अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका शुक्रवारी आमच्या सोसायटीच्या व्हॉट्सॅप ग्रुप वर एका मित्राचा मेसेज आला की त्याची बायको माहेरी गेलीय तर त्याच्या घरी दारु प्यायला जमायचं का? माझ्यासारखे काही जणं स्वतःच्याच घरी जेउन तिथे गेले, तर काहींनी तिथे गेल्यानंतर फुडपांडावरुन ऑर्डर दिली. मस्त गप्पा, दारु, गॉसिपिंग वगैरे रात्री १-१:३० पर्यंत चालंल. मग जे माझ्यासारखे घरुन जेउन गेलेले त्यांना भुका लागल्या. घरातला दारुचा स्टॉक पण संपलेला मग दोन गाड्या काढुन हायवे वरच्या एका हॉटेलात जाउन अजुन खाणं पिणं झालं. रात्री ३ ला परत आलो बिल्डींग च्या बेसमेंट (-१ लेवल. झिरो लेवल म्हणजे ग्राउंड फ्लोअर) मधे गाड्या पार्क केल्या. पण अजुनही गप्पा संपल्या नव्हत्या. तिथेच जमिनीवर मांड्या ठोकुन कोंडाळं करुन बसलो. अचानक एकाला आठवलं की आम्ही जिथे बसलोय त्याच्या बरोबर वरती २ वर्षांपुर्वी एका विशीतल्या तरुणीने टॉप फ्लोअर वरुन उडी मारुन आत्महत्या केलेली. सोसायटीचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने आमच्यापैकीच काहीजणं पोलिसांना बोलवायला, त्या तरुणीची ओळख पटवायला पुढे होतो. अचानक गप्पा गंभीर झाल्या. इतक्या उंचावरुन पडल्यामुळे तिचा मेंदु कसा दुरपर्यंत पसरला होता त्याची बीभत्स वर्णनं करुन झाली. एक जण म्हणाला की भुताच्या भितीने त्या जागेच्या आसपास काहीजणं त्यांच्या मुलांना खेळायला पाठवत नाहीत. दुसरा म्हणाला भुतं वगैरे काही नसतं आणि त्याच क्षणी सगळ्यात जास्त प्यायलेला एक म्हणाला के त्याला घुंगरांचा आवाज येतोय. आम्ही बाकीचे हसायला लागलो.
"चु$% बना रह है क्या गां#" कोणीतरी त्याला म्हणालं
तेव्हढ्यात अजिबात न प्यायलेला तिसराच म्हणाला की त्या आत्महत्येचा विषय निघाल्यापासुन त्यालापण घुंगरांचा आवाज येतोय. अचानक सगळे शांत झाले. रात्री ३-३:३० ची निरव शांतता. आणि त्या शांततेत दुरुन कुठुन तरी "छुम" असा हल्का आवाज आला. घुंगराचा आवाज म्हणण्यापेक्षा पैजणाचा आवाज वाटतोय असं एक म्हणाला. सगळे चिडीचुप झाले. काही सेकंदांनंतर पुन्हा तो आवाज आला.
"उस लडकीने मरते वक्त पायल पहने हुए थे क्या?"
विचित्र वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेल्या त्या मुलीच्या पायातले पैजण चट्कन माझ्या डोळ्यासमोर आले.
"हा, उस्ने पायल पहने थे" मी अजाणता म्हणालो.
१०-१५ सेकंदांची अवघडलेली शांतता पसरली. तेवढ्या वेळात ४-५ वेळा पैजणांचा "छुम" आवाज आला. आवाज येतोय यात आता काहीच दुमत नव्हतं. मी उठलो आणि आवाजाच्या दिशेने निघालो.
"अबे भो#$% टग्या, तेरी गां&&$% $%$% $%#$!! चुप चाप बैठ इधर" एक दारुड्या ओरडला मला.
"भो#@$#, इस्स #$#$% मिथ को अब्बी दफनाना पडेगा" अस्मादिकांनी ड्वायलॉक मारला.
७-८ पावलं चलुन गेल्यावर कळलं की आवाज मागुन येतोय. पण मी आत्ताच तिथुनच तर चालत आलेलो. मी गोंधळुन मागे फिरलो.
"क्या हुआ भाई? " मघाशी मला शिव्या घालणार्‍याच्या आवाजात आता काळजी होती.
"चुप बैठ बे बेवडे, मुझे सुनने दे आवाज कहांसे आ रही है" मी म्हणालो.
२-४ पावलं पुन्हा मागे आल्यावर मी स्तब्ध उभा राहीलो. इथेच आवाज सगळ्यात स्पष्ट येत होता. नक्कीच नाजुक पैजणाचा "छुम" असा आवाज. पण इथे काहीच नव्हतं? सगळ्यात जवळ पार्क केलेली गाडी पण ८-१० फुट दुर होती. आवाज वरुन येतोय का? वर बघितलं तर सिलिंगशिवाय काहीच नाही. ट्युबलाईट आणि इकडुन तिकडे जाणार्‍या काही वायर्स आणि पाइप. माझ्या लक्षात आलं की आता मी एक्झॅक्ट्ली त्या जागी उभा होतो जिथे वरच्या पोडियम वर ती तरुणी मरुन पडलेली. मला तसं तिथे उभं राहुन वर बघताना बाकिच्यांनी पण ओळंखलं मी काय विचार करतोय ते. कट्टर नास्तिकांच्या मनात देखिल शंका उभ्या राहील्या. सगळेच आपापल्या जागी खिळुन होते. कोणीच आपली जागा सोडुन माझ्या शोधकार्यात मदत करायला आलं नाही.
मी वर बघत असतानाच पुन्हा आवाज आला ................."छुम"
आणि माझ्याही नकळत माझ्या चेहर्‍यावर हसु आलं. मला शोध लागला आवाज कुठुन येतोय याचा.
वरच्या ट्युबलाईटच्या वायरींमधे एका चिमणीचं घरटं होतं. त्या घरट्यातुन बहुतेक पिल्लु नाजुक "चिव" असा आवाज करत होतं जो आवाज आम्हाला पैजणाच्या आवाजा सारखा वाटत होता.
"इस्स चिडीया के मांकी #$%#$, सारी नशा उतार दी #$%#$%"
मित्र पुन्हा शिव्या देउ लागले म्हणजे तणाव संपला होता Happy एक अमानवी किस्सा पसरायच्या आधीच विरुन गेला.

. . (दारू)
नाजुक चिव चिव -------> पैजण वाला छम छम
. . कैटलिस्ट.

Wink

प्लस जिथे ते बसले होते तिथलं टेम्प्रेचर, वास्तू रचना, हवेची घनता, या सगळ्यांचा आवाज बदलण्यात हातभार लागतो

बाय द वे, दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही तपासलं तेव्हा कळलं की त्या मुलीने उडी मारलेली जागा आम्ही बसलो होतो तिथुन तब्बल तीसेक फुट दुर होती. पण आधल्या रात्री आमची पक्की खात्री झलेली की आम्ही त्याच जागेच्या खाली आहोत.
जोपर्यंत तो आवाज कसला आहे हे माहीत नव्हतं तोपर्यंत तो आवाज पैजणाचाच वाटत होता, एकदा कळल्यानंतर ते वाटणं बंद झालं.

पुर्वश्रमीची पटणी मग Igates आणि आता कॅपजेमीनी झालेली ही इमारत.

मुंबईकडे जाताना ठाण्याची खाडी पार करताना डाव्या हाताला दिसेल.
गोलाकार चार इमारती आहेत. सुंदर बांधकाम.
देखणी नीटनेटकी बाग अगदी कारंज्यांसकट.
बर लोकांचाही वावर आहे.
मी तिथे जिमला जातो.

आत गेल्यावर एक प्रकारची अस्वस्थता येते.
माझ्या मित्रानेही मान्य केल.

कुणाला तिथला अनुभव आहे का ?

@गुगु - कधी काही नीट व्हेंटिलेशन नसल्याने पण असे घडू शकते, आधी त्या जागेची रचना पहा ... दरवेळी अमानवीय असेलच असे नाही

अनेकदा पूर्वी स्मशान अथवा दफ़न भूमि असलेल्या ठिकाणी अनाहूतपणे बिल्डिंग्स उभारतात तेव्हा अश्या प्रकारचे अनुभव येवू शकतात. (आलेले आहेत)

हो नक्कीच देणार
नाव आणि पत्तासहित Happy
फक्त ते कुठल्या अंकातील अनुभव वाचला होता ते आठवायला /मासिक शोधायला थोडा वेळ लागेल.

राहुल
ते अनुभव खास अनुभवण्यासाठी अनेकदा अकारण / शिकारीव्यतीरीक्त जंगल भ्रमंती आणि काही निर्जन समुद्र किनारे (जे अश्या गोष्टीसाठी फेमस होते) असे अनेकवार आणि मुद्दाम पौर्णिमा अमावस्या मुहूर्त साधुन घडलीय पण डायरेक्ट भुत काही दिसले नाही (बहुतेक 2 भूते एकमेकांना समोरसमोर दिसत नसावीत Wink )

पण त्यांचे अस्तित्व नक्की फिल केलाय आणि त्याचे स्वरुप आधीच्या प्रतिसादांत अनेकदा लिहिलय अन् त्याची कारणमीमांसासुद्धा दिलीय.

interesting...
बाकी दोन भूतं एकमेकांना दिसत नाहीत>>> Lol आवडलं.

फक्त ते कुठल्या अंकातील अनुभव वाचला होता ते आठवायला /मासिक शोधायला थोडा वेळ लागेल.>>>
"(आलेले आहेत) " यावरुन तु्म्हाला आलेले असे वाटले, म्हणुन विचारले.

असो, जर मासिकात सापडले तर सांगा.
तिथे जाउन बघायला आवडेल.

राज, तो व्हिडीओ बघीतला. पण मला काहीच कळले नाही. ती नायिका ( नायिकेचे खरे नाव पूजा नायक) कशाला घाबरते? तिला तिथे काय दिसते तेच कळले नाही.

मोबाईल फोन असतो झाडावर ज्याची रिंगटोन बाळाच्या रडण्याच्या आवाजाची असते.
तो माणुस (बहुतेक) झाडावर मोबाईल फोन विसरला असतो.

Pages