'अ‍ॅक्वा सेरेनिटी' केस

Submitted by हायझेनबर्ग on 8 June, 2017 - 20:43

टुरिस्ट लोकांनी कायमच ओसंडून वाहणार्‍या वर्दळीच्या गोव्यापासून पाऊण तासभर तरी लांब अरबी समुद्राच्या किनार्‍याला लागून 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' दिमाखात ऊभी होती.. बिल्डिंगपासून केवळ ३० मीटर वर असलेल्या बीचवर समुद्राची गाज आणि समुद्रीपक्षांच्या आवाजाशिवाय ईतर मानवनिर्मित आवाज फार क्वचितंच ऐकायला मिळत. बिल्डिंगमधल्या बारा सूपर लक्झ्युरियस आणि अतिप्रशस्तं अपार्टमेंट मध्ये राहणारे अतिश्रीमंत रिटायरी कपल्स सोडून चार पाच मैलांच्या परिसरात दुसरा मानवी निवारा नव्हता. हा पूर्ण ८० एकरचा बीच एरिया 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' नावाच्या मोठ्या कन्स्ट्रक्शन ग्रूपने विकत घेतल्याने भविष्यातही तिथे 'गॅलॅक्सी बीच सिटी' अंतर्गत 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' सारख्याच अजून सूपर लक्झ्युरियस बिल्डिंग बांधण्याचा ग्रूपचा मानस होता. त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्ट 'गॅलॅक्सी बीच सिटी- अ‍ॅक्वा सेरेनिटी' ला अपेक्षापेक्षा खूप जबरदस्तं प्रतिसाद मिळाला होता आणि पुढच्या बिल्डिंगची बुकिंग कधी सुरू होणार ह्याची देश विदेशातून प्रॉस्पेक्टिव क्लायंट्सकडून सातत्याने विचारणा होत होती.

तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी ह्या प्रोजेक्टचे पहिले प्रपोजल/प्रेझेंटेशन 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' च्या टॉप एक्झेक्युटिव्ज समोर झाले तेव्हा कंपनीचा भविष्यकाळ ह्या प्रोजेक्टमुळे किती ऊज्ज्वल असू शकतो हे ऊमगायला ग्रूप सीईओ 'राजपत गांधींना' ११ वा मिनिट देखील लागला नाही. प्रेझेंटेशन देणार्‍या ज्या व्यक्तीने आपल्या परिपूर्ण ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर पहिल्या दहा मिनिटांतच सगळ्या एक्झेक्युटिव्जना खिशात घातले होते ती असामी होती 'नरीन मिस्त्री'. आय आय एम मधली पदवी, देश विदेशातल्या कंपनीतल्या ऊच्चपदावरच्या अधिकार्‍यांबरोबर कामाचा अनुभव आणि प्रचंड मोठे प्रोफेशनल सर्कल ह्यामुळे नरीन मिस्त्रींचे नाव गॅलॅक्सी ग्रूप ला अपरिचित निश्चितंच नव्हते. मिस्त्रींनी आजवर नवीन अनएक्स्प्लोर्ड पण प्रॉमिसिंग ठिकाणी लँड अ‍ॅक्विझिशन पासून कंपन्यांचे युनिट्स सेट करण्यापर्यंतच्या कामांसाठे अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी कन्सल्टिंग केले होते, पण कधीच कुठल्या कंपनीची एम्प्लॉयमेंट मात्रं घेतली नव्हती. तसे करणे त्यांना कधीच रूचले नाही आणि जमले तर आजिबातंच नसते. 'रिअल ईस्टेट ग्रूप' ह्या 'जमाती'शी मिस्त्रींचा संबंध पहिल्यांदाच आला होता आणि हे कदाचित त्यांचे दुर्दैवच असावे.

आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांच्या कामाला प्रचंड डिमांड होती आणि त्यांचा ऊत्साहही २५ वर्षाच्या तरूणाला लाजवेल असा होता. एक My way or Highway असा प्रचंड हेकेखोर स्वभाव सोडला तर ५ फुट १० ईंच आणि ७५ किलो वजनाची त्यांची पर्सनॅलिटी अतिशय इंप्रेसिव आणि ईन्फ्ल्युएन्सिंग होती. मिस्त्री लाईफ लाँग रनर होते रोज सकाळी पूर्ण बीचला ते या वयातही ६० मिनिटांची फेरी मारत आणि वीकेंडलाही बर्‍याचदा अनेक ठिकाणी मॅरॅथॉन ही पळत. त्यांच्या कायम धाड्सी स्वभावाने त्यांना नेचर अ‍ॅडवेंचररही बनवले नसते तर नवलच. अफ्रिका, अ‍ॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातली कैक जंगलात त्यांनी एकट्याने भटकंती केली होती . आपल्या अनुभवाबद्दल 'नेचर्स अ‍ॅडवेंचर्स' मासिकांत त्यांचे एक दोन लेख देखील प्रकाशित झाले होते. हौशी लोकांनाही ते अश्या मोहिमांत जीव सुखरूप कसा ठेवावा ह्याचे मार्दर्शन त्यांच्या ब्लॉग द्वारे करीत.

परंतू मागच्या सहा महिन्यांपासून गॅलॅक्सी ग्रूप खासकरून सीईओ राजपत गांधी व सीएफओ रतन पारीख आणि नरीन मिस्त्रींमध्ये शीतयुद्ध चालू होते. झाले असे होते की मिस्त्रींनी 'गॅलॅक्सी बीच सिटी' प्रोजेक्ट च्या आधी कन्सल्टिंग सोडून त्यांच्या 'आर्ट्स डीलर' बनण्याच्या लाँग टाईम पॅशनला नवा पेशा म्हणून स्वीकारले होते. 'गॅलॅक्सी बीच सिटी'ला भारताची आर्ट आणि अँटिक कॅपिटल बनवण्याचे त्यांचे भव्यदिव्य स्वप्नं होते. त्यांच्या ३५ वर्षांच्या करियर मध्ये त्यांनी अतिशय दुर्मिळ पेंटिंग्स, पुरातन कला वस्तू पासून तर अँटिक फर्निचर, नामशेष होत चाललेले पण कायदेशीर मार्गाने टॅक्सिडर्म केलेले प्राणी, जुनी शस्त्रे असे काय अन काय जमा केले होते. आपली आयुष्याची कमाई कॅपिटल मार्केट मध्ये ईनवेस्ट न करता त्यांनी अश्या आर्ट्स कलेक्शन मध्येच गुंतवली होती. आज जर त्यांनी त्यांचे कलेकशन लिक्विडेट केले असते तर गेल्या ३५ वर्षात कुठल्याही कॅपिटल मार्केटने दिला असता त्याच्या ३ ते ४ पट परतावा त्यांच्या कलेक्शन ने त्यांना मिळवून दिला असता. आपल्या कलेक्शनसाठी लागणार्‍या श्रीमंत आणि दर्दी क्लायंट्सना टॅप करण्यासाठी देशोदेशी न हिंडता 'गॅलॅक्सी बीच सिटी' च्या रुपाने असा क्लायंट बेसच तयार करण्याचा मास्टर प्लान त्यांनी गॅलॅक्सी ग्रूपला हाताशी धरून अंमलात आणण्याचा घाट घातला होता. शेवटी मिस्त्री हे एक प्रचंड हुषार आणि महत्वाकांक्षी रसायन होते आणि अश्या मोठ्या गोष्टी घडवून आणाण्याचा पेशंस आणि अनुभव त्यांनी पूर्ण ऊमेद खर्चून कमावला होताच.

तर गांधी-पारीख आणि मिस्त्री मधल्या शीतयुद्धाचे कारण होते 'गॅलॅक्सी बीच सिटी' मधली 'अ‍ॅक्वा सेरेनिटीला' लागून असलेली ३ एकर जागा. ह्या जागेवर 'गॅलॅक्सी ग्रूप' मिस्त्रींची कन्सल्टिंग फी म्हणून तीन वर्षापूर्वी झालेल्या करारानुसार मिस्त्रींना एक तीन मजली आर्ट गॅलरी बांधून देण्यास बांधील होता आणि त्यासोबतच सहा मजल्यांच्या 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' मधल्या टॉप फ्लोअरवरच्या दोन पैकी एक सी फेसिंग फ्लॅट '६०२' देण्यासाठी सुद्धा. परंतू 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' च्या जबरदस्तं यशानंतर आणि पुढच्या स्कीमसाठी अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्तं किंमत मोजण्यास तयार असणार्‍या क्लायंटस मुळे गांधी-पारीखना आर्ट गॅलरीची मोक्याची जागा मिस्त्रींना देण्यास प्रचंड जिवावर आले होते. ते आता मिस्त्रींना सेरेनिटीपासून लांब गॅलॅक्सी बीच सिटीची एका कोपर्‍यातली जागा घेण्यास मनधरणी करत होते. गांधी-पारीखांची ऊफाळलेली लालसा आणि मिस्त्रींचा प्रचंड हेकेखोर स्वभाव ह्यामुळे ही मनधरणी, मनभेद आणि अविश्वासापर्यंत पोचायला महिनाभरही लागला नाही. ठरलेल्या जागेवर आर्ट गॅलरीचे काम सुरू करण्यास मुद्दाम केला जाणारा ऊशीर आणि जागेबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा हेका त्यामुळे मिस्त्रींनी गांधींना कोर्टात खेचण्याची आणि पूर्ण बीच सिटीवरच स्टे आणण्याची धमकी दिली तेव्हा गांधी, पारीखांचे धाबे जोरदार दणाणले. आपली मोक्याची जागा वाचवण्याचा शेवटचा 'दाम-भेद' ऊपाय म्हणून गांधी-पारीखांनी मिस्त्रीं च्या आर्ट्स कलेक्शनचे कस्टोडियन आणि मॅनेजर कुणाल भरूचांना मिस्त्रींचे मन वळवण्यासाठी चार कोटी रुपयांची लाच क्लॉबॅक क्लॉजसहित दिली (क्लॉबॅक म्हणजे जर भरूचा मिस्त्रींचे मन वळवण्यात अपयशी ठरले तर चार कोटी रुपये त्यांना गांधींना परत करावे लागतील). हा ही ऊपाय न चालल्यास मिस्त्रींवर 'दंड' ऊपाय करून त्यांना 'कायमचे' हटवण्याचीही गांधी-पारीखांची तयारी होतीच.

पण मिस्त्रींना कुठूनतरी भरूचांनी चार कोटी रुपये लाच स्वीकारल्याची बातमी कळालीच. त्यांनी लगोलग भरूच्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या ईतर क्लायंट समोरच विश्वासघात केल्याचा आरोप ठेवत त्यांना मानहानीकारक बोल लावले. भरूच्यांच्या जागी लवकरच दुसरा कस्टोडियन नेमणार अशी धमकीही दिली. भरूचांबरोबर तीन महिन्यांत एक्स्पायर होणारे काँट्रॅक्ट रिन्यू न करता मिस्त्रींनी त्यांच्या कलेक्शनमधले काही छोटे मोठे आर्टिफॅक्ट्स आपल्या अ‍ॅक्वा सेरेनिटी मधल्या प्रशस्तं फ्लॅट मध्ये ट्र्रान्सपोर्ट करण्यास सुरूवात केली. (असे करण्यामागे आर्ट गॅलरीला लागत असलेल्या ऊशीरा मुळे क्लायंट्सना घरीच बोलावून आपले कलेक्शन दाखवण्याचाही त्यांचा अंतर्गत हेतू होता) भरूचा मिस्त्रींच्या कलेक्शनच्या सेफ किपिंगसाठी कायदेशीर रित्या बांधील होते त्यामुळे मिस्त्रींना अजून तीन महिने काही चिंता नव्हती पण भरूचांवर अजून विश्वास ठेवण्याचीही मिस्त्रींची ईच्छा नव्हती.
मिस्त्री १५ वर्षांची मैत्री आणि संबंध अश्या अपमानकारक रित्या तोडून गेल्याचा भरूचांना प्रचंड राग आला. मिस्त्रींच्या आरोपानंतर समोर बसलेले क्लायंट्स ऊठून गेल्याने मिस्त्रींमुळे आपले आता कमीत कमी ८-१२ कोटींचे नुकसान होणार समजल्याने त्यांनी मनोमन मिस्त्रींचा बदला घेण्याचा चंगच बांधला. गांधी-पारीख बरोबर मिस्त्रींच्या जीवावर ऊठलेल्या लोकांच्या यादीमध्ये भरूचांचेही नाव अ‍ॅड झाले.

पण ही यादी ईथेच संपत नाही.

डिमांड्मध्ये असलेले कंन्सल्टींगचे करियर सोडून तीन वर्षांपूर्वी गोव्यातच सेटल होण्याचे मिस्त्रींनी ठरवले त्याला कारण होते त्यांची एकुलती एक मुलगी 'पेरिजाद' आणि तिचा अडीच वर्षांचा मुलगा 'दानिश'. जगातल्या सर्व सुखसोयींनी युक्त कॉलेज/हॉस्टेल्स मध्ये का वाढली असेना पण लहानपणापासूनच वडिलांपासून लांब आणि आईविना वाढलेल्या पेरिजाद ने जेव्हा 'कैझाद दोर्दीशी' लग्नं करायचे ठरवले तेव्हा देशाबाहेर असलेल्या मिस्त्रींना तिने केवळ औपचारिकता म्हणूनच दोन दिवस आधी लग्नाची तारीख कळवली. आपल्या बिझी आयुष्याने आपल्या मुलीला आपल्यापासून किती लांब लोटले ह्याची जाणीव मिस्त्रींना झाली आणि आयुष्यात कधीही तडकाफडकी निर्णय न घेणारे मिस्त्री हातातले काम सोडून लगोलग गोव्यात दाखल झाले. कौटुंबिक सुखासाठी आसुसलेली मलूल चेहर्‍याची पेरिजाद पाहून त्यांच्या जीवाची कोण घालमेल झाली. त्यांनी पेरिजादकडे तिच्या नातं जपण्यात अपयशी ठरलेल्या बापाला माफ करण्यासाठी हात पसरले. पेरिजादनेही मोठ्या मनाने त्यांना माफ केले आणि मिस्त्रींनी आनंदाने गोव्याला आपले घर बनवले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कैझादच्या अल्कोहोलिक, बाहेरख्याली आणि वायोलंट वागण्याला कंटाळून आयुष्यात कायम प्रेमाची वानवाच नशिबी आलेल्या पेरिजाद ने दानिश च्या जन्मानंतर दीड वर्षांतच मिस्त्रींना पत्रं पाठवून दानिशची काळजी घेण्याची श्यपथ घालून आपली जीवनयात्रा संपवली. खचलेल्या मिस्त्रींनी पेरिजाद बाबत झालेल्या चुकीचं प्रायश्चित्तं म्हणून दानिशची कस्टडी मिळवून कैझादला पेरीजादच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवून कायदेशीर शिक्षा करण्याचं ठरवलं. हॉटेलिंगच्या मोठा बिझनेस असलेली कैझादची फॅमिलीही पैसा आणि काँटॅक्ट्सच्या बाबतीत कमी नसल्याने दानिशची लीगल कस्टडी मिळावण्यात मिस्त्रींना खूपच कष्टाची कायदेशीर लढाई करावी लागली. पण आयुष्यात आजवर कधीच हार न मानलेले मिस्त्री ही लढाईदेखील मागच्याच आठवड्यात जिंकले. कैझादला शिक्षा झाली नाही पण आठवड्याभरात दानिशचा ताबा मिस्त्रींकडे देण्याचे अपील कोर्टाने मंजूर केले. पुढच्या आठवड्यात दानिशला घरी घेवून येणार ह्या आनंदात मिस्त्रींनी आजिबात वेळ न दवडता अ‍ॅक्वा सेरेनिटी मधली एक बेडरूम दानिशसाठी तयार करण्याचे काँट्रॅक्ट पेरिजादची जवळची मैत्रिण 'अलमिरा ईराणी' च्या फर्निचर आणि डेकॉरला दिले.

आणि तशातच ३१ डिसेंबरची ती रात्रं ऊजाडली. अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या बीचवर ३१ डिसेंबरचे फायरवर्क सेलिब्रेशन करून रात्री १ च्या ठोक्याला परतणार्‍या सेरेनिटीच्या रिटायरी कपल्सना कॅक्टस बेडमध्ये मिस्त्रींचा मृतदेह दिसला आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकून फ्रंट एंट्र्रन्सवरचे दोन्ही गार्ड्स धावतपळत बॅक एंट्र्न्सला आले.

पोलिस फायलीतल्या काही नोंदी.

पोस्टमॉर्टेम / मेडिकल रिपोर्ट
-मृत्यू ३१ डिसेंबर रात्री ११:३० ते १२:०० च्या दरम्यान झाला असावा. विक्टिमच्या हातातले घड्याळ रात्री ११:४० ला बंद पडले.
-ऊंचावरून फोर्स ने पडतांना नेमके डोके कॅक्टस बेडच्या (निवडुंगाचे ताटवे) कॉक्रीट बॉर्डरवर आपटून स्कल ब्रेक झाले.
-अंगाखाली कॅक्टस बेड असल्याने शरीरात शेकडो ठिकाणी कॅक्टसचे काटे घुसले.
-डोके आपटले नसते तर डेन्स कॅक्टस बेड मुळे कदाचित प्राण वाचू शकले असते.
-पडण्यापूर्वी विक्टिमला सफोकेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,
-कॅक्टसच्या काट्यांबरोबरच काचांमुळे झालेल्या जखमा आणि काचांचे बारीक तुकडेही शरीरात व चेहर्‍यावर घुसल्याचे मिळाले
-पोटात थोडेफार पचलेले अन्न, वाईन आणि काही माईल्ड स्लीप मेडिकेशन मिळाले. विक्टिम हे मेडिकेशन बराच काळापासून घेत असावा.
-जखमा आणि फ्रॅक्चर्स ऊंचावरून पडतांनाशी कन्सिस्टंट आहे.
- सापडलेल्या बाटलीतील २९ गोळ्या जेन्यूईन स्लीप मेडिकेशन आहे.
-कॉज ऑफ डेथ - आत्महत्या किंवा खून नक्की अनुमान लावणे कठीण आहे.

टाईमलाईन
----------------
३१ डिसेंबर
-दुपारी ४:१० - नरीन मिस्त्री एलेवेटरने फ्लॅट मध्ये दाखल
-दुपारी ४:२१ - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी पहिल्या बॉक्सची डिलीवरी
-दुपारी ४:५७ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी शेवटच्या बॉक्सची डिलीवरी
-संध्या ५:२० - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची पहिली डिलिवरी
-संध्या ६:५१ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी
-रात्री ९:४० - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन' पार्टीत जाण्यासाठी एलेवेटरने एक्झिट
-रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
-रात्री १०:३४ - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी'तून एलेवेटरने फ्लॅट मध्ये एंट्री
-रात्री १०:४० - तीच हुडेड व्यक्ती फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि जिन्यावाटे अतिशय घाईघाईने निघून गेली. पाठीवर एक बॅग.
-रात्री ११:५५ एक ऊंच, अंगापिंडाने मजबूत आणि रुबाबदार व्यक्ती (ऊंची पार्टी सुट, हातमोजे, चेहरा आजिबात दिसणार नाही अशी टोपी) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.

१ जानेवारी (३१ डिसेंबरचीच रात्रं पुढे चालू पण तारीख बदलली)
-रात्री १२:०४ तीच ऊंची पार्टी सुट घातलेली व्यक्ती ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि शांतपणे जिन्यावाटे निघून गेली.
-रात्री १:०४ सेरेनिटीचे दोन सिक्यूरिटी गार्डस एलेवेटरने फ्लॅट नंबर ६०१ च्या दरवाज्यासमोर दाखल
-रात्री १:१० सेरेनिटीमधील बर्‍याच राहिवाशांची सहाव्या मजल्यावर गर्दी
-रात्री १:१८ गार्डसने मास्टर की ने पोलिसांसमोर दरवाजा ऊघडून पोलिसांचा फ्लॅट मध्ये प्रवेश.
-रात्री १:२५ आत येवू पाहणार्‍या गर्दीला पोलिसांनी ६ व्या मजल्यावरून खाली हुसकावले.

प्रासंगिक माहिती
क्राईम सीन
-मिस्त्रींच्या ६०२ नंबरच्या सी-फेसिंग फ्लॅटची सी-साईड बेडरूमची भिंत जमिनी पासून ८ फूट ऊंच आण १५ फूट रूंद अश्या स्टँडर्ड जाडीच्या काचेची बनलेली आहे.
-मिस्त्रींनी काचा बंद असतांनाच खाली ऊडी मारली वा त्यांना बाहेर फेकले गेले.
-बेड अस्ताव्यस्त अवस्थेत. बेडवर स्ट्रगल झाल्याचे दिसून येते.
-बेडरूमला लागून असलेल्या टेरेसचा दरवाजा आतून (बेडरूममधून) बंद होता.
-बेडच्या डोक्याकडच्या भिंतीत (जी फ्लॅट नं ६०१ ला कॉमन वॉल आहे) एक आरपार बुलेट होल मिळाले , आणि तीन २८ mm कॅलिबरच्या गोळ्या
जिथे साधारणतः झोपले असतांना मिस्त्रींची छाती असली असती तिथे मॅट्रेस मध्ये अडकलेल्या मिळाल्या
-फ्लॅट नं ६०१ मध्ये बुलेट होल असलेल्या कॉमन वॉल वर भिंतीवर गन पावडर रेसेड्यू
-साईड टेबलवर कमी पावरचे (माईल्ड) स्लीप मेडिकेशन सापडले. ३० पैकी २९ गोळ्या बाटलीमध्ये आहेत.
- चष्मा, पुस्तंक, वाईन चा रिकामा ग्लास आणि अजूनही चालू असलेला नाईट लँप खाली जमिनीवर पडलेले होते
-किचन सिंक खालच्या कॅबिनेटला भिंतितून आरपार केलेले ३५० मिमि चे होल सापडले जे बाजूच्या रिकाम्या फ्लॅट नं ६०१ च्या किचन सिंक खालच्या कॅबिनेट मध्ये ऊघडते. भिंतीचा कट केलेला पीस बाजूच्या फ्लॅट मध्ये सापडला. एखादा अ‍ॅथलेटिक मनुष्य ह्या होल मधून जाऊ शकतो.

फ्लॅट नं ६०१
- सहाव्या मजल्यावर जिन्याचा दरवाजा बरोबर फ्लॅट नं ६०१ च्या दरवाज्यासमोरच आहे.
- महिन्यापूर्वीच ग्राहकाने खरेदी रद्द केल्याने फ्लॅट नं ६०१ अजूनही विकला नव्हता. पझेशन देण्याची डेड लाईन नसल्याने त्याचे ईंटेरियर डेकोरशन व रंगरंगोटीचे काम अजूनही अतिशय संथगतीने चालू होते. फ्लॅटमध्ये ठिकठिकाणी सामान विखुरलेले होते.
- ह्या फ्लॅट साठी क्लायंट मिळवण्याचे काँट्रॅक्ट मिळालेली रिअल ईस्टेट एजंसी 'फॉन्सेका प्रॉपर्टीज' वीकेंडला फ्लॅट चे 'ओपन हाऊस' शोईंग्ज करते. ह्या शोईंग्ज मध्ये अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डींग चा टूर ही समाविष्टं असतो. अपॉईंटमेंट घेवून फ्लॅट बघायला येणार्‍यांच्या आयडेंटिटीच्या प्रतीची कॉपी करू ठेवली जात असली तरी क्लायंटला नाराज होऊ नये ह्या हेतूने बर्‍याच वेळा आयडी प्रुफ आणायला विसरलेल्यां क्लायंट्सनाही फ्लॅट आणि बिल्डिंग दाखवल्याचे फॉन्सेका च्या सेल्स एजंट्सनी मान्य केले आहे.

अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डिंग
-फ्रंट एंट्र्न्स ने बिल्डिंग मध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये कैद होते आणि २४ तास हजर असलेले सिक्युरिटी गार्डस ती व्यक्ती राहिवासी नसल्यास, राहिवाश्यांनी खाली येवून त्यांना एस्कॉर्ट करेपर्यंत लॉबीमध्येच बसवून ठेवतात.
-एलिवेटर्स, फ्लॅटचा एंट्रन्स आणि कॉरिडोर कॅमेराने ईक्विप्ड आहेत आणि कॅमेरात कॅप्चर न होता फ्लॅट मध्ये जाणे अशक्य आहे.
-बिल्डिंगला एक जिना असून तो प्रत्येक मजल्यावर ऊघडतो, पण जिन्यामध्ये कुठलाही कॅमेरा नाही

मिस्त्रींचे घर
- बिल्डिंगच्या आऊटर भिंती काँक्रीटच्या पण आतल्या वुडन आहेत. फ्लोअर ही वुडन आहे.
-मिस्त्रींचे आर्ट आणि अँटिक गोष्टींसाठीचे प्रेम घरात ठिकठिकाणी दिसत होते. एखाद्या अतिशय कलात्मकतेने सजवलेल्या आर्ट म्युझियम पेक्षा फार वेगळं नसावं त्यांचं घर. भिंतीवर ठिकठिकाणी मोठमोठ्या तस्वीरी, नाना प्रकारचे फर्निचर/अलमार्‍या, देशविदेशातल्या भिन्न रंगारुपाच्या आणि कालखंडातल्या वाटाव्यात अश्या कलाकुसरीच्या वस्तू, राजघराण्यातली वाटावी अशी झुंबरं, फुलदाण्या, शोभेची श्स्त्रास्त्रं असे बरेच काही.
-पूर्ण घरभर अँटिक आणि आर्ट्स सामानाचे छोटे मोठे अकूण १२ लाकडी बॉक्सेस ठेवलेले आहेत. सर्वात मोठा बॉक्स ६ x ८ x २ आणि सर्वात लहान बॉक्स बॉक्स ३ x ३ x २ फूट डायमेन्शन्सचा आहे.
-अँटिक आणि आर्ट्स पीसेसचे सगळे १२ बॉक्सेस ऊघडलेले आहेत. त्यातल्या लहान ३ x ३ x २ च्या बॉक्समधली मधली वस्तू गायब आहे.
- बॉक्स मधल्या वस्तू वगळता घरातल्या ईतर वस्तू केवळ शोभेच्या असाव्यात आणि त्यांना काही अँटिक वॅल्यू नसावी असे प्रथमदर्शनी वाटते.
-एका बेडरूममध्ये लहान मुलाच्या फर्निचर आणि डेकॉरच्या सामानाचे मोठे बॉक्सेस. बॉक्सेस ऊघडले असता आत काही आक्षेपार्ह सापडले नाही.
-लहान मुलांच्या 'कार्स' सिनेमावर आधारीत बेडरूम सेट अर्धवट लावून सोडून देण्यात आला आहे तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ५ x ४ x ४ ची कार फ्रेम मागे ठेवलेल्या बेडरूम सेटच्या रिकाम्या मोठ्या बॉक्स मध्ये मिळाली नाही
-'ती' कार फ्रेम आमच्या शोरूम मध्ये फ्रंटला लावलेली असल्याने गोडाऊनमधून डिलिवरी नेणारे बॉईज ती नेण्यास विसरून गेले असा जबाब अलमीरा ईराणींनी दिला. डिलिवरी बॉईजनी ती फ्रेम दुसर्‍यादिवशी आणून लावण्याची हमी मिस्त्रींना दिली होती. डिलिवरी बॉईजनेही असेच झाले असल्याचे सांगितले.
-मिस्त्री आणि सेरेनिटी मधल्या ईतर कुठल्याही राहिवाश्याचा कोणत्याही प्रकारचा कधी संबंध आल्याचे पुरावे मिळाले नाहीत. सर्व जण त्यांना एक दर्दी आर्ट डीलर म्हणूनच चेहेर्‍याने ओळखत होता.

३१ डिसेंबरची बीच पार्टी
-३१ डिसेंबरला गॅलॅक्सी ग्रूप-सेरेनिटीने मोठी बीच पार्टी आयोजित केली असल्याने ६०१ चे क्लायंट शोईंग करण्यास फॉन्सेकाला मनाई करण्यात आली होती.
-बिल्डिंगमधील राहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांना बिल्डिंगला वळसा घालून बीच पार्टीला जावे लागू नये म्हणून त्यांच्या सोयीसाठी बिल्डिंगच्या बॅक साईडला (जी बीच सईड आहे) ऊघडणारे जिन्याचे दार (जे ईतरवेळी कायम बंद असते आणि ऊघडल्यास अलार्म वाजतो) रात्री ९ वाजल्यापासूनच अलार्म डिझेबल करून ऊघडेच ठेवण्यात आले होते.
-३१ डिसेंबर रात्री ९ पूर्वी बिल्डिंगचे बॅक डोर महिन्याभरात आजिबात ऊघडले गेले नव्हते.
-बॅक डोर मधून आत येणारा वा जाणारा कॅमेरामध्ये कैद होतो पण ३१ डिसेंबरच्या रात्री कैक सेरेनिटीचे राहिवासी आणि त्यांचे विजिटर्स अनेक वेळा घोळक्याने आत व बाहेर करत असल्याने त्यातून नेमकी संशयित व्यक्ती शोधणे अशक्य आहे.
-बीच पार्टीला सेरेनिटीच्या सध्याच्या राहिवाशांबरोबरच त्यांच्याकडच्या पाहुण्यांची आणि अनेक प्रॉस्पेक्टिव क्लायंटसची ऊपस्थिती होती.
-गॅलॅक्सी ग्रूपने आयोजित केलेल्या या बीच पार्टीचे ईवेंट मॅनेजमेंट गोव्यातल्या नावाजलेल्या आणि अतिशय महागड्या 'मूनलाईट असोसिएट्सला' देण्यात आले होते.
-मिस्त्रींच्या बीच फेसिंग फ्लॅट मधून पार्टीची जागा, बीचकडून बिल्डिंगकडे येणारी ४० मीटरची पायवाट आणि चालणारी व्यक्ती स्पष्टं दिसते.

खबरींकडून कळालेली माहिती
-अलमीरा ईराणीच्या 'फर्निचर & डेकॉर स्टोर' मध्ये आणि खाजगी आयुष्यातही 'कैझाद दोर्दी' सिक्रेट स्लीपींग पार्टनर आहे अशी वदंता आहे.
-मुलाची कस्टडी गेल्याने कैझाद दोर्दी मिस्त्रींवर फार खवळलेला आहे. त्याच्या फॅमिलीचे त्यांच्या हॉटेल बिझनेसच्या माध्यमातून गुन्हेगारी वर्तुळात काँटॅक्ट्स असण्याची खूप शक्यता आहे.

**************************************************

कसा झाला असेल नरीन मिस्त्रींचा करूण अंत? काही घातपात असण्याचा संभव आहे की त्यांनी अचानक अशी खिडकीतून ऊडी मारून आत्महत्या केली? मॅट्रेस मध्ये गोळ्या कुठून आल्या? मिस्त्रींची आत्महत्या नसून खून असेल तर कोणी केला आणि कसा?

घटना सोडून वरती मिस्त्रींबद्दल मी जी लांबड लावली आहे ती फक्तं मिस्त्री आणि त्यांचे 'हितचिंतक' Wink एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीच. एकदा एकेकाचे कॅरिकेचर समजले की ती माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स
वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास) आणि त्यांची पद्धत समजू शकते. मान्य आहे माहिती खूप दिली आहे पण ऊलट त्याचा ऊपयोग अ‍ॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.

*बीच पार्टी म्हणजे केवळ बीचवर झालेले ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन अपेक्षित आहे. बिकिनी,रेव वगैरे तसले काही नाही. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर एका स्टेजला एक मोठ्या कोटात घुसून दोन माणसे आली असा सुद्धा विचार केला होता. हो, कुठलीही शक्यता राहून जायला नको > lol, श्र!!

मी तर एका स्टेजला एक मोठ्या कोटात घुसून दोन माणसे आली असा सुद्धा विचार केला होता. हो, कुठलीही शक्यता राहून जायला नको. >> same here. Lol
Maja aali.

कोणीतरी दुसर्‍याने पुढाकार घेवून नवीन कोडं टाका आता. आमालाबी चानस पायजे ना सुलटीकडून डोकं लावायचा. कायम ऊलटीकडूनच डोकं चालवून चक्कर येईल आता.
तोवर मग मी आमच्या अतिश्रीमंत धेंडांचे थोडे पैसे ऊडवून त्यांना मध्यमवर्गीय बनवतो म्हणजे त्यांच्या करोडोंच्या गप्पा लाखावर, हजारावर येतील. Lol

हाब छान कोडे,
अजगराचे लॉजिकं पटले,

पण प्रॉफेशन किलर ने random गोळीबार केला हे काही पटत नाही,
त्या ऐवजी असा ट्विस्ट देऊ शकला असता,

दोन्ही लोकांना एकाच माणसाने हायर केले होते,
पण हुडी ला फक्त चोरी करायची इतकीच कामगिरी होती, हे कव्हर अप होते,(मुख्य कामगिरी पॅसेज तयार करणे)
सुटोबा ला तिकडे ओपनिंग असेल त्यातून जाऊन काम फत्ते करणे इतकेच ब्रिफिंग होते.
त्यानुसार 601 मधून गोळीबार केला, मृत्यू कन्फर्म करायला 602 मध्ये गेला तेव्हा फ्लॅट रिकामा दिसला, फुटक्या काचेतून त्यांची डेड बॉडी दिसली आणि तो परत 601 मधून बाहेर गेला

दोन्ही केसेस खूप आवडल्या. अजगराचे शक्य आहे, अजगरामुळे मृत्यू झाल्यानंतरचे सोपस्कार आटप्ल्यानंतर तो फ्लॅट बंद राहिला असता, भरुचा मॅनेजर असल्यामुळे तो नंतर फ्लॅट मध्ये प्रवेश मिळवू शकला असता. तो स्वतः भुकेलेल्या अजगरपासून स्वतः ला कसा वाचवू शकला असता हा प्रश्न आहेच पण सुडाने पेटलेल्या भरुचाला हा विचार सुचलेला दिसत नाही.

मिस्त्रीचे जंगलातले स्किल लक्षात घेता मृत्यू अजगरामुळे होण्याची शक्यता खरेतर 50:50 टक्केच होती. मिस्त्रीने उडी न घेता दरवाजाच्या दिशेने धाव घेतली असती तर कदाचित जीव वाचला असता. पण अजगराच्या विळख्यात असे करणे अशक्य होते हे उडीवरून दिसतेय.

एका उत्कंठावर्धक गोष्टीसाठी धन्यवाद. स्पार्टाकसच्या ट्रॅप ची आठवण झाली. तेव्हाही सतत मायबोली अशीच चेक केलेली.

थोड्याफार त्रुटी मान्य करूनही जबरदस्त प्लॅन!! त्याकरीता एवढं वाचन, अभ्यास केलात! _/\_>> +१
पुढचं कोडं जरा भारतीय वेळेत देता येतं का पहा ना प्लीज, आम्ही सुरुवात करेपर्यंत ५०-६० गेसेस आलेले असतात Wink

हो ना, चालायला बाहेर पडल्यावर सहज मोबाईल पहिला तर नवीन केस दिसली,
मग एका बाईक वर बसून वाचली, आणि फर्स्ट कट गेस टाकला,
फिरता फिरता तो चुकीचा वाटला म्हणून एडिट केला,
पण हाय...... त्याची पण टाइम1लाईन चुकली Wink

चला सगळ्यांना पटेल अशी स्टोरी तयार करू या.
एखाद्या खुनात गोष्टीमधे उल्लेख केलेल्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक असने जरुरीचे नसते. फक्त खुनी आणि त्यामागचा मोटीव्ह आवश्यक असतो.

मिस्त्रींना अँटीक गोष्टीं जमवण्याचा फार नाद होता. देशविदेशी फिरुन ते आपली हौस पुर्ण करत होते. स्वतःच्या अँटीक मधे त्यांनी बराच पैसा गुंतवून ठेवला होता. भरूच यांना त्या अँटीकची पुरेपुर माहीती होती. भरूचने एका प्रोफेशनल चोराला रुम मधल्या काही वस्तूंची माहीती दिली आणि ती चोरी करून आंणण्यासाठी सांगितले. ३१ ला सगळे पार्टी मधे गुंग असतील म्हणून त्या चोराने तो दिवस निवडला. तर दुसरीकडे गांधी आणि पारेख यांनी एका प्रोफेशनल किलरला मिस्त्रीला ठार करण्याचे पैसे दिले होते. ३१ च्या आदल्या दिवशी पासून गांधी आणि पारेख दोघे ही पार्टीमधे बिझी असल्यामुळे त्यांच्यावर कुणाला संशय जाणार नव्हता.

आता ३१ च्या रात्री.
१०.४० ला भरूचने पाठवलेल्या चोराने ६०१ मधून आत येऊन किचन मधल्या सिंक मधून ६०१ मधे प्रवेश केला. आणि मिस्त्रीची दुर्मीळ चित्रे चोरली त्यांन्तर पार्टीत मनसोक्त ड्रिंक केल्यानंतर मिस्त्री रूम मधे आल्यानंतर सुध्दा वाईन पित बसलेले. औषध घेतल्यानंतर त्यांनी घरी आलेले सामान बघण्यासाठी मोठ्या पेटीत बंद करून अजगर मिस्त्रींनी अ‍ॅमेझॉन च्या जंगलातून मागवलेला होता. भटकंती फार केलेली असल्याने त्यांच्या ओळखीने ते सहजशक्य झाले फारच दुर्मिळ प्रजातीचा तो अजगर होता त्याला मुंबईवरून त्यांच्या मित्राने गुंगीचे औषध देऊन पाठवलेला. सगळ्या पेटी बघत असताना त्यांना अचानक अजगराची आठवण आली. गुंगी दिलेली माहीत असल्याने मिस्त्रींनी थोड्या बेसावधपणे तो बॉक्स उघडला. बॉक्स उघडल्यानंतर गुंगीतून कधीच जागे झालेल्या अजगरने त्यांच्यावर झेप घेतली आणि नेमका गळ्याच्या कंठाचा चावा घेतला. (बॉक्स उघडताना आपण बरोबर कमरेत खाली वाकतो आणि जेव्हा जोर लावून बॉक्स उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गळा आपला पुढे आलेला असतो) मिस्त्रींचा आवाज एक्दम कमी झाला. त्यांना श्वास घेण्यास आणि ओरडण्यास त्रास होऊ लागला. अजगराशी झटापटीत ते खिडकी मधून खाली पडले. आवाज आधीच गेलेला असल्यामुळे उडी मारतानाचा त्यांच्या ओरडण्याचा आवाज गार्ड पर्यंत पोहचू शकला नाही. खाली काँक्रिटवर पडल्यावर तिथेच मरण पावले. याच दरम्यान प्रोफेशनल किलर याने ६०१ मधे प्रवेश केला आणि किचन सिंक मधून गोळीबार केला. (तेव्हा अजगर शी झटापट चालू होती) खिडकी तुटल्याचा आणि खाली पडल्याचा आवाज ऐकल्यावर प्रोफेशनल किलर ला वाटले की गोळी लागल्याने मिस्त्री खिडकीतून खाली पडले. तो तडक खाली निघाला. यावेळेस गोळी झाडल्यामुळे किचनसिंक मधे गरम वातावरण तयार झाले मिस्त्रीच्या रुम मधे फिरणारा अजगराला बाहेर पडण्यासाठी वाट मिळाली तो गरम वातावरणाचा माग काढत काढत त्या सिंक मधून ६०१ मधे गेला.
किलरच्या सोईसाठी बॅक डोअर उघडा ठेवलेला होता. पण किलरने फ्रंट डोअर वापरल्यामुळे तो दरवाजा तसाच उघडा राहिला. अजगर त्या दरवाजातून पसार झाला.

------------
जवळपास सगळे मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला

Lol

मी स्टोरी(कोडे) वाचलं नाही...फक्त गजोजींचे प्रतिसाद वाचले... त्यावरून लक्षात आलं Happy

हाब छान कोडे,
अजगराचे लॉजिकं पटले,
पण प्रॉफेशन किलर ने random गोळीबार केला हे काही पटत नाही, >>> रँडम गोळीबार केला नाही. मिस्त्री बेडवरंच असतील ह्या पक्क्या हिशोबाने केला. आणि ते बेड वर असते तर गोळ्यांनी मेलेच असते.

त्या ऐवजी असा ट्विस्ट देऊ शकला असता,
दोन्ही लोकांना एकाच माणसाने हायर केले होते,
पण हुडी ला फक्त चोरी करायची इतकीच कामगिरी होती, हे कव्हर अप होते,(मुख्य कामगिरी पॅसेज तयार करणे)
सुटोबा ला तिकडे ओपनिंग असेल त्यातून जाऊन काम फत्ते करणे इतकेच ब्रिफिंग होते.
त्यानुसार 601 मधून गोळीबार केला, मृत्यू कन्फर्म करायला 602 मध्ये गेला तेव्हा फ्लॅट रिकामा दिसला, फुटक्या काचेतून त्यांची डेड बॉडी दिसली आणि तो परत 601 मधून बाहेर गेला >>>> चोरी करायला आत जाणारा माणूस आरामात शूट ही करू शकतो त्यासाठी दोन माणसांचा द्राविडी प्राणायाम का करेल कोणी. त्याने काहीही अचिव होत नाही. चोर हा त्याच्या मर्जीने आलेला चोर होता गांधी-पारीख, भरूचा किंवा कैझाद-अलमीरा पैकी कोणीही त्याला पाठवले नव्हते. मिस्त्रींचे अँटिक्स चोरायचा ऊद्देश/मानस कथेतल्या एकाही संशयिताने व्य्कत केलेला नाही.

दोन्ही केसेस खूप आवडल्या. अजगराचे शक्य आहे, अजगरामुळे मृत्यू झाल्यानंतरचे सोपस्कार आटप्ल्यानंतर तो फ्लॅट बंद राहिला असता, भरुचा मॅनेजर असल्यामुळे तो नंतर फ्लॅट मध्ये प्रवेश मिळवू शकला असता. तो स्वतः भुकेलेल्या अजगरपासून स्वतः ला कसा वाचवू शकला असता हा प्रश्न आहेच पण सुडाने पेटलेल्या भरुचाला हा विचार सुचलेला दिसत नाही. >>> अजगराला काढून आणण्यासाठी भरूचाल स्वतः जाण्याची गरज नाही. जसे त्याने कुणाकडून तरी तो बॉक्स मध्ये ठेवला असावा तसा तो त्याच कुणाकडून काढूनही घेईन...
दोन्ही केसेस खूप आवडल्या. अजगराचे शक्य आहे, अजगरामुळे मृत्यू झाल्यानंतरचे सोपस्कार आटप्ल्यानंतर तो फ्लॅट बंद राहिला असता, भरुचा मॅनेजर असल्यामुळे तो नंतर फ्लॅट मध्ये प्रवेश मिळवू शकला असता. तो स्वतः भुकेलेल्या अजगरपासून स्वतः ला कसा वाचवू शकला असता हा प्रश्न आहेच पण सुडाने पेटलेल्या भरुचाला हा विचार सुचलेला दिसत नाही.

मिस्त्रीचे जंगलातले स्किल लक्षात घेता मृत्यू अजगरामुळे होण्याची शक्यता खरेतर 50:50 टक्केच होती. मिस्त्रीने उडी न घेता दरवाजाच्या दिशेने धाव घेतली असती तर कदाचित जीव वाचला असता. पण अजगराच्या विळख्यात असे करणे अशक्य होते हे उडीवरून दिसतेय. >>> बरोबर.
हात अडकलेले असतांना दरवाजा ऊघडणेही अवघड आहे.

चला सगळ्यांना पटेल अशी स्टोरी तयार करू या. >>तसे करण्याची गरज नाही. दिलेल्या घटनाक्रमातून 'काय झाले होते' ह्याची केवळ एकंच शक्यता निघू शकते. 'काय होऊ शकले असते' त्याच्या अनेक शक्यता निघतील पण त्या गृहीत धरण्यातून केस सॉल्व होत नाही म्हणून तसे करणे अर्थहीन आहे.

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

दुसरा कुठलाही माणूस घरामध्ये नसतांना झोपलेल्या माणसाला सफोकेट करत गुदमरून मारण्याचा प्रयत्न करू शकेल अशी भूत आणि अजगर सोडली तर तिसरी शक्यता माझ्या तरी डोक्यात येत नाही.

मिस्त्री पडले ही त्या स्ट्रगल मध्ये घडलेली कोणीही प्लॅन न केलेली घटना होती. तिथे लाकडी वा सिमेंट कॉ़ंक्रीटची भिंत असती तर ते पडलेच नसते. विचार करू शकण्याच्या स्थितीत असलेला कोणीही सेन माणूस सहाव्या मजल्यावरून ऊडी मारून वाचण्याची अपेक्षा करणार नाही.

अजगर किंवा बोआ हे केवळ गृहितकच आहे राईट? सिद्ध करणं ( कॅमेरामध्ये कॅपचर झाल्याशिवाय) जवळ जवळ अशक्य. हे भरूचा नेच केले असावे हे सिद्ध करणे त्याहून कठीण. अर्थात पुढे कबुलीजबाब त्यानेच दिला तर.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझी एक थेअरी - मेस्त्री च्या स्लिप मेडिकेशन मध्ये एकच गोळी सफोकेट होईल अशी बनवली गेली असेल तर? गोळी घेतली असेल, रात्री सफोकेट झाले असतील. तोल जाऊन खाली पडले असतील.

गोळी घेवून सफोकेट कसे होणार? तुम्हाला चोकिंग सारखे काही अपेक्षित असेल तर त्यासाठी ऑबजेक्ट विंडपाईपमध्ये सापडायला हवा.
नाक, गळा, छातीचा डायफ्रॅम तिन्हीपैकी एकाचे कार्य एक्सटर्नल फोर्सने रिस्ट्रिक्ट केल्याशिवाय सफोकेट होणार नाही. प्लास्टिक बॅग डोक्यात घालूनही सफोकेट करता येईल पण तसे करण्यासाठीही मनुष्यप्राणीच लागेल.
चीकू म्हणाले तसं अजगराने सफोकेट केलं (छातीचा डायफ्रॅम आवळत) आणि लगेच पडून मृत्य्यू झाल्यास ( मृत्यू लगेच झाला असे मी नमूद केले असल्याने ही तृटी राहून गेली ) छाती आणि दंडावरच्या त्वचेवर त्याच्या आवळण्याचे वळ राहतील. पण मृत्य्यू ताबडतोब न होता काही काळ हार्ट पंपिंग असेल तर ते वळही काही मिनिटांमध्ये निघून जाऊ शकतात. पण अजगर हार्टबीट चालू असेपर्यंत पकड सोडत नाही, त्यामुळे वळ सापडणे हे जास्तं योग्य आहे अनलेस वरतून पडल्याच्या ईंपॅक्ट नंतर आणि कॅक्टसचे काटे टोचल्यावर अजगराने मिस्त्रींना जिवंत सोडून पळ काढला असेल.

अजगर किंवा बोआ हे केवळ गृहितकच आहे राईट? सिद्ध करणं ( कॅमेरामध्ये कॅपचर झाल्याशिवाय) जवळ जवळ अशक्य. हे भरूचा नेच केले असावे हे सिद्ध करणे त्याहून कठीण. अर्थात पुढे कबुलीजबाब त्यानेच दिला तर. >> हो बरोबर आपण फक्तं काय झाले असेल त्याचा अंदाजच लाऊ शकतो. म्हणून माझी ऊत्तरं ही 'असे झाले असावे' अशीच असतात. 'हे असेच झाले' म्हणणे मी टाळतो. कॅमेरामध्ये कॅपचर झाले तर मग तर्क लढवण्याची गरजच पडणार नाही.

म्हणूनच वर म्हणालो
दुसरा कुठलाही माणूस घरामध्ये नसतांना झोपलेल्या माणसाला सफोकेट करत गुदमरून मारण्याचा प्रयत्न करू शकेल अशी भूत Proud आणि अजगर सोडली तर तिसरी शक्यता माझ्या तरी डोक्यात येत नाही. कुणाच्या डोक्यात येत असल्यास नक्की लिहा.

आता आपलं उगाच वेगळा विचार करायचा म्हणून:
त्या किचनच्या भोकातून एक पाईप सोडला आणि तो भल्यामोठ्या कार्बन मोनॉक्साईडच्या सिलेंडरला लावला. ६०१ मध्ये फर्निशिंगचं काम चालूच होतं, सो वेल्डिंग इ. साठी सिलेंडर आणले होते. त्यातूनच हा एक सिलेंडर आणला गेला.
६०२ मध्ये वेगाने कार्बन मोनॉक्साईडच्या भरू लागला, घरातली असलेली हवा पंप करायला त्याच भोकातून आणखी एक पाईप जोडला.
मिस्त्रीना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने तडफड होऊ लागली. बेडरूमच्या दारातून बाहेर मेन डोर पर्यंत बॉक्सेस पडलेले आणि तिकडे गेलं तर आणखी किती हवा विरळ होईल आणि आपण किती वेळ राहू याची शंका वाटल्याने त्यांनी काच फोडून उडी घेण्याचा निर्णय घेतला. निवडुंगात पडू ही अपेक्षा. पण किंचित उडी चुकली.
काच फुटल्याने पोलीस आत गेल्यावर हवा नेहेमी सारखीच होती.
काच फुटली नसती, तर धिप्पाड गाय हवा परत सक करून घेणार होता/ नॉर्मल हवा सोडणार होता.

-बेडरूमला लागून असलेल्या टेरेसचा दरवाजा आतून (बेडरूममधून) बंद होता.

बेडरूमला अ‍ॅटॅच्ड टेरेस आहे Happy , तू म्हणतोस त्या केस मध्ये मिस्त्री टेरेसमध्ये जाऊन दरवाजा लावून घेवू शकतात. अजगराच्या केस मध्ये हातंच अवेलेबल नसल्याने टेरेस चा दरवाजा ऊघडणे शक्यं होणार नाही आणि शक्य झाले तरी टेरेसचा दरवाजा ऊघडला म्हणून अजगरबुवा सोडणार नाहीत. पण सही विचार होता, आवडलाच.

पण CO पॉईझनिंगमध्ये मला वाटतं माणूस बहूतेक झोपेतंच मरेल, त्याला आपण मरतो आहेत हे सुद्धां कळणार नाही, सफोकेट वगैरेही होणार नाही . चेक करावे लागेल

येस. टेरेसचं काहीतरी आठवत होतं पण परत स्क्रोल करून बघितलं नाही.
आणि हल्ली फायर आणि CO कॉम्बो इतकी स्वस्त मिळत असताना हाय एंड घरात फायर कोड आणि CO डिटेक्टर नाही हे ही केवळ अशक्य, अर्थात दुसरा कलरलेस, ओडरलेस गॅस आणि ऑक्सिजन डीप्राईव्हड असं काही शक्य असेल तर ते म्हणायचं होतं.

हो अलार्म ही असणारंच अशा हाय एंड घरात.
ऑल्क्सिजन काढून घेवून दुसरा एखादा अनडिटेक्टेबल ब्रीदींग करता येणार नाही असा गॅस पंप केला तर शक्य आहे. सफोकेट होत असतांना ब्रेनला ऑक्सिजन कमी झाला की हॅल्युसिनेशन्स ही चालू होणार मग बेडरूममध्ये झालेले स्ट्रगल 'फर्स्ट ही लॉस्ट हिज माईंड अँड देन जंप्ड टू हिज डेथ' असं म्हणता येवू शकेल.

तिन्ही गोष्टी वाचल्या .भारी मज्जा आली तर्क वाचायला. वातावरण निर्मिती , प्लॉट सगळंच मस्त आहे. अब्बास मस्तान च्या सिनुमाची आठवण झाली. :P। हाब यांना मायबोलीचे अब्बास मस्तान म्हंटल पाहिजे आता Light 1

Pages