दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.
____________________________
फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवीन जोडप्याला एकत्र वेळ घालवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून मनाने तसेच शरीराने जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी मधुचंद्र आयोजित केला जायचा.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच लग्नानंतर हनीमूनला जायलाच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच लग्नावर लाखो रुपये उधळणारे तेवढ्यातच आणखी लाखभर खर्च करून हनीमूनला जाऊन येतात. त्यात ट्रॅवेल एजंटना जेव्हा समजते की तुम्ही हनीमूनला निघाला आहात तर ते तुम्हाला आणखी कापू लागतात. मला मात्र हा एकूणच खर्च वायफळ वाटतो.
हल्लीच्या काळात जर लव मॅरेज असेल तर ते प्रेमी युगुल आधीच मनाने वा (काही सन्माननीय अपवाद वगळता) शरीरानेही जवळ आलेले असतात. अश्यावेळी त्या मधुचंद्राच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.
जर तुमचे अरेंज मॅरेज असेल तरी हल्ली एकमेकांना लग्नाआधी भेटून पुरेसे ओळखून घेतले जाते. त्याऊपर एकमेकांना जाणून घ्यायला अगदी मधुचंद्रालाच जायची गरज नाही. एकमेकांच्या सहवासात जाणून घेता येते. हल्ली एकत्र कुटुंब अभावानेच आढळतात. त्यातही आईवडील सोबत असले तरी नवराबायकोंना सेपरेट बेडरूम असते. त्यामुळे मनाने वा शरीराने जवळ येण्यास कुठलीही प्रायव्हसीची अडचण नसते. म्हणजे अश्या जोडप्यांनीही हनीमूनला गेलेच पाहिजे असे गरजेचे नसते.
मुळात मी ईथे नवराबायकोने फिरायला जाण्याच्या विरोधात नाहीते. आर्थिक क्षमता असेल तर वर्ष दोन वर्षातून एकदा फिरायला गेलेच पाहिजे. पण लग्नानंतर लगेचच मधुचण्द्राच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.
जसे की,
1) आर्थिक फटका - वर म्हटल्याप्रमाणे आधीच लग्नाचा खर्च त्यात लगोलग हा खर्च.
2) फिरायला आपण स्थळ काळ वेळ सीजन बघून जातो. पण ईथे लग्न मुहुर्त बघून वा ईतर बांबींनुसार जमेल तसे, जुळेल तसे केलेले असते. आणि मग लग्नानंतर फिरायला जायचेच म्हणून लोकं चुकीच्या सीजनला चुकीच्या जागी जातात.
3) सुट्ट्या - आधीच लग्नासाठी तयारी करण्याच्या वेळेपासून सुट्ट्या घेतल्या गेल्या असतात. त्यावर या आणखीच्या सुट्ट्या. करीअरच्या महत्वाच्या टप्प्यावर जेव्हा नवीन सुरू होणारया संसाराला तुमच्या नोकरीची आणि आर्थिक स्थैर्याची जास्त गरज असते, तेव्हाच ही सुट्ट्यांची लयलूट आणि कामाला कमी महत्व देणे योग्य वाटत नाही.
एक ताजे उदाहरण म्हणजे आमच्या ऑफिसमधेच दोघांचे आपापसात जुळले आणि दोघांनी अर्थातच एकाच वेळी लग्न आणि हनीमून अशी जोडून महिन्याभराची सुट्टी टाकली. एकाच वेळी एकाच टीममधले दोन ईंजिनीअर सुट्टीला गेल्याने कामाची बोंब झाली. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचे लग्न आता ऑफिसमध्ये चर्चेचा विषय झालाय.
असो, तर ही मधुचंद्राची प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.
काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, ऋन्मेष
शेवटी काय ठरलं ऋ?
शेवटी काय ठरलं ऋ?
Bhava tu Vahini la vichar
Bhava tu Vahini la vichar aani Mag decision ghe..... Baki konache aiku nakos
srd, अजून माझे काही ठरले नाही
srd, अजून माझे काही ठरले नाही. लोकं खुलून बोलत नाहीयेत. हातचे राखून प्रतिसाद देत आहेत.
असो,
धागाकर्त्यांच्या मते प्रत्येक गोष्टीला दोनच बाजू असतात एक त्याची आणि दुसरी चुकीची
>>>>>>>>
असहमत !
माझ्यामते जगात प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात.
एक चूक, एक बरोबर, आणि तिसरी आपल्या फायद्याची.
असो,
लग्नानंतरचे सहजीवन आणि जोडीदाराला समजून घेणे वगैरे वेगळा विषय आहे आणि हनीमून हा टोटली वेगळा विषय आहे.
जेव्हा हनीमून नव्हते तेव्हा नवरा बायकोमधील नाते कसे फुलायचे याचा विचार कधी कोणी केला आहे का?
याचा ठरलेला दिसतंय
याचा ठरलेला दिसतंय
जेव्हा हनीमून नव्हते तेव्हा
जेव्हा हनीमून नव्हते तेव्हा नवरा बायकोमधील नाते कसे फुलायचे याचा विचार कधी कोणी केला आहे का?
>>>
अनेक वर्षांपुर्वी घडलेल्या गोष्टींची चर्चा आत्ता कशाला?
तेंव्हाची आणि आत्ताची परिस्थीती डिट्टो सेम आहे का?
माझी पणजी म्हणायची, तुम्हा आजकालच्या मुलींची थेरंच खुप... एक पोर जन्माला घालायचं तर वर्षाआधी पासून दवाखाने वगैरे शोधत बसता.. आम्ही १४-१४ मुलांना घरात जन्म दिलेत... आम्ही तिला उत्तर देत बसायचो नाही.. पुर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात जमिन असमानाचा फरक आहे
तेंव्हाची आणि आत्ताची
तेंव्हाची आणि आत्ताची परिस्थीती डिट्टो सेम आहे का?
>>>>
एकझॅकटली हेच मी लेखात म्ह्टलेय. हनीमूनची खरी गरज असायची परिस्थिती केव्हाच लोप पावली आहे. आता ते फक्त फॅड म्हणून ऊरले आहे.
नानाकळा >>> छान मांडलेत
नानाकळा >>> छान मांडलेत सर्व मुद्दे
सिन्जीने सांगितल्यासारखे विचार असणारे पुरुष स्वतःच्या बायकांना "फ्री सेक्सची सोय" म्हणून बघतात, मग समरसुन संभोग काय असतो ते माहित नसतं, पत्नीला उपभोग-वस्तू समजतात, आयुष्यभर संभोगाच्या खर्या आनंदापासुन मुकतात आणि मग वखवखलेल्या नजरेने इतरांच्या बायका न्याहाळत बसतात, मनातल्या मनात काल्पनिक संभोग करत.... आय जस्ट पिटी ऑन दोज पिपल. >>> होना, तसेही छेड काढणारे किंवा मुद्दाम धक्के मारणारे बहुतांशी तिशी-पस्तीशी पुढचेच असतात बर्याचदा तर अगदी म्हातारेसुद्धा,
या आणी अशाच विचारसरणीमुळे हल्ली स्त्रिया कुठेच सेफ नाहीयेत, अगदी एखाद्याला जवळचा मित्र समजुन गप्पा जरी मारल्या तरी त्याच्या डोक्यात काय चाललेय काही भरवसा नाही
१०० लवकर पूर्ण करण्यासाठी.
१०० लवकर पूर्ण करण्यासाठी. बाकी काही नाही.
आता ते फक्त फॅड म्हणून ऊरले
आता ते फक्त फॅड म्हणून ऊरले आहे.
>>
हे कसं नाही ते मी मागे एक उदाहरण दिलंय त्यात वाच
१०० लवकर पूर्ण करण्यासाठी.
१०० लवकर पूर्ण करण्यासाठी. बाकी काही नाही.
Submitted by सूनटून्या on 16 May, 2017 - 14:54
आपणास अनुमोदन
हा वायफळ खर्च तुम्ही टाळाल हि
हा वायफळ खर्च तुम्ही टाळाल हि अपेक्षा
हे कसं नाही ते मी मागे एक
हे कसं नाही ते मी मागे एक उदाहरण दिलंय त्यात वाच
>>>>>
आई म्हणाली आयुष्यात कधी मागे वळून बघू नकोस.. पुन्हा कॉपीपेस्ट कर
जोक्स द अपार्ट, अपवादांनी नियम सिद्ध होतो. आपण फार मोठा सॅम्पल घेऊया. बहुतांश लोकांच्या हनुमान बद्दलच्या कल्पना टिपिकल असतात आणि तो टिपिकल पद्धतीनेच साजरा होतो.
हा वायफळ खर्च तुम्ही टाळाल हि
हा वायफळ खर्च तुम्ही टाळाल हि अपेक्षा
>>>>>
मी तर खर्च वाढवायचा विचार करतोय.
या धाग्याच्या निमित्ताने गर्लफ्रेंडशी चर्चा झाली. तिला एक कल्पना दिली. हनीमूनला आपण तुझे आणि माझे दोघांचे कुटुंब घेऊन गेलो तर. पुर्णवेळ नाही तर आधी आम्ही जाउन ते आम्हाला चार दिवसांनी जॉईन करणार किंवा एकत्र जाऊन चार दिवस एकत्र फिरल्यावर ते परत येणार वा ते आणि आम्ही वेगवेगळ्या जागी जाणार... तुर्तास तिलाही ही कल्पना आवडली आहे.
अहो भरल्या बाजारी धनी मला
अहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं
हेरलं ते हेरलं अन् लगीन अपुलं ठरलं
लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो ठरलं
लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
रातभर एकली जागू कशी ?
सासूला अडचण सांगू कशी ?
घरात पाव्हणं न् दारात मेव्हणं
एकांत मिळेना भेटायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जातानं दोघं न् येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
बहुतांश लोकांच्या हनुमान
बहुतांश लोकांच्या हनुमान बद्दलच्या कल्पना टिपिकल असतात आणि तो टिपिकल पद्धतीनेच साजरा होतो. >> हनुमान???
हनुमान जयंती असेल.
हनुमान जयंती असेल.
ऋ चा हनीमुन ते हनुमान प्रवास
ऋ चा हनीमुन ते हनुमान प्रवास छान आहे
आम्ही शाळेत प्रयोगाच्या
आम्ही शाळेत प्रयोगाच्या तासाला अनुमानला हनुमान बोलायचो ते आठवले ..
मी तर खर्च वाढवायचा विचार
मी तर खर्च वाढवायचा विचार करतोय.>>>>>> ये ना चालबे. वायफळ खर्च टाळता टाळता २ ऐवजी एकूण ६ जणांचा खर्च करावा लागेल शिवाय परस्परांचे आईवडील नोकरी करीत असतील तर ६ जणांची एकदम सुट्टी आणि मॅन पॉवरचा र्हास.
परत त्यातून ग.फ्रे.ला छोटी बहीण-भाऊ असतील तर त्याच्या/तिच्याकडे कोण बघणार म्हणून त्याला/ तिला घेऊन जायला लागेल.पहा बरे, १ लग्न किती वायफळ गोष्टींना जन्म देते.
आम्ही लग्न रजिस्टर पद्धतीने
आम्ही लग्न रजिस्टर पद्धतीने करायचे ठरवले आहे आणि ज्या दिवशी करणार त्याच संध्याकाळी हनीमूनला रवाना. त्यामुळे अतिरीक्त खर्च नाही होणार.
अरे पण मुळात हनिमून हाच एक
अरे पण मुळात हनिमून हाच एक वायफळ खर्च आहे त्यात परत सोबत आईवडिलांच्या २ जोड्या सोबत.
हनिमूनचा खर्च करण्यास तुझे मतपरिवर्तन झालेच तर!
माझा फिरण्यावर खर्च करण्यास
माझा फिरण्यावर खर्च करण्यास आक्षेप नव्हताच हे मी लेखातच नमूद केले आहे.
पण हनीमून का कश्याला गरज आहे का नाही याचा विचारही न करता झालेय लग्न तर हनीमूनला जायलाच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील या विचारसरणीवर आक्षेप आहे.
माझं लग्नं ठरल्यावर आमच्या
माझं लग्नं ठरल्यावर आमच्या दोघांच्याही घरातल्यांनी हनिमूनला कुठे जाणार हा प्रश्न आम्हाला विचारला होता. लग्नानंतर आम्ही दोघंही स्वतंत्र राहणार असल्याने मुद्दाम हनिमूनला जाण्याची आवश्यकता नाही असं आमचं दोघांचंही मत होतं. वडिलधार्यांच्या समाधानासाठी लग्नं वैदीक पद्धतीने सर्व धर्मसंस्कार करुन आणि हॉलमध्ये केलं होतं, पण आहेर घेणार नाही असं पत्रिकेत स्पष्टं नमूद केलं होतं. त्यातूनही ज्यांना कोणाला काही देण्याची इच्छा होती त्यांना केवळ रोख रक्कम द्यावी अशी सूचना केली होती. आहेराची जमा झालेली रक्कम आणि हनिमूनचा साधारण एस्टीमेट केलेला खर्च अशी सगळी मिळून आलेली रक्कम आनंदवनाला हातभार म्हणून दिली. अर्थात यात आम्ही फार काही केलं असं अजिबात नाही, दान केलं असं तर मुळीच म्हणणार नाही कारण दान वगैरे करण्याएवढी आमची पात्रता नाही, पण ऋण फेडण्याचा प्रयत्नं म्हणून करणं शक्यं होतं ते केलं.
लग्नानंतर कुठेही जात असाल
लग्नानंतर कुठेही जात असाल (त्याला हनिमून म्हणा वा न म्हणा) कुठ्ल्याच नातेवाईकाना (आणि अगदी मित्रानासुद्धा) बरोबर घेऊन जाऊ नका असे मी सुचवेन.
कुठल्याही मोठ्या प्रवासात काही टाळकी एकत्र आली की ( अगदी अनेक वर्षांचे जिवलग मित्र असले तरी) मतभेद होतातच. कोण पटकन/उशीरा तयार होतो त्यापासून कुणाला काय खायला आवडते, आवडत असेल तरी त्या वेळेस खाण्याचा कुणाला काय मूड आहे, कोणाचे खर्च करण्याबद्दलचे काय मत आहे अशा अनेक गोष्टींबद्दल वाद टाळणे शक्य नसते. आणि त्यात तुम्ही दोघे पहिल्यांदा एकत्र प्रवास करत असाल (अनेक दिवसांचा, डे ट्रीप नाही) तर तुमच्या दोघांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे तुम्हाला अजून कळायचे असतील. त्यातले वाद वेगळेच. नातेवाईक असतील तर त्यांचे प्रेमाने दिलेले वैयक्तिक सल्ले (तू आतापासून त्याचं/तीच एकून वाईट पायंडे पाडू नकोस. आतापासूनच ठाम रहायला रहा) हे आणखीन टाळणं अशक्य असतं. त्यामुळे कुठेही जायचं ठरवलंत तर दोघानीच जा असं मी सुचवेन.
या विषयावर पूर्वी माबोवर
या विषयावर पूर्वी माबोवर चर्चा होऊन गेल्याचे प्पुसटसे आठवते आहे...

तेव्हा तिथे बरेच काही पोटतिडिकीने लिहिल्याचेही स्मरते...
हा वायफळ खर्च टाळायचा असेल तर
हा वायफळ खर्च टाळायचा असेल तर जायफळ चाटून आपल्याच घरी गाढ झोपून जाऊ शकतो>> हा भन्नाट प्रतिसाद आहे.
@ ॠन्मेष, ह्या चर्चेचा विषयच
@ ॠन्मेष, ह्या चर्चेचा विषयच सापेक्ष आहे. त्यामुळे सगळ्यांचे एकमत कसे होणार?
@अजय +१
तुर्तास तिलाही ही कल्पना
तुर्तास तिलाही ही कल्पना आवडली आहे.
>>
मलाही आवडते ही कल्पना पण तरी कितपत जमतं हे हे त्यावेळेचं त्या वेळेलाच ठरतं..
मी दिलंय ते एक उदाहरण, अशी प्रत्येकाची दृष्टी आणि त्यावेळेची परिस्थीती हा वायफळ खर्च आहे का नाही ते ठरवते..
आपण आपल्यापुर्तं ठरवावं आणि ते करावं... लोकांना काय करायचंय ते त्यांना करू देत
हनिमून केला नाही म्हणून
हनिमून केला नाही म्हणून हसणारे कोण लोक आहेत ते मला एकदा बघायची इच्छा आहे.
इथे तुम्ही जगलाय का मेलाय याची पर्वा नसते, जो तो आपल्या व्यापात. तिथे ऋ हनिमून ला गेला नाही यावर चर्चा सत्र घडवून आणतील, हास्य क्लबत विषय देतील.
ऋ हनिमून ला गेला नाही हा हा हा
हो हो हो खी खी खी
नशीबवान आहेस लेका खरे
मुळात कार्यालय वगैरे घेऊन,
मुळात कार्यालय वगैरे घेऊन, सगेसोयरे सहित पैपाहुणे म्हणत हजाराच्या संख्येने माणसे बोलावित, घोडे नाचवित, अन बरेच काय काय करीत होत असलेले हल्लीचे विवाहसोहळे, हाच मुळात एक मोठ्ठा वायफळ खर्चाचा (पैसे अन वेळ) विष्गय आहे.
हनिमुन नंतरची गोष्ट.... !
Pages