पकोडे २ [ हेडर संपादित केले आहे ]

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 27 May, 2017 - 12:31

ll जय भद्रकाली ll

भद्रावती नगरीत युद्धाची तयारी सुरू आहे. राजाचं शयनगृह म्हणजे युद्धनियोजन बैठकींचं मुख्य ठिकाण. एकदा राजा एकटाच युद्धविषयक विचारमंथन करत असतांना सेवक बोलवायला येतो आणि राजाला घाईघाईत जावं लागतं.
राजा परत येतो तेव्हा सोनेरी नक्षीकाम केलेला नकाशा गायब झालेला असतो.

ही झाली प्रमुख घटना. यावर आधारीत मी दोन प्रश्न विचारणार आहे. पहिल्याचं उत्तर आधी शोधायचंय. ते मिळालं की नंतर मी दुसरा प्रश्न विचारेन.

पहिला प्रश्न :
नकाशा कुणी पळवला आणि कसा ?

विचारा प्रश्न आणि शोधा उत्तर Happy

-----------------------------------------------
सुटलेले कोडे

१ . नकाशा कुणी आणि कसा पळवला ?

>> राजकुमाराने चमचमणारा नकाशा पाहिला आणि तो खेळायला घेऊन गेला.

इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न :

शत्रुराष्ट्राला नकाशातली माहिती मिळाली पण काहीच उपयोग झाला नाही, राजाला नकाशा मिळूनही फायदा झाला नाही....

हे कसंकाय झालं या प्रश्नाची उकल प्रश्नोत्तराच्या स्वरूपात टाकत आहे ( वाचकांनी विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची मी दिलेली उत्तरे )

राजकुमाराने नकाशा खेळताना फाडला म्हणून राजाला त्याचा फायदा झाला नाही असं आहे का ?
>> हो

नकाशा युद्धाच्या व्यूव्हाचा आहे का ?
>> हो

राजकुमाराकडे असलेला नकाशा कुणी पाहिलाय का >>त्याच्याकडे नकाशा असतांना कुणीच पाहिला नाही.

पहारेकरी फितुर आहे का ?
>> हो

नकाशा घेतल्यापासून फाटेपर्यंत पुर्णवेळ राजकुमाराकडे आहे का ?
>> हो

शत्रूला नकाशा किंवा नकाशाचा एखादा तुकडा मिळालाय का ?
>> नाही

त्या नकाशाची एखादी प्रत आहे का जी शत्रूने चोरली असेल ?
>> नाही. तो एकच पीस आहे.

युद्ध सुरू आहे की झालं ? तह झाला का ?
>> तह झाला नाही. युद्ध सुरू असेल किंवा व्हायचं असेल पण संपलेल नाही.

शत्रूला नकाशा राजकुमाराने नेला हे कळले आहे का
>> नाही

शत्रूला आता नकाशा कामाचा राहिला आहे हे कळले आहे का ?
>> नाही

हा नकाशा शत्रूचा आहे का जो राजाच्या हस्तकानी मिळवून राजाला दिलाय ?
>> नाही

शत्रुपक्षाला जी माहिती मिळाली ती त्याच नकाशावरुन मिळाली आहे का ?
>> हो

शत्रूला माहिती फितुर पहरेकर्याने दिली आहे का ?
>> हो

राजकुमाराने नकाशा नेण्याचा आणि शत्रूला त्यातली माहिती समजण्याचा काही संबंध आहे का ?
>> नाही

या कटात दोघेजण सहभागी आहेत का ?
>> हो

------------------

तर एकंदरीतपणे हे असं आहे -

राजा बाहेर पडतो तेव्हा एक पहारेकरी आत जातो. दुसरा बाहेरच थांबून कुणी येतंय का यावर लक्ष ठेवत असतो. आतला पहारेकरी नकाशा (त्याकाळच्या) कागदावर उतरवून घेतो आणि बाहेर येतो. तो नकाशा ते चोरत नाहीत कारण तसं झाल्यावर राजाने व्यूव्ह बदलला असता आणि त्या नकाशाचा त्यांना काहीच फायदा झाला नसता)

थोड्या वेळाने बाल राजकुमार आत जातो. तिथे त्याला नकाशा दिसतो. चमचमणारी वस्तू असल्यामुळे तो नकाशा खेळायला घेऊन जातो. पहारेकऱ्यांचं तिकडे लक्ष नसतं. ते मिळालेली माहिती शत्रूला पुरवतात.

इकडे, थोड्यावेळाने राजा परततो, त्याला नकाशा दिसत नाही म्हणून तो पहारेकऱ्यांना विचारतो की कुणी आलं होतं का, ते सांगतात राजकुमार आले होते. राजा राजकुमाराकडे जातो पण तोपर्यंत त्याने नकाशा फाडलेला असतो म्हणून तो राजाच्या कामी उरत नाही. खबरदारी म्हणून तो वेगळा नकाशा बनवतो. ही गोष्ट पहारेकऱ्यांना अन पर्यायाने शत्रूला माहीतच नसल्याने त्यांना मिळालेल्या माहितीचा काहीच फायदा नाही.

उलट जुन्या नकाशाला अनुसरून त्यांनी चाल खेळल्यास ते तोंडघशी पडणार हे नक्की. राजकुमाराने अनवधानाने जी कृती केली ती त्याच्या वडिलांना युद्ध जिंकायला कारणीभूत ठरू शकते !!

--------------------------------------

पहिला बिंगो : सोनाली
दुसरा बिंगो : चिकू आणि गजोधर

प्रश्नयुद्धात सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
---------------------------------------

वाचकांनी लढवलेले काही उत्तम तर्क :

१. गजोधर :

नकाशा हा एका लोकरीचे विनकाम असलेल्या छोट्या रुमालासारखा असतो. राजा जेव्हा नकाशा बघत विचारमग्न असतो तेव्हा तो त्यात नोंदी सुध्दा करत असतो. अचानक सेवकाने "बोलवणे" आले आहे असा निरोप दिल्याने त्याला ते काम अर्धवट सोडून जावे लागते. तो गेल्यानंतर राजकुमार तिथे खेळायला येतो. रुमाल हातात घेऊन खेळत असताना पहारेकरी तो रुमाल बघतो आणि त्याच्यावरच्या नोंदी लक्षात ठेवतो आणि शत्रूपक्षाकडे पाठवतो. राजकुमार खेळत असताना चुकून एका खिळ्याला तो रुमाल अडकतो आणि एक एक करून त्याचे धागे सुटू लागतात (जसे लोकरीच्या स्वेटर रुमालाचे निघतात) राजकुमार घाबरून अर्धवट धागे निघालेला रुमाल बाजुला फेकून देतो. नंतर राजा शोधायला लागतो तेव्हा काही वेळाने तो अर्धवट धागे निघालेला रुमाल त्यास सापडतो परंतू त्याने नोंदी केलेली बाजू नेमकी उसवल्याने राजाला नविन व्यहूरचना बनवावी लागते. आणि तो रुमाल उसवल्याने पहारेकरीला सुध्दा पुन्हा नीट नोंदी करता येत नाही.

२. विलभ :

राजकुमाराने खेळता खेळता नकाशा टराटरा फाडला अन त्याचे २ तुकडे केले. एका तुकड्यात राजाच्या सैन्याची व्यूहरचना , दुसऱ्यात शत्रुसैन्याची. दोन्ही बाजू वेगवेगळ्या रंगात रंगवल्या होत्या, ज्याची कल्पना नकाशा चोरणाऱ्याला नव्हती. एका नकाशाच्या तुकड्यावर त्याची नजर पडली, अन राजा नाही, हे पाहून त्याने तो तुकडा लंपास केला . पण नकाशाच्या या चोरलेल्या भागात राजाचा नव्हे तर शत्रुसैन्याचा व्यूह होता.
म्हणून शत्रूला जेव्हा हा नकाशाचा भाग मिळाला, तेव्हा त्यात त्यांचीच व्यूहरचना होती, राजाची नाही; म्हणून त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही.
इकडे राजा परत शयनगृहात आला, अन त्याला नकाशाचा दुसरा तुकडा मिळाला ज्यात शत्रूची व्यूहरचना नव्हती, त्यामुळे त्याला नकाशा मिळूनही काही उपयोग झाला नाही.

३.. मानव पृथ्वीकर :

हा नकाशा मूळात शत्रुचा आहे जो राज्याच्या हस्तकांनी मिळवून राजाला दिलाय.
आणि राजाने तो बघुन झाल्यावर हस्तकांनी तो परत शत्रुपक्षाकडे होत्या त्या जागी ठेवायचा होता म्हणजे शत्रुला कळले नसते की हा नकाशा काही काळ बाहेर गेले होता किंवा अजून कुणी पाहिला आहे.
पण आता नकाशा राजकुमाराने खेळायला घेउन त्याच्या तारा काढल्या. तेव्हा तो परत नेउन ठेवला तरी शत्रुला कळेल की नकाशा बाहेर गेला होता / कुणीतरी हाताळला आहे.
तेव्हा शत्रु आपली व्यूहरचना बदलणारच.
तेव्हा नकाशाचा कुणालाच उपयोग नाही आता.

४. हायझेनबर्ग :

नकाशा विसरून जाणे हे राजाचे चाल होती. तो पहारेकरी असलेल्या शत्रू पक्षाच्या हेराच्या हातात पडावा अशी राजाचीच ईच्छा होती. पण राजकुमाराने सोन्याचे धागे काढून ध चा मा केला. त्यामुळे नकाशा प्फितूर पहारेकर्याला मिळाला पण तो राजाच्या योजने प्रमाणे नसल्याने त्यांची नेमके रिएक्शन राजाच्या अपेक्षेप्रमाणे नसणार होते. असा ऑल्टर्ड नकाशा परत मिळूनही राजाचा प्लॅन फसला त्यामुळे त्याला नकाशा ऊपयोग अता नव्ह्ता.

-------------------------------------------------------------

प्रश्नोत्तरांची मजा अनुभवायची असेल तर प्रतिसाद जरूर वाचायला हवेत 

आपल्यालाही काही तर्क सुचत असतील तर केव्हाही टाकू शकता. आपलं स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सर्व घटने मधे किती लोकांचा अ‍ॅक्टिव्ह समाविष्ट आहे ?
>> नकाशातली माहिती पोहोचवण्याच्या घटनेत दोघांचा active समावेश आहे

राजा बाहेर गेल्यावर पहारेकर्‍याने आत जाऊन नकाशा पाहिला आणि शत्रूला माहिती कळवली. त्यानंतर राजकुमाराने नकाशा घेतला.

त्यानंतर राजकुमाराने नकाशा घेतला. आंणि फाडला. आणि आपला राजा विसराळू विनू होता म्हणून तो नकाशात काय होते ते विसरला आणि पुन्हा नविन बनवायला घेतला. अशा प्रकारे जुना नकाशा रद्दबदल झाला

Lol मोगँबो खुश हुवा

गजोधर आणि चिकू दोघांचेही तर्क अगदी बरोबर आहेत.... You.both hit the Bingo

फक्त एक addition की दोन्ही पहारेकरी कटात सामील असतात. एकजण आत जाऊन (त्याकाळच्या) कागदावर नोंदी ऊतरवतो आणि दुसरा कोणी येतंय का यावर लक्ष ठेवतो

सहज म्हणून एक शक्यता सांगतो -
याच्या पुढे असंही होऊ शकतं :

शत्रूला माहीतच नाही की राजकुमाराने नकाशा घेतला त्यामुळे राजाने व्युव्ह बदलला याची कल्पनाच नाही. ते जुन्या व्यूव्हानुसार त्यांची रणनीति आखणार आणि वेळेवर माती खाणार.
म्हणजे राजकुमाराची कृती त्याच्या वडिलांना युद्ध जिंकायला indirectly कारणीभूत ठरू शकते.

हो पण य मधे नकाशा फाडला म्हणून राजकुमार पायताण तुटू पर्यन्त मार खाणार
>>
पायताण सोनेरी कलाबुत असलेले आहे काय?
पायताण राजाचे आहे की राणीचे?
ही मारामारी शत्रुशी युद्ध होण्याआधीची आहे की नंतरची?
Light 1

I must admit, काही शक्यता माझ्या या शक्यतेपेक्षाही जास्त interesting होत्या. याच concept वर पाचसहा उत्तम गुढकथा बनू शकतात. Hats off to you all.

काय एकेक भन्नाट तर्क लावलेत ! व्वा मजा आली.

Sonali...
Waited so long for your yeeeeepy.
Got it now... Thanks _/\_ Happy

हो पण य मधे नकाशा फाडला म्हणून राजकुमार पायताण तुटू पर्यन्त मार खाणार
>> Biggrin

पायताण सोनेरी कलाबुत असलेले आहे काय?
पायताण राजाचे आहे की राणीचे?
ही मारामारी शत्रुशी युद्ध होण्याआधीची आहे की नंतरची?
>> बाब्बो Light 1

गजोधर तुम्हीपण yepee आरोळी द्या म्हणजे कोडं पुर्णपणे सुटेल >>> YEPPEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEE
EEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEE
EEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEE
EEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEEE

घ्या तुमची इच्छा पुर्ण केली

Pages