिद्ध करायच्या नव्या युक्त्या.
१. स्वतः का ही ही करायचं नाही.
२. दुसर्‍याला तू हे, हे आणि हे करू नकोस , ते देशद्रोही कृत्य आहे किंवा तू ते ते आणि ते करून देशभक्ती सिद्ध कर, नाही तर तू देशद्रोही ; असं बजावायचं.

या धाग्याचा नक्की उद्देश काय आहे? खरतर एकच. TRP मिळविणे नेहेमीच्या वादाला रॉकेल पुरवणे.

जे लोक पाकशी का खेळता म्हणत आहेत व अशा म्याच का बघता म्हणत आहेत त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलीच नाहीये का? आपण पाकड्यांशी कुठलीही वेगळी फक्त दोघच असलेली स्पर्धा ठेवली तर हे म्हणणे योग्य आहे की सीमेवर सैनिक लढत आहेत व तुम्ही स्पर्धा घेताय.

आत्ता चालू असलेली स्पर्धा आंतरराष्ट्रीय आहे तिथे तुम्ही पाक खेळणार असेल तर आम्ही खेळणार नाही असे म्हणून चालेल का? अशाने मग कुठल्याच स्पर्धेत खेळायलाच नको. उगाच काहीतरी बोलायचे म्हणून का विरोध करतात देव जाणे.

बाकी धाग्याचा उद्देशच चिथावणी देणे व तसेच कळालावे धागे उघडणे हे असल्याने चालुद्या!!

भारतीय संघ जेव्हा परकीय संघाशी आणि परदेशातील भूमीवर खेळतो, तेव्हा सरकारच्या दहा पंधरा खात्यांच्या परवानगीशिवाय ते होत नाही. तक्तालीन सरकारच्या कोणत्याही धोरणाशी विसंगत असेल तर अशी परवानगीच मिळणार नाही.
त्यात सरकार ने स्वतः राजनैतिक संबंध तोडलेले नाहीत. सरकारी भेटीगाठी सुरूच आहेत. त्यात काहीच चूक नही. सीमेवरचे टेन्शन कमी झाले तर अतिरिक्त सैन्यही कमी करता येते. अशा हेतूनेच इतर राजनैतिक गोष्टीही सुरू असतात. मग जनरल लोकांनी सरकारच्या धोरणांशी विसंगत का वागावे?
मला पाक बद्दल अजिबात सहानुभूती नाही. सरकार व मिलीटरीने युद्ध करायचे ठरवले तर गोष्ट वेगळी. पण सध्या तसे नाही.

>> +१११११

एकदा ही पोस्ट शांतपणे वाचून समजून घेतली की चर्चा संपवली तरी चालेल Happy

<आत्ता चालू असलेली स्पर्धा आंतरराष्ट्रीय आहे तिथे तुम्ही पाक खेळणार असेल तर आम्ही खेळणार नाही असे म्हणून चालेल का? अशाने मग कुठल्याच स्पर्धेत खेळायलाच नको. उगाच काहीतरी बोलायचे म्हणून का विरोध करतात देव जाणे.>
का नाही?
मी आधी उदाहरण दिलंय. द.आफ्रिकेच्या वर्णद्वेषाविरुद्ध भारताने डेव्हिस कपची फायनल सोडली. १९८० मॉस्को ऑलिंपिकवर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी आणि १९८४ लॉस एंज्ल्स ऑलिंपिक्सवर रशिया व त्याच्या मित्र राष्ट्रांनी बहिष्कार टाकला.
खरं तर विजय मल्ल्या आणि ललित मोदीं(नदीम श्रवणमधला नदीम पण इथेच आहे ना?) सारख्या लोकांना आश्रय देणार्‍या देशात होत असलेल्या या स्पर्धेवरच बहिष्कार घालायला हवा होता - इति अत्युच्च कोटीचे देशभक्त अर्णब गोस्वामी

जो खेळ सट्टेबाज खेळवतात व लाखो क्रिडारसिकास मुर्ख बनवतात तो खेळ खेळ न राहता पोरखेळ झालाय असे वाटते.

पाकिस्तान मध्ये चिंतेची मोठी लाट..

India Vs Pak final मागच्या TV चा EMI अजून भरतोय....
.
.
आता नवीन TV कुठून आणू

- (एक चिंत्ताग्रस्त पाकीस्तानी)

पाकिस्तान आणि भारत फायनल मधे येणार हे सेमि - फायनल च्या आधि च ठरलेले होते.
भारत जर फायनल मधे नसेल तर मॅच बघणार कोण ह्या जगात, मग धंदा होणार कसा?
पाक नी सेमिफायनल मधे प्रवेश केला तेंव्हाच त्यांचा फायनल मधे प्रवेश नक्कि होता.
----------------
जरी पाकी खेळाडु थेट अतिरेकी नसतील, तरी त्यांना भारताशी क्रिकेट खेळण्या मुळेच पैसा मिळतो आणि तो पैसा किंवा त्या पैश्याचे २-५% कोण विरुद्ध वापरले जातात ते सांगायचि गरज नाहि.
भारता नी पाक शी कुठेही आणि कधी ही क्रिकेट खेळायला बंदि केली तर पाकची क्रिकेट टिम कायमचि बंद करावि लागेल. जागतिक क्रिकेट फक्त आणि फक्त भारताच्या १२५ कोटी लोकांवर तरते आहे.

ÿआणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे>>> काहि हरकत नाहि तिकडेच सपोर्टची आवश्यकता आहे Proud
most deserving for defeat

मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या ....

किती ती रिस्क!! Wink

कांदापोहे,
>>>>>>>
आत्ता चालू असलेली स्पर्धा आंतरराष्ट्रीय आहे तिथे तुम्ही पाक खेळणार असेल तर आम्ही खेळणार नाही असे म्हणून चालेल का? अशाने मग कुठल्याच स्पर्धेत खेळायलाच नको. उगाच काहीतरी बोलायचे म्हणून का विरोध करतात देव जाणे.
>>>>>

मागे बहुधा 1996 च्या विश्वचषकाला ऑस्ट्रेलियाने आणि आणखी एका टीमने सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेशी तिथे जाऊन खेळायला नकार दिला. श्रीलंकेला फुकटचे पॉईण्ट मिळाले. पण ऑस्ट्रेलिया तरीही पुढच्या फेरीत गेलीच. म्हणजे किमान साखळी सामन्यात तरी आपण असे करू शकतो.

पण चला, आपल्यात हिंमत नाही ती रिस्क घ्यायची आणि ते दोन पॉईण्ट सोडायची तयारी आपण दाखवली नाही. आणि खेळलोच पाकिस्तानशी... नाईलाजाने..

पण खरंच तुम्हाला हे नाईलाजाने खेळल्यासारखे वाटतेय?
प्रामाणिकपणे सांगा...
एवढी जाहीरातबाजी करून, जल्लोष करून, मुद्दाम सुट्टीच्या दिवशीच कसा सामना येईल हे बघून खेळलेला सामना नाईलाजाने खेळलेला वाटतो का?

बरं, मग ? या चर्चेतून आणि धाग्यातून तुला नक्की सिद्ध काय करायचं आहे? >>

दक्षिणा , यू आर............ जोकिंग (आखरी पास्ताच्या चालीवर वाचावे)

बरं, मग ? या चर्चेतून आणि धाग्यातून तुला नक्की सिद्ध काय करायचं आहे? ....
>>
हा प्रश्न ऋ च्या प्रत्येक धाग्यासाठी बाय डिफॉल्ट लागू पडतो ना?

आत्ता चालू असलेली स्पर्धा आंतरराष्ट्रीय आहे तिथे तुम्ही पाक खेळणार असेल तर आम्ही खेळणार नाही असे म्हणून चालेल का? अशाने मग कुठल्याच स्पर्धेत खेळायलाच नको>>>>>>

हि हि हि. भारतानी क्रिकेटच्या स्पर्धेत भाग घेतला नाही तर हि किंवा अशी कुठलीच स्पर्धा होणार नाही.

भारतानी क्रिकेटच्या स्पर्धेत भाग घेतला नाही तर हि किंवा अशी कुठलीच स्पर्धा होणार नाही.>>>> अस खरंच आहे ??? ऑसीज, न्युझीलंड, वेस्ट इंडीज बाकी टीम काय फुकट आहेत का ????? Uhoh

बघ ऋ तुझ्या धाग्याच्या शंभरी साठी मी पण हातभार लावला. Wink

माझ्यावर आणि सचिन रमेश तेण्डुलकरवर हे असले आरोप नेहमीच होतात पण विनम्रपणे ईतकेच सांगू ईच्छितो की धाग्याचे शतक होणे देशहितापेक्षा मोठे नाही.

बाकी मी प्रतिसादात विचारलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्तरे देणे काही जण टाळत आहेत वा नेमके उत्तरे देत नाहीत. किंवा बहुतेक गोंधळ आहे.

आता अजून एक प्रश्न :
एखद्या शत्रूराष्ट्राबद्दल देशाची पॉलिसी आणि आपली भुमिका जर विरुद्ध टोकाची असेल तर ते बंड वा देशद्रोह समजावा का?

उदाहरणार्थ -
1) भारताने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये परवानगी नाकारली असून त्यांनी खेळावे अशी ईच्छा व्यक्त करणे.
2) भारत पाक विश्वचषकातील सामन्यांना भारत सरकारने परवानगी दिली असूनही आपण भारताचेच प्रतिनिधीत्व करत त्या सामन्यावर बहिष्कार टाकणे.

बरं, मग ? या चर्चेतून आणि धाग्यातून तुला नक्की सिद्ध काय करायचं आहे?
>>>>
दक्षिणा,
मी काही शास्त्रज्ञ, गणितज्ञ, वा क्रिकेट, राजकारण, परराष्ट्र धोरण या विषयांपैकी कश्याचाही तज्ञ नाहीये. मी काय सिद्ध करणार? लोकांची मते जाणून घ्यायला हा धागा. तसेच ही मते केवळ मलाच जाणून घ्यायची आहेत असेही नाही. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने सर्वच लोकांना एकमेकांची मते कळणे आणि त्यानुसार बहुतांश लोकांनी बहुमताने आणि गोंधळून न जाता एकच पॉलिसी ठरवणे गरजेचे नाही का? जर लोकांना अश्या चर्चेला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे चांगले काम असेल तर नक्कीच त्याचे श्रेय मयबोलीला जाते. पण त्यावरही कोणीतरी धागा काढायला हवाच ना, ते भाग्य माझ्या पदरी मी पाडून घेतले ईतकेच.
बाकी आपली मते रोखठोक आणि कोणाला काय वाटेल याची पर्वा न करता असतात. (हे कौतुक आहे) त्यामुळे या विषयावर आपले मत जाणून घ्यायला आवडेल Happy

Pages