लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2017 - 15:57

दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.

____________________________

फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवीन जोडप्याला एकत्र वेळ घालवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून मनाने तसेच शरीराने जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी मधुचंद्र आयोजित केला जायचा.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच लग्नानंतर हनीमूनला जायलाच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच लग्नावर लाखो रुपये उधळणारे तेवढ्यातच आणखी लाखभर खर्च करून हनीमूनला जाऊन येतात. त्यात ट्रॅवेल एजंटना जेव्हा समजते की तुम्ही हनीमूनला निघाला आहात तर ते तुम्हाला आणखी कापू लागतात. मला मात्र हा एकूणच खर्च वायफळ वाटतो.

हल्लीच्या काळात जर लव मॅरेज असेल तर ते प्रेमी युगुल आधीच मनाने वा (काही सन्माननीय अपवाद वगळता) शरीरानेही जवळ आलेले असतात. अश्यावेळी त्या मधुचंद्राच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.

जर तुमचे अरेंज मॅरेज असेल तरी हल्ली एकमेकांना लग्नाआधी भेटून पुरेसे ओळखून घेतले जाते. त्याऊपर एकमेकांना जाणून घ्यायला अगदी मधुचंद्रालाच जायची गरज नाही. एकमेकांच्या सहवासात जाणून घेता येते. हल्ली एकत्र कुटुंब अभावानेच आढळतात. त्यातही आईवडील सोबत असले तरी नवराबायकोंना सेपरेट बेडरूम असते. त्यामुळे मनाने वा शरीराने जवळ येण्यास कुठलीही प्रायव्हसीची अडचण नसते. म्हणजे अश्या जोडप्यांनीही हनीमूनला गेलेच पाहिजे असे गरजेचे नसते.

मुळात मी ईथे नवराबायकोने फिरायला जाण्याच्या विरोधात नाहीते. आर्थिक क्षमता असेल तर वर्ष दोन वर्षातून एकदा फिरायला गेलेच पाहिजे. पण लग्नानंतर लगेचच मधुचण्द्राच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.

जसे की,
1) आर्थिक फटका - वर म्हटल्याप्रमाणे आधीच लग्नाचा खर्च त्यात लगोलग हा खर्च.

2) फिरायला आपण स्थळ काळ वेळ सीजन बघून जातो. पण ईथे लग्न मुहुर्त बघून वा ईतर बांबींनुसार जमेल तसे, जुळेल तसे केलेले असते. आणि मग लग्नानंतर फिरायला जायचेच म्हणून लोकं चुकीच्या सीजनला चुकीच्या जागी जातात.

3) सुट्ट्या - आधीच लग्नासाठी तयारी करण्याच्या वेळेपासून सुट्ट्या घेतल्या गेल्या असतात. त्यावर या आणखीच्या सुट्ट्या. करीअरच्या महत्वाच्या टप्प्यावर जेव्हा नवीन सुरू होणारया संसाराला तुमच्या नोकरीची आणि आर्थिक स्थैर्याची जास्त गरज असते, तेव्हाच ही सुट्ट्यांची लयलूट आणि कामाला कमी महत्व देणे योग्य वाटत नाही.

एक ताजे उदाहरण म्हणजे आमच्या ऑफिसमधेच दोघांचे आपापसात जुळले आणि दोघांनी अर्थातच एकाच वेळी लग्न आणि हनीमून अशी जोडून महिन्याभराची सुट्टी टाकली. एकाच वेळी एकाच टीममधले दोन ईंजिनीअर सुट्टीला गेल्याने कामाची बोंब झाली. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचे लग्न आता ऑफिसमध्ये चर्चेचा विषय झालाय.

असो, तर ही मधुचंद्राची प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.

काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानाकळा, मी प्रश्न विचारलाच नाहीये. ते एक उत्तरच आहे आपल्या प्रश्नाला. मला ऊत्तर अपेक्षितच नाहीये त्याचे. आपण हवे तर त्याचे ऊतर शोधू शकता. आपल्याला आपल्या प्रश्नाचे ऊत्तर मिळेल.

पण लग्न म्हणजे काय यावरून एक प्रश्न पडलाय.
जर लग्न झाल्यावर दोघांपैकी एकाने सेक्ससाठी नकार दिला तर दुसरयाला या कारणाने घटस्फोट मिळू शकतो का?

हो, मिळतो ना..

माझं म्हणणं आहे की लग्न फक्त सेक्ससाठी होत नाही, याचा अर्थ "विवाहितांमध्ये सेक्स नसेल तरी चालतं" असा का घेत आहात?

सिन्जि म्हणतात तसा जर फक्त सेक्ससाठीचा मामला आहे तर मग शिक्षण, उंची, पगार, हुंडा, जात, जमिनजुमला, दागदागिने, मानपान, सोहळे, इत्यादी प्रकार हवेच कशाला?

मुलींच्या आणि मुलांच्या वरवधूंच्या अपेक्षेत "चांगला सेक्स अपेक्षित" एवढेच असावे ना? नै का? काय करायचंय ते पगारपाणी, शिक्षण, घरदार इत्यादी,

मी तरी कुठे म्हणालो फक्त सेक्ससाठी होते पण हे मुख्य कारण नाही का?

आता आपण कपडे का घालतो? लज्जा निवारणासाठी. मग लज्जा निवारणच करायचे असेल तर कपड्यांची स्टाईल, कलर, फिटींग, क्वलिटी अश्या कैक गोष्टी का बघतो Happy

ऋन्मेष हो.
माकड गावले नाही की माणुस शेवटी तेच करतो.

चलो भैय्या.... तू नेहमीप्रमाणे सुरु झालायस... धाग्यावरुन कल्टी मारलेली उत्तम. Happy

चालुद्या...

मानवजी, माकड हे माकड असते म्हणून त्याच्या गुणधर्माने फसते. माणूस हा माकडापेक्षा वेगळा याच साठी आहे की तो आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी एकाच वेळी कश्या मिळवगा येतील यासाठी डोके चालवतो, प्रयत्न करतो.

तरी जाता जाता एवढे सुचलेच आहे ते टैप करुन जातो.

आता आपण कपडे का घालतो? लज्जा निवारणासाठी. मग लज्जा निवारणच करायचे असेल तर कपड्यांची स्टाईल, कलर, फिटींग, क्वलिटी अश्या कैक गोष्टी का बघतो

कपडे म्हणजे वस्तू.... तर ज्याच्याशी लग्न करतोय ती एक उपभोगायची वस्तु आहे असे अभिप्रेत आहे तर....

घरी 'फ्रीसेक्स'साठी घरी आणलेल्या मुलीकडून " तीने माझ्या आईवडिलांची काळजी घ्यावी, सासुसासर्‍यांना मान द्यावा, स्वयंपाक करुन कुटूंबाला खाऊ-पिऊ घालावे, नोकरी करत असेल तर पगार घरच्यांवरच खर्च करावा, घरचे सगळे कुळाचार, कुळधर्म पाळावे, माझी पोरे पैदा करावी, त्यांना सांभाळावे, माझ्याशी एकनिष्ठ राहावे, परक्या पुरषाकडे ढुंकून पाहू नये तसे विचारही मनात आणू नये." अशा अपेक्षा का बाळगाव्या?

कपडे लज्जा रक्षणासाठी आणि शोबाजीसाठी आहेत ना, मग तेवढाच त्याचा उपयोग असावा नैका... त्या कपड्यांनी तुमच्या घरच्या लाद्या पुसाव्या, कार वरची धूळ झटकावी, पायपुसणे म्हणून भूमिका करावी हे कशाला?

लग्न हे सेक्ससाठी होत असेल तर मग तितकीच अपेक्षा असते का? मान्य आहे की तुम्ही रंग, रुप, बांधा वगैरे सर्व बघून मुलगी पसंत करता. ते एकवेळ एक्सेप्टेबल आहे.... हे बाकीचे लचांड कशाला पायजे वो...?

सिन्जीने सांगितल्यासारखे विचार असणारे पुरुष स्वतःच्या बायकांना "फ्री सेक्सची सोय" म्हणून बघतात, मग समरसुन संभोग काय असतो ते माहित नसतं, पत्नीला उपभोग-वस्तू समजतात, आयुष्यभर संभोगाच्या खर्‍या आनंदापासुन मुकतात आणि मग वखवखलेल्या नजरेने इतरांच्या बायका न्याहाळत बसतात, मनातल्या मनात काल्पनिक संभोग करत.... आय जस्ट पिटी ऑन दोज पिपल.

सिन्जीने सांगितल्यासारखे विचार असणारे पुरुष स्वतःच्या बायकांना "फ्री सेक्सची सोय" म्हणून बघतात, मग समरसुन संभोग काय असतो ते माहित नसतं, पत्नीला उपभोग-वस्तू समजतात, आयुष्यभर संभोगाच्या खर्या आनंदापासुन मुकतात आणि मग वखवखलेल्या नजरेने इतरांच्या बायका न्याहाळत बसतात, मनातल्या मनात काल्पनिक संभोग करत.... आय जस्ट पिटी ऑन दोज पिपल.
Submitted by नानाकळा on 14 May, 2017 - 15:35
>>>>
समरसुन संभोग हा काय प्रकार कळला नाही!
बायॉलॉजीमध्ये संभोगाला copulation असा फडतुस शब्द आहे.

तुम्ही एका टोकाचे बोलत आहात सिंजी एका टोकाचे बोलत आहात. फॅक्ट या दोघांच्या मध्ये आहे.
मनुष्य हा ईतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे पण आहे एक प्राणीच. हे यामागचे कारण आहे.
सविस्तर उद्या बोलूया.

नाना असे बोलतायत की जसा काय फक्त मुलाला सेक्स हवा असतो? मुलीलपन्न हवा असतो सेक्स..
बायको फ्री सेक्स ची सोय हा मुद्दा पटला नाही...

च्रप्स... मुलांच्या बाजूनेच सध्या सिन्जी बोलत आहेत, त्याला प्रत्युत्तर आहे. विषय 'सेक्सची सोय म्हणून लग्न केले' ह्या त्यांच्या मित्रांच्या उत्तरावर आणि सिन्जी जे माझ्या प्रतिसादावर हसण्याबद्दल बोलत आहेत त्याबद्दल आहे. चील!

बाकी, मुलींना काय हवे ते तुम्ही कशाला सांगताय... मुलींना सांगू दे की... ! तेव्हा बघू त्यांचेही.. शिक्षण, नोकरी, गाडी-घर वगैरे त्यांनाही हवेच असते की... अपेक्षांची लाइन दोन्हींकडे आहे. त्यात 'उत्तम सेक्स अपेक्षित' असे कुठेच यादीत दिसले नाही आजवर दोघांच्याही. तरी धागाकर्ते लग्न हे सेक्ससाठीच असते ह्यावर कपड्यालत्त्याच्या स्टाइल-कलर ची असंबंद्ध उदाहरणे देत आहेत. आधी लग्न म्हणजे काय ते तर ठरु द्या.

कोणीही उत्तर द्या मग...!

--------------------------------------

समरसुन संभोग हा काय प्रकार कळला नाही!

ह्यांगाश्शी..... हा प्रकार कळण्यासाठी आधी संभोग झालेला हवा. नैका. नुसतं बुकिश लेक्चर ऐकून कसं समजणार सिन्जी.....?

अवांतर प्रश्नः ते लग्न झालेल्या स्त्रीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कसा करु वाला धागा काढणारे कोणतेवाले जिनियस होते... सिन्टेथिक का अजून कोणी...?

हे भगवान!!!!
ऋ, काढलासच का धागा
आशुचॅम्प्चा निषेध Lol

नानाकळा, छान पोस्टी

त्यात 'उत्तम सेक्स अपेक्षित' असे कुठेच यादीत दिसले नाही आजवर 
>>>>>

वधू हवा किंवा वर हवा असे का असते? निव्वळ जोडीदार हवा असे का नसते? लिंग अमुकतमुकच हवे हा हट्ट कश्याला...
आणि फोटो का हवा असतो? बाह्य सौण्दर्य का बघितले जाते?

नानाकळा, फार मस्त पोस्ट...प्रत्येक लग्न झालेल्या / होणार्यांना वाचायला द्यावी अशी Happy
हनिमून हवे की नको हे प्रत्येकाच्या मानसिक गरजेवर आणि आर्थिक परिस्थीतीवर अवलंबून असते..
उदाहरण देते - माझ्या २ मैत्रिणींचे लव्ह मॅरेज झाले आत्ता काही महिन्यांपुर्वी...त्यात लं एक कपल हनिमून ल गेलेलं दुसरं नाही...
यावर आमचं डिस्कशन झालं ( कोणी लग्ना नंतर हनिमूनला जात नाहीये म्हणलं की आपसूकच मी पण 'का?' हा प्रश्न विचारते.. गेलंच पाहिजे असं माझं मत नाही तरीही न कळत होतंच ते) त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते मलाही पटलं..
पहिली मैत्रिण जी हनिमूनला गेलेली नाही ती म्हणाली ' आम्ही इतक्या वर्षांपासून सोबत आहोत, आम्हाला नव्याने एकमेकांना ओळखायची गरज नाही.. अर्थातच बॉयफ्रेण्ड आणि नवर्‍यामधे फरक असतोच पण तो तसाही हनिमूनच्या १५ दिवसांमधे कळतोच असं काही नाही.. मला सद्ध्या त्याला नवरा म्हणून ओळखण्याची एवढी घाई झालेली नाहीये. पण घरातली सगळीच माणसं मला नविन आहेत, त्यांना ओळखणं जास्त महत्वाचं वाटतंय मला.. तेंव्हा ऑफिसमधून सुट्टी घेऊन हा जो काळ रिकामा मिळालाय तो आई-बाबांना समजून घेण्यात इन्वेस्ट करायचं ठरवलंय'
दुसरी मैत्रिण जी हनिमूनला गेलेली ती म्हणाली ' आम्ही इतके वर्ष स्ट्रगल करून घरून होकार मिळवलाय. इथुन पुढे काही दिवस सासू सासर्‍यांचे टोमणे ऐकायचे आहेतच. आता यात पडलोय म्हणजे ते एक्सेप्ट करूनच चाललोय आम्ही सो म्हणूनच इतके दिवस केलेल्या धावपळीचा. त्रासाचा उतारा म्हणून म्हण किंवा स्वतःला शाबसकी म्हणून म्हण पण आम्ही हनिमूनला जायचं ठरवलंय'

मला दोन्ही मतं पटली...

नानाकळा, जगात काही लोकांना हे विचार समजणं अवघड असतं, अशांकडे दुर्लक्ष करावं हेच उत्तम... तुम्ही फार चांगल्या गोष्टी लिहिताय पण इतर लोकांमुळे चर्चेला वेगळं वळण लागतंय.. माझ्यामते तुम्ही त्यांना उत्तर देणं टाळावं Happy

अवांतर प्रश्नः ते लग्न झालेल्या स्त्रीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कसा करु वाला धागा काढणारे कोणतेवाले जिनियस होते... सिन्टेथिक का अजून कोणी...?>>>>>>>
>>मीच हो तो.थेट विचारलं होतं धाग्यात .ताकाला जाऊन भांडे लपवत नाही आम्ही.
सिधी बात नो बकवास(समरसुन सेक्स म्हणजे सेक्स दरम्यान पार्टनरच्या कानात " हे समरसुन चाललयं बर्का! असे कुजबुजायचे Biggrin )

नानाकळा उत्तम पोस्ट
नानाकळा, जगात काही लोकांना हे विचार समजणं अवघड असतं, अशांकडे दुर्लक्ष करावं हेच उत्तम... तुम्ही फार चांगल्या गोष्टी लिहिताय पण इतर लोकांमुळे चर्चेला वेगळं वळण लागतंय.. माझ्यामते तुम्ही त्यांना उत्तर देणं टाळावं +++++११११११

नानाकळा तुम्ही कोणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय
धागाकर्त्यांच्या मते प्रत्येक गोष्टीला दोनच बाजू असतात एक त्याची आणि दुसरी चुकीची

धन्यवाद, मंडळी!

मला लिहायचे ते लिहून झाले आहे. भलतीकडे जाण्यापेक्षा थांबलेलं बरं.

{{{ नानाकळा तुम्ही कोणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय
धागाकर्त्यांच्या मते प्रत्येक गोष्टीला दोनच बाजू असतात एक त्याची आणि दुसरी चुकीची
नवीन Submitted by manalee on 15 May, 2017 - 12:29 }}}

जगातलं अंतिम सत्य का म्हणतात तेच सांगितलंत तुम्ही. तुमच्या प्रतिसादाशी प्रत्येक माबोकर नक्कीच सहमत असेल.

काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते. खरं कि काय ?
तुझं कधी काही चुकू शकत का ?तुझं कधी काही चुकू शकत का ? काहीही हं ऋ

नानाकळांची पोस्ट आणि त्याला चान चान म्हणणारे ढीगभर लोकं पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या ;-(

* लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नाही
* बायको ही नवर्याची मालमत्ता आहे
'या कायद्यांबद्दल लोकांचे काय मत?' असे विचारले असता एका जालप्रसिद्ध लेखकाने असलीच काहीतरी पोस्ट टाकलेली. अन् त्यावर बरेच आहाहा ओहोहो प्रतिसाद आले होते.

'अहो लग्नाबद्दलचे जे कायदे आहेत त्याबद्दल बोला' म्हणलं तर दुसर्या एक आदरणीय स्त्रिवादी विदुषी 'एकत्र लोन घेता येतं, कंपनीकडून विमा मिळतो' वगैरे लालुच दाखवू लागल्या.

हमसूनहमसून ललु आलं की ओ मला :-/

असो. कोणाला महत्वाचे वाटत असेल तर विवाहसंस्थेला कंट्रोल करणारे कायदे माहीत करुन घ्या लग्नाआधी.

Pages