'अ‍ॅक्वा सेरेनिटी' केस

Submitted by हायझेनबर्ग on 8 June, 2017 - 20:43

टुरिस्ट लोकांनी कायमच ओसंडून वाहणार्‍या वर्दळीच्या गोव्यापासून पाऊण तासभर तरी लांब अरबी समुद्राच्या किनार्‍याला लागून 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' दिमाखात ऊभी होती.. बिल्डिंगपासून केवळ ३० मीटर वर असलेल्या बीचवर समुद्राची गाज आणि समुद्रीपक्षांच्या आवाजाशिवाय ईतर मानवनिर्मित आवाज फार क्वचितंच ऐकायला मिळत. बिल्डिंगमधल्या बारा सूपर लक्झ्युरियस आणि अतिप्रशस्तं अपार्टमेंट मध्ये राहणारे अतिश्रीमंत रिटायरी कपल्स सोडून चार पाच मैलांच्या परिसरात दुसरा मानवी निवारा नव्हता. हा पूर्ण ८० एकरचा बीच एरिया 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' नावाच्या मोठ्या कन्स्ट्रक्शन ग्रूपने विकत घेतल्याने भविष्यातही तिथे 'गॅलॅक्सी बीच सिटी' अंतर्गत 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' सारख्याच अजून सूपर लक्झ्युरियस बिल्डिंग बांधण्याचा ग्रूपचा मानस होता. त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्ट 'गॅलॅक्सी बीच सिटी- अ‍ॅक्वा सेरेनिटी' ला अपेक्षापेक्षा खूप जबरदस्तं प्रतिसाद मिळाला होता आणि पुढच्या बिल्डिंगची बुकिंग कधी सुरू होणार ह्याची देश विदेशातून प्रॉस्पेक्टिव क्लायंट्सकडून सातत्याने विचारणा होत होती.

तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी ह्या प्रोजेक्टचे पहिले प्रपोजल/प्रेझेंटेशन 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' च्या टॉप एक्झेक्युटिव्ज समोर झाले तेव्हा कंपनीचा भविष्यकाळ ह्या प्रोजेक्टमुळे किती ऊज्ज्वल असू शकतो हे ऊमगायला ग्रूप सीईओ 'राजपत गांधींना' ११ वा मिनिट देखील लागला नाही. प्रेझेंटेशन देणार्‍या ज्या व्यक्तीने आपल्या परिपूर्ण ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर पहिल्या दहा मिनिटांतच सगळ्या एक्झेक्युटिव्जना खिशात घातले होते ती असामी होती 'नरीन मिस्त्री'. आय आय एम मधली पदवी, देश विदेशातल्या कंपनीतल्या ऊच्चपदावरच्या अधिकार्‍यांबरोबर कामाचा अनुभव आणि प्रचंड मोठे प्रोफेशनल सर्कल ह्यामुळे नरीन मिस्त्रींचे नाव गॅलॅक्सी ग्रूप ला अपरिचित निश्चितंच नव्हते. मिस्त्रींनी आजवर नवीन अनएक्स्प्लोर्ड पण प्रॉमिसिंग ठिकाणी लँड अ‍ॅक्विझिशन पासून कंपन्यांचे युनिट्स सेट करण्यापर्यंतच्या कामांसाठे अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी कन्सल्टिंग केले होते, पण कधीच कुठल्या कंपनीची एम्प्लॉयमेंट मात्रं घेतली नव्हती. तसे करणे त्यांना कधीच रूचले नाही आणि जमले तर आजिबातंच नसते. 'रिअल ईस्टेट ग्रूप' ह्या 'जमाती'शी मिस्त्रींचा संबंध पहिल्यांदाच आला होता आणि हे कदाचित त्यांचे दुर्दैवच असावे.

आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांच्या कामाला प्रचंड डिमांड होती आणि त्यांचा ऊत्साहही २५ वर्षाच्या तरूणाला लाजवेल असा होता. एक My way or Highway असा प्रचंड हेकेखोर स्वभाव सोडला तर ५ फुट १० ईंच आणि ७५ किलो वजनाची त्यांची पर्सनॅलिटी अतिशय इंप्रेसिव आणि ईन्फ्ल्युएन्सिंग होती. मिस्त्री लाईफ लाँग रनर होते रोज सकाळी पूर्ण बीचला ते या वयातही ६० मिनिटांची फेरी मारत आणि वीकेंडलाही बर्‍याचदा अनेक ठिकाणी मॅरॅथॉन ही पळत. त्यांच्या कायम धाड्सी स्वभावाने त्यांना नेचर अ‍ॅडवेंचररही बनवले नसते तर नवलच. अफ्रिका, अ‍ॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातली कैक जंगलात त्यांनी एकट्याने भटकंती केली होती . आपल्या अनुभवाबद्दल 'नेचर्स अ‍ॅडवेंचर्स' मासिकांत त्यांचे एक दोन लेख देखील प्रकाशित झाले होते. हौशी लोकांनाही ते अश्या मोहिमांत जीव सुखरूप कसा ठेवावा ह्याचे मार्दर्शन त्यांच्या ब्लॉग द्वारे करीत.

परंतू मागच्या सहा महिन्यांपासून गॅलॅक्सी ग्रूप खासकरून सीईओ राजपत गांधी व सीएफओ रतन पारीख आणि नरीन मिस्त्रींमध्ये शीतयुद्ध चालू होते. झाले असे होते की मिस्त्रींनी 'गॅलॅक्सी बीच सिटी' प्रोजेक्ट च्या आधी कन्सल्टिंग सोडून त्यांच्या 'आर्ट्स डीलर' बनण्याच्या लाँग टाईम पॅशनला नवा पेशा म्हणून स्वीकारले होते. 'गॅलॅक्सी बीच सिटी'ला भारताची आर्ट आणि अँटिक कॅपिटल बनवण्याचे त्यांचे भव्यदिव्य स्वप्नं होते. त्यांच्या ३५ वर्षांच्या करियर मध्ये त्यांनी अतिशय दुर्मिळ पेंटिंग्स, पुरातन कला वस्तू पासून तर अँटिक फर्निचर, नामशेष होत चाललेले पण कायदेशीर मार्गाने टॅक्सिडर्म केलेले प्राणी, जुनी शस्त्रे असे काय अन काय जमा केले होते. आपली आयुष्याची कमाई कॅपिटल मार्केट मध्ये ईनवेस्ट न करता त्यांनी अश्या आर्ट्स कलेक्शन मध्येच गुंतवली होती. आज जर त्यांनी त्यांचे कलेकशन लिक्विडेट केले असते तर गेल्या ३५ वर्षात कुठल्याही कॅपिटल मार्केटने दिला असता त्याच्या ३ ते ४ पट परतावा त्यांच्या कलेक्शन ने त्यांना मिळवून दिला असता. आपल्या कलेक्शनसाठी लागणार्‍या श्रीमंत आणि दर्दी क्लायंट्सना टॅप करण्यासाठी देशोदेशी न हिंडता 'गॅलॅक्सी बीच सिटी' च्या रुपाने असा क्लायंट बेसच तयार करण्याचा मास्टर प्लान त्यांनी गॅलॅक्सी ग्रूपला हाताशी धरून अंमलात आणण्याचा घाट घातला होता. शेवटी मिस्त्री हे एक प्रचंड हुषार आणि महत्वाकांक्षी रसायन होते आणि अश्या मोठ्या गोष्टी घडवून आणाण्याचा पेशंस आणि अनुभव त्यांनी पूर्ण ऊमेद खर्चून कमावला होताच.

तर गांधी-पारीख आणि मिस्त्री मधल्या शीतयुद्धाचे कारण होते 'गॅलॅक्सी बीच सिटी' मधली 'अ‍ॅक्वा सेरेनिटीला' लागून असलेली ३ एकर जागा. ह्या जागेवर 'गॅलॅक्सी ग्रूप' मिस्त्रींची कन्सल्टिंग फी म्हणून तीन वर्षापूर्वी झालेल्या करारानुसार मिस्त्रींना एक तीन मजली आर्ट गॅलरी बांधून देण्यास बांधील होता आणि त्यासोबतच सहा मजल्यांच्या 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' मधल्या टॉप फ्लोअरवरच्या दोन पैकी एक सी फेसिंग फ्लॅट '६०२' देण्यासाठी सुद्धा. परंतू 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' च्या जबरदस्तं यशानंतर आणि पुढच्या स्कीमसाठी अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्तं किंमत मोजण्यास तयार असणार्‍या क्लायंटस मुळे गांधी-पारीखना आर्ट गॅलरीची मोक्याची जागा मिस्त्रींना देण्यास प्रचंड जिवावर आले होते. ते आता मिस्त्रींना सेरेनिटीपासून लांब गॅलॅक्सी बीच सिटीची एका कोपर्‍यातली जागा घेण्यास मनधरणी करत होते. गांधी-पारीखांची ऊफाळलेली लालसा आणि मिस्त्रींचा प्रचंड हेकेखोर स्वभाव ह्यामुळे ही मनधरणी, मनभेद आणि अविश्वासापर्यंत पोचायला महिनाभरही लागला नाही. ठरलेल्या जागेवर आर्ट गॅलरीचे काम सुरू करण्यास मुद्दाम केला जाणारा ऊशीर आणि जागेबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा हेका त्यामुळे मिस्त्रींनी गांधींना कोर्टात खेचण्याची आणि पूर्ण बीच सिटीवरच स्टे आणण्याची धमकी दिली तेव्हा गांधी, पारीखांचे धाबे जोरदार दणाणले. आपली मोक्याची जागा वाचवण्याचा शेवटचा 'दाम-भेद' ऊपाय म्हणून गांधी-पारीखांनी मिस्त्रीं च्या आर्ट्स कलेक्शनचे कस्टोडियन आणि मॅनेजर कुणाल भरूचांना मिस्त्रींचे मन वळवण्यासाठी चार कोटी रुपयांची लाच क्लॉबॅक क्लॉजसहित दिली (क्लॉबॅक म्हणजे जर भरूचा मिस्त्रींचे मन वळवण्यात अपयशी ठरले तर चार कोटी रुपये त्यांना गांधींना परत करावे लागतील). हा ही ऊपाय न चालल्यास मिस्त्रींवर 'दंड' ऊपाय करून त्यांना 'कायमचे' हटवण्याचीही गांधी-पारीखांची तयारी होतीच.

पण मिस्त्रींना कुठूनतरी भरूचांनी चार कोटी रुपये लाच स्वीकारल्याची बातमी कळालीच. त्यांनी लगोलग भरूच्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या ईतर क्लायंट समोरच विश्वासघात केल्याचा आरोप ठेवत त्यांना मानहानीकारक बोल लावले. भरूच्यांच्या जागी लवकरच दुसरा कस्टोडियन नेमणार अशी धमकीही दिली. भरूचांबरोबर तीन महिन्यांत एक्स्पायर होणारे काँट्रॅक्ट रिन्यू न करता मिस्त्रींनी त्यांच्या कलेक्शनमधले काही छोटे मोठे आर्टिफॅक्ट्स आपल्या अ‍ॅक्वा सेरेनिटी मधल्या प्रशस्तं फ्लॅट मध्ये ट्र्रान्सपोर्ट करण्यास सुरूवात केली. (असे करण्यामागे आर्ट गॅलरीला लागत असलेल्या ऊशीरा मुळे क्लायंट्सना घरीच बोलावून आपले कलेक्शन दाखवण्याचाही त्यांचा अंतर्गत हेतू होता) भरूचा मिस्त्रींच्या कलेक्शनच्या सेफ किपिंगसाठी कायदेशीर रित्या बांधील होते त्यामुळे मिस्त्रींना अजून तीन महिने काही चिंता नव्हती पण भरूचांवर अजून विश्वास ठेवण्याचीही मिस्त्रींची ईच्छा नव्हती.
मिस्त्री १५ वर्षांची मैत्री आणि संबंध अश्या अपमानकारक रित्या तोडून गेल्याचा भरूचांना प्रचंड राग आला. मिस्त्रींच्या आरोपानंतर समोर बसलेले क्लायंट्स ऊठून गेल्याने मिस्त्रींमुळे आपले आता कमीत कमी ८-१२ कोटींचे नुकसान होणार समजल्याने त्यांनी मनोमन मिस्त्रींचा बदला घेण्याचा चंगच बांधला. गांधी-पारीख बरोबर मिस्त्रींच्या जीवावर ऊठलेल्या लोकांच्या यादीमध्ये भरूचांचेही नाव अ‍ॅड झाले.

पण ही यादी ईथेच संपत नाही.

डिमांड्मध्ये असलेले कंन्सल्टींगचे करियर सोडून तीन वर्षांपूर्वी गोव्यातच सेटल होण्याचे मिस्त्रींनी ठरवले त्याला कारण होते त्यांची एकुलती एक मुलगी 'पेरिजाद' आणि तिचा अडीच वर्षांचा मुलगा 'दानिश'. जगातल्या सर्व सुखसोयींनी युक्त कॉलेज/हॉस्टेल्स मध्ये का वाढली असेना पण लहानपणापासूनच वडिलांपासून लांब आणि आईविना वाढलेल्या पेरिजाद ने जेव्हा 'कैझाद दोर्दीशी' लग्नं करायचे ठरवले तेव्हा देशाबाहेर असलेल्या मिस्त्रींना तिने केवळ औपचारिकता म्हणूनच दोन दिवस आधी लग्नाची तारीख कळवली. आपल्या बिझी आयुष्याने आपल्या मुलीला आपल्यापासून किती लांब लोटले ह्याची जाणीव मिस्त्रींना झाली आणि आयुष्यात कधीही तडकाफडकी निर्णय न घेणारे मिस्त्री हातातले काम सोडून लगोलग गोव्यात दाखल झाले. कौटुंबिक सुखासाठी आसुसलेली मलूल चेहर्‍याची पेरिजाद पाहून त्यांच्या जीवाची कोण घालमेल झाली. त्यांनी पेरिजादकडे तिच्या नातं जपण्यात अपयशी ठरलेल्या बापाला माफ करण्यासाठी हात पसरले. पेरिजादनेही मोठ्या मनाने त्यांना माफ केले आणि मिस्त्रींनी आनंदाने गोव्याला आपले घर बनवले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कैझादच्या अल्कोहोलिक, बाहेरख्याली आणि वायोलंट वागण्याला कंटाळून आयुष्यात कायम प्रेमाची वानवाच नशिबी आलेल्या पेरिजाद ने दानिश च्या जन्मानंतर दीड वर्षांतच मिस्त्रींना पत्रं पाठवून दानिशची काळजी घेण्याची श्यपथ घालून आपली जीवनयात्रा संपवली. खचलेल्या मिस्त्रींनी पेरिजाद बाबत झालेल्या चुकीचं प्रायश्चित्तं म्हणून दानिशची कस्टडी मिळवून कैझादला पेरीजादच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवून कायदेशीर शिक्षा करण्याचं ठरवलं. हॉटेलिंगच्या मोठा बिझनेस असलेली कैझादची फॅमिलीही पैसा आणि काँटॅक्ट्सच्या बाबतीत कमी नसल्याने दानिशची लीगल कस्टडी मिळावण्यात मिस्त्रींना खूपच कष्टाची कायदेशीर लढाई करावी लागली. पण आयुष्यात आजवर कधीच हार न मानलेले मिस्त्री ही लढाईदेखील मागच्याच आठवड्यात जिंकले. कैझादला शिक्षा झाली नाही पण आठवड्याभरात दानिशचा ताबा मिस्त्रींकडे देण्याचे अपील कोर्टाने मंजूर केले. पुढच्या आठवड्यात दानिशला घरी घेवून येणार ह्या आनंदात मिस्त्रींनी आजिबात वेळ न दवडता अ‍ॅक्वा सेरेनिटी मधली एक बेडरूम दानिशसाठी तयार करण्याचे काँट्रॅक्ट पेरिजादची जवळची मैत्रिण 'अलमिरा ईराणी' च्या फर्निचर आणि डेकॉरला दिले.

आणि तशातच ३१ डिसेंबरची ती रात्रं ऊजाडली. अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या बीचवर ३१ डिसेंबरचे फायरवर्क सेलिब्रेशन करून रात्री १ च्या ठोक्याला परतणार्‍या सेरेनिटीच्या रिटायरी कपल्सना कॅक्टस बेडमध्ये मिस्त्रींचा मृतदेह दिसला आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकून फ्रंट एंट्र्रन्सवरचे दोन्ही गार्ड्स धावतपळत बॅक एंट्र्न्सला आले.

पोलिस फायलीतल्या काही नोंदी.

पोस्टमॉर्टेम / मेडिकल रिपोर्ट
-मृत्यू ३१ डिसेंबर रात्री ११:३० ते १२:०० च्या दरम्यान झाला असावा. विक्टिमच्या हातातले घड्याळ रात्री ११:४० ला बंद पडले.
-ऊंचावरून फोर्स ने पडतांना नेमके डोके कॅक्टस बेडच्या (निवडुंगाचे ताटवे) कॉक्रीट बॉर्डरवर आपटून स्कल ब्रेक झाले.
-अंगाखाली कॅक्टस बेड असल्याने शरीरात शेकडो ठिकाणी कॅक्टसचे काटे घुसले.
-डोके आपटले नसते तर डेन्स कॅक्टस बेड मुळे कदाचित प्राण वाचू शकले असते.
-पडण्यापूर्वी विक्टिमला सफोकेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,
-कॅक्टसच्या काट्यांबरोबरच काचांमुळे झालेल्या जखमा आणि काचांचे बारीक तुकडेही शरीरात व चेहर्‍यावर घुसल्याचे मिळाले
-पोटात थोडेफार पचलेले अन्न, वाईन आणि काही माईल्ड स्लीप मेडिकेशन मिळाले. विक्टिम हे मेडिकेशन बराच काळापासून घेत असावा.
-जखमा आणि फ्रॅक्चर्स ऊंचावरून पडतांनाशी कन्सिस्टंट आहे.
- सापडलेल्या बाटलीतील २९ गोळ्या जेन्यूईन स्लीप मेडिकेशन आहे.
-कॉज ऑफ डेथ - आत्महत्या किंवा खून नक्की अनुमान लावणे कठीण आहे.

टाईमलाईन
----------------
३१ डिसेंबर
-दुपारी ४:१० - नरीन मिस्त्री एलेवेटरने फ्लॅट मध्ये दाखल
-दुपारी ४:२१ - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी पहिल्या बॉक्सची डिलीवरी
-दुपारी ४:५७ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी शेवटच्या बॉक्सची डिलीवरी
-संध्या ५:२० - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची पहिली डिलिवरी
-संध्या ६:५१ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी
-रात्री ९:४० - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन' पार्टीत जाण्यासाठी एलेवेटरने एक्झिट
-रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
-रात्री १०:३४ - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी'तून एलेवेटरने फ्लॅट मध्ये एंट्री
-रात्री १०:४० - तीच हुडेड व्यक्ती फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि जिन्यावाटे अतिशय घाईघाईने निघून गेली. पाठीवर एक बॅग.
-रात्री ११:५५ एक ऊंच, अंगापिंडाने मजबूत आणि रुबाबदार व्यक्ती (ऊंची पार्टी सुट, हातमोजे, चेहरा आजिबात दिसणार नाही अशी टोपी) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.

१ जानेवारी (३१ डिसेंबरचीच रात्रं पुढे चालू पण तारीख बदलली)
-रात्री १२:०४ तीच ऊंची पार्टी सुट घातलेली व्यक्ती ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि शांतपणे जिन्यावाटे निघून गेली.
-रात्री १:०४ सेरेनिटीचे दोन सिक्यूरिटी गार्डस एलेवेटरने फ्लॅट नंबर ६०१ च्या दरवाज्यासमोर दाखल
-रात्री १:१० सेरेनिटीमधील बर्‍याच राहिवाशांची सहाव्या मजल्यावर गर्दी
-रात्री १:१८ गार्डसने मास्टर की ने पोलिसांसमोर दरवाजा ऊघडून पोलिसांचा फ्लॅट मध्ये प्रवेश.
-रात्री १:२५ आत येवू पाहणार्‍या गर्दीला पोलिसांनी ६ व्या मजल्यावरून खाली हुसकावले.

प्रासंगिक माहिती
क्राईम सीन
-मिस्त्रींच्या ६०२ नंबरच्या सी-फेसिंग फ्लॅटची सी-साईड बेडरूमची भिंत जमिनी पासून ८ फूट ऊंच आण १५ फूट रूंद अश्या स्टँडर्ड जाडीच्या काचेची बनलेली आहे.
-मिस्त्रींनी काचा बंद असतांनाच खाली ऊडी मारली वा त्यांना बाहेर फेकले गेले.
-बेड अस्ताव्यस्त अवस्थेत. बेडवर स्ट्रगल झाल्याचे दिसून येते.
-बेडरूमला लागून असलेल्या टेरेसचा दरवाजा आतून (बेडरूममधून) बंद होता.
-बेडच्या डोक्याकडच्या भिंतीत (जी फ्लॅट नं ६०१ ला कॉमन वॉल आहे) एक आरपार बुलेट होल मिळाले , आणि तीन २८ mm कॅलिबरच्या गोळ्या
जिथे साधारणतः झोपले असतांना मिस्त्रींची छाती असली असती तिथे मॅट्रेस मध्ये अडकलेल्या मिळाल्या
-फ्लॅट नं ६०१ मध्ये बुलेट होल असलेल्या कॉमन वॉल वर भिंतीवर गन पावडर रेसेड्यू
-साईड टेबलवर कमी पावरचे (माईल्ड) स्लीप मेडिकेशन सापडले. ३० पैकी २९ गोळ्या बाटलीमध्ये आहेत.
- चष्मा, पुस्तंक, वाईन चा रिकामा ग्लास आणि अजूनही चालू असलेला नाईट लँप खाली जमिनीवर पडलेले होते
-किचन सिंक खालच्या कॅबिनेटला भिंतितून आरपार केलेले ३५० मिमि चे होल सापडले जे बाजूच्या रिकाम्या फ्लॅट नं ६०१ च्या किचन सिंक खालच्या कॅबिनेट मध्ये ऊघडते. भिंतीचा कट केलेला पीस बाजूच्या फ्लॅट मध्ये सापडला. एखादा अ‍ॅथलेटिक मनुष्य ह्या होल मधून जाऊ शकतो.

फ्लॅट नं ६०१
- सहाव्या मजल्यावर जिन्याचा दरवाजा बरोबर फ्लॅट नं ६०१ च्या दरवाज्यासमोरच आहे.
- महिन्यापूर्वीच ग्राहकाने खरेदी रद्द केल्याने फ्लॅट नं ६०१ अजूनही विकला नव्हता. पझेशन देण्याची डेड लाईन नसल्याने त्याचे ईंटेरियर डेकोरशन व रंगरंगोटीचे काम अजूनही अतिशय संथगतीने चालू होते. फ्लॅटमध्ये ठिकठिकाणी सामान विखुरलेले होते.
- ह्या फ्लॅट साठी क्लायंट मिळवण्याचे काँट्रॅक्ट मिळालेली रिअल ईस्टेट एजंसी 'फॉन्सेका प्रॉपर्टीज' वीकेंडला फ्लॅट चे 'ओपन हाऊस' शोईंग्ज करते. ह्या शोईंग्ज मध्ये अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डींग चा टूर ही समाविष्टं असतो. अपॉईंटमेंट घेवून फ्लॅट बघायला येणार्‍यांच्या आयडेंटिटीच्या प्रतीची कॉपी करू ठेवली जात असली तरी क्लायंटला नाराज होऊ नये ह्या हेतूने बर्‍याच वेळा आयडी प्रुफ आणायला विसरलेल्यां क्लायंट्सनाही फ्लॅट आणि बिल्डिंग दाखवल्याचे फॉन्सेका च्या सेल्स एजंट्सनी मान्य केले आहे.

अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डिंग
-फ्रंट एंट्र्न्स ने बिल्डिंग मध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये कैद होते आणि २४ तास हजर असलेले सिक्युरिटी गार्डस ती व्यक्ती राहिवासी नसल्यास, राहिवाश्यांनी खाली येवून त्यांना एस्कॉर्ट करेपर्यंत लॉबीमध्येच बसवून ठेवतात.
-एलिवेटर्स, फ्लॅटचा एंट्रन्स आणि कॉरिडोर कॅमेराने ईक्विप्ड आहेत आणि कॅमेरात कॅप्चर न होता फ्लॅट मध्ये जाणे अशक्य आहे.
-बिल्डिंगला एक जिना असून तो प्रत्येक मजल्यावर ऊघडतो, पण जिन्यामध्ये कुठलाही कॅमेरा नाही

मिस्त्रींचे घर
- बिल्डिंगच्या आऊटर भिंती काँक्रीटच्या पण आतल्या वुडन आहेत. फ्लोअर ही वुडन आहे.
-मिस्त्रींचे आर्ट आणि अँटिक गोष्टींसाठीचे प्रेम घरात ठिकठिकाणी दिसत होते. एखाद्या अतिशय कलात्मकतेने सजवलेल्या आर्ट म्युझियम पेक्षा फार वेगळं नसावं त्यांचं घर. भिंतीवर ठिकठिकाणी मोठमोठ्या तस्वीरी, नाना प्रकारचे फर्निचर/अलमार्‍या, देशविदेशातल्या भिन्न रंगारुपाच्या आणि कालखंडातल्या वाटाव्यात अश्या कलाकुसरीच्या वस्तू, राजघराण्यातली वाटावी अशी झुंबरं, फुलदाण्या, शोभेची श्स्त्रास्त्रं असे बरेच काही.
-पूर्ण घरभर अँटिक आणि आर्ट्स सामानाचे छोटे मोठे अकूण १२ लाकडी बॉक्सेस ठेवलेले आहेत. सर्वात मोठा बॉक्स ६ x ८ x २ आणि सर्वात लहान बॉक्स बॉक्स ३ x ३ x २ फूट डायमेन्शन्सचा आहे.
-अँटिक आणि आर्ट्स पीसेसचे सगळे १२ बॉक्सेस ऊघडलेले आहेत. त्यातल्या लहान ३ x ३ x २ च्या बॉक्समधली मधली वस्तू गायब आहे.
- बॉक्स मधल्या वस्तू वगळता घरातल्या ईतर वस्तू केवळ शोभेच्या असाव्यात आणि त्यांना काही अँटिक वॅल्यू नसावी असे प्रथमदर्शनी वाटते.
-एका बेडरूममध्ये लहान मुलाच्या फर्निचर आणि डेकॉरच्या सामानाचे मोठे बॉक्सेस. बॉक्सेस ऊघडले असता आत काही आक्षेपार्ह सापडले नाही.
-लहान मुलांच्या 'कार्स' सिनेमावर आधारीत बेडरूम सेट अर्धवट लावून सोडून देण्यात आला आहे तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ५ x ४ x ४ ची कार फ्रेम मागे ठेवलेल्या बेडरूम सेटच्या रिकाम्या मोठ्या बॉक्स मध्ये मिळाली नाही
-'ती' कार फ्रेम आमच्या शोरूम मध्ये फ्रंटला लावलेली असल्याने गोडाऊनमधून डिलिवरी नेणारे बॉईज ती नेण्यास विसरून गेले असा जबाब अलमीरा ईराणींनी दिला. डिलिवरी बॉईजनी ती फ्रेम दुसर्‍यादिवशी आणून लावण्याची हमी मिस्त्रींना दिली होती. डिलिवरी बॉईजनेही असेच झाले असल्याचे सांगितले.
-मिस्त्री आणि सेरेनिटी मधल्या ईतर कुठल्याही राहिवाश्याचा कोणत्याही प्रकारचा कधी संबंध आल्याचे पुरावे मिळाले नाहीत. सर्व जण त्यांना एक दर्दी आर्ट डीलर म्हणूनच चेहेर्‍याने ओळखत होता.

३१ डिसेंबरची बीच पार्टी
-३१ डिसेंबरला गॅलॅक्सी ग्रूप-सेरेनिटीने मोठी बीच पार्टी आयोजित केली असल्याने ६०१ चे क्लायंट शोईंग करण्यास फॉन्सेकाला मनाई करण्यात आली होती.
-बिल्डिंगमधील राहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांना बिल्डिंगला वळसा घालून बीच पार्टीला जावे लागू नये म्हणून त्यांच्या सोयीसाठी बिल्डिंगच्या बॅक साईडला (जी बीच सईड आहे) ऊघडणारे जिन्याचे दार (जे ईतरवेळी कायम बंद असते आणि ऊघडल्यास अलार्म वाजतो) रात्री ९ वाजल्यापासूनच अलार्म डिझेबल करून ऊघडेच ठेवण्यात आले होते.
-३१ डिसेंबर रात्री ९ पूर्वी बिल्डिंगचे बॅक डोर महिन्याभरात आजिबात ऊघडले गेले नव्हते.
-बॅक डोर मधून आत येणारा वा जाणारा कॅमेरामध्ये कैद होतो पण ३१ डिसेंबरच्या रात्री कैक सेरेनिटीचे राहिवासी आणि त्यांचे विजिटर्स अनेक वेळा घोळक्याने आत व बाहेर करत असल्याने त्यातून नेमकी संशयित व्यक्ती शोधणे अशक्य आहे.
-बीच पार्टीला सेरेनिटीच्या सध्याच्या राहिवाशांबरोबरच त्यांच्याकडच्या पाहुण्यांची आणि अनेक प्रॉस्पेक्टिव क्लायंटसची ऊपस्थिती होती.
-गॅलॅक्सी ग्रूपने आयोजित केलेल्या या बीच पार्टीचे ईवेंट मॅनेजमेंट गोव्यातल्या नावाजलेल्या आणि अतिशय महागड्या 'मूनलाईट असोसिएट्सला' देण्यात आले होते.
-मिस्त्रींच्या बीच फेसिंग फ्लॅट मधून पार्टीची जागा, बीचकडून बिल्डिंगकडे येणारी ४० मीटरची पायवाट आणि चालणारी व्यक्ती स्पष्टं दिसते.

खबरींकडून कळालेली माहिती
-अलमीरा ईराणीच्या 'फर्निचर & डेकॉर स्टोर' मध्ये आणि खाजगी आयुष्यातही 'कैझाद दोर्दी' सिक्रेट स्लीपींग पार्टनर आहे अशी वदंता आहे.
-मुलाची कस्टडी गेल्याने कैझाद दोर्दी मिस्त्रींवर फार खवळलेला आहे. त्याच्या फॅमिलीचे त्यांच्या हॉटेल बिझनेसच्या माध्यमातून गुन्हेगारी वर्तुळात काँटॅक्ट्स असण्याची खूप शक्यता आहे.

**************************************************

कसा झाला असेल नरीन मिस्त्रींचा करूण अंत? काही घातपात असण्याचा संभव आहे की त्यांनी अचानक अशी खिडकीतून ऊडी मारून आत्महत्या केली? मॅट्रेस मध्ये गोळ्या कुठून आल्या? मिस्त्रींची आत्महत्या नसून खून असेल तर कोणी केला आणि कसा?

घटना सोडून वरती मिस्त्रींबद्दल मी जी लांबड लावली आहे ती फक्तं मिस्त्री आणि त्यांचे 'हितचिंतक' Wink एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीच. एकदा एकेकाचे कॅरिकेचर समजले की ती माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स
वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास) आणि त्यांची पद्धत समजू शकते. मान्य आहे माहिती खूप दिली आहे पण ऊलट त्याचा ऊपयोग अ‍ॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.

*बीच पार्टी म्हणजे केवळ बीचवर झालेले ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन अपेक्षित आहे. बिकिनी,रेव वगैरे तसले काही नाही. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी फर्स्ट कट गेस,
गुन्हेगाराची ये जा फ्लॅट 601 मधून झाली आहे,
2 फ्लॅट मध्ये पडलेले भोक तेच दर्शवते,

पहिली व्यक्ती 601 मध्ये आली, मिस्त्री बेड वर झोपले आहेत असे गृहीत धरून तिने गोळ्या चालवल्या, मेस्त्री घरी नसल्याने बचावले.
ते मेले आहेत अशा समजुतीने 601 ते 602 भोक पाडून पॅसेज बनवला, आणि 602 मध्ये दाखल,
तेव्हड्यात पार्टी वरून मेस्त्री घरी आले,
झोपायच्या तयारीत असताना (पिल घेतल्या नंतर) या पाहुण्यांची चाहूल लागली
अभ्यागता बरोबर झटापट.
त्यात घड्याळ बंद पडले, आणि गळा दाबल्यामुळे + पिल मुले गलितगात्र अवस्थेत पडले असतील,
पहिला चोर घाई घाईत बाहेर गेला, मास्टर माईंड ला बातमी सांगितली, मास्टर माईंड परत 601 मध्ये दाखल, आणि वरून फेकून देऊन खून

त्यातल्या लहान ३ x ३ x २ च्या बॉक्समधली मधली वस्तू गायब आहे
>>>>>

तो खूनी या पेटारयातूनच आला हे नक्की.

आणि यामागे याचा हात असू शकतो...
<<<< खबरींकडून कळालेली माहिती
-अलमीरा ईराणीच्या 'फर्निचर & डेकॉर स्टोर' मध्ये आणि खाजगी आयुष्यातही 'कैझाद दोर्दी' सिक्रेट स्लीपींग पार्टनर आहे अशी वदंता आहे. <<<<<<<<

बाकीचे ईतर लोकं सोडवतीलच. वाचेवाचेपर्यण्तच माझे ऑफिस आले Happy

ऋ, मी आधी याचा विचार केला होता,
पण बाहेर जाणारी जास्तीची व्यक्ती दिसली नाही,
हे बॉक्सेस मेस्त्रीच्या उपस्थितीत उघडले असे गृहीत धरले आहे, म्हणजे त्या बॉक्स मध्ये माणूस असेल तर तो लगेच कळला असता,
बॉक्स आणणारे वर्कर्स सुद्धा यात सामील असतील असे वाटत नाही कारण प्लॅन जास्त लोकं पर्यंत पोहोचेल.

मला यात मेस्त्रीच्या मॅनेजर चा हात वाटतो,
1)मेस्त्री मेल्या मुले मिळणारे 4 करोड रुपये,
2)त्याचे कुठाचे तरी डिल चालू होते, जो कलायन्ट उठून गेला, कदाचित तीच वस्तू मेस्त्री ने आपल्या फ्लॅट वर आणली असेल, आणि ती वस्तू परत मिळवणे हा त्याचा तत्कालीन मोटिव्ह असेल
3)मेस्त्री च्या पुढे मागे कोणी नाही, र्याचे आर्ट कलेक्शन ची जबाबदारी याच्यावर म्हणजे त्याला वस्तू गहाळ करण्यास पुरेपूर स्कोप आहे, यातून होणारा जास्तीचा फायदा.

६०१ आणि ६०२ मधल्या किचन सिंक होलमधून ये जा केलेली काळ्या हुडेड गेटपमधली व्यक्ती स्वतः मिस्त्रीच. ते अथलेटिक असण्याचा उल्लेख आणि टाईमलाईन जुळते. 9:40 ला मिस्त्री म्हणून खाली गेले. वेष बदलून हूड घालून आले. स्वतःच्या फ्लॅटमध्ये जाऊन त्या सगळ्यांत छोट्या बॉक्समधली गोष्ट घेतली. ते बहुधा अँटिक रिव्हॉल्व्हर वगैरे असावे, जे घ्यायला तो दुसरा माणूस येणार होता. ३१ डिसेंबरला तिथे गर्दी असते त्याचा फायदा घेऊन क्लायंटला ती वस्तू हस्तांतरित करता येईल असा त्यांचा प्लॅन असावा. पण बहुधा ती गोष्ट हाताळल्यावर ती जेन्यूइन नाही फेक आहे, हे त्यांना कळले असावे. (ते रेग्युलर रिव्हॉल्व्हर आहे, हे तपासायला स्वतः मिस्त्रीनीच त्या गोळ्या चालवल्या)

येताना हातात बॅग आहे (बहुधा भोक पाडण्यासाठीची अवजारे) आणि नंतर पाठीवरची बॅग (ती छोट्या खोक्यातली वस्तू)

त्या धिप्पाड सुटबुटातल्या माणसाचा त्या वस्तूची डिलिव्हरी घेणे यापलीकडे सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही. तो आला, ठरल्याप्रमाणे मिस्त्रीची वाट बघत 601 मध्ये थांबला, ते ऑलरेडी मरण पावले होते म्हणून आले नाहीत, तो वाट बघून निघून गेला.

भरुचांनी स्वतः मिस्री यांना मारले असले तर ते कैझाद व अलमीराशी संधान बांधून आहेत. मिस्त्रीन्ना संपवण्यात दोघांचाही फायदा आहे. बेडरूम सेटच्या बॉक्समधून ते स्वतः आले. मिस्त्री परत आले तेव्हा त्यांची आणि खुन्याची (मोस्ट प्रॉबेबली भरुचा) झटापट झाली करण तोवर मिस्त्रीना भ्रुचांचे खरे रूप कळले होते. ती जी मिसिंग (काचेची) कार फ्रेम आहे ती डोक्यावर मारली (चेहऱ्यावर व शरीरावर काचेच्या जखमा व काचेचे तुकडे) कारण तीच तिथे अव्हेलेबल होती. नंतर त्यांना खाली ढकलण्यात आले. कारण खून करताना ते बरोब्बर काँक्रीट बॉर्डरवर पडतील इतके अचूक प्रेडिक्ट करणे शक्य नाही.

पण बाहेर जाणारी जास्तीची व्यक्ती दिसली नाही<<<<<<
बाहेरची व्यक्ती इंव्हॉल्व्हड असेल तर ती व्यक्ती 1:25 पर्यंत फ्लॅटमध्येच होती आणि 1:25ला सहाव्या मजल्यावरून हटवल्या गेलेल्या गर्दीसोबत बाहेर पडली.

दुसरं असं की, भरुचांनी चार कोटी स्वीकारून नंतर भांडणाचे नाटक करायचे व सगळ्या प्रकरणात गांधी पारीख मंडळींना अडकवायचे हा मिस्त्री यांचा प्लॅन होता. परंतु, भरुचा त्यांना डबल क्रॉस करत असावेत. प्लॅननुसार वस्तू घरी हलवताना मिस्त्रीन्नी नेमकी भरुचांनी आधी गुपचूप विकून त्याजागी ठेवलेली हुबेहूब पण फेक वस्तू पण घरी हलवली. हे त्यांनी आणखीही वस्तूंबाबत केले असणे शक्य आहे. त्यामुळे भरुचांना त्यांचा काटा काढणे आवश्यक झाले.

खुनाचा मोटिव्ह = अर्थातच पैसा +/ रिवेंज

४कोटि रक्कम किंवा एखादी एंटीक वस्तुची अफ़रतफर हिपेक्षा मोठी रक्कम म्हणजे अर्थातच मिस्त्री ह्यांची आयुष्यभर कमावलेली संपत्ती जिचा वारस आता फक्त त्यांचा एकमेव नातू आहे.

मिस्त्री ह्यांच्या जावयास माइनरची कस्टडी द्यावी लागली म्हणजेच मेनटेनेन्स कॉस्ट किंवा वन टाईम सेटलमेंट ह्यापैकी काहीतरी एक असणार आणि जावयाचे आर्थिक स्टेट्स पाहता ही रक्कम बऱ्यापैकी मोठी असावी.

जर मिस्त्रीचा काटा काढला तर पालकत्व पुन्हा जावयाकडे येते आणि ओघाने त्यांची सारी संपत्तीसुद्धा (वारस अर्थात मिस्त्रीच्या नातवाच्या रुपात)

ह्यावरून जावई हाच खुनामागील मास्टर माइंड असावा असे वाटते

श्रद्धा पण जर ती काळी हुडेड व्याक्ती मेस्त्रीच असतील तर ते परत बाहेर गेल्याचा उल्लेख आहे, मग ते वरून कसे फेकले गेले?
दुसरे म्हणजे ती व्यक्ती वर असतानाच मेस्त्री पार्टी वरून परत आले सो या दोन्ही व्यक्ती वेगळ्या आहेत
प्लस झटापट बेडवर झाली आहे, आणी मेस्त्री यांनी झोपेची गोळी देखील घेतली होती, म्हणजेच ते नेहमीप्रमाणे झोपायच्या तयारीर होते.

मग हुडेड व्यक्ती भरूचा असू शकतील.

ते 601 च्या भिंतीतून मारलेल्या गोळ्या 100% रेड हेरिंग आहे. कारण 31 च्या रात्री ती व्यक्ती घरी आहे की नाही, ती बेडवर झोपलीय की नाही हे कळतही नसताना खून करण्याच्या उद्देशाने आलेली व्यक्ती अंदाधुंद गोळ्या मारणार नाही.

.>>>>>>>>>>>>>मिस्त्रींच्या ६०२ नंबरच्या सी-फेसिंग फ्लॅटची सी-साईड बेडरूमची भिंत जमिनी पासून ८ फूट ऊंच आण १५ फूट रूंद अश्या स्टँडर्ड जाडीच्या काचेची बनलेली आहे.
-मिस्त्रींनी काचा बंद असतांनाच खाली ऊडी मारली वा त्यांना बाहेर फेकले गेले.>>>>>>>>>>>
इथे बेडरूम ची काचेची भिंत फुटली आहे असे गृहीत धरले आहे का?

तसंच, 11:40ला बंद पडलेलं घड्याळ actual मृत्यूची वेळ दाखवतेय जो फ्लॅटमध्येच झाला. डोक्यावर काही मारले जात असेल तर प्रतिक्षिप्त क्रियेने माणूस आपले हात डोक्यावर घेऊ पाहील. त्यावेळेच्या फटक्याने घड्याळ बंद झाले. मग 12 वाजता सेलिब्रेशन, फटाके, न्यू इयर जल्लोष जोमात असताना त्यांना खाली फेकले गेले. तेही काचा बंद ठेवून. कारण फ्रेमच्या काचांवरून लक्ष हटवणे आणि मृत्यू फ्लॅटमध्ये झाला नाही, हे दोन उद्देश होते.

श्रद्धा, म्हणजे त्यांना उचलून बाल्कनी मध्ये नेले आणी खाली टाकले (कट्ट्यावरून उचलून ) असे म्हणायचे आहे?
म्हणजे खुनी तो सूट मधला माणूस असू शकेल कारण ७५ किलो च्या माणसाला उचलायला तितकाच मजबूत माणूस हवा

कॅरिकेचर (व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्यांकडे) लक्ष द्या असं मी म्हणेन
नेहमी रोखठोक बोलणारे, मुलगी गेली तरी न्यायावर विश्वास असणारे मिस्त्री असा खेळ करतील? ते हुशार आहेत पण पाताळयंत्री वा प्लॅनर नाहीत असे मला वाटते.
भरूचा, गांधी, कैझाद हे अनलिमिटेड रिसोर्सेस बाळगून असलेले लोक आहेत (त्यांच्या संपत्ती आणि बिझनेस डील्स वरून तसा अंदाज यायला हवा) काही घडवून आणावयाचे असल्यास ते स्वतः तिथे असणे जरूरी नाही

इथे बेडरूम ची काचेची भिंत फुटली आहे असे गृहीत धरले आहे का? >> हो त्याशिवाय मिस्त्री खाली कसे पडतील.

मेडिकल रिपोर्ट मध्ये काय लिहिले आहे त्याकडे ही लक्ष द्या.

भरूचा, गांधी, पारीख,कैझाद आणि अलमीरा ह्यांच्या बॉडी टाईपचा वा वयाचा ऊल्लेख नाहीये. म्हण़जे ज्यांचा तो तसा आहे ते भरूचा, गांधी, पारीख,कैझाद आणि अलमीरा असावेत असा अंदाज बांधण्याला काही बेसच रहात नाही

एक शक्यता अशीही आहे की तो सुटबुटातला माणूस पण सामील आहे. वेगळ्या मापाचा पॅडिंग असलेला सूट घालून नसलेला धिप्पाडपणा दाखवता येऊ शकेल. हॅन्डग्लोव्ह्ज म्हणजे हात बाईचे किंवा पुरुषाचे आहेत हे न कळणे. ती अलमीरा असणार नक्की. त्या होलमधून जाण्याइतकी अथलेटिक तीसुद्धा असणार.

हायझेनबर्ग आतापर्यंत किती गोष्टी थोड्याफार ट्रॅकवर आहेत, ते तरी लिहा. नुसते अंदाज शक्यता लिहायला मजा येत नाही.

Mistri_Bedroom.jpgCar_Bedroom.jpg

मिस्त्रींच्या बेडरूम चे आणि किड्स रूमचे कल्पनाचित्रं?
कारची पुढची बॉनेट फ्रेम जिचा आकार वरती लिहिला आहे मिसिंग आहे.

श्रद्धा, पण 75 kg च्या माणसाला काचेवर ढकलून काच फोडायची शारीरिक क्षमता बाईत असेल?

हायझेनबर्ग आतापर्यंत किती गोष्टी थोड्याफार ट्रॅकवर आहेत, ते तरी लिहा. नुसते अंदाज शक्यता लिहायला मजा येत नाही. >> अगदीच फार थोडे ट्रॅक वर आहे पण त्या येवू शकतील असे लिहितो लवकर

दोन लोक होते ना. एक अलमीरा आणि दुसरा ऑलरेडी घरात असलेला.

मला असंही वाटतंय की, मिस्त्रीना काच उघडून दोघांनी मिळून ढकलले व नंतर काच फोडली गेली. फटाक्यांच्या आवाजात सहाव्या मजल्यावर फुटलेली काच कुणाला ऐकू जाईल?

हे म्हणजे क्रिमिनल केस म्हणून जो गेम आहे ना, त्याच्या सारखे चालू आहे.. एक नंबर धमाल.. फक्त गेस वगैरे करणे सध्या तरी अवाक्यात नाही.. फक्त वाचनमात्र..

ओह ओके. अशी फ्रेम! मी चित्राची फ्रेम समजत होते.

अजून डिटेल्स नक्कीच आवश्यक आहेत.

केस सॉल्व करू ईच्छिणार्‍या मला (स्टोरी लिहिणार्‍या नव्हे) जर टाईमलाईन वर्क आऊट केली तर मला असे दिसते की
स्वेटशर्ट वाल्या हुडेड व्यक्तीचा मिस्त्रींना टाळून फ्लॅट मधून निघून जाण्याचाच प्लान असावा. त्याला आत लागलेला एवढा वेळ कदाचित ते होल बनवण्यासाठी लागला असू शकतो.
सूट बुट मध्ये आलेली व्यक्ती तिचा रुबाबदार आणि शांतपणा बघता पार्टीचे कवर घेवून वरती आलेली असावी. स्टायलिश कपडे, १२ चा टायमिंग, सेलिब्रेशनचे मोक्याचे फायरवर्क म्हणजे ती व्यक्ती 'प्रोफेशनल' असावी. पुन्हा तिचा जाण्या येण्याचा एकंदर कमी वेळ बघता ती मिस्त्रींच्या फ्लॅटमध्ये जाऊन येणे अवघड वाटते.

ओह ओके. अशी फ्रेम! मी चित्राची फ्रेम समजत होते. >> फ्रेम त्रिमितीय आहे. Happy >>तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ५ x ४ x ४ ची कार फ्रेम

काही निरीक्षणे :
१. ५ x ४ x ४ ची कार फ्रेम मागे ठेवलेल्या बेडरूम सेटच्या रिकाम्या मोठ्या बॉक्स मध्ये मिळाली नाही व ती' कार फ्रेम आमच्या शोरूम मध्ये फ्रंटला लावलेली असल्याने गोडाऊनमधून डिलिवरी नेणारे बॉईज ती नेण्यास विसरून गेले असा जबाब अलमीरा ईराणींनी दिला. डिलिवरी बॉईजनी ती फ्रेम दुसर्‍यादिवशी आणून लावण्याची हमी मिस्त्रींना दिली होती. डिलिवरी बॉईजनेही असेच झाले असल्याचे सांगितले >> मग तो रिकामा बॉक्स डिलिवरी बॉईज का आणतील? बॉक्स आणताना तो रिकामा आहे हे त्यांना कळलं असणार तरी पण त्यांनी तो आणला, यात काहीतरी बेत आहे. यामुळे अलमीरा ईराणी व पर्यायाने कैझाद ह्याचा काहीतरी डाव आहे. त्या खोक्यात बसून कोणीतरी आलं. बहुदा कैझादचा माणूस. त्यानेच मिस्त्रींचा खून करून नंतर भोक पाडून ६०२ मध्ये गेला. व नंतर गर्दीचा फायदा घेऊन निसटला. पण संध्या ६:५१ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी नंतर त्याने लगेच मिस्त्रींचा खून का केला नसावा हा प्रश्न उरतो.

२. किचन सिंक खालच्या कॅबिनेटला भिंतितून आरपार केलेले ३५० मिमि चे होल सापडले जे बाजूच्या रिकाम्या फ्लॅट नं ६०१ च्या किचन सिंक खालच्या कॅबिनेट मध्ये ऊघडते. भिंतीचा कट केलेला पीस बाजूच्या फ्लॅट मध्ये सापडला. >> हे ६०१ मधून भिंत कापून तुकडा दुसर्‍या बाजूला पडू न देता ६०१ च्या बाजूला ओढून पाडला असण्याची शक्यता आहे.
लहान ३ x ३ x २ च्या बॉक्समधली मधली वस्तू गायब आहे. >> ती अँटिक वस्तू चोरायला कोणीतरी (भरुचाचा माणूस वगैरे) चोरायला आला. त्याचा मिस्त्रींच्या खूनाशी संबंध नसावा.
रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली. >> हाच तो चोर. ह्या वक्तीने ६०१ मध्ये शिरून सिंकखाली भोक करून जाऊन त्या बॉक्स मधील वस्तू चोरली. व ती व्यक्ती बॅगमध्ये ती अँटिक गोष्ट घेऊन पळाली.
या चोराचं घरात लपलेल्या त्या व्यक्तीशी encounter झालं असावं का? त्या बेडमधील गोळ्यांचा या encounter शी काही संबंध असावा का?

३. कॅक्टस बेडसशी काय भानगड असावी? (मूळात समुद्राजवळ कॅक्टस येतात का? ) कॅक्टसच का? (thinking...)

श्रद्धा, relevent टाइम लाईन परत लिहितो
९:४० pm नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन' पार्टीत जाण्यासाठी एलेवेटरने एक्झिट

-रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.

-रात्री १०:३४ - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी'तून एलेवेटरने फ्लॅट मध्ये एंट्री
( संशयित खुनी आणि मिस्त्री एका वेळेस फ्लॅट मध्ये असण्याचा अवधी 6 मिनिटे. Too short to kill some one
-रात्री १०:४० - तीच हुडेड व्यक्ती फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि जिन्यावाटे अतिशय घाईघाईने निघून गेली. पाठीवर एक बॅग. ( हातातील बॅग पाठीवर गेलीये
(या स्लॉट मध्ये खून झालाय 1130 ते 12 हि मृत्यूची वेळ आहे. घड्याळ 1140 ला बंद पडलय
-रात्री ११:५५ एक ऊंच, अंगापिंडाने मजबूत आणि रुबाबदार व्यक्ती (ऊंची पार्टी सुट, हातमोजे, चेहरा आजिबात दिसणार नाही अशी टोपी) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
(कदाचित हि व्यक्ती आत गेली तेव्हा फ्लॅट रिकामा असेल मिस्त्री खाली पडलेले असतील

-रात्री १२:०४ तीच ऊंची पार्टी सुट घातलेली व्यक्ती ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि शांतपणे जिन्यावाटे निघून गेली.

-रात्री १:०४ सेरेनिटीचे दोन सिक्यूरिटी गार्डस एलेवेटरने फ्लॅट नंबर ६०१ च्या दरवाज्यासमोर दाखल

रायगड सही जारेले है!!!
१)मग तो रिकामा बॉक्स डिलिवरी बॉईज का आणतील? बॉक्स आणताना तो रिकामा आहे हे त्यांना कळलं असणार तरी पण त्यांनी तो आणला, यात काहीतरी बेत आहे. >> कार बेडच्या एकाच बॉक्स मध्ये पूर्ण सेट होता पण त्यातली फक्त पुढची फ्रेम मिसिंग होती. त्या मिसिंग जागेत बसून कोणी आले का? तर शक्यता आहेच म्हणूनच पोलिसांनी तशी नोंद केली आहे.
कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी नंतर त्याने लगेच मिस्त्रींचा खून का केला नसावा हा प्रश्न उरतो. >> तो कोण आहे हे समजू शकते. खाली सिक्युरिटी गार्डसना माहित आहे डिलिवरी चालू आहे त्याचा चेहरा कॅमेरा मध्ये कैद आहे तो डिलिवरी बॉय खून कसा करेल?

२) तुमचा हा तर्क ऑलमोस्ट बँग ऑन आहे

३) कॅक्टस का ? >> त्याचेही एक दोन रेफरंस आले आहेत पण नक्कीच वॅलिड मुद्दा आहे. बीच वर कॅक्टस कसे येतील हे मात्रं ईरिलेवंट आहे ही मॅन मेड बिल्डिंग आहे शोभेसाठी लावले असतील.

मिस्त्रींचे कॅरॅक्टर थोडे अजून अभ्यासायला हवे.

मग तो रिकामा बॉक्स डिलिवरी बॉईज का आणतील? बॉक्स आणताना तो रिकामा आहे हे त्यांना कळलं असणार तरी पण त्यांनी तो आणला, यात काहीतरी बेत आहे. यामुळे अलमीरा ईराणी व पर्यायाने कैझाद ह्याचा काहीतरी डाव आ>>>>>>>>

हि शंका मलाही आलेली, पण डिलिव्हरी बॉयज ना यात सामील करून घेण्याची रिस्क हे लोक घेतील असे वाटत नाही,
दुसरी शक्यता बोयज सामील नाहीयेत आणि त्यात माणूस बसून आला तर ते स्टेटमेंट देतील बॉक्स ज्ड होता , तो रिकामा कसा निघाला माहित नाही, पण ते सुद्धा सांगत आहेत आम्ही आणायला विसरलो.

बॉक्स मधून खुनी आला असेल तर त्याला 1 दीड तास वेळ होता मिस्त्रींना संपवायला, त्या ऐवजी तो थांबला, मिस्त्री पार्टी ला गेल्यावर भिंतीत भोक करून साथीदारांची वाट पाहत बसला हे तजोडी खटकते

१०.४० ते ११.५५ या मध्ये ६०१/ ६०२ मध्ये मिस्त्री शिवाय वर उल्लेख केलेल्यात (हुडेड आणि धिप्पाड) कोणी नाही.
मनगटी घड्याळ ११:४० ला बंद पडले. जर मृत्यू ११:४० लाच झाला असेल आणि तो फोर्सेफुली झाला असेल तर आणखी एक व्यक्ती (जिचा हिशेब लागत नाहीये) ती कुठे तरी असली पाहिजे.

मृत्यू ११:३० ते १२ च्या दरम्यानचा आहे. ११:५५ ते १२: ०४ ही ९ मिनिटे धिप्पाड व्यक्ती ६०१ मध्ये आहे. ती व्यक्ती किचन होल मधून जाणं शक्य नाही.

हुडी गाय च्या जाताना हातात आणि येताना पाठीवर bag आहे.
जड bag साधारण पाठीवर घेतली जाईल का? त्याअर्थी त्यात काही जड गोष्ट असेल का? किंवा मौल्यवान?

रायगड सही जारेले है!!!
मग तो रिकामा बॉक्स डिलिवरी बॉईज का आणतील? बॉक्स आणताना तो रिकामा आहे हे त्यांना कळलं असणार तरी पण त्यांनी तो आणला, यात काहीतरी बेत आहे. >> कार बेडच्या एकाच बॉक्स मध्ये पूर्ण सेट होता पण त्यातली फक्त पुढची फ्रेम मिसिंग होती. त्या मिसिंग जागेत बसून कोणी आले का? तर शक्यता आहेच म्हणूनच पोलिसांनी तशी नोंद केली आहे. >>>> येस.. त्यात बसुन खुनी आला.. खुन केल्यावर तो दोर लाउन किन्वा पाइप ने उतरुन पळून गेला..

ओके,
हुडेड माणूस आत आला, त्याने बॉक्स उघडून साथीदाराला बाहेर काढले हि शक्यता आहे,
आणि दोघांनी मिळून मिस्त्रींना संपवले,
(मिस्त्रीच्या वाजनानेच काच फुटली आहे, त्यांच्या चेहऱ्यात काचा घुसल्याच्या खुणा आहेत)
पण मिस्त्री आणि खुनी एकत्र असायची वेळ 6 मिन आहे,
यात मिस्त्री झोपेची गोळी घेतात, बेडवर झटापट करतात पण मरत नाहीत,
अर्ध मेल्या अवस्थेत पुढे तासभर जिवंत राहतात पण कुणाला फोन करत नाहीत हा कॅच वाटतोय

३. कॅक्टस बेडसशी काय भानगड असावी? (मूळात समुद्राजवळ कॅक्टस येतात का? ) कॅक्टसच का? <<<<<<<
कॅक्टसच का चा माझा तर्क! डेन्स कॅक्टस बेडमध्ये अजून काही इनक्रिमीनेटिंग पुरावा पडला तर काट्यांमुळे कुणी तो तिथे फार उचकून बघणार नाही.

खुनी 1:25च्या गर्दीसोबत बाहेर पडला, हा माझा तर्क आहे.

जड बॅग पाठीवर घेतली जाईल, हा विचार आला होता डोक्यात. पण माझ्या तर्कानुसार ती नेलेली वस्तू त्या छोट्या बॉक्समधली पण फेक आर्टिफॅक्ट असावी जी मिस्त्रीना कळू न देता हलवली जाणे आवश्यक होते.

काही निरिक्षणे:
- हुडेड व्यक्ती ३ बाय २ बाय २ वाल्या बॉक्समधला ऐवज चोरीच्या दृष्टीनी आली होती. ६०१ मधून जाऊन भोक पाडून, ६०२ मधे दाखल होऊन, बॉक्स, उघडून आतला ऐवज बॅगेत टाकून पसार झाली.
- हुडेड व्यक्ती अन धिप्पाड व्यक्तींचा जॉईंट प्लॅन असावा. हुडेड व्यक्तीचा अ‍ॅडिशनल मोटिव्ह चोरीचा अन धिप्पाड व्यक्तीसाठी ६०१ मधून ६०२ मधे जायचा रस्ता बनवायची जवाबदारी असा दुहेरी वाटतो.
- धिप्पाड व्यक्ती नी अंधारात घरात शिरून बेडवर अंदाजे गोळी चालवली असेल, पण मयत इसम नेमका शौचालयात वगैरे गेला असावा. आवाज ऐकून बाहेर येऊन त्यानी झटापट केली असावी, त्या दरम्यान बाकी गोळ्या हवेत उडल्या असाव्या. पिस्तूल रिकामं झाल्यानी धिप्पाड व्यक्तीनी मयतास सफोकेट करायचा प्रयत्न केला असावा अन तो असफल झाल्यानी एखाद्या जड वस्तूनी (पिस्तूलीचं हँडल वगैरे) डोक्यात मारून खून केला असावा.
- खुनानंतर पार्टीची जागा अन बिल्डिंग या रस्त्यावर कुणीही नाही हे पाहून, काच फोडून बॉडी खाली टाकली असावी. काच फोडायला बाकी काही न वापरता मयताची बॉडीच वापरली असावी, ज्यानी अंगात खूप काचा घुसल्या (ही काच झटापटीत फुटल्याचीही शंका आहे)
- लाकूड कापणे वगैरे लक्षात घेता हुडेड व्यक्ती अलमीरा असावी. (चोरी भरूचा साठी केली असावी, अन वस्तूचं मूल्य अन मौल्य लक्षात घेता भाडोत्री व्यक्ती नसावी)
- धिप्पाड व्यक्ती कैझाद / भरूचा / भाडोत्री असावी. काम - कसं ही करून मयतास संपवणं.

ओव्हरॉल प्लॅन कैझाद-अलमीरा अन भरूचा यांचा असावा

खुनी 1:25च्या गर्दीसोबत बाहेर पडला, हा माझा तर्क आहे. >> पण मग तो आला कुठून ?
सगळे बॉक्सेस ऊघडलेले होते, चोर जर सिंक खालच्या होल मधून आला असे धरले तर ६ x ८ x २ चा बॉक्स तो का ऊघडेल कारण ह्यात जे काही आहे ते नेणे त्याला शक्यच नाहीये. म्हणजे हे सगळे बॉक्सेस मिस्त्रींनीच ऊघडल्याची शक्यता जास्तं आहे.
बेडरूम सेट चा रिकामा बॉक्स मिळाला पण त्यात जर कोणी असेल तर डिलिवरी बॉईज ना समजले असतेच ना. समजा डिलिवरी बॉईज सामील असते तर तेव्हाच मिस्त्रींना मारून रिकामा बॉक्स घेवून चाललो म्हणून ते त्या माणसाला पुन्हा बॉक्स मधून ऑफिशिअली घेवून जाऊ शकले असते. त्याला घरात सोडायची गरज मला वाटत नाही

धिप्पाड व्यक्तिला ६०१ च्या काचेतून खाली पड्लेला मिस्त्री ची dead body दिसली.. so तो वापस चालला गेला.. [ he was another contract killer ]

अफ्रिका, अ‍ॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातली कैक जंगलात त्यांनी एकट्याने भटकंती केली होती . आपल्या अनुभवाबद्दल 'नेचर्स अ‍ॅडवेंचर्स' मासिकांत त्यांचे एक दोन लेख देखील प्रकाशित झाले होते. हौशी लोकांनाही ते अश्या मोहिमांत जीव सुखरूप कसा ठेवावा ह्याचे मार्दर्शन त्यांच्या ब्लॉग द्वारे करीत. >> मला वाटतं याचा कॅक्टसशी काहीतरी संबंध आहे. म्हणजे मिस्त्रींना जो कोणी सफोकेट करून मारायचा प्रयत्न करत होता, त्यातून सुटण्याकरीता मिस्त्रींनी स्वतःच काच फोडून खाली उडी मारली असावी. यात त्यांचा बेत कॅक्टसवर पडून जीव वाचणार असा असावा. पण त्यांचा अंदाज चुकला. व डोकं आपटून मेले ते.

खुनी 1:25च्या गर्दीसोबत बाहेर पडला, हा माझा तर्क आहे. >> पण मग तो आला कुठून ?
सगळे बॉक्सेस ऊघडलेले होते, चोर जर सिंक खालच्या होल मधून आला असे धरले तर ६ x ८ x २ चा बॉक्स तो का ऊघडेल कारण ह्यात जे काही आहे ते नेणे त्याला शक्यच नाहीये. म्हणजे हे सगळे बॉक्सेस मिस्त्रींनीच ऊघडल्याची शक्यता जास्तं आहे.
बेडरूम सेट चा रिकामा बॉक्स मिळाला पण त्यात जर कोणी असेल तर डिलिवरी बॉईज ना समजले असतेच ना. समजा डिलिवरी बॉईज सामील असते तर रिकामा बॉक्सघेवून चाललो म्हणून ते त्या माणसाला पुन्हा बॉक्स मधून ऑफिशिअली घेवून जाऊ शकले असते. त्याला घरात सोडायची गरज मला वाटत नाही >> अजून confuse का करताहात? Happy

अफ्रिका, अ‍ॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातली कैक जंगलात त्यांनी एकट्याने भटकंती केली होती . आपल्या अनुभवाबद्दल 'नेचर्स अ‍ॅडवेंचर्स' मासिकांत त्यांचे एक दोन लेख देखील प्रकाशित झाले होते. हौशी लोकांनाही ते अश्या मोहिमांत जीव सुखरूप कसा ठेवावा ह्याचे मार्दर्शन त्यांच्या ब्लॉग द्वारे करीत. >> मला वाटतं याचा कॅक्टसशी काहीतरी संबंध आहे. म्हणजे मिस्त्रींना जो कोणी सफोकेट करून मारायचा प्रयत्न करत होता, त्यातून सुटण्याकरीता मिस्त्रींनी स्वतःच काच फोडून खाली उडी मारली असावी. यात त्यांचा बेत कॅक्टसवर पडून जीव वाचणार असा असावा. पण त्यांचा अंदाज चुकला. व डोकं आपटून मेले ते. >> प्रश्न आता खुनाचा नाहिच आहे.. प्रश्न आहे.. खुनी कोण? आला कोठून? आणी गेला कोठून?..

>>>>- धिप्पाड व्यक्ती नी अंधारात घरात शिरून बेडवर अंदाजे गोळी चालवली असेल, पण मयत इसम नेमका शौचालयात वगैरे गेला असावा. आवाज ऐकून बाहेर येऊन त्यानी झटापट केली असावी, >>>

अँकी गोळी 601 मधून चालवली आहे, त्या साईड ला गन पौंड्र मिळाली

कॅक्ट्स वर उडी इज बेस्ट गेस रायगड.
मेलेल्या माणसाला काच फोडून बाहेर टाकण वाटतं तितकं सोपं नसावं. विलिंगली माणूस फोडून उडी मारू शकेल.

Pages