ll जय भद्रकाली ll
भद्रावती नगरीत युद्धाची तयारी सुरू आहे. राजाचं शयनगृह म्हणजे युद्धनियोजन बैठकींचं मुख्य ठिकाण. एकदा राजा एकटाच युद्धविषयक विचारमंथन करत असतांना सेवक बोलवायला येतो आणि राजाला घाईघाईत जावं लागतं.
राजा परत येतो तेव्हा सोनेरी नक्षीकाम केलेला नकाशा गायब झालेला असतो.
ही झाली प्रमुख घटना. यावर आधारीत मी दोन प्रश्न विचारणार आहे. पहिल्याचं उत्तर आधी शोधायचंय. ते मिळालं की नंतर मी दुसरा प्रश्न विचारेन.
पहिला प्रश्न :
नकाशा कुणी पळवला आणि कसा ?
विचारा प्रश्न आणि शोधा उत्तर 
-----------------------------------------------
सुटलेले कोडे
१ . नकाशा कुणी आणि कसा पळवला ?
>> राजकुमाराने चमचमणारा नकाशा पाहिला आणि तो खेळायला घेऊन गेला.
इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न :
शत्रुराष्ट्राला नकाशातली माहिती मिळाली पण काहीच उपयोग झाला नाही, राजाला नकाशा मिळूनही फायदा झाला नाही....
हे कसंकाय झालं या प्रश्नाची उकल प्रश्नोत्तराच्या स्वरूपात टाकत आहे ( वाचकांनी विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची मी दिलेली उत्तरे )
राजकुमाराने नकाशा खेळताना फाडला म्हणून राजाला त्याचा फायदा झाला नाही असं आहे का ?
>> हो
नकाशा युद्धाच्या व्यूव्हाचा आहे का ?
>> हो
राजकुमाराकडे असलेला नकाशा कुणी पाहिलाय का >>त्याच्याकडे नकाशा असतांना कुणीच पाहिला नाही.
पहारेकरी फितुर आहे का ?
>> हो
नकाशा घेतल्यापासून फाटेपर्यंत पुर्णवेळ राजकुमाराकडे आहे का ?
>> हो
शत्रूला नकाशा किंवा नकाशाचा एखादा तुकडा मिळालाय का ?
>> नाही
त्या नकाशाची एखादी प्रत आहे का जी शत्रूने चोरली असेल ?
>> नाही. तो एकच पीस आहे.
युद्ध सुरू आहे की झालं ? तह झाला का ?
>> तह झाला नाही. युद्ध सुरू असेल किंवा व्हायचं असेल पण संपलेल नाही.
शत्रूला नकाशा राजकुमाराने नेला हे कळले आहे का
>> नाही
शत्रूला आता नकाशा कामाचा राहिला आहे हे कळले आहे का ?
>> नाही
हा नकाशा शत्रूचा आहे का जो राजाच्या हस्तकानी मिळवून राजाला दिलाय ?
>> नाही
शत्रुपक्षाला जी माहिती मिळाली ती त्याच नकाशावरुन मिळाली आहे का ?
>> हो
शत्रूला माहिती फितुर पहरेकर्याने दिली आहे का ?
>> हो
राजकुमाराने नकाशा नेण्याचा आणि शत्रूला त्यातली माहिती समजण्याचा काही संबंध आहे का ?
>> नाही
या कटात दोघेजण सहभागी आहेत का ?
>> हो
------------------
तर एकंदरीतपणे हे असं आहे -
राजा बाहेर पडतो तेव्हा एक पहारेकरी आत जातो. दुसरा बाहेरच थांबून कुणी येतंय का यावर लक्ष ठेवत असतो. आतला पहारेकरी नकाशा (त्याकाळच्या) कागदावर उतरवून घेतो आणि बाहेर येतो. तो नकाशा ते चोरत नाहीत कारण तसं झाल्यावर राजाने व्यूव्ह बदलला असता आणि त्या नकाशाचा त्यांना काहीच फायदा झाला नसता)
थोड्या वेळाने बाल राजकुमार आत जातो. तिथे त्याला नकाशा दिसतो. चमचमणारी वस्तू असल्यामुळे तो नकाशा खेळायला घेऊन जातो. पहारेकऱ्यांचं तिकडे लक्ष नसतं. ते मिळालेली माहिती शत्रूला पुरवतात.
इकडे, थोड्यावेळाने राजा परततो, त्याला नकाशा दिसत नाही म्हणून तो पहारेकऱ्यांना विचारतो की कुणी आलं होतं का, ते सांगतात राजकुमार आले होते. राजा राजकुमाराकडे जातो पण तोपर्यंत त्याने नकाशा फाडलेला असतो म्हणून तो राजाच्या कामी उरत नाही. खबरदारी म्हणून तो वेगळा नकाशा बनवतो. ही गोष्ट पहारेकऱ्यांना अन पर्यायाने शत्रूला माहीतच नसल्याने त्यांना मिळालेल्या माहितीचा काहीच फायदा नाही.
उलट जुन्या नकाशाला अनुसरून त्यांनी चाल खेळल्यास ते तोंडघशी पडणार हे नक्की. राजकुमाराने अनवधानाने जी कृती केली ती त्याच्या वडिलांना युद्ध जिंकायला कारणीभूत ठरू शकते !!
--------------------------------------
पहिला बिंगो : सोनाली
दुसरा बिंगो : चिकू आणि गजोधर
प्रश्नयुद्धात सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
---------------------------------------
वाचकांनी लढवलेले काही उत्तम तर्क :
१. गजोधर :
नकाशा हा एका लोकरीचे विनकाम असलेल्या छोट्या रुमालासारखा असतो. राजा जेव्हा नकाशा बघत विचारमग्न असतो तेव्हा तो त्यात नोंदी सुध्दा करत असतो. अचानक सेवकाने "बोलवणे" आले आहे असा निरोप दिल्याने त्याला ते काम अर्धवट सोडून जावे लागते. तो गेल्यानंतर राजकुमार तिथे खेळायला येतो. रुमाल हातात घेऊन खेळत असताना पहारेकरी तो रुमाल बघतो आणि त्याच्यावरच्या नोंदी लक्षात ठेवतो आणि शत्रूपक्षाकडे पाठवतो. राजकुमार खेळत असताना चुकून एका खिळ्याला तो रुमाल अडकतो आणि एक एक करून त्याचे धागे सुटू लागतात (जसे लोकरीच्या स्वेटर रुमालाचे निघतात) राजकुमार घाबरून अर्धवट धागे निघालेला रुमाल बाजुला फेकून देतो. नंतर राजा शोधायला लागतो तेव्हा काही वेळाने तो अर्धवट धागे निघालेला रुमाल त्यास सापडतो परंतू त्याने नोंदी केलेली बाजू नेमकी उसवल्याने राजाला नविन व्यहूरचना बनवावी लागते. आणि तो रुमाल उसवल्याने पहारेकरीला सुध्दा पुन्हा नीट नोंदी करता येत नाही.
२. विलभ :
राजकुमाराने खेळता खेळता नकाशा टराटरा फाडला अन त्याचे २ तुकडे केले. एका तुकड्यात राजाच्या सैन्याची व्यूहरचना , दुसऱ्यात शत्रुसैन्याची. दोन्ही बाजू वेगवेगळ्या रंगात रंगवल्या होत्या, ज्याची कल्पना नकाशा चोरणाऱ्याला नव्हती. एका नकाशाच्या तुकड्यावर त्याची नजर पडली, अन राजा नाही, हे पाहून त्याने तो तुकडा लंपास केला . पण नकाशाच्या या चोरलेल्या भागात राजाचा नव्हे तर शत्रुसैन्याचा व्यूह होता.
म्हणून शत्रूला जेव्हा हा नकाशाचा भाग मिळाला, तेव्हा त्यात त्यांचीच व्यूहरचना होती, राजाची नाही; म्हणून त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही.
इकडे राजा परत शयनगृहात आला, अन त्याला नकाशाचा दुसरा तुकडा मिळाला ज्यात शत्रूची व्यूहरचना नव्हती, त्यामुळे त्याला नकाशा मिळूनही काही उपयोग झाला नाही.
३.. मानव पृथ्वीकर :
हा नकाशा मूळात शत्रुचा आहे जो राज्याच्या हस्तकांनी मिळवून राजाला दिलाय.
आणि राजाने तो बघुन झाल्यावर हस्तकांनी तो परत शत्रुपक्षाकडे होत्या त्या जागी ठेवायचा होता म्हणजे शत्रुला कळले नसते की हा नकाशा काही काळ बाहेर गेले होता किंवा अजून कुणी पाहिला आहे.
पण आता नकाशा राजकुमाराने खेळायला घेउन त्याच्या तारा काढल्या. तेव्हा तो परत नेउन ठेवला तरी शत्रुला कळेल की नकाशा बाहेर गेला होता / कुणीतरी हाताळला आहे.
तेव्हा शत्रु आपली व्यूहरचना बदलणारच.
तेव्हा नकाशाचा कुणालाच उपयोग नाही आता.
४. हायझेनबर्ग :
नकाशा विसरून जाणे हे राजाचे चाल होती. तो पहारेकरी असलेल्या शत्रू पक्षाच्या हेराच्या हातात पडावा अशी राजाचीच ईच्छा होती. पण राजकुमाराने सोन्याचे धागे काढून ध चा मा केला. त्यामुळे नकाशा प्फितूर पहारेकर्याला मिळाला पण तो राजाच्या योजने प्रमाणे नसल्याने त्यांची नेमके रिएक्शन राजाच्या अपेक्षेप्रमाणे नसणार होते. असा ऑल्टर्ड नकाशा परत मिळूनही राजाचा प्लॅन फसला त्यामुळे त्याला नकाशा ऊपयोग अता नव्ह्ता.
-------------------------------------------------------------
प्रश्नोत्तरांची मजा अनुभवायची असेल तर प्रतिसाद जरूर वाचायला हवेत
आपल्यालाही काही तर्क सुचत असतील तर केव्हाही टाकू शकता. आपलं स्वागत आहे.
राजकुमाराने नकाशा खेळायला
राजकुमाराने नकाशा खेळायला घेतला. राणी ही शत्रुपक्षाला सामील असू शकते, अथवा तिचे माहेरच शत्रुपक्ष असू शकतो. राजकुमाराने नकाशा घेतला हे पाहून तिने सर्व माहिती करून घेतली. नंतर राजकुमाराने नकाशा खरवडला. आणि मग खेळ संपला म्हणून परत राजाकडे आणून दिला. राजकुमाराने अनवधानाने कुणाला नकाशा दाखवला असेल आणि तो फितूर असेल अशी शंका राजाला आली आणि त्याने व्युहरचना बदलली.
दोघांचे पण लॉजिक उत्तम आहेत.
दोघांचे पण लॉजिक उत्तम आहेत. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे
राजकुमाराकडुन तो नकाशा थेट
राजकुमाराकडुन तो नकाशा थेट शत्रुपक्षाकडे आला की एखाद्या मध्यस्था मार्फत / मध्यस्थ साखळी मार्फत आला?
शत्रुपक्षाला नकाशा मिळाला तेव्हा तो पुर्ण नकाशा होता की आधीच खेळण्यामुळे खराब झालेला होता?
शत्रुपक्षाला नकाशा मिळाला तेव्हा युद्धा सुरु झालेले होते की अजुन सुरु होणार होते?
राजकुमाराने नकाशा फाडला अर्धा
राजकुमाराने नकाशा फाडला अर्धा शत्रूच्या हेराने वा फितुराने चोरला आणि अर्धा राजाच्या सेवकांना मिळाला.
अर्धा नकाशा दोघांना मिळूनही ऊपयोग झाला नाही.
नकाशा एक मुहुर्ता वरच आक्रमण केले तरच यशस्वी होणार अश्या योजनेचा होता. तो मुहूर्त टळून गेल्याने नकाशा दोघांच्याही कामाचा राहिला नाही
शत्रूला नकाशा मिळाला नाही.
शत्रूला नकाशा मिळाला नाही.
राणी अथवा दासी (राजकुमाराला
राणी अथवा दासी (राजकुमाराला सांभाळणारी) शत्रुपक्षाला सामील आहे का?
हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
उत्तम तर्क लढवलात.
पण माझ्या डोक्यातली कल्पना जरा वेगळी आहे
राणी अथवा दासी (राजकुमाराला
राणी अथवा दासी (राजकुमाराला सांभाळणारी) शत्रुपक्षाला सामील आहे का?
>> नाही
The golden map was nothing
The golden map was nothing but 5star chocolate wrapped in golden paper. The king must be hiding the chocolate from the prince because he has already eaten one too many chocolates. The prince got the chocolate /map (now he came to know that father was lying about chocolate being over)but he doesn't know how to open pillow pack of 5star chocolate. So he didn't get it. So even though he got golden thing he didn't actually get the main useful thing i.e. chocolate
)
(I am very serious about my chocolate
राजकुमाराचाच शत्रुपक्षाशी
राजकुमाराचाच शत्रुपक्षाशी काही संबंध आहे का
राजकुमाराचाच शत्रुपक्षाशी
राजकुमाराचाच शत्रुपक्षाशी काही संबंध आहे का
>> नाही
राजसी, the chocolate theory
राजसी, the chocolate theory is pretty impressive.
नकाशा घेतल्यापासून ते तो
नकाशा घेतल्यापासून ते तो राजाला परत मिळेपर्यंत राजकुमाराकडेच आहे का
त्या अवधीत तो नकाशा कोणी
त्या अवधीत तो नकाशा कोणी बघितला आहे का
शत्रुपक्षाचा राजकुमार हा या
शत्रुपक्षाचा राजकुमार हा या रा जकुमाराचा मित्र आहे का?
शत्रु पक्षाने तह केला. युद्ध
शत्रु पक्षाने तह केला. युद्ध झालेच नाही.
तेव्हा नकाशातील माहिती मिळुन शत्रुला फायदा नाही, की नकाशा परत मिळुन राजाला फायदा नाही.
नकाशा घेतल्यापासून ते तो
नकाशा घेतल्यापासून ते तो राजाला परत मिळेपर्यंत राजकुमाराकडेच आहे का
>> हो
त्या अवधीत तो नकाशा कोणी बघितला आहे का
>> नाही
शत्रुपक्षाचा राजकुमार हा या
शत्रुपक्षाचा राजकुमार हा या रा जकुमाराचा मित्र आहे का?
>> नाही
शत्रु पक्षाने तह केला. युद्ध
शत्रु पक्षाने तह केला. युद्ध झालेच नाही.
तेव्हा नकाशातील माहिती मिळुन शत्रुला फायदा नाही, की नकाशा परत मिळुन राजाला फायदा नाही.
>> नाही
मस्त तर्क लढवलेत लोकांनी. आमच
मस्त तर्क लढवलेत लोकांनी. आमच एक लंगडा तर्क.
नकाशातील माहिती शत्रूला मिळालेली आहे. ती कशी ? >> राजकुमार शत्रुबरोबरच नकाशावर बसुन, उड्या मारुन खेळला
पण शत्रूला नकाशातली माहिती मिळूनही फायदा झाला नाही हे कसं >> कारण शत्रुला कळलेच नाही की तो नकाशा आहे किंवा कळले तरी त्याचा अर्थ समजला नाही.
राजकुमार शत्रुबरोबरच नकाशावर
राजकुमार शत्रुबरोबरच नकाशावर बसुन, उड्या मारुन खेळला
>> असं कुठे म्हटलंय !!?
आतपर्यंतचे मुद्दे सलग जोडून मांडतोय :
राजाच्या शयनगृहातही युद्धाच्या व्युहाबद्दल एक नकाशा आहे जो अगदी सोनेरी, चमचमता आहे.
राजाला घाईघाईत बाहेर जावं लागतं म्हणून तो नकाशा कुलुपात ठेवायचं विसरतो. परत येतो तेव्हा नकाशा गायब झालेला असतो.
आता दरम्यानच्या काळात बाल राजकुमार नकाशा घेऊन गेलेला असतो. चमचमणारी वस्तू असल्यामुळे नकाशा खेळायला नेतो. तिकडे त्याची सोनेरी तार तोडून टाकतो किंवा कागद फाडतो. राजाला हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो. दरम्यान राजकुमाराकडे असलेला नकाशा कुणीच पाहिला नाही, शत्रु राजकुमार त्याचा मित्र किंवा राजकुमारी त्याची मैत्रीणही नाही. नकाशा घेतल्यापासून ते फाटेपर्यंत पूर्णवेळ त्याच्याकडे आहे.
परंतू...
राजा नकाशा बेवारस सोडून जेवढा वेळ बाहेर गेला त्यावेळात असं काहीतरी झालं ज्यामुळे शत्रूला किंवा त्याच्या हस्तकाला नकाशामधली माहिती मिळाली.
पण या माहितीचा त्यालाही काही फायदा झाला नाही.
युद्ध अटळ आहे, तह झाला नाही.
राजाला बोलवायला आलेला सेवक, दासी, राणी, राजकुमार, राजाचा कुठलाच नातेवाईक फितुर नाही. पहारेकरी फितुर आहेत पण त्यांनी नकाशा चोरला नाही.
अहो ते मी म्हटलंय, तुम्ही
अहो ते मी म्हटलंय, तुम्ही नाही. ( पण तुमच्या प्रश्नावरुन तसे नाहीये ते कळले).
फितुर पहारेकऱ्याने पाहिले की
फितुर पहारेकऱ्याने पाहिले की राजकुमाराने नकाशा खेळायला नेला त्याने लपून त्यातिल महत्वाची माहिती नोंद करुन ती शत्रुला कळवली.
पण नंतर खेळताना राजकुमाराच्या हातून नकाशाची बऱ्यापैकी वाट लागली.
नकाशा राजाला परत मिळाला तेव्हा त्याची अशी बऱ्यापैकी वाट लागल्याने त्याला त्याचा उपयोग नाही.
आणि युद्धात आता ती व्यूह रचना राजा वापरणार नाही म्हणुन त्याची माहिती मिळुनही शत्रुला त्याचा उपयोग नाही.
नकाशा हा एका लोकरीचे विनकाम
नकाशा हा एका लोकरीचे विनकाम असलेल्या छोट्या रुमालासारखा असतो. राजा जेव्हा नकाशा बघत विचारमग्न असतो तेव्हा तो त्यात नोंदी सुध्दा करत असतो. अचानक सेवकाने "बोलवणे" आले आहे असा निरोप दिल्याने त्याला ते काम अर्धवट सोडून जावे लागते. तो गेल्यानंतर राजकुमार तिथे खेळायला येतो. रुमाल हातात घेऊन खेळत असताना पहारेकरी तो रुमाल बघतो आणि त्याच्यावरच्या नोंदी लक्षात ठेवतो आणि शत्रूपक्षाकडे पाठवतो. राजकुमार खेळत असताना चुकून एका खिळ्याला तो रुमाल अडकतो आणि एक एक करून त्याचे धागे सुटू लागतात (जसे लोकरीच्या स्वेटर रुमालाचे निघतात) राजकुमार घाबरून अर्धवट धागे निघालेला रुमाल बाजुला फेकून देतो. नंतर राजा शोधायला लागतो तेव्हा काही वेळाने तो अर्धवट धागे निघालेला रुमाल त्यास सापडतो परंतू त्याने नोंदी केलेली बाजू नेमकी उसवल्याने राजाला नविन व्यहूरचना बनवावी लागते. आणि तो रुमाल उसवल्याने पहारेकरीला सुध्दा पुन्हा नीट नोंदी करता येत नाही.
फितुर पहारेकऱ्याने पाहिले की
वरती म्हटल्याप्रमाणे राजकुमाराकडे असलेला नकाशा कुणीच पाहिलेला नाही. त्यामुळे वरील दोन्ही तर्क जुळत नाहीत.
अहो ते मी म्हटलंय, तुम्ही
अहो ते मी म्हटलंय, तुम्ही नाही.
>> ओके ओके no problem
नकाशा कुणीच पाहिलेला नाही >>>
नकाशा कुणीच पाहिलेला नाही >>> नकाशा न पाहता माहीती कशी मिळाली ?
हे आमचे तर्क -
हे आमचे तर्क -
१) राजाच्या हातात नकाशा आला पण वेळ निघून गेली होती. फितूर पहारेकर्यांनी सगळ्या राजपरिवाराचा खून केला, सैन्याचे मनोबल खचले अन शत्रूराष्ट्राचा हातोहात विजय झाला. नंतर नकाशा शत्रूला मिळाला पण त्याची गरज पडलीच नाही.
२) राजकुमाराने खेळता खेळता नकाशा टराटरा फाडला अन त्याचे २ तुकडे केले. एका तुकड्यात राजाच्या सैन्याची व्यूहरचना , दुसऱ्यात शत्रुसैन्याची. दोन्ही बाजू वेगवेगळ्या रंगात रंगवल्या होत्या, ज्याची कल्पना नकाशा चोरणाऱ्याला नव्हती. एका नकाशाच्या तुकड्यावर त्याची नजर पडली, अन राजा नाही, हे पाहून त्याने तो तुकडा लंपास केला . पण नकाशाच्या या चोरलेल्या भागात राजाचा नव्हे तर शत्रुसैन्याचा व्यूह होता.
म्हणून शत्रूला जेव्हा हा नकाशाचा भाग मिळाला, तेव्हा त्यात त्यांचीच व्यूहरचना होती, राजाची नाही; म्हणून त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही.
इकडे राजा परत शयनगृहात आला, अन त्याला नकाशाचा दुसरा तुकडा मिळाला ज्यात शत्रूची व्यूहरचना नव्हती, त्यामुळे त्याला नकाशा मिळूनही काही उपयोग झाला नाही.
शत्रुला नकाशा राजकुमाराने
शत्रुला नकाशा राजकुमाराने नेला हे कळले आहे का?
राजकुमारने नकाशावरिल सोन्याची तार काढल्यामुळे म्हणा, कागद फाडल्यामुळे म्हणा किंवा त्यावर काही सांडले म्हणुन म्हणा आता नकाशा उपयोगी राहिला नाही असे आहे का?
आणि शत्रुला आता नकाशा उपयोगी राहिला नाही हे कळले आहे का?
शत्रुला नकाशा राजकुमाराने
शत्रुला नकाशा राजकुमाराने नेला हे कळले आहे का?
>> नाही
राजकुमारने नकाशावरिल सोन्याची तार काढल्यामुळे म्हणा, कागद फाडल्यामुळे म्हणा किंवा त्यावर काही सांडले म्हणुन म्हणा आता नकाशा उपयोगी राहिला नाही असे आहे का?
>> हो ( राजाच्या दृष्टीने)
आणि शत्रुला आता नकाशा उपयोगी राहिला नाही हे कळले आहे का?
>> नाही
Pages