लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2017 - 15:57

दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.

____________________________

फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवीन जोडप्याला एकत्र वेळ घालवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून मनाने तसेच शरीराने जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी मधुचंद्र आयोजित केला जायचा.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच लग्नानंतर हनीमूनला जायलाच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच लग्नावर लाखो रुपये उधळणारे तेवढ्यातच आणखी लाखभर खर्च करून हनीमूनला जाऊन येतात. त्यात ट्रॅवेल एजंटना जेव्हा समजते की तुम्ही हनीमूनला निघाला आहात तर ते तुम्हाला आणखी कापू लागतात. मला मात्र हा एकूणच खर्च वायफळ वाटतो.

हल्लीच्या काळात जर लव मॅरेज असेल तर ते प्रेमी युगुल आधीच मनाने वा (काही सन्माननीय अपवाद वगळता) शरीरानेही जवळ आलेले असतात. अश्यावेळी त्या मधुचंद्राच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.

जर तुमचे अरेंज मॅरेज असेल तरी हल्ली एकमेकांना लग्नाआधी भेटून पुरेसे ओळखून घेतले जाते. त्याऊपर एकमेकांना जाणून घ्यायला अगदी मधुचंद्रालाच जायची गरज नाही. एकमेकांच्या सहवासात जाणून घेता येते. हल्ली एकत्र कुटुंब अभावानेच आढळतात. त्यातही आईवडील सोबत असले तरी नवराबायकोंना सेपरेट बेडरूम असते. त्यामुळे मनाने वा शरीराने जवळ येण्यास कुठलीही प्रायव्हसीची अडचण नसते. म्हणजे अश्या जोडप्यांनीही हनीमूनला गेलेच पाहिजे असे गरजेचे नसते.

मुळात मी ईथे नवराबायकोने फिरायला जाण्याच्या विरोधात नाहीते. आर्थिक क्षमता असेल तर वर्ष दोन वर्षातून एकदा फिरायला गेलेच पाहिजे. पण लग्नानंतर लगेचच मधुचण्द्राच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.

जसे की,
1) आर्थिक फटका - वर म्हटल्याप्रमाणे आधीच लग्नाचा खर्च त्यात लगोलग हा खर्च.

2) फिरायला आपण स्थळ काळ वेळ सीजन बघून जातो. पण ईथे लग्न मुहुर्त बघून वा ईतर बांबींनुसार जमेल तसे, जुळेल तसे केलेले असते. आणि मग लग्नानंतर फिरायला जायचेच म्हणून लोकं चुकीच्या सीजनला चुकीच्या जागी जातात.

3) सुट्ट्या - आधीच लग्नासाठी तयारी करण्याच्या वेळेपासून सुट्ट्या घेतल्या गेल्या असतात. त्यावर या आणखीच्या सुट्ट्या. करीअरच्या महत्वाच्या टप्प्यावर जेव्हा नवीन सुरू होणारया संसाराला तुमच्या नोकरीची आणि आर्थिक स्थैर्याची जास्त गरज असते, तेव्हाच ही सुट्ट्यांची लयलूट आणि कामाला कमी महत्व देणे योग्य वाटत नाही.

एक ताजे उदाहरण म्हणजे आमच्या ऑफिसमधेच दोघांचे आपापसात जुळले आणि दोघांनी अर्थातच एकाच वेळी लग्न आणि हनीमून अशी जोडून महिन्याभराची सुट्टी टाकली. एकाच वेळी एकाच टीममधले दोन ईंजिनीअर सुट्टीला गेल्याने कामाची बोंब झाली. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचे लग्न आता ऑफिसमध्ये चर्चेचा विषय झालाय.

असो, तर ही मधुचंद्राची प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.

काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर्च होणारच आहे मधुचंद्र नाहीतर marriage counselor. पैसा, करियर पेक्षा माणूस महत्वाचा नाही का? माणसाला दिलेला वेळ जास्त अमूल्य. एकदा रोजच रहाटगाडगे सुरू झाले की कुठे फक्त एकमेकांसाठी वेळ काढता येतो. मन-शरीर त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी.

मला नाही तसे वाटत.
१)काही उदाहरणांत तर काका,मामा वगैरे अगोदरच दोन तिकिटे आहेर म्हणून देतात.
२)त्यांना परवडत असेल तर आपण का रडावं?
३)लग्नाअगोदर दोनेक वर्षे रजा आणि पैसे साठवून ठेवतात.
४)टुअरवाल्याकडून जाणाय्रांची मात्र दया येते.

शिर्षक वाचून वाटले की लग्ना आधीच्या मधुचंद्राचे फॅड निघालेय, तसे असताना परत लग्नानंतर मधुचंद्र कशाला असा काही लेख आहे की काय.
असो.

वायफळ खर्च लग्नात करतात, काही करत नाहीत.
त्याच प्रमाणे वायफळ खर्च मधुचंद्रात काही करतात, काही करत नाहीत. ज्याला जेवढा खर्च झेपतो ते बघुन करावे. लग्न ही आयुष्यातील मोठी गोष्ट आहे आणि मधुचंद्र सुद्धा. राजसी यांनी म्हटल्या प्रमाणे माणसे महत्वाची. लग्ना नंतर लगेच गेले काय आणि वर्षभराने गेले काय खर्च होणारच. लग्नाचे सुरवातीचे दिवस फार मौजेचे असतात. सहा महिन्यांपर्यंत पाय परत जमिनीवर टेकतात. तेव्हा लग्नानंतर लगेच मधुचंद्राला जावे.

अरे रुन्मेष, मला माझ्या लग्नाची आठवण झाली. घरची लोकं जून्या विचारांची, हनिमूनला बाहेर जायला विरोध, काय करायचं ते घरात करा. मी आईला म्हटलें अग आई जमाना बदललाय, आई म्हणाली म्हणून काय झालं हनिमून तोच आहे ना.

लग्नात आहेर म्हणून जसे हनिमून ची तिकिटे किंवा पेकेज देतात तसे थोडे जागरूक राहून चांगल्या आणि सुरक्षित निवासांची (हॉटेल्स) यादी सुद्धा त्या त्या स्थळानुसार देत जावी. हल्ली टेक्नोलोजी चुकीच्या हातात आणि आणि चुकीच्या मार्गानेच फार लवकर वापरली जाते जसे कि हिडन/स्पाय केमेरा ... मूळ उद्देश ऑफिस कामांसाठी पण त्याचा अश्या हनिमून कपल्सना टार्गेट करण्यासाठी फार विकृतपणे वापर होत असतो. हे टाळण्यासाठी / असे हिडन केमेरा शोधण्यासाठी सुद्धा उपकरणे आहेतच त्याचा वापर नवीन दाम्पत्याने फिरायला जाताना जरूर करावा असेच सध्याच्या काळात म्हणावे लागेल.

बाकी फिरायला जाणे न जाणे हे ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार आणि ऐपतीनुसार ह्यास अनुमोदन.

ऋन्मेष दादा,
लोक लग्नात, हनिमूनला वारेमाप खर्च करतात, पण बॅचलर पार्टी देण्यात मात्र काकू करतात. हे काही ठीक नाही, जंगी लग्न करतात तर मग जंगी बॅचलर पार्टी का देत नाहीत?

हनिमून म्हणजे काय याचं आधी उत्तर दे रुन्मेष, मग पुढे बोलतो.....

–-------–
रच्याकने, "सिंजी आणि ऋ मध्ये फरक करणे योग्य आहे का असा धागा काढावा का" या प्रश्नावर एक धागा काढता येईल काय यावर धागा काढायचा विचार करतोय... Wink

जाउ दे रे ऋन्म्या त्यांना मधुचंद्राला.कोंदट ब्लॉक,वन रुम कीचन फ्लॅट,पत्र्याची घरं,जुनी माळवदं पडायला आलेली घरं इथे काय रोमँटीक आहे मला सांग?आणि प्राव्हसीची बोंबाबोंब. बहुतांश भारतीय अशाच घरात राहतात.

हनिमून हि भारतीय संकल्पना नाहीये सिंजी, LOL!!!!

आणि हनिमून म्हणजे वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांवर (किंवा चक्क प्रार्थनास्थळांवरही) जाऊन हॉटेलात सेक्स करणे एवढाच अर्थ घेणार असतील तर ते जीव महान आहेत.;-)

कोणताही खर्च वायफळ आहे की योग्य ह्याची व्याख्या व्यक्ती गणिक तसेच त्याच्या आर्थिक क्षमते प्रमाणे बदलते . आपण इथे कशाला फुकट की बोर्ड बडवा त्याव

लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का? >>> अरे , लग्न हेच एक प्रचंड मोठा वायफळ खर्च आहे तिथे लग्नानंतरच्या हनिमुनचं काय घेऊन बसलायस ? Proud

हनिमून हि भारतीय संकल्पना नाहीये सिंजी, LOL!!!!
आणि हनिमून म्हणजे वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांवर (किंवा चक्क प्रार्थनास्थळांवरही) जाऊन हॉटेलात सेक्स करणे एवढाच अर्थ घेणार असतील तर ते जीव महान आहेत.;-)
>>>>>>मग हॉटेलात जाऊन काय करायचं असतं म्हणे.?९० टक्के भारतीय दोन खोल्यांच्या घरांमधे राहतात.त्यात मुलबाळ पदरी आलं की सेक्सलाईफ बोंबलते.मग तो चोरुन करायचा प्रकार होतो.जर थंड हवेच्या ठीकाणी केलेला हनिमून आठवणीत राहणार असेल् तर का करु नये? परदेशी प्रथा आज् पण चांगली आहे की!

हा हा हा

सिंजी, 90 टक्के भारतीय दोन्खोल्यांच्या घरात राहत असलेले गरीब असतील तर त्यांच्या हनिमूनला पतपुरवठा अंबानी करतात का मल्ल्या?

आठवणीत राहायला केला जाणारा एकदाचा हनिमून सेक्स म्हणजे लग्नसोहळा नव्हे हो....

हायला, हसून हसून पॉट दुखायला लागले... राव.

आठवणीत राहायला केला जाणारा एकदाचा हनिमून सेक्स म्हणजे लग्नसोहळा नव्हे हो....>>>>>> एक दिवस हनिमुन नाही करत लोक,चांगलं आठवडाभर जातात.सेक्सच्या बाबतीत तुंबलेल्यांचा निचरा करायचा तोच मार्ग आहे.
(प्रतिसाद नियमात बसत नसेल तर उडवावा)

अरे आवरा या मुलाला

पहिले एक तर लग्नानंतरचा मधुचंद्र बदल

अजूनही ९० टक्के समाज लग्नानंतरच जातो.

गजोधर भाऊ मी नाही सुचवला, तो असाही नव्या काही तरी सेन्सशेन च्या शोधत होताच. सध्या चालू असलेल्या माबो मंथनामुळे त्याच्या वरचा फोकस हलला होता. आणि सगळे जण त्याच्या जन्माच्या आधीच्या गोष्टी बोलत असल्याने काही वावही नव्हता.
त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने त्याने ही काडी धरलीये.

आठवड्याभराच्या घमासानानंतर खडखडाट करत सात वाजून सदतीस मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी धीमी लोकल आपल्या नेहेमीच्या रुळावर येत आहे. प्रवाशांना विनंती आहे की चलती का नाम गाडी... आपलं चलती गाडी पकडनेका प्रयास न करे. ये जानलेवा हो सकता है. आपकी सुखद (हायला..... रुन्म्या आला रे आला, जरा मटकी (मूग वाली नाही... डोक्याची मंडई वाली मटकी) संभाळ वेब मास्तुरा... एक दोन तीन चार... धागे निघाले पन्नास हजार.. ) और सुरक्षित यात्रा की हम उमीद ही कर सकते है. आता बसा बोंबलत. उद्या हापिस.. आपलं खुदा हापिस

रुन्मेश सर एकदम बरोबर बोललात.
यावतचंद्रदिवाकरौ अमृताचेही पैजा जिंके मराठाची बॉल कौतुके लॅन्ग्वेजमध्ये हनि- मूनला साधा प्रतिशब्द नाही. हनी = मध , मून = चंद्र असं धेडइंग्रजी भांषांतर करून हनीमूनहा शब्द एत्तदेशीय सरकारच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक, लैंगिक दिवाळखोरीचं धडधडीत जाज्वल्य आणि आपलं ते हे उदाहरण आहे. यांची अस्वलावर बसवून धिंड काढली पाहिजे. बोला भगतसिंग की ... जय.
ही टोटल विदेशी फ्याड... हो मग! फ्याडचं म्हणायचं नाही तर काय. विवाहाचा मूळ उद्देश अपत्यप्राप्ती करून रघुकुलदीपिका पदुकोण जन्माला घालणे हा आहे. प्लॅन्ड पेरेंटहूड मुद्दामून गर्भपात पर्ल सेंटर दादर पश्चिम करून न्यू बोर्न बेबीला या जगात येण्यापासून रोखत आहे, आणि जगाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचच्या मूलभूत कर्तव्यापासुन नॅशनल रायफल असो. ला मज्जाव करत आहे अशी राजाधिराज गजपती डोनाल्ड मामांनी रणदुंदुभी फुंकून घोषणा केली आहे. बोला केलीअ‍ॅन कॉनवे की.. .तर ... ते जाउदे..
जो शब्दही आपल्या महान पूर्वजांना माहित न्हवता आणि तरीही आपण आज इथे आहोत. यातच सगळं आलं. जय हिंद. जय महाराष्ट्र.

अजूनही ९० टक्के समाज लग्नानंतरच जातो.
>>>>>>
म्हणूनच उरलेल्या 10 टक्क्यांना यातून वगळायला मी असे शीर्षक दिले.

खर्च होणारच आहे मधुचंद्र नाहीतर marriage counselor.
>>>>>>
नक्की अर्थ समजला नाही. मंधुचंद्र हा संसार सुरळीत होण्यासाठी ईतका गरजेचा आहे का? कि ही कुठली अंधश्रद्धा आहे?

पैसा, करियर पेक्षा माणूस महत्वाचा नाही का? माणसाला दिलेला वेळ जास्त अमूल्य. एकदा रोजच रहाटगाडगे सुरू झाले की कुठे फक्त एकमेकांसाठी वेळ काढता येतो. 
>>>>
मी कुठे पैश्याला माणसापेक्षा जास्त महत्व दिले. उलट आपलीच पोस्ट बघा. एकदाच हनीमूनला जाऊन खर्च करून या मग रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात जवळच्या माणसांना वेळ देता आला नाही तरी चालेन असे वाटतेय. उलट मी तर म्हणतोय रोज वेळ द्या आपल्या माणसांना. बिजी कोणीही नसते ईतके आयुष्यात फक्त प्रायोरीटी बदललेल्या असतात. आपल्या प्रायोरीटी क्लीअर असल्या तर कधी करीअर फॅमिलीच्या आड येत नाही.
बाकी उधळपट्टी रोखणे म्हणजे पैश्याचा विचार करणे असा अर्थ होत नाही.

श्या अमितव
मी लिंबुदा असतील या अपेक्षेने खाली वाचत आलो तर नाव भलतंच निघालं.
अर्थात काही वाक्ये बोल्ड नाहीत आणि अक्ख्या पोस्टमध्ये एकदाही बुप्रा, काँगी किंवा लाल्या शब्द न आल्यामुळे शंका येऊन राहिली होती.

ओह
हनीमून हा मूळ शब्द असून मधुचंद्र हे त्याचे शब्दशा भाषांतर आहे का? हे नव्हते मला माहीत...

हनिमूनला जाण्यात काय गम्मत असते ते न जाणाऱ्यांना काय कळणार? बाकी म्हटले तर सगळेच खर्च वायफळ आहेत. कोणती गोष्ट उधळपट्टी आणि कोणती वायफळ हेही सापेक्ष आहे. लग्नाआधी गफ्रेसाठी जे खर्च केले जातात ते गफ्रे बायको (स्वतःचीच) झाली तर वायफळ वाटतील. तेच आपली गफ्रे बायको(कोण्या दुसऱ्याची) झाली तरि काही मजनू पहिल्यासारखेच खर्च करत राहतील.

१)काही उदाहरणांत तर काका,मामा वगैरे अगोदरच दोन तिकिटे आहेर म्हणून देतात.
२)त्यांना परवडत असेल तर आपण का रडावं?
>>>>
जर हे फॅड गेले तर ते त्याच पैश्यात संसाराला उपयुक्त अश्या गोष्टी नाही का देणार?

३)लग्नाअगोदर दोनेक वर्षे रजा आणि पैसे साठवून ठेवतात.
>>>>>>>
लग्नासाठी पैसे साठवा हेच मुळात पटत नाही मला. आपल्याकडे मुलांच्या खास करून मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्नासाठी पैसे जोडले जातात यासारखेच झाले हे. चुकीच्या गोष्टींना आयुष्यात महत्व दिलेय.

हनिमूनला जाण्यात काय गम्मत असते ते न जाणाऱ्यांना काय कळणार?
>>>>>
पण जाऊन आलेल्यांकडून जाणून तर घेऊ शकतो.

३)लग्नाअगोदर दोनेक वर्षे रजा आणि पैसे साठवून ठेवतात.
>>>>>>>
लग्नासाठी पैसे साठवा हेच मुळात पटत नाही मला. आपल्याकडे मुलांच्या खास करून मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्नासाठी पैसे जोडले जातात यासारखेच झाले हे. चुकीच्या गोष्टींना आयुष्यात महत्व दिलेय.<<<<<<<<

तोडलस मित्रा तोडलस..

पण जाऊन आलेल्यांकडून जाणून तर घेऊ शकतो>>>>>>

मग सर्वेचा काय निष्कर्ष निघाला? वायफळ खर्च झाला असे कोणी जाहीर रित्या म्हटले का? की उगाच धागा काढायला विषय सुचत नव्हता म्हणून हा धागा?

Pages