लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2017 - 15:57

दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.

____________________________

फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवीन जोडप्याला एकत्र वेळ घालवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून मनाने तसेच शरीराने जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी मधुचंद्र आयोजित केला जायचा.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच लग्नानंतर हनीमूनला जायलाच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच लग्नावर लाखो रुपये उधळणारे तेवढ्यातच आणखी लाखभर खर्च करून हनीमूनला जाऊन येतात. त्यात ट्रॅवेल एजंटना जेव्हा समजते की तुम्ही हनीमूनला निघाला आहात तर ते तुम्हाला आणखी कापू लागतात. मला मात्र हा एकूणच खर्च वायफळ वाटतो.

हल्लीच्या काळात जर लव मॅरेज असेल तर ते प्रेमी युगुल आधीच मनाने वा (काही सन्माननीय अपवाद वगळता) शरीरानेही जवळ आलेले असतात. अश्यावेळी त्या मधुचंद्राच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.

जर तुमचे अरेंज मॅरेज असेल तरी हल्ली एकमेकांना लग्नाआधी भेटून पुरेसे ओळखून घेतले जाते. त्याऊपर एकमेकांना जाणून घ्यायला अगदी मधुचंद्रालाच जायची गरज नाही. एकमेकांच्या सहवासात जाणून घेता येते. हल्ली एकत्र कुटुंब अभावानेच आढळतात. त्यातही आईवडील सोबत असले तरी नवराबायकोंना सेपरेट बेडरूम असते. त्यामुळे मनाने वा शरीराने जवळ येण्यास कुठलीही प्रायव्हसीची अडचण नसते. म्हणजे अश्या जोडप्यांनीही हनीमूनला गेलेच पाहिजे असे गरजेचे नसते.

मुळात मी ईथे नवराबायकोने फिरायला जाण्याच्या विरोधात नाहीते. आर्थिक क्षमता असेल तर वर्ष दोन वर्षातून एकदा फिरायला गेलेच पाहिजे. पण लग्नानंतर लगेचच मधुचण्द्राच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.

जसे की,
1) आर्थिक फटका - वर म्हटल्याप्रमाणे आधीच लग्नाचा खर्च त्यात लगोलग हा खर्च.

2) फिरायला आपण स्थळ काळ वेळ सीजन बघून जातो. पण ईथे लग्न मुहुर्त बघून वा ईतर बांबींनुसार जमेल तसे, जुळेल तसे केलेले असते. आणि मग लग्नानंतर फिरायला जायचेच म्हणून लोकं चुकीच्या सीजनला चुकीच्या जागी जातात.

3) सुट्ट्या - आधीच लग्नासाठी तयारी करण्याच्या वेळेपासून सुट्ट्या घेतल्या गेल्या असतात. त्यावर या आणखीच्या सुट्ट्या. करीअरच्या महत्वाच्या टप्प्यावर जेव्हा नवीन सुरू होणारया संसाराला तुमच्या नोकरीची आणि आर्थिक स्थैर्याची जास्त गरज असते, तेव्हाच ही सुट्ट्यांची लयलूट आणि कामाला कमी महत्व देणे योग्य वाटत नाही.

एक ताजे उदाहरण म्हणजे आमच्या ऑफिसमधेच दोघांचे आपापसात जुळले आणि दोघांनी अर्थातच एकाच वेळी लग्न आणि हनीमून अशी जोडून महिन्याभराची सुट्टी टाकली. एकाच वेळी एकाच टीममधले दोन ईंजिनीअर सुट्टीला गेल्याने कामाची बोंब झाली. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचे लग्न आता ऑफिसमध्ये चर्चेचा विषय झालाय.

असो, तर ही मधुचंद्राची प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.

काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अठरा वर्षांपूर्वी लग्न झालं तेव्हा हनीमूनला न जाऊन मी पैसे वाचवले आहेत
पण आवडाबाईच्या तोंडच्या शिव्या काही अजून खळल्या नाहीत. आणि जन्मभर खळतील असं वाटत नाही.....

अवांतर:
लयी दि झालं तुम्हाला सान्गन सान्गन म्हनत व्ह्तो........
त्ये तुम्हि कव्हा कव्हा म्हये कदमच
'जोक्स द अपार्ट'
आसं टायिप करत्याय ना त्ये मला कणि लयी म्हये लऽऽऽऽऽऽयी आवडातं पघा.
यखान्द्या MNC च्या गारीगार हापिसात, त्या चाकं लावलिल्या खुडश्या राह्त्याय ना त्येच्यावं बसून्सनि गोल्गोल राऊन्ड गोल्गोल राऊन्ड्मधी भिन्गल्यागत वाटातं पघा..
जोक्स द अपार्ट वा वा....

ते सगळं राहू द्या. हनिमून पाहिजे तो राजश्रीवाल्यां सारखा. हम साथ साथ है मध्ये कसा पवित्र हनिमून दाखवला होता त्यांनी. सहकुटुंब सहपरिवार एकाच बस मध्ये "ए बी सी डी इ एफ जी एच आय " गाणं म्हणत. असा पाहिजे हनिमून !

https://www.youtube.com/watch?v=fPE3IOw5g7Q

हनीमून ते हनुमान!
विषय चघळून, मोलाच्या ४ गोष्टी सांगणाऱ्यांना पकवून(जेणेकरून ते या धाग्यावर प्रतिसाद देणार नाहीत ) नवीन खेळ खेळायला माणसं (बकरे) जमा करायला टाकलेले जाळे होते.
हनुमान कृपेने जास्त कोणी अडकले नाही, अाणि अडकले ते पण गुंतले नाहीत.

त्यात तुम्ही दोघे पहिल्यांदा एकत्र प्रवास करत असाल (अनेक दिवसांचा, डे ट्रीप नाही) तर तुमच्या दोघांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे तुम्हाला अजून कळायचे असतील >>>> 10 दिवस सगळ्याबरोबर जाण्यापेक्षा 6-8 दिवस दोघे च जा. काही दिवस घरी कुटुंबात घालवा. मुलाची मैत्रीण / मित्राची आई तो पर्यंत ठीक असते. एकदा सून/सासू झाली की समिकरणं बदलत जातात.

म्हणजे शाखाचा फॅन असून ऋ बडजात्या कॅम्पला शरण जाणार
>>>
आता यावर मी काही लिहिले आणि विषय वाढला तर धाग्यात शाहरूखला आणल्याचे बिल माझ्यावर फाटणार..
बाकी मी हनीमूनबाबत कोणाचाही आदर्श ठेवला तरी रोमान्स बाबत किंग ऑफ रोमान्सलाच आदर्श मानतो. स्टाईल आपली स्वत:ची पण प्रेरणा त्याच्याकडून घेतो Happy

शाखाची स्टाईल घे अथवा नको घेऊ, एक चांगला सल्ला असा की लग्नापूर्वी शक्य झाल्यास जोडीने डॉ शशंक सामाक यांचे व्यख्यन ऐका.
यात कसलीही चेष्टा नाही, लग्नापूर्वी आवश्यक मधल्या या गोष्टी आहेत आणि आपण आपल्याला कितीही तज्ञ समजत असलो तरी एक व्याख्यान एकल्यानं नुकसान काहीच नाही, झालाच तर फायदा होईल.

Dr. शशंक सामक... कोण आहेत हे. गूगाळून वाचायला मिळेल का यांच्याबद्दल. कुठे असते त्यांचे लेक्चर?

होय गुगल करच, लेक्चर ची जाहिरात पेपर ला येते, तू कुठल्या भागात राहतोस याची मुळीच कल्पना नाही अन्यथा सांगितले असते

मुण्बईत कुठेही जाऊ शकतो. शोधतो मी. अर्थात जोडीदार तयार पाहिजे. दोघांना तेव्हा वेळ मिळाला पाहिजे. एकटे जाणार नाही.

आणि वर सुचवलेलं काहीच पटत नसेल तर एकएकटे हनीमूनला जा >>>>>>>> श्री: काहीतरी नविन नविन आयडिया सुचवू नकोस रे ......... Happy

तुम्ही एकेकटेचे बोलत आहात.. वयात येतानाच्या माझ्या फॅन्टसी खूप भारी होत्या. मला दोन बायका असाव्यात आणि मी दोन्हींबरोबर एकत्र हनीमूनला जाबे आणि त्या दोघींचे आपापसात छान जुळावे वगैरे.. कारणही तसेच होते.. मला एक बिल्डींगमधली आणि एक दूरच्या नात्यातील बहीण (पण बहीण न मानलेली) अश्या दोन मुली एकाच वेळी आवडायच्या.. डेविड धवनचे काही पिक्चर बघून काहीतरी अशी परिस्थिती उद्भवेल की मला दोघींशी लग्न करता येईल असे फार वाटायचे. रात्री बिछान्यावर पडले की छताला डोळे लाऊन त्याच कल्पना रेंगाळायच्या Happy

तू आता आवरच. तुझे प्रतिसाद आता घसरू लागले आहेत. इथे महिला सदस्य आहेत हे कृपा करून ध्यानी घे. मनात आलेली प्रत्येक गोष्ट सोशल फोरम वर व्यक्त करणे हे निरागस नाही वाटत तर क्रिपी वाटतं.
नागव्याने फिरणारी लहान मुले गोंडस वाटतत् ती एक वयापर्यंत, त्यांनतर नाही.
आणि हे समजण्या इतके तुझे वय झाले असावे अशी आशा आहे.

आशूचॅम्प, माझ्या मनात रेंगाळणारया कल्पनांबद्दल तुम्ही अर्थ काढायला गल्लत करत आहात. कदाचित लग्न आणि हनीमून म्हणजे सेक्स हेच पटकन डोक्यात येत असल्यामुळे तसे झाले असावे. माझी पोस्ट पुन्हा वाचा. डेविड धवन चित्रपटासारख्या कश्या एकेक सिच्युएशन क्रिएट होतील आणि मला आवडणारया दोन्ही मुलींशी माझे लग्न होईल याच्या विविध कल्पना डोक्यात यायच्या. जो तुम्ही अर्थ काढताय ते काय कसे हे मला त्या वयात माहीतही नव्हते. कदाचित आजही माहीत आहे हा माझा गैरसमज असू शकतो Happy

ते अजय ह्यांनी. लिहिलेले १६ मे ची पोस्ट योग्य आहे.
कशाला लवाजमा घेवून जायचा? दोघांचे आई वडील जरी आधी पासूनच ओळखत असले तरी त्रास होतो.
रुसवे फुगवे असतातच.

सूरवातीच्या वर्षात आमच्या लग्ना नंतर, जेवायला कुठे कधी जावे ह्या मध्ये साबा आधीच मुद्दे काढत; मग माझे साबु तिच्याशी भांडत ; त्यांची भांडण शांत होइपर्यंत आम्ही दोघे नवरा बायको त्यांचा तमाशा बघायचो.
माझ्या आई वडीलांची प्रकॄती नाजूकच आणि ते आपले बघे म्हणून रहात आणि काही बाही खात न बोलता. अगदीच काही डिमांड न करता ; त्यामुळे माझ्या आई वडीलांची आवाड कधीच माझ्या सासरी विचारात नाही घेत. मी बंदच केले ते एकत्र जेवणॅ , फिरणे.

लोकं नाती टिकवायला नात्यांपासून लांब राहायला बघतात हेच का ते प्रभू रामचंद्र कह गये सीया से ऐसा कलयुग आयेगा ..

Pages