पकोडे २ [ हेडर संपादित केले आहे ]

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 27 May, 2017 - 12:31

ll जय भद्रकाली ll

भद्रावती नगरीत युद्धाची तयारी सुरू आहे. राजाचं शयनगृह म्हणजे युद्धनियोजन बैठकींचं मुख्य ठिकाण. एकदा राजा एकटाच युद्धविषयक विचारमंथन करत असतांना सेवक बोलवायला येतो आणि राजाला घाईघाईत जावं लागतं.
राजा परत येतो तेव्हा सोनेरी नक्षीकाम केलेला नकाशा गायब झालेला असतो.

ही झाली प्रमुख घटना. यावर आधारीत मी दोन प्रश्न विचारणार आहे. पहिल्याचं उत्तर आधी शोधायचंय. ते मिळालं की नंतर मी दुसरा प्रश्न विचारेन.

पहिला प्रश्न :
नकाशा कुणी पळवला आणि कसा ?

विचारा प्रश्न आणि शोधा उत्तर Happy

-----------------------------------------------
सुटलेले कोडे

१ . नकाशा कुणी आणि कसा पळवला ?

>> राजकुमाराने चमचमणारा नकाशा पाहिला आणि तो खेळायला घेऊन गेला.

इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न :

शत्रुराष्ट्राला नकाशातली माहिती मिळाली पण काहीच उपयोग झाला नाही, राजाला नकाशा मिळूनही फायदा झाला नाही....

हे कसंकाय झालं या प्रश्नाची उकल प्रश्नोत्तराच्या स्वरूपात टाकत आहे ( वाचकांनी विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची मी दिलेली उत्तरे )

राजकुमाराने नकाशा खेळताना फाडला म्हणून राजाला त्याचा फायदा झाला नाही असं आहे का ?
>> हो

नकाशा युद्धाच्या व्यूव्हाचा आहे का ?
>> हो

राजकुमाराकडे असलेला नकाशा कुणी पाहिलाय का >>त्याच्याकडे नकाशा असतांना कुणीच पाहिला नाही.

पहारेकरी फितुर आहे का ?
>> हो

नकाशा घेतल्यापासून फाटेपर्यंत पुर्णवेळ राजकुमाराकडे आहे का ?
>> हो

शत्रूला नकाशा किंवा नकाशाचा एखादा तुकडा मिळालाय का ?
>> नाही

त्या नकाशाची एखादी प्रत आहे का जी शत्रूने चोरली असेल ?
>> नाही. तो एकच पीस आहे.

युद्ध सुरू आहे की झालं ? तह झाला का ?
>> तह झाला नाही. युद्ध सुरू असेल किंवा व्हायचं असेल पण संपलेल नाही.

शत्रूला नकाशा राजकुमाराने नेला हे कळले आहे का
>> नाही

शत्रूला आता नकाशा कामाचा राहिला आहे हे कळले आहे का ?
>> नाही

हा नकाशा शत्रूचा आहे का जो राजाच्या हस्तकानी मिळवून राजाला दिलाय ?
>> नाही

शत्रुपक्षाला जी माहिती मिळाली ती त्याच नकाशावरुन मिळाली आहे का ?
>> हो

शत्रूला माहिती फितुर पहरेकर्याने दिली आहे का ?
>> हो

राजकुमाराने नकाशा नेण्याचा आणि शत्रूला त्यातली माहिती समजण्याचा काही संबंध आहे का ?
>> नाही

या कटात दोघेजण सहभागी आहेत का ?
>> हो

------------------

तर एकंदरीतपणे हे असं आहे -

राजा बाहेर पडतो तेव्हा एक पहारेकरी आत जातो. दुसरा बाहेरच थांबून कुणी येतंय का यावर लक्ष ठेवत असतो. आतला पहारेकरी नकाशा (त्याकाळच्या) कागदावर उतरवून घेतो आणि बाहेर येतो. तो नकाशा ते चोरत नाहीत कारण तसं झाल्यावर राजाने व्यूव्ह बदलला असता आणि त्या नकाशाचा त्यांना काहीच फायदा झाला नसता)

थोड्या वेळाने बाल राजकुमार आत जातो. तिथे त्याला नकाशा दिसतो. चमचमणारी वस्तू असल्यामुळे तो नकाशा खेळायला घेऊन जातो. पहारेकऱ्यांचं तिकडे लक्ष नसतं. ते मिळालेली माहिती शत्रूला पुरवतात.

इकडे, थोड्यावेळाने राजा परततो, त्याला नकाशा दिसत नाही म्हणून तो पहारेकऱ्यांना विचारतो की कुणी आलं होतं का, ते सांगतात राजकुमार आले होते. राजा राजकुमाराकडे जातो पण तोपर्यंत त्याने नकाशा फाडलेला असतो म्हणून तो राजाच्या कामी उरत नाही. खबरदारी म्हणून तो वेगळा नकाशा बनवतो. ही गोष्ट पहारेकऱ्यांना अन पर्यायाने शत्रूला माहीतच नसल्याने त्यांना मिळालेल्या माहितीचा काहीच फायदा नाही.

उलट जुन्या नकाशाला अनुसरून त्यांनी चाल खेळल्यास ते तोंडघशी पडणार हे नक्की. राजकुमाराने अनवधानाने जी कृती केली ती त्याच्या वडिलांना युद्ध जिंकायला कारणीभूत ठरू शकते !!

--------------------------------------

पहिला बिंगो : सोनाली
दुसरा बिंगो : चिकू आणि गजोधर

प्रश्नयुद्धात सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
---------------------------------------

वाचकांनी लढवलेले काही उत्तम तर्क :

१. गजोधर :

नकाशा हा एका लोकरीचे विनकाम असलेल्या छोट्या रुमालासारखा असतो. राजा जेव्हा नकाशा बघत विचारमग्न असतो तेव्हा तो त्यात नोंदी सुध्दा करत असतो. अचानक सेवकाने "बोलवणे" आले आहे असा निरोप दिल्याने त्याला ते काम अर्धवट सोडून जावे लागते. तो गेल्यानंतर राजकुमार तिथे खेळायला येतो. रुमाल हातात घेऊन खेळत असताना पहारेकरी तो रुमाल बघतो आणि त्याच्यावरच्या नोंदी लक्षात ठेवतो आणि शत्रूपक्षाकडे पाठवतो. राजकुमार खेळत असताना चुकून एका खिळ्याला तो रुमाल अडकतो आणि एक एक करून त्याचे धागे सुटू लागतात (जसे लोकरीच्या स्वेटर रुमालाचे निघतात) राजकुमार घाबरून अर्धवट धागे निघालेला रुमाल बाजुला फेकून देतो. नंतर राजा शोधायला लागतो तेव्हा काही वेळाने तो अर्धवट धागे निघालेला रुमाल त्यास सापडतो परंतू त्याने नोंदी केलेली बाजू नेमकी उसवल्याने राजाला नविन व्यहूरचना बनवावी लागते. आणि तो रुमाल उसवल्याने पहारेकरीला सुध्दा पुन्हा नीट नोंदी करता येत नाही.

२. विलभ :

राजकुमाराने खेळता खेळता नकाशा टराटरा फाडला अन त्याचे २ तुकडे केले. एका तुकड्यात राजाच्या सैन्याची व्यूहरचना , दुसऱ्यात शत्रुसैन्याची. दोन्ही बाजू वेगवेगळ्या रंगात रंगवल्या होत्या, ज्याची कल्पना नकाशा चोरणाऱ्याला नव्हती. एका नकाशाच्या तुकड्यावर त्याची नजर पडली, अन राजा नाही, हे पाहून त्याने तो तुकडा लंपास केला . पण नकाशाच्या या चोरलेल्या भागात राजाचा नव्हे तर शत्रुसैन्याचा व्यूह होता.
म्हणून शत्रूला जेव्हा हा नकाशाचा भाग मिळाला, तेव्हा त्यात त्यांचीच व्यूहरचना होती, राजाची नाही; म्हणून त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही.
इकडे राजा परत शयनगृहात आला, अन त्याला नकाशाचा दुसरा तुकडा मिळाला ज्यात शत्रूची व्यूहरचना नव्हती, त्यामुळे त्याला नकाशा मिळूनही काही उपयोग झाला नाही.

३.. मानव पृथ्वीकर :

हा नकाशा मूळात शत्रुचा आहे जो राज्याच्या हस्तकांनी मिळवून राजाला दिलाय.
आणि राजाने तो बघुन झाल्यावर हस्तकांनी तो परत शत्रुपक्षाकडे होत्या त्या जागी ठेवायचा होता म्हणजे शत्रुला कळले नसते की हा नकाशा काही काळ बाहेर गेले होता किंवा अजून कुणी पाहिला आहे.
पण आता नकाशा राजकुमाराने खेळायला घेउन त्याच्या तारा काढल्या. तेव्हा तो परत नेउन ठेवला तरी शत्रुला कळेल की नकाशा बाहेर गेला होता / कुणीतरी हाताळला आहे.
तेव्हा शत्रु आपली व्यूहरचना बदलणारच.
तेव्हा नकाशाचा कुणालाच उपयोग नाही आता.

४. हायझेनबर्ग :

नकाशा विसरून जाणे हे राजाचे चाल होती. तो पहारेकरी असलेल्या शत्रू पक्षाच्या हेराच्या हातात पडावा अशी राजाचीच ईच्छा होती. पण राजकुमाराने सोन्याचे धागे काढून ध चा मा केला. त्यामुळे नकाशा प्फितूर पहारेकर्याला मिळाला पण तो राजाच्या योजने प्रमाणे नसल्याने त्यांची नेमके रिएक्शन राजाच्या अपेक्षेप्रमाणे नसणार होते. असा ऑल्टर्ड नकाशा परत मिळूनही राजाचा प्लॅन फसला त्यामुळे त्याला नकाशा ऊपयोग अता नव्ह्ता.

-------------------------------------------------------------

प्रश्नोत्तरांची मजा अनुभवायची असेल तर प्रतिसाद जरूर वाचायला हवेत 

आपल्यालाही काही तर्क सुचत असतील तर केव्हाही टाकू शकता. आपलं स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नकाशा एखाद्या स्थळाचा आहे की एखाद्या लपवलेल्या वस्तुचा?
स्थळाचा असल्यास शत्रुराज्यासंबंधीत की स्वतःच्याच राज्यातील स्थळाचा?

-------------------------------------------------------------------------------------------------
अवांतरः कलाबुत म्हणजे काय?

राजाचा नकाशा म्हणजे गुप्त लिखाण व खाणा खुणा असणारा ऐवज असतो त्यामुळे साधारण माणसाला तो एखाद्या नक्षी सारखा सुद्धा वाटू शकतो. आणि ही नक्षीदार कलाकुसर जर सोन्याची असेल तर कोणाला मोह नाही होणार हे सोने ओरखडून काढायला !

राजाच्या अचानक जाण्याने तो त्याचा नकशा सेफ लॉकर मध्ये न ठेवता किंवा त्या बॉक्सची गुप्त कळ दाबून तो मिटून न ठेवता गेला असेल तर ह्या सोन्याच्या मोहा पायी त्या सैनिक / द्वारपाल वगैरे कमी हुद्द्याचा हुजरा अश्यापैकी त्यातील नक्षी ओरबडली म्हणजेच सोने काढून घेतले त्यामुळे त्याचा बेस जरी तिकडे तसाच राहिला तरी तो नक्शा म्हणून अस्तित्व हरवून बसलाय

नकाशा स्थळ आणि वस्तू दोन्हींचा नाही.
कलाबुत म्हणजे सोनेरी धाग्यानी विणलेली डिझाइन

@ अंबज्ञ
माझ्या मनातील शक्यता ही नाही

राणी शयनग्रुहात नाही का?
>> ती शयनगृहात नाही

राणी शत्र्यु पक्षाला सामिल असते का?
>> नाही

नकाशा सोनेरी कलाबुतानी मढवलेला असणं याचा गायब होण्याशी संबंध आहे का? म्हणजे साधा कागदी नकाशा असता तरी गायब झाला असता का?

ज्याने नकाशा चोरला तो राजा बाहेर जायच्या आधी पासून लपून बसला होता का
>> नाही

शयन गृहाला भुयारी मार्ग किंवा इतर गुप्त दरवाजा आहे का
>> नाही

नकाशा सोनेरी कलाबुतानी मढवलेला असणं याचा गायब होण्याशी संबंध आहे का?
>> हो

म्हणजे साधा कागदी नकाशा असता तरी गायब झाला असता का?
>> नाही

हे युद्ध, परक्या शत्रुराज्याशी आहे की,
अंतर्गत गृहकलहामुळे (मुले, भाऊ ई यांच्याशी) होत असलेले युद्ध आहे?

हे युद्ध, परक्या शत्रुराज्याशी आहे की,
अंतर्गत गृहकलहामुळे (मुले, भाऊ ई यांच्याशी) होत असलेले युद्ध आहे?
>> असंबद्ध

राणीने तीच्या एका सेवकला किंवा मुलगा / मुलगी यांना राजाच्या शयनकक्षात जाउन सोनेरी नक्षीकाम असलेले वस्त्र किंवा तत्सम काही आणायला सांगीतले.
तो राणीचा सेवक असल्याने / मुलगा - मुलगीच असल्याने पहारेक-यांनी त्याला आत जाऊ दिले.
त्याला तो नकाशा, त्यावरील सोनेरी नक्षीकामामुळे त्या वस्त्रासारखाच / तत्सम वस्तुसारखाच वाटल्यामुळे तो तेच घेऊन आला.

नकाशा गायब झाला आहे. म्हणजे चोरीला गेला आहे का?

घरातल्या घरात जेव्हा वस्तू गायब होते तेव्हा कधी कधी घरातलेच कुणीतरी ती वस्तू डाव्या हाताने इकडे-तिकडे ठेवतात. मग शोधा-शोध केल्यावर मिळू शकते. राणीने तर ठेवला नाही ना? Happy

आता शयनगृहाबाहेर पहारा आहे, सेवकाने तर चोरला नाही, बाहेरच्या कोणाला तेथे प्रवेश नाही अश्यावेळी छोटा राजकुमार-कुमारीने तर घेतला नाही ना, नक्षी बघायला किंवा खेळायला?

शक्यता - राजा शयनगृहात आहे म्हणजे त्याने पूर्ण पेहराव केला नाही. सेवक त्याला बोल वायला येतो तेव्हा राजा उठतो आणि सेवकाला अंगावर शेला टाकायला सांगतो. सेवक हुशार आहे , तो तोच नकाशा उलटा करून राजाच्या अंगावर टाकतो अथवा शेला घ्यायच्या मिषाने तो नकाशाही उचलतो. दुसरी शक्यता म्हणजे राजाच गडबडीत शेल्याऐवजी चुकून तो नकाशा उचलतो, उलटा टाकल्याने आणि सोनेरी नक्षी मुळे त्याच्या ध्यानात येत नाही.

Pages