'अ‍ॅक्वा सेरेनिटी' केस

Submitted by हायझेनबर्ग on 8 June, 2017 - 20:43

टुरिस्ट लोकांनी कायमच ओसंडून वाहणार्‍या वर्दळीच्या गोव्यापासून पाऊण तासभर तरी लांब अरबी समुद्राच्या किनार्‍याला लागून 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' दिमाखात ऊभी होती.. बिल्डिंगपासून केवळ ३० मीटर वर असलेल्या बीचवर समुद्राची गाज आणि समुद्रीपक्षांच्या आवाजाशिवाय ईतर मानवनिर्मित आवाज फार क्वचितंच ऐकायला मिळत. बिल्डिंगमधल्या बारा सूपर लक्झ्युरियस आणि अतिप्रशस्तं अपार्टमेंट मध्ये राहणारे अतिश्रीमंत रिटायरी कपल्स सोडून चार पाच मैलांच्या परिसरात दुसरा मानवी निवारा नव्हता. हा पूर्ण ८० एकरचा बीच एरिया 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' नावाच्या मोठ्या कन्स्ट्रक्शन ग्रूपने विकत घेतल्याने भविष्यातही तिथे 'गॅलॅक्सी बीच सिटी' अंतर्गत 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' सारख्याच अजून सूपर लक्झ्युरियस बिल्डिंग बांधण्याचा ग्रूपचा मानस होता. त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्ट 'गॅलॅक्सी बीच सिटी- अ‍ॅक्वा सेरेनिटी' ला अपेक्षापेक्षा खूप जबरदस्तं प्रतिसाद मिळाला होता आणि पुढच्या बिल्डिंगची बुकिंग कधी सुरू होणार ह्याची देश विदेशातून प्रॉस्पेक्टिव क्लायंट्सकडून सातत्याने विचारणा होत होती.

तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी ह्या प्रोजेक्टचे पहिले प्रपोजल/प्रेझेंटेशन 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' च्या टॉप एक्झेक्युटिव्ज समोर झाले तेव्हा कंपनीचा भविष्यकाळ ह्या प्रोजेक्टमुळे किती ऊज्ज्वल असू शकतो हे ऊमगायला ग्रूप सीईओ 'राजपत गांधींना' ११ वा मिनिट देखील लागला नाही. प्रेझेंटेशन देणार्‍या ज्या व्यक्तीने आपल्या परिपूर्ण ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर पहिल्या दहा मिनिटांतच सगळ्या एक्झेक्युटिव्जना खिशात घातले होते ती असामी होती 'नरीन मिस्त्री'. आय आय एम मधली पदवी, देश विदेशातल्या कंपनीतल्या ऊच्चपदावरच्या अधिकार्‍यांबरोबर कामाचा अनुभव आणि प्रचंड मोठे प्रोफेशनल सर्कल ह्यामुळे नरीन मिस्त्रींचे नाव गॅलॅक्सी ग्रूप ला अपरिचित निश्चितंच नव्हते. मिस्त्रींनी आजवर नवीन अनएक्स्प्लोर्ड पण प्रॉमिसिंग ठिकाणी लँड अ‍ॅक्विझिशन पासून कंपन्यांचे युनिट्स सेट करण्यापर्यंतच्या कामांसाठे अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी कन्सल्टिंग केले होते, पण कधीच कुठल्या कंपनीची एम्प्लॉयमेंट मात्रं घेतली नव्हती. तसे करणे त्यांना कधीच रूचले नाही आणि जमले तर आजिबातंच नसते. 'रिअल ईस्टेट ग्रूप' ह्या 'जमाती'शी मिस्त्रींचा संबंध पहिल्यांदाच आला होता आणि हे कदाचित त्यांचे दुर्दैवच असावे.

आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांच्या कामाला प्रचंड डिमांड होती आणि त्यांचा ऊत्साहही २५ वर्षाच्या तरूणाला लाजवेल असा होता. एक My way or Highway असा प्रचंड हेकेखोर स्वभाव सोडला तर ५ फुट १० ईंच आणि ७५ किलो वजनाची त्यांची पर्सनॅलिटी अतिशय इंप्रेसिव आणि ईन्फ्ल्युएन्सिंग होती. मिस्त्री लाईफ लाँग रनर होते रोज सकाळी पूर्ण बीचला ते या वयातही ६० मिनिटांची फेरी मारत आणि वीकेंडलाही बर्‍याचदा अनेक ठिकाणी मॅरॅथॉन ही पळत. त्यांच्या कायम धाड्सी स्वभावाने त्यांना नेचर अ‍ॅडवेंचररही बनवले नसते तर नवलच. अफ्रिका, अ‍ॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातली कैक जंगलात त्यांनी एकट्याने भटकंती केली होती . आपल्या अनुभवाबद्दल 'नेचर्स अ‍ॅडवेंचर्स' मासिकांत त्यांचे एक दोन लेख देखील प्रकाशित झाले होते. हौशी लोकांनाही ते अश्या मोहिमांत जीव सुखरूप कसा ठेवावा ह्याचे मार्दर्शन त्यांच्या ब्लॉग द्वारे करीत.

परंतू मागच्या सहा महिन्यांपासून गॅलॅक्सी ग्रूप खासकरून सीईओ राजपत गांधी व सीएफओ रतन पारीख आणि नरीन मिस्त्रींमध्ये शीतयुद्ध चालू होते. झाले असे होते की मिस्त्रींनी 'गॅलॅक्सी बीच सिटी' प्रोजेक्ट च्या आधी कन्सल्टिंग सोडून त्यांच्या 'आर्ट्स डीलर' बनण्याच्या लाँग टाईम पॅशनला नवा पेशा म्हणून स्वीकारले होते. 'गॅलॅक्सी बीच सिटी'ला भारताची आर्ट आणि अँटिक कॅपिटल बनवण्याचे त्यांचे भव्यदिव्य स्वप्नं होते. त्यांच्या ३५ वर्षांच्या करियर मध्ये त्यांनी अतिशय दुर्मिळ पेंटिंग्स, पुरातन कला वस्तू पासून तर अँटिक फर्निचर, नामशेष होत चाललेले पण कायदेशीर मार्गाने टॅक्सिडर्म केलेले प्राणी, जुनी शस्त्रे असे काय अन काय जमा केले होते. आपली आयुष्याची कमाई कॅपिटल मार्केट मध्ये ईनवेस्ट न करता त्यांनी अश्या आर्ट्स कलेक्शन मध्येच गुंतवली होती. आज जर त्यांनी त्यांचे कलेकशन लिक्विडेट केले असते तर गेल्या ३५ वर्षात कुठल्याही कॅपिटल मार्केटने दिला असता त्याच्या ३ ते ४ पट परतावा त्यांच्या कलेक्शन ने त्यांना मिळवून दिला असता. आपल्या कलेक्शनसाठी लागणार्‍या श्रीमंत आणि दर्दी क्लायंट्सना टॅप करण्यासाठी देशोदेशी न हिंडता 'गॅलॅक्सी बीच सिटी' च्या रुपाने असा क्लायंट बेसच तयार करण्याचा मास्टर प्लान त्यांनी गॅलॅक्सी ग्रूपला हाताशी धरून अंमलात आणण्याचा घाट घातला होता. शेवटी मिस्त्री हे एक प्रचंड हुषार आणि महत्वाकांक्षी रसायन होते आणि अश्या मोठ्या गोष्टी घडवून आणाण्याचा पेशंस आणि अनुभव त्यांनी पूर्ण ऊमेद खर्चून कमावला होताच.

तर गांधी-पारीख आणि मिस्त्री मधल्या शीतयुद्धाचे कारण होते 'गॅलॅक्सी बीच सिटी' मधली 'अ‍ॅक्वा सेरेनिटीला' लागून असलेली ३ एकर जागा. ह्या जागेवर 'गॅलॅक्सी ग्रूप' मिस्त्रींची कन्सल्टिंग फी म्हणून तीन वर्षापूर्वी झालेल्या करारानुसार मिस्त्रींना एक तीन मजली आर्ट गॅलरी बांधून देण्यास बांधील होता आणि त्यासोबतच सहा मजल्यांच्या 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' मधल्या टॉप फ्लोअरवरच्या दोन पैकी एक सी फेसिंग फ्लॅट '६०२' देण्यासाठी सुद्धा. परंतू 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' च्या जबरदस्तं यशानंतर आणि पुढच्या स्कीमसाठी अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्तं किंमत मोजण्यास तयार असणार्‍या क्लायंटस मुळे गांधी-पारीखना आर्ट गॅलरीची मोक्याची जागा मिस्त्रींना देण्यास प्रचंड जिवावर आले होते. ते आता मिस्त्रींना सेरेनिटीपासून लांब गॅलॅक्सी बीच सिटीची एका कोपर्‍यातली जागा घेण्यास मनधरणी करत होते. गांधी-पारीखांची ऊफाळलेली लालसा आणि मिस्त्रींचा प्रचंड हेकेखोर स्वभाव ह्यामुळे ही मनधरणी, मनभेद आणि अविश्वासापर्यंत पोचायला महिनाभरही लागला नाही. ठरलेल्या जागेवर आर्ट गॅलरीचे काम सुरू करण्यास मुद्दाम केला जाणारा ऊशीर आणि जागेबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा हेका त्यामुळे मिस्त्रींनी गांधींना कोर्टात खेचण्याची आणि पूर्ण बीच सिटीवरच स्टे आणण्याची धमकी दिली तेव्हा गांधी, पारीखांचे धाबे जोरदार दणाणले. आपली मोक्याची जागा वाचवण्याचा शेवटचा 'दाम-भेद' ऊपाय म्हणून गांधी-पारीखांनी मिस्त्रीं च्या आर्ट्स कलेक्शनचे कस्टोडियन आणि मॅनेजर कुणाल भरूचांना मिस्त्रींचे मन वळवण्यासाठी चार कोटी रुपयांची लाच क्लॉबॅक क्लॉजसहित दिली (क्लॉबॅक म्हणजे जर भरूचा मिस्त्रींचे मन वळवण्यात अपयशी ठरले तर चार कोटी रुपये त्यांना गांधींना परत करावे लागतील). हा ही ऊपाय न चालल्यास मिस्त्रींवर 'दंड' ऊपाय करून त्यांना 'कायमचे' हटवण्याचीही गांधी-पारीखांची तयारी होतीच.

पण मिस्त्रींना कुठूनतरी भरूचांनी चार कोटी रुपये लाच स्वीकारल्याची बातमी कळालीच. त्यांनी लगोलग भरूच्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या ईतर क्लायंट समोरच विश्वासघात केल्याचा आरोप ठेवत त्यांना मानहानीकारक बोल लावले. भरूच्यांच्या जागी लवकरच दुसरा कस्टोडियन नेमणार अशी धमकीही दिली. भरूचांबरोबर तीन महिन्यांत एक्स्पायर होणारे काँट्रॅक्ट रिन्यू न करता मिस्त्रींनी त्यांच्या कलेक्शनमधले काही छोटे मोठे आर्टिफॅक्ट्स आपल्या अ‍ॅक्वा सेरेनिटी मधल्या प्रशस्तं फ्लॅट मध्ये ट्र्रान्सपोर्ट करण्यास सुरूवात केली. (असे करण्यामागे आर्ट गॅलरीला लागत असलेल्या ऊशीरा मुळे क्लायंट्सना घरीच बोलावून आपले कलेक्शन दाखवण्याचाही त्यांचा अंतर्गत हेतू होता) भरूचा मिस्त्रींच्या कलेक्शनच्या सेफ किपिंगसाठी कायदेशीर रित्या बांधील होते त्यामुळे मिस्त्रींना अजून तीन महिने काही चिंता नव्हती पण भरूचांवर अजून विश्वास ठेवण्याचीही मिस्त्रींची ईच्छा नव्हती.
मिस्त्री १५ वर्षांची मैत्री आणि संबंध अश्या अपमानकारक रित्या तोडून गेल्याचा भरूचांना प्रचंड राग आला. मिस्त्रींच्या आरोपानंतर समोर बसलेले क्लायंट्स ऊठून गेल्याने मिस्त्रींमुळे आपले आता कमीत कमी ८-१२ कोटींचे नुकसान होणार समजल्याने त्यांनी मनोमन मिस्त्रींचा बदला घेण्याचा चंगच बांधला. गांधी-पारीख बरोबर मिस्त्रींच्या जीवावर ऊठलेल्या लोकांच्या यादीमध्ये भरूचांचेही नाव अ‍ॅड झाले.

पण ही यादी ईथेच संपत नाही.

डिमांड्मध्ये असलेले कंन्सल्टींगचे करियर सोडून तीन वर्षांपूर्वी गोव्यातच सेटल होण्याचे मिस्त्रींनी ठरवले त्याला कारण होते त्यांची एकुलती एक मुलगी 'पेरिजाद' आणि तिचा अडीच वर्षांचा मुलगा 'दानिश'. जगातल्या सर्व सुखसोयींनी युक्त कॉलेज/हॉस्टेल्स मध्ये का वाढली असेना पण लहानपणापासूनच वडिलांपासून लांब आणि आईविना वाढलेल्या पेरिजाद ने जेव्हा 'कैझाद दोर्दीशी' लग्नं करायचे ठरवले तेव्हा देशाबाहेर असलेल्या मिस्त्रींना तिने केवळ औपचारिकता म्हणूनच दोन दिवस आधी लग्नाची तारीख कळवली. आपल्या बिझी आयुष्याने आपल्या मुलीला आपल्यापासून किती लांब लोटले ह्याची जाणीव मिस्त्रींना झाली आणि आयुष्यात कधीही तडकाफडकी निर्णय न घेणारे मिस्त्री हातातले काम सोडून लगोलग गोव्यात दाखल झाले. कौटुंबिक सुखासाठी आसुसलेली मलूल चेहर्‍याची पेरिजाद पाहून त्यांच्या जीवाची कोण घालमेल झाली. त्यांनी पेरिजादकडे तिच्या नातं जपण्यात अपयशी ठरलेल्या बापाला माफ करण्यासाठी हात पसरले. पेरिजादनेही मोठ्या मनाने त्यांना माफ केले आणि मिस्त्रींनी आनंदाने गोव्याला आपले घर बनवले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कैझादच्या अल्कोहोलिक, बाहेरख्याली आणि वायोलंट वागण्याला कंटाळून आयुष्यात कायम प्रेमाची वानवाच नशिबी आलेल्या पेरिजाद ने दानिश च्या जन्मानंतर दीड वर्षांतच मिस्त्रींना पत्रं पाठवून दानिशची काळजी घेण्याची श्यपथ घालून आपली जीवनयात्रा संपवली. खचलेल्या मिस्त्रींनी पेरिजाद बाबत झालेल्या चुकीचं प्रायश्चित्तं म्हणून दानिशची कस्टडी मिळवून कैझादला पेरीजादच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवून कायदेशीर शिक्षा करण्याचं ठरवलं. हॉटेलिंगच्या मोठा बिझनेस असलेली कैझादची फॅमिलीही पैसा आणि काँटॅक्ट्सच्या बाबतीत कमी नसल्याने दानिशची लीगल कस्टडी मिळावण्यात मिस्त्रींना खूपच कष्टाची कायदेशीर लढाई करावी लागली. पण आयुष्यात आजवर कधीच हार न मानलेले मिस्त्री ही लढाईदेखील मागच्याच आठवड्यात जिंकले. कैझादला शिक्षा झाली नाही पण आठवड्याभरात दानिशचा ताबा मिस्त्रींकडे देण्याचे अपील कोर्टाने मंजूर केले. पुढच्या आठवड्यात दानिशला घरी घेवून येणार ह्या आनंदात मिस्त्रींनी आजिबात वेळ न दवडता अ‍ॅक्वा सेरेनिटी मधली एक बेडरूम दानिशसाठी तयार करण्याचे काँट्रॅक्ट पेरिजादची जवळची मैत्रिण 'अलमिरा ईराणी' च्या फर्निचर आणि डेकॉरला दिले.

आणि तशातच ३१ डिसेंबरची ती रात्रं ऊजाडली. अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या बीचवर ३१ डिसेंबरचे फायरवर्क सेलिब्रेशन करून रात्री १ च्या ठोक्याला परतणार्‍या सेरेनिटीच्या रिटायरी कपल्सना कॅक्टस बेडमध्ये मिस्त्रींचा मृतदेह दिसला आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकून फ्रंट एंट्र्रन्सवरचे दोन्ही गार्ड्स धावतपळत बॅक एंट्र्न्सला आले.

पोलिस फायलीतल्या काही नोंदी.

पोस्टमॉर्टेम / मेडिकल रिपोर्ट
-मृत्यू ३१ डिसेंबर रात्री ११:३० ते १२:०० च्या दरम्यान झाला असावा. विक्टिमच्या हातातले घड्याळ रात्री ११:४० ला बंद पडले.
-ऊंचावरून फोर्स ने पडतांना नेमके डोके कॅक्टस बेडच्या (निवडुंगाचे ताटवे) कॉक्रीट बॉर्डरवर आपटून स्कल ब्रेक झाले.
-अंगाखाली कॅक्टस बेड असल्याने शरीरात शेकडो ठिकाणी कॅक्टसचे काटे घुसले.
-डोके आपटले नसते तर डेन्स कॅक्टस बेड मुळे कदाचित प्राण वाचू शकले असते.
-पडण्यापूर्वी विक्टिमला सफोकेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,
-कॅक्टसच्या काट्यांबरोबरच काचांमुळे झालेल्या जखमा आणि काचांचे बारीक तुकडेही शरीरात व चेहर्‍यावर घुसल्याचे मिळाले
-पोटात थोडेफार पचलेले अन्न, वाईन आणि काही माईल्ड स्लीप मेडिकेशन मिळाले. विक्टिम हे मेडिकेशन बराच काळापासून घेत असावा.
-जखमा आणि फ्रॅक्चर्स ऊंचावरून पडतांनाशी कन्सिस्टंट आहे.
- सापडलेल्या बाटलीतील २९ गोळ्या जेन्यूईन स्लीप मेडिकेशन आहे.
-कॉज ऑफ डेथ - आत्महत्या किंवा खून नक्की अनुमान लावणे कठीण आहे.

टाईमलाईन
----------------
३१ डिसेंबर
-दुपारी ४:१० - नरीन मिस्त्री एलेवेटरने फ्लॅट मध्ये दाखल
-दुपारी ४:२१ - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी पहिल्या बॉक्सची डिलीवरी
-दुपारी ४:५७ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी शेवटच्या बॉक्सची डिलीवरी
-संध्या ५:२० - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची पहिली डिलिवरी
-संध्या ६:५१ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी
-रात्री ९:४० - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन' पार्टीत जाण्यासाठी एलेवेटरने एक्झिट
-रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
-रात्री १०:३४ - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी'तून एलेवेटरने फ्लॅट मध्ये एंट्री
-रात्री १०:४० - तीच हुडेड व्यक्ती फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि जिन्यावाटे अतिशय घाईघाईने निघून गेली. पाठीवर एक बॅग.
-रात्री ११:५५ एक ऊंच, अंगापिंडाने मजबूत आणि रुबाबदार व्यक्ती (ऊंची पार्टी सुट, हातमोजे, चेहरा आजिबात दिसणार नाही अशी टोपी) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.

१ जानेवारी (३१ डिसेंबरचीच रात्रं पुढे चालू पण तारीख बदलली)
-रात्री १२:०४ तीच ऊंची पार्टी सुट घातलेली व्यक्ती ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि शांतपणे जिन्यावाटे निघून गेली.
-रात्री १:०४ सेरेनिटीचे दोन सिक्यूरिटी गार्डस एलेवेटरने फ्लॅट नंबर ६०१ च्या दरवाज्यासमोर दाखल
-रात्री १:१० सेरेनिटीमधील बर्‍याच राहिवाशांची सहाव्या मजल्यावर गर्दी
-रात्री १:१८ गार्डसने मास्टर की ने पोलिसांसमोर दरवाजा ऊघडून पोलिसांचा फ्लॅट मध्ये प्रवेश.
-रात्री १:२५ आत येवू पाहणार्‍या गर्दीला पोलिसांनी ६ व्या मजल्यावरून खाली हुसकावले.

प्रासंगिक माहिती
क्राईम सीन
-मिस्त्रींच्या ६०२ नंबरच्या सी-फेसिंग फ्लॅटची सी-साईड बेडरूमची भिंत जमिनी पासून ८ फूट ऊंच आण १५ फूट रूंद अश्या स्टँडर्ड जाडीच्या काचेची बनलेली आहे.
-मिस्त्रींनी काचा बंद असतांनाच खाली ऊडी मारली वा त्यांना बाहेर फेकले गेले.
-बेड अस्ताव्यस्त अवस्थेत. बेडवर स्ट्रगल झाल्याचे दिसून येते.
-बेडरूमला लागून असलेल्या टेरेसचा दरवाजा आतून (बेडरूममधून) बंद होता.
-बेडच्या डोक्याकडच्या भिंतीत (जी फ्लॅट नं ६०१ ला कॉमन वॉल आहे) एक आरपार बुलेट होल मिळाले , आणि तीन २८ mm कॅलिबरच्या गोळ्या
जिथे साधारणतः झोपले असतांना मिस्त्रींची छाती असली असती तिथे मॅट्रेस मध्ये अडकलेल्या मिळाल्या
-फ्लॅट नं ६०१ मध्ये बुलेट होल असलेल्या कॉमन वॉल वर भिंतीवर गन पावडर रेसेड्यू
-साईड टेबलवर कमी पावरचे (माईल्ड) स्लीप मेडिकेशन सापडले. ३० पैकी २९ गोळ्या बाटलीमध्ये आहेत.
- चष्मा, पुस्तंक, वाईन चा रिकामा ग्लास आणि अजूनही चालू असलेला नाईट लँप खाली जमिनीवर पडलेले होते
-किचन सिंक खालच्या कॅबिनेटला भिंतितून आरपार केलेले ३५० मिमि चे होल सापडले जे बाजूच्या रिकाम्या फ्लॅट नं ६०१ च्या किचन सिंक खालच्या कॅबिनेट मध्ये ऊघडते. भिंतीचा कट केलेला पीस बाजूच्या फ्लॅट मध्ये सापडला. एखादा अ‍ॅथलेटिक मनुष्य ह्या होल मधून जाऊ शकतो.

फ्लॅट नं ६०१
- सहाव्या मजल्यावर जिन्याचा दरवाजा बरोबर फ्लॅट नं ६०१ च्या दरवाज्यासमोरच आहे.
- महिन्यापूर्वीच ग्राहकाने खरेदी रद्द केल्याने फ्लॅट नं ६०१ अजूनही विकला नव्हता. पझेशन देण्याची डेड लाईन नसल्याने त्याचे ईंटेरियर डेकोरशन व रंगरंगोटीचे काम अजूनही अतिशय संथगतीने चालू होते. फ्लॅटमध्ये ठिकठिकाणी सामान विखुरलेले होते.
- ह्या फ्लॅट साठी क्लायंट मिळवण्याचे काँट्रॅक्ट मिळालेली रिअल ईस्टेट एजंसी 'फॉन्सेका प्रॉपर्टीज' वीकेंडला फ्लॅट चे 'ओपन हाऊस' शोईंग्ज करते. ह्या शोईंग्ज मध्ये अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डींग चा टूर ही समाविष्टं असतो. अपॉईंटमेंट घेवून फ्लॅट बघायला येणार्‍यांच्या आयडेंटिटीच्या प्रतीची कॉपी करू ठेवली जात असली तरी क्लायंटला नाराज होऊ नये ह्या हेतूने बर्‍याच वेळा आयडी प्रुफ आणायला विसरलेल्यां क्लायंट्सनाही फ्लॅट आणि बिल्डिंग दाखवल्याचे फॉन्सेका च्या सेल्स एजंट्सनी मान्य केले आहे.

अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डिंग
-फ्रंट एंट्र्न्स ने बिल्डिंग मध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये कैद होते आणि २४ तास हजर असलेले सिक्युरिटी गार्डस ती व्यक्ती राहिवासी नसल्यास, राहिवाश्यांनी खाली येवून त्यांना एस्कॉर्ट करेपर्यंत लॉबीमध्येच बसवून ठेवतात.
-एलिवेटर्स, फ्लॅटचा एंट्रन्स आणि कॉरिडोर कॅमेराने ईक्विप्ड आहेत आणि कॅमेरात कॅप्चर न होता फ्लॅट मध्ये जाणे अशक्य आहे.
-बिल्डिंगला एक जिना असून तो प्रत्येक मजल्यावर ऊघडतो, पण जिन्यामध्ये कुठलाही कॅमेरा नाही

मिस्त्रींचे घर
- बिल्डिंगच्या आऊटर भिंती काँक्रीटच्या पण आतल्या वुडन आहेत. फ्लोअर ही वुडन आहे.
-मिस्त्रींचे आर्ट आणि अँटिक गोष्टींसाठीचे प्रेम घरात ठिकठिकाणी दिसत होते. एखाद्या अतिशय कलात्मकतेने सजवलेल्या आर्ट म्युझियम पेक्षा फार वेगळं नसावं त्यांचं घर. भिंतीवर ठिकठिकाणी मोठमोठ्या तस्वीरी, नाना प्रकारचे फर्निचर/अलमार्‍या, देशविदेशातल्या भिन्न रंगारुपाच्या आणि कालखंडातल्या वाटाव्यात अश्या कलाकुसरीच्या वस्तू, राजघराण्यातली वाटावी अशी झुंबरं, फुलदाण्या, शोभेची श्स्त्रास्त्रं असे बरेच काही.
-पूर्ण घरभर अँटिक आणि आर्ट्स सामानाचे छोटे मोठे अकूण १२ लाकडी बॉक्सेस ठेवलेले आहेत. सर्वात मोठा बॉक्स ६ x ८ x २ आणि सर्वात लहान बॉक्स बॉक्स ३ x ३ x २ फूट डायमेन्शन्सचा आहे.
-अँटिक आणि आर्ट्स पीसेसचे सगळे १२ बॉक्सेस ऊघडलेले आहेत. त्यातल्या लहान ३ x ३ x २ च्या बॉक्समधली मधली वस्तू गायब आहे.
- बॉक्स मधल्या वस्तू वगळता घरातल्या ईतर वस्तू केवळ शोभेच्या असाव्यात आणि त्यांना काही अँटिक वॅल्यू नसावी असे प्रथमदर्शनी वाटते.
-एका बेडरूममध्ये लहान मुलाच्या फर्निचर आणि डेकॉरच्या सामानाचे मोठे बॉक्सेस. बॉक्सेस ऊघडले असता आत काही आक्षेपार्ह सापडले नाही.
-लहान मुलांच्या 'कार्स' सिनेमावर आधारीत बेडरूम सेट अर्धवट लावून सोडून देण्यात आला आहे तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ५ x ४ x ४ ची कार फ्रेम मागे ठेवलेल्या बेडरूम सेटच्या रिकाम्या मोठ्या बॉक्स मध्ये मिळाली नाही
-'ती' कार फ्रेम आमच्या शोरूम मध्ये फ्रंटला लावलेली असल्याने गोडाऊनमधून डिलिवरी नेणारे बॉईज ती नेण्यास विसरून गेले असा जबाब अलमीरा ईराणींनी दिला. डिलिवरी बॉईजनी ती फ्रेम दुसर्‍यादिवशी आणून लावण्याची हमी मिस्त्रींना दिली होती. डिलिवरी बॉईजनेही असेच झाले असल्याचे सांगितले.
-मिस्त्री आणि सेरेनिटी मधल्या ईतर कुठल्याही राहिवाश्याचा कोणत्याही प्रकारचा कधी संबंध आल्याचे पुरावे मिळाले नाहीत. सर्व जण त्यांना एक दर्दी आर्ट डीलर म्हणूनच चेहेर्‍याने ओळखत होता.

३१ डिसेंबरची बीच पार्टी
-३१ डिसेंबरला गॅलॅक्सी ग्रूप-सेरेनिटीने मोठी बीच पार्टी आयोजित केली असल्याने ६०१ चे क्लायंट शोईंग करण्यास फॉन्सेकाला मनाई करण्यात आली होती.
-बिल्डिंगमधील राहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांना बिल्डिंगला वळसा घालून बीच पार्टीला जावे लागू नये म्हणून त्यांच्या सोयीसाठी बिल्डिंगच्या बॅक साईडला (जी बीच सईड आहे) ऊघडणारे जिन्याचे दार (जे ईतरवेळी कायम बंद असते आणि ऊघडल्यास अलार्म वाजतो) रात्री ९ वाजल्यापासूनच अलार्म डिझेबल करून ऊघडेच ठेवण्यात आले होते.
-३१ डिसेंबर रात्री ९ पूर्वी बिल्डिंगचे बॅक डोर महिन्याभरात आजिबात ऊघडले गेले नव्हते.
-बॅक डोर मधून आत येणारा वा जाणारा कॅमेरामध्ये कैद होतो पण ३१ डिसेंबरच्या रात्री कैक सेरेनिटीचे राहिवासी आणि त्यांचे विजिटर्स अनेक वेळा घोळक्याने आत व बाहेर करत असल्याने त्यातून नेमकी संशयित व्यक्ती शोधणे अशक्य आहे.
-बीच पार्टीला सेरेनिटीच्या सध्याच्या राहिवाशांबरोबरच त्यांच्याकडच्या पाहुण्यांची आणि अनेक प्रॉस्पेक्टिव क्लायंटसची ऊपस्थिती होती.
-गॅलॅक्सी ग्रूपने आयोजित केलेल्या या बीच पार्टीचे ईवेंट मॅनेजमेंट गोव्यातल्या नावाजलेल्या आणि अतिशय महागड्या 'मूनलाईट असोसिएट्सला' देण्यात आले होते.
-मिस्त्रींच्या बीच फेसिंग फ्लॅट मधून पार्टीची जागा, बीचकडून बिल्डिंगकडे येणारी ४० मीटरची पायवाट आणि चालणारी व्यक्ती स्पष्टं दिसते.

खबरींकडून कळालेली माहिती
-अलमीरा ईराणीच्या 'फर्निचर & डेकॉर स्टोर' मध्ये आणि खाजगी आयुष्यातही 'कैझाद दोर्दी' सिक्रेट स्लीपींग पार्टनर आहे अशी वदंता आहे.
-मुलाची कस्टडी गेल्याने कैझाद दोर्दी मिस्त्रींवर फार खवळलेला आहे. त्याच्या फॅमिलीचे त्यांच्या हॉटेल बिझनेसच्या माध्यमातून गुन्हेगारी वर्तुळात काँटॅक्ट्स असण्याची खूप शक्यता आहे.

**************************************************

कसा झाला असेल नरीन मिस्त्रींचा करूण अंत? काही घातपात असण्याचा संभव आहे की त्यांनी अचानक अशी खिडकीतून ऊडी मारून आत्महत्या केली? मॅट्रेस मध्ये गोळ्या कुठून आल्या? मिस्त्रींची आत्महत्या नसून खून असेल तर कोणी केला आणि कसा?

घटना सोडून वरती मिस्त्रींबद्दल मी जी लांबड लावली आहे ती फक्तं मिस्त्री आणि त्यांचे 'हितचिंतक' Wink एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीच. एकदा एकेकाचे कॅरिकेचर समजले की ती माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स
वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास) आणि त्यांची पद्धत समजू शकते. मान्य आहे माहिती खूप दिली आहे पण ऊलट त्याचा ऊपयोग अ‍ॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.

*बीच पार्टी म्हणजे केवळ बीचवर झालेले ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन अपेक्षित आहे. बिकिनी,रेव वगैरे तसले काही नाही. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कॅक्टस चा अजून एक उपयोग. To hide injection prick.
खून केला हुडेड व्यक्तीनेच. तिचा इरादा फक्त चोरीचा होता. पण मिस्त्री लौकर येतील असे त्या व्यक्तीला वाटले नसावे. पण ते आले. मे बी ती व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याने तिने त्यांना झोपेचे इंजेक्शन टोचले असावे. पण खूप काळापासून स्लीप मेडिकेशन वर असणाऱ्यांना नंतर सामान्य माणसाला झोपवू शकेल त्यापेक्षा जास्त डोस लागतो. (आठवा, एरक्युल प्वारोची 'कर्टन' ही शेवटची गोष्ट!) त्यामुळे ते शुद्धीत राहिले व झटापट झाली व त्यांचा खून झाला.

हा डीटेल मिसला होता सिंबा...
गोळ्या मारून झाल्यावर खुनी चेक करायला ६०२ मधे गेला असावा.

रायगडच्या युक्तिवादाप्रमाणे जर मयतानी स्वतः उडी मारली असेल तर कदाचित बेडच्या पीसचा उपयोग काच फोडायला केला असावा.
उडी मारता मारता खुन्यानी तोच पीस डोक्यात घातला असेल.
नंतर तो ही खाली फेकून, खाली जाऊन कलेक्ट केला असेल.

To hide injection prick
श्र,
हा पॉईंट आला होता डोक्यात. पण जास्तीचा डोस मेडिकल रिपोर्टमधे कळला असता ना...
म्हणून तो बाद केला

बायदवे, ६ फूट बाय ८ फूट बाय २ फूट हे अजस्त्र डायमेंशन आहे. हा बॉक्स घरात आलाच कसा?
८ फुटी सीलिंग आहे, ६ फूट म्हणजे क्वीन साईझ बेड झाला. हा बॉक्स दारातून येणं शक्य वाटत नाही. सो तो दोरीने बाल्कनी मधून ओढून आणला असेल.
सेकंड थॉट दारातून येऊ शकेल असं वाटतंय.

अरे कॅक्टस चा अजून एक उपयोग. To hide injection prick.
खून केला हुडेड व्यक्तीनेच. तिचा इरादा फक्त चोरीचा होता. पण मिस्त्री लौकर येतील असे त्या व्यक्तीला वाटले नसावे. पण ते आले. मे बी ती व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याने तिने त्यांना झोपेचे इंजेक्शन टोचले असावे. पण खूप काळापासून स्लीप मेडिकेशन वर असणाऱ्यांना नंतर सामान्य माणसाला झोपवू शकेल त्यापेक्षा जास्त डोस लागतो. (आठवा, एरक्युल प्वारोची 'कर्टन' ही शेवटची गोष्ट!) त्यामुळे ते शुद्धीत राहिले व झटापट झाली व त्यांचा खून झाला. >> खून ११:३० ते १२:00 च्या मधे झालेला आहे.. हुडेड व्यक्ती १०:४० ला बाहेर पड्लेली आहे.. timeline mismatch?

बायदवे, ६ फूट बाय ८ फूट बाय २ फूट हे अजस्त्र डायमेंशन आहे. हा बॉक्स घरात आलाच कसा?
८ फुटी सीलिंग आहे, ६ फूट म्हणजे क्वीन साईझ बेड झाला. हा बॉक्स दारातून येणं शक्य वाटत नाही. सो तो दोरीने बाल्कनी मधून ओढून आणला असेल. >> ८ फूट खिडकीची काच आहे सिलिंग आपले रेग्यूलर ११ फूटच आहे. निश्चितच येवू शकेल दरवाजातून असा बॉक्स

बरं हे ६०१ मधून आपलेच घर असल्यासारखे कुणीही यावे कधीही जावे हे कसे काय? >> हो ते आलंय डोक्यात. मंडळी सराईतपणे त्या घरात शिरतायत म्हणजे किल्ली आहे त्यांच्याकडे किंवा 'फॉन्सेका प्रॉपर्टीज' मधील कोणीतरी आहेत ते.

ओके.
हाब, लगा कल्पनाचित्रात सगळी काच दाखवतो ना तू Lol

हाब, लगा कल्पनाचित्रात सगळी काच दाखवतो ना तू >> Lol आता मोजून आठ फूट काच असलेलं चित्रं कुठून पैदा करू भाऊ म्हणून म्हंटलं हेच चिपकून टाकू Proud
आपल्या ऑफिसला असते तशी काचेची भिंत होती एवढाच अर्थ .. ८ फूट काय आणि ११ फूट काय.. काही फरक नाही

अवांतर,

फॉन्सेका प्रॉपर्टीजचा ओनर 'नाम है मेरा फॉन्सेका, बेबी हमे तुम नै जानता' गाणं म्हणात असेल का?? Wink

अवांतर,

फॉन्सेका प्रॉपर्टीजचा ओनर 'नाम है मेरा फॉन्सेका, बेबी हमे तुम नै जानता' गाणं म्हणात असेल का?? Wink >>>
Lol

फोन्सका प्रॉपर्टी आणि प्रोमोटर्स दोघांकडे असेल ना किल्ली >>> माझ्यामते असे डिटेल्स ही महत्वाचे आहेत. खून (खूनच असल्यास) कसा झाला हे तर महत्वाचे आहेच पण खुनी कोण हे संगितल्याशिवाय सुटका नाही आपली

खुनाची वेळ इतकी अचूक सांगता येते का? काहीएक रेंज असेल ना मृत्यूवेळेची. जर 11:40 ला ते खाली पडून मेले असते तर त्यांची बॉडी नोटीस व्हायला 1 वाजलाच नसता. कारण त्यावेळेपावेतो 31 रात्रीचे काउंटडाऊन सुरू झालेले नसल्याने त्या वाटेवरून लोकांची ये जा चालू असणारच. उलट 'चला चला लौकर, तिकडे काउंटडाऊन सुरू होईल' असं म्हणत बीचकडे निघालेली जनता जास्त असणार. Proud

खुनाची वेळ इतकी अचूक सांगता येते का? काहीएक रेंज असेल ना मृत्यूवेळेची. जर 11:40 ला ते खाली पडून मेले असते तर त्यांची बॉडी नोटीस व्हायला 1 वाजलाच नसता. कारण त्यावेळेपावेतो 31 रात्रीचे काउंटडाऊन सुरू झालेले नसल्याने त्या वाटेवरून लोकांची ये जा चालू असणारच. उलट 'चला चला लौकर, तिकडे काउंटडाऊन सुरू होईल' असं म्हणत बीचकडे निघालेली जनता जास्त असणार. >> पोस्टमॉर्टेम / मेडिकल रिपोर्ट नुसार मृत्यूवेळेची रेंज 11:30 ते १२:००

अवांतर,
फॉन्सेका प्रॉपर्टीजचा ओनर 'नाम है मेरा फॉन्सेका, बेबी हमे तुम नै जानता' गाणं म्हणात असेल का?? Wink<<<<<<
अँकी, ते नाव वाचल्यापासून माझ्या डोक्यातही तेच गाणं सुरू आहे. Lol

घड्याळात ११:४० वाजले होते, हे स्पेसिफिक डिटेल दिलंय म्हणजे तेव्हा काही तरी झटापट नक्की झालेली आहे. मृत्यू कदाचित नंतर झाला असेल.

रिटायर्ड लोकं आहेत ते श्रद्धा. १० वाजल्या पासून जाऊन बसले असतील सगळे. >>>> अर्रर्रर्र..... तिथे पार्टीमध्ये स्लॉट मशिन्स ही होते लिहायला हवं होतं Lol

बरं, हुडेड गाय आणि धिप्पाड गाय कोणी अनोळखी असणं शक्य नाही. कारण सिक्युरिटीने अडवलं असतं. सो ते रहिवासी, किंवा त्याचे मित्र इ. आहेत ज्यांना रहिवाशांनी एस्कोर्ट करून रिसीव्ह केलंय.
ते कोणी केलंय ते फुटेज वरून कळेल का?

फॉन्सेका प्रॉपर्टीजचा ओनर 'नाम है मेरा फॉन्सेका, बेबी हमे तुम नै जानता' गाणं म्हणात असेल का?? Wink<<<<<<
अँकी, ते नाव वाचल्यापासून माझ्या डोक्यातही तेच गाणं सुरू आहे. Lol >>> Lol खूप दिवस झाले ऐकून हे गाणं... ह्या निमित्ताने ऐकतो आता

हो. मागचे दार डायरेक्ट अ‍ॅक्सेस देईल. बरोबर.

मिस्त्रीनी १२ च्या ठोक्याला खाली उडी घेतली असणार. कारण तिकडे प्रिस्टीन शांतता आहे. १२ ला म्युझिक जरा जोरदार वाजेल आणि पडण्याचा आवाज मास्क होईल.
११.५५ ते १२.४ धिप्पाड व्यक्ती ६०१ मध्ये होती. ती ६०२ मध्ये जाणं शक्य नाही. ६०१ मधून - ६०२ च्या बेडरूमच्या लागून असलेल्या खोलीतून बंदुकीतून गोळ्या मारल्या असतील का?

बरं धिप्पाड माणूस शांत पणे गेला पण एलिव्हेटर ने का नाही गेला?
>> 'रिअल ईस्टेट ग्रूप' ह्या 'जमाती'शी मिस्त्रींचा संबंध पहिल्यांदाच आला होता आणि हे कदाचित त्यांचे दुर्दैवच असावे. >> सो गांधी आणि तो दुसरा याचं मोटीव्ह असणार!

मिस्त्री आणि सेरेनिटी मधल्या ईतर कुठल्याही राहिवाश्याचा कोणत्याही प्रकारचा कधी संबंध आल्याचे पुरावे मिळाले नाहीत. सर्व जण त्यांना एक दर्दी आर्ट डीलर म्हणूनच चेहेर्‍याने ओळखत होता.>> यावरुन असं वाटतं की मिस्त्री पार्टीच्या वेळात पार्टीला न जाता दुसर्‍याच जागी गेले आणि पार्टी संपण्याच्या वेळी परत आले.

सगळ्यात जास्त वाईट वाटतेय ते दानिशचे!! ते अजाण बालक निराधार झाले. Sad >>> बनवलेली गोष्टं आहे ही विनिता खरी केस नाहीये.

कोणीतरी आत्तापर्यंतचे सुसंगत प्रतिसाद एका प्रतिसादात एकत्र करून ठेवणार का ज्याने सगळ्यांच्याच पुढच्या प्रयत्नांना (To come out of weeds) दिशा मिळेल.

त्या धिप्पाड माणसाबद्दल...

जर तो लक्षात राहील इतका धिप्पाड असेल तर नंतर इतर ठिकाणी कॅमेऱ्यात कॅपचर केलेल्या गर्दीत ओळखू आला असता. कारण अगदी जाणवण्याइतके धिप्पाड असे किती लोक सेरेनिटी मध्ये आले गेले असतील? म्हणजेच तो जो लुक आहे तो फेक आहे.

माझ्या मते हुडी गाय आणि धिप्पाड एकच असावा. भरूचा! त्याने आधी हवी असलेली अँटिक आर्टिफॅक्ट चोरून नेली. नंतर पुन्हा वेष पालटून 601 मध्ये गेला. आता त्याला भोक आयते तयार होते. त्याला मिस्त्री फ्लॅटमध्ये आहेत हे पक्के ठाऊक होते, त्याला त्यांच्या बेडची लोकेशन ठाऊक होती (पण तरीही त्या बुलेट्स रेड हेरिंग आहेत कारण बेडवर त्यावेळी मिस्त्री झोपलेत की नाही, असल्यास कसे झोपलेत हे कळणे पलीकडून अशक्य आहे) त्याने फ्लॅटमध्ये जाऊन मिस्त्रीवर डायरेक्ट हल्ला केला. कारण दुसऱ्या दिवशी ती वस्तू गेल्याचे मिस्त्रीना कळणारच. नंतर साहजिकच ते भरुचावर संशय घेणार. याउलट एकदा वस्तू ताब्यात आल्यावर मिस्त्रीना संपवले तरी त्या मिस्त्रीच्या खाजगी संग्रहातल्या वस्तुबद्दल इतर कुणाला कल्पना नसल्याने ती चोरी उघड होणार नाही. त्याची कल्पना त्या वेळी ते झोपलेले असण्याची असावी. पण बहुधा गॅलरीच्या मार्गी लागत असलेल्या कामाने, दानिशच्या येण्याच्या विचाराने ते आनंदाने जागेच असावेत. त्यांची झटापट झाली. भारुचाकडे रिव्हॉल्व्हर असल्याने जीव वाचवायचा उपाय म्हणून त्यांनी कॅक्टस बेडवर उडी टाकली. पण अंदाज चुकून डोके आपटून प्राण गेला. हे सगळे त्या 9 मिनिटांत होणे शक्य आहे. तसेच ही टाईमलाईन न्यू इयर टाईमशी जुळते आणि कसलाही आवाज कुणालाच ऐकू जाणे शक्य नाही. मग भरूचा पुन्हा सोफिस्तिकेटेड वेष करून जिन्यावाटे खाली आला व नंतर गर्दीत मिसळला. त्याने किल्लीही त्या एजन्सीवाल्यांकडे प्रोस्पेक्टीव्ह पण फेक क्लायंट बनून जाऊन युक्तीने मिळवली.

९;४० ला मिस्त्री खाली आलेत पण तरी तो ९ नंतर कधीही ६०१ मधे जाऊन थांबू शकला असता, पूर्वतयारी करू शकला असता, मिस्त्री बाहेर गेल्याचा सिग्नल मिळाल्यावर लगेच काम सुरू करू शकला असता.

मिस्त्री पार्टीला गेले नव्हते, हा मॅगी चा तर्कही बरोबर बसतो. भरुचाला क्लिअर फिल्ड मिळावे म्हणून गॅलरीच्या जागेसंबंधी चर्चा करण्याच्या मिषाने गांधी पारेख जोडगोळीने मिस्त्रीना पार्टीच्या ठिकाणी बोलावले असणार. बीच पार्टी त्यांनीच दिलेली असल्याने त्यांची तिथे उपस्थिती मिस्त्रीशी बोलणे कुणालाच खटकले नसते.

सिंकाखालच्या भिंतीचा तुकडा 601 मध्येच पाडण्याचे कारण - जर खुन्याला अपेक्षित पद्धतीने खून झाला असता तर खुन्याने तो तुकडा होता तसा लावून त्याला 'बंद फ्लॅटमध्ये झालेला खून' असे रूप देऊन पोलिसांची काही काळ तरी दिशाभूल केली असती. 601 चे रिपेअर वर्क नाहीतरी चालू होतेच आणि माहिती असल्याशिवाय मुद्दाम सिंकखालची जागा कोण 602 मध्ये तपासून पाहिल?
पण मिस्त्रीनी अनपेक्षितरीत्या बचावाची मूव्ह केली. आता खुन्याला लौकरात लौकर खाली जाऊन ते मेलेत की जिवंत आहेत हे पाहणे आवश्यक झाले. त्या गडबडीत तो तो तुकडा लावायचे विसरून गेला.

601 मध्ये आलेल्या दोन्ही व्यक्ती एकच असण्याचे आणखी एक कारण म्हणजे रिकाम्या फ्लॅटच्या काही डझनावारी डुप्लिकेट किल्ल्या नसणार. कुणीही या, किल्ल्या घ्या. Proud

9 नंतर अलार्म बँड झाला मागच्या गेटचा, मग 10 पर्यंत बऱ्यापैकी वर्दळ असू शकेल, शिवाय मिस्त्री 9:40 ला निघाले. कदाचित भरुचाने ते गांधी पारीखना खरोखर भेटले हे कन्फर्म केले असेल, मध्येच त्यांचा विचार बदलला तर काय घ्या. म्हणून 10.

11:40 ला बंद पडलेले घड्याळ पण रेड हेरिंग आहे. ते खराब झाले म्हणून त्यावेळी बंद पडले. मृत्यूवेळेशी, झटापट वेळीशी काही संबंध नाही.

-रात्री ९:४० - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन' पार्टीत जाण्यासाठी एलेवेटरने एक्झिट
-रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
-रात्री १०:३४ - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी'तून एलेवेटरने फ्लॅट मध्ये एंट्री
-रात्री १०:४० - तीच हुडेड व्यक्ती फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि जिन्यावाटे अतिशय घाईघाईने निघून गेली. पाठीवर एक बॅग.

चीकु सही पकडे ...
मिस्त्री ९:४० ला निघून पार्टीमध्ये गेले आणि तेव्हाच तो कार्यरत झाला असणार. त्याचे पार्टी मध्ये असणे जरूरी होते किंवा मिस्त्री पार्टी मध्ये दिसल्यानंरच आपण काम चालू करायचे असा त्याचा प्लान असावा. तो मिस्त्रींवर नजा ठेवून असावा आणि मिस्त्रींचे फ्लॅट मध्ये नसणे त्याच्यासाठी जरूरी असावे.
त्याला एकंदर कामाला लागलेला वेळ (३९ मिनिटे) हातातल्या बॅगेत नव्याने काहितरी आल्याचा संकेत आणि सिंक खालचे होल ह्यावरून बॉक्स मध्ये जे काही मिसिंग होते त्यासाठीच आलेला चोर असावा.

-मिस्त्रींच्या बीच फेसिंग फ्लॅट मधून पार्टीची जागा, बीचकडून बिल्डिंगकडे येणारी ४० मीटरची पायवाट आणि चालणारी व्यक्ती स्पष्टं दिसते.
मिस्त्रींच्या येण्याच्या वाटेवरही त्याचे लक्ष असणार म्हणूनच ते फ्लॅट मध्ये दाखल झाल्या झाल्या त्याची एक्झिट आहे. मिस्त्रींनी गोळी घेतलेली आहे, घरात येवून वाईन पिलेली आहे (वाईन चा ग्लास सापडला) त्यामुळे त्यांनी हे पार्टीवरून आल्यावरच केले असण्याची शक्यता जास्तं आहे.
१०:३४ ते १०:४० हा सहा मिनिटांचा ओवरलॅप मिस्त्रींनी वरचे सगळे आणि हुडीने त्यानंतर त्यांचा खून करण्यास पुरेसा नाही ह्यावरून तो फक्तं चोर असावा असे मला वाटते.
असे ऊंदरासारखे येणे जाणे चोरांच्या सायकोलॉजीला फिट बसते. पुन्हा घड्याळा मुळे ११:४० पर्यंत तरी मिस्त्री जिवंत होते असे समजायला वाव आहे.

श्रद्धा
वेष बदलून मध्यम चणीचा माणूस ऊंच आणि रुबाबदार झाला, घड्याळ आधीच बंद पडलेले होते हे थोडे फिल्मी आणि बराच योगायोग वाटते.

स्त्रींनी गोळी घेतलेली आहे, घरात येवून वाईन पिलेली आहे (वाईन चा ग्लास सापडला) त्यामुळे त्यांनी हे पार्टीवरून आल्यावरच केले असण्याची शक्यता जास्तं आहे.
१०:३४ ते १०:४० हा सहा मिनिटांचा ओवरलॅप मिस्त्रींनी वरचे सगळे आणि हुडीने त्यानंतर त्यांचा खून करण्यास पुरेसा नाही ह्यावरून तो फक्तं चोर असावा असे मला वाटते.>>>>>

हाब, हे मी पण सांगितलेले, तुम्ही कि नै प्रोत्साहनच देत नायी Lol

-रात्री ११:५५ एक ऊंच, अंगापिंडाने मजबूत आणि रुबाबदार व्यक्ती (ऊंची पार्टी सुट, हातमोजे, चेहरा आजिबात दिसणार नाही अशी टोपी) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
-रात्री १२:०४ तीच ऊंची पार्टी सुट घातलेली व्यक्ती ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि शांतपणे जिन्यावाटे निघून गेली.

रुबाबदार व्य्कतीमत्व, सुट बुट, ९ मिनिटांमध्ये ईन अ‍ॅंड आऊट, पर्फेक्ट १२ चे फायर्वरकचे टायमिंग, ग्लोवज, बुलेट होल, गन रेसेड्यू, तीन बुलेट्स, शांतपणे निघून जाणे To me this sounds like a clean professional job

ओह सिम्बा खरे का.. माफ करा ...झोपेत होतो आणि नजरचुकीने राहून गेले असेल.
माझ्याही डोक्यात एक अ‍ॅसॅसिन आणि एक चोर असे ऑलरेडी डीड्यूस झालेले आहे असेच होते पण पुन्हा ऊठून बघितले तर कन्फ्युजन अजून चालू दिसले.

हाब, हे मी पण सांगितलेले, तुम्ही कि नै प्रोत्साहनच देत नायी

>>>
मेर्कु भी नै दिया प्रोत्साहन

अवांतर,

त्या तीन बुलेट्स म्हणजे रेड हेरिंग नसल्या तर फार दुःख होईल मला. आणि काय हे अरे, कोट्यधीशांचे फ्लॅट आणि एवढे पैसे फ्लॅटसाठी मोजून बुलेट्स आरपार जातील अशा वुडन भिंती???? Lol

कोट्यधीशांचे फ्लॅट आणि एवढे पैसे फ्लॅटसाठी मोजून बुलेट्स आरपार जातील अशा वुडन भिंती???? Lol >> अगं हो जातात .... केसेस झालेल्या आहेत.. शीथ रॉक आणि ड्रायवॉल मधून बुलेट आरपार जाते आणि ही तर बरीच मोठी पावरफुल गनमध्ये जाणारी बुलेट आहे.

सिम्बा आणि अँकी दोघांनाही सॉरी..... खरंच रात्रीच्या २-३ वाजता मी पेंगुळलेल्या अवस्थेत प्रतिसाद देत होतो.

म्हणजे ज्याने खून प्लॅन केला त्याने रस्ता बनवण्यासाठी चोरी प्लॅन केली
(वरती कोणीतरी म्हणालाय हे)
हुडोबा ने खाली जाऊन सुटोबा ला सांगितले असेल की ते झोपलेत, म्हणून याने न बघता 3 गोळ्या चालवल्या, पण तेव्हा नेमके मिस्त्री पलंगावर नव्हते म्हणून बचावले.
ते मेलेत का बघायला सुटोबा 602 मध्ये गेला तेव्हा ते जागेच दिसले मग झटापट आणि खून किंवा बचावासाठी त्यांची उडी

मला अजूनही हे कैझाद, अलमीरा अन भरूचा चं मिलीभगत वाटतंय.
कैझादला मुलाची कस्टडी अन पर्यायानी पैसा पाहिजे.
अलमीरा त्याच्याच पार्टीची आहे.
भरूचा ला क्लॉबॅक न देता ४ कोटी ठेवायचे आहेत, शिवाय गेलेल्या क्लायंटला वस्तू देऊन फायदा (८ ते १२ कोटी) + गेलेली पत मिळवायची आहे.
कैझादला इस्टेट मिळाल्यावरही अँटीक्स अन आर्ट मधली मिळकत लिक्विडेट करायला भरूचा ची गरज आहे. भरूचा १५ वर्ष मिस्त्रींसोबत आहे, म्हणजे त्याला सर्व घडामोडींची बर्‍यापैकी माहिती असू शकते, तसंच त्याची अन कैझादची आधीपासूनची ओळख / मैत्री ही असू शकते.

या तिघांपैकीच कुणीतरी फॉन्सिकाकडून बनावट क्लायंट बनून ६०१ ची चावी मिळवली असावी.
गांधी अन पारेख यांच्याकडेच ६०१ ची एक चाबी असणार हे उघड असताना ते स्वतः ६०१ चा वापर करून असा काही प्लॅन करणार नाहीत.

म्हणजे ज्याने खून प्लॅन केला त्याने रस्ता बनवण्यासाठी चोरी प्लॅन केली
(वरती कोणीतरी म्हणालाय हे)
हुडोबा ने खाली जाऊन सुटोबा ला सांगितले असेल की ते झोपलेत, म्हणून याने न बघता 3 गोळ्या चालवल्या, पण तेव्हा नेमके मिस्त्री पलंगावर नव्हते म्हणून बचावले.
ते मेलेत का बघायला सुटोबा 602 मध्ये गेला तेव्हा ते जागेच दिसले मग झटापट आणि खून किंवा बचावासाठी त्यांची उडी
>>>

सिम्बा, मी हेच सगळं लिहिलंय...

रायगड चा मिस्त्रींचा मृत्यू कसा झाला असावा आणि त्याच अनुषंगाने अमितवचा प्रतिसाद आणि अनुमोदन तेही अ‍ॅक्युरसीच्या फार जवळ होते, मी तेव्हा म्हणालो ही गाडी आता मस्तं ट्रॅकवर लागली पण तो ट्रॅक सोडून ती पुन्हा डीरेल झाली

Pages