६४वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेता-अक्षय कुमार

Submitted by टीना on 8 April, 2017 - 13:55

सध्या चालू असलेला गदारोळ बघुन राहावलं नाही म्हणुन हा धागाप्रपंच..

यावर्षीचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'चा पुरस्कार 'रुस्तम' या चित्रपटासाठी 'अक्षय कुमार' याला प्रदान करण्यात आला.. याबद्दल सगळ्यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या.

या विभागातील पुरस्कारकरिता असलेल्या ११ ज्युरींच्या टिमबद्दल सगळ्यांनी बेकार जुरी डिसीजन असे निकष काढलेले दिसत आहे. यात मुख्य असलेल्या 'प्रियदर्शन' ला सर्वांनी टारगेट करुन केवळ अक्षय कुमारला फेवर करायचा म्हणुन त्याला पुरस्कार दिला असे आरोप लोकं त्याच्यावर करत असलेले दिसताहेत.

प्रियदर्शनला याबाबत विचारले असता त्याने दिलेल्या उत्तरात,
१. तुम्ही ज्युरींच्या निर्णयाचा आदर करायला हवा. या पुरस्कारांमधे जनतेचे मत नाही तर ज्युरींचे मत चालते
२. तुम्ही त्या अभिनेत्याच्या अभिनयावर शंका घेत आहात का?
३. जो व्यक्ती (आमिर खान-दंगल) पुरस्कार स्विकारायला नाकारतो अशा व्यक्तिला राष्ट्रपती देत असलेला पुरस्कार नाकारायचा मौका देऊन त्या पुरस्काराचा अपमान करायचा का?
४. ज्युरींना 'अलिगड' वा इतर चित्रपट अपिल झाले नाहीत म्हणजे त्यांचा निर्णय चुक आहे अस म्हणता येईल का?
५. पिकुकरिता अमिताभ बच्चन ला पुरस्कार मिळाला, अजय देवगन ला गंगाजल चित्रपटाकरिता पुरस्कार मिळाला त्यावेळी ज्युरींमधे रमेश सिप्पी अन प्रकाश झा होते तेव्हा त्यांच्यावर असले आळ घेण्यात आले नाही अन माझ्यावर असे आरोप का लावल्या जात आहे?
असे प्रतिवाद केले.

इतर कुठल्याही पुरस्काराबद्दल साशंक नसलेले लोक फक्त या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उठवत असताना माबोकरांच याबाबत काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.

तुम्हाला काय वाटतं ?

तळटिप :
माहिती नाही हा धागा असावा कि नसावा... उगाच भारंभार धागे काढण्याचा माझा स्वभाव नाही पण माझ्या आवडत्या अभिनेत्याबद्दल अन ऐन ऐरणीवर असलेल्या या वादामुळे हा धागा काढलाय..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिना, साशंक चं चुकून शाशंक झालं आहे! ते बदल.
अक्षय कुमार आवडतो पण रुस्तम त्याचा राष्ट्रीय पुरस्कार योग्य सिनेमा/भुमिका आहे असं मला वाटत नाही. अर्थात हेमावैम. बाकी, you can't please everyone always. तेव्हा वाद स्वाभाविक आहेत.

कडक इस्त्री असलेल्या चेहर्याच्या अभिनयाला राष्ट्रभक्ती पुरस्कार

एअऱलिफ्टसाठी दिला असता तर चालले असते

रुस्तम मधे सगळेच भावनाहीन चेहर्याने वावरले होते, अक्षय, इशा, इलियाना सगळे एकापेक्षा एक होते

रुस्तम मी पाहिला नाहीये. पण आजवर अक्षयकुमारचे जे चित्रपट पाहिलेत त्यात त्याने कुठेही राष्ट्रीय पुरस्कारतोड अभिनय केला नाहीये.

बाकी आमीर खान फक्त फिल्मफेअर नाकारतो कारण तेथील ज्युरी शाहरूख आपल्या खिशात घेऊन फिरतो. राष्ट्रीय पुरस्कारांशी त्याचे सध्या तरी काही वाकडे नाहीये. या वर्षी होऊ शकते Happy
पण त्यानेही दंगलमध्ये अ‍ॅक्टींग तोडली होती अश्यातला भाग नाही.

रुस्तम मधे सगळेच भावनाहीन चेहर्याने वावरले होते, अक्षय, इशा, इलियाना सगळे एकापेक्षा एक होते
>>>>>
शून्य एक्स्प्रेशन्स हा देखील एक उच्च अभिनयाचा प्रकार आहे.
जसे झिरो फिगर सुद्धा एक वाखाणण्याजोगी फिगर असते तसेच ..

IMO - मनोज वाजपेयी ला मिळायला पाहिले होता.. पण नॅशनल अवॉर्डस एक जोक आहे... हम तुम बद्धल सैफ ला मिळू शकतो तर अक्षय ला का नाही...

हम तुम बद्धल सैफ ला मिळू शकतो तर ... अच्छा हे पण झालेले का? मग ठिक आहे, परंपराच असेल तर ...

बाकी गेल्या वर्षी यालाही मिळालेला की ...
http://www.maayboli.com/node/58199
मलाही हे पचनी पडले नव्हते.

अवांतर - बाई वर्ष झाले या गोष्टीला.. दिवस कसे जातात ना..

अतिअवांतर - फेसबूकमध्ये हल्ली ते मेमरीज प्रकरण सुरू केलेय तसे मायबोलीवर देखील करायला हवे. म्हणजे आजच्याच तारखेला अमुक तमुक वर्षांपूर्वी तुम्ही हा धागा काढलेला वगैरे.. मजा येईल.

>>या विभागातील पुरस्कारकरिता असलेल्या ११ ज्युरींच्या टिमबद्दल सगळ्यांनी बेकार ज्युरिस्डिक्शन असे निकष काढलेले दिसत आहे.<<
माझंहि राष्ट्रीय पुरस्कारांबाबत काहिसं असंच मत होतं, पण या लेखाच्या निमित्ताने विकिवर आत्तापर्यंतच्या विजेत्यात शारुखचं नांव नाहि हे वाचुन ज्युरींबद्दल माझ्या मनांत थोडाफार असलेला आदरभाव दुणावला... Proud

अक्षय कुमार हा कंप्लीट पॅकेज आहे - हि डिझर्वड इट!

अक्षय कुमार हा कंप्लीट पॅकेज आहे--- एंटरटेरमेटचा
अभिनयाचा नव्हे Wink अमिताभ, अमीर ,मनोज असताना अक्षयला मिळणे हास्यापद आहे

मला अक्षय कुमार, अगदी त्याच्या खिलाडी सिरीज पासून आवडतो. त्याच्या अभिनयाला मर्यादा असल्या तरी त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कुणालाच शंका असायला नको.
मी रुस्तम बघितला नाही पण जी परिक्षणे वाचली त्यावरुन त्यात त्याचा अभिनय उत्तम असावा असे काही वाटले नाही.
( तो चित्रपटहि फार ग्रेट असावा असे वाटत नाहि. )
बेबी, एअरलिफ्ट, स्पेशल २६ वगैरे जास्त चांगले होते.
शिवाय हा काही एकमेव पुरस्कार नाही, इतरही पुरस्कार अमिर ला देता येतीलच कि.

अमिताभ, अमीर ,मनोज असताना अक्षयला मिळणे हास्यापद आहे.

<<

अमिताभ, अमीर आणि अभिनय ??? Lol

अंदाज अपना अपना या सिनेमात आमिरचा व अमिताभ यांच्या लाल बादशाह पासून पुढे आलेल्या, त्यांच्या इतर सर्व सिनेमातील "अभिनय" अगदी ऑस्करच्या तोडीचा होता.

असे जुरींचे विचार असतील तर अक्षय ला का नाही मिळणार Happy
अलिगड मधला मनोज , दंगल मधला आमिर , पिंक मधला अमिताभ... २०१७ चे अवॉर्डस आहेत हो.. कुठे लाल बादशाह आठवतंय ..

अहो भरत
उडता पंजाब प्रदर्शित होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षांनी किती प्रयत्न केले. त्यांना पुढचे परिणाम ठाऊक होते. नेमके तेच झाले. अशा चित्रपटाला पुरस्कार देतील का? Wink

आत्तापर्यंतच्या विजेत्यात शारुखचं नांव नाहि हे वाचुन ......
>>>>>>>

म्हणूनच राष्ट्रीय पुरस्कारांना ग्लॅमर नाही.
एकदा एखादा एवार्ड शाहरूखला द्या आणि बघा. दरवर्षी या एवार्डची चर्चा होऊ लागेल Happy

टण्यांनी दिलेली लिंक वाचली. this doesn't seem to be an award for Rustom, after all. "An actor is somebody who does different roles and survives for years," said jury chairperson and veteran filmmaker Priyadarshan, explaining the decision to reward Kumar. "So, considering that, we found Akshay the suitable one." हा पुरस्कार अक्कीच्या आतापर्यंतच्या एकंदर कामासाठी आहे म्हणे.
मग दादासाहेब फाळके पुरस्कार कशासाठी असतो?
आणि बाकीच्यांना दिलेत ते त्या त्या सिनेमासाठी की एकंदर कामगिरी साठी?

११ ज्युरींच्या टिमबद्दल सगळ्यांनी बेकार ज्युरिस्डिक्शन असे निकष काढलेले दिसत आहे >>>>ज्युरिस्डिक्शन? ज्युरी डिसीजन असं म्हणायचं होतं का ?

'कासव' ला सुवर्ण कमळ देणारे जुरीच जर अक्षय कुमारला बेस्ट ऍक्टर ठरवत असतील तर बेकार जुरी डिसीजन म्हणता येणार नाही ना?

. मोदी साहेबांचे गुणगान करा पुरस्कार घ्या
अजय च्या शिवाय सारख्या महाबंडल चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बोला आता

अजय ने चित्रपट चालावा म्हणून काय काय केलेले सगळ्यांना माहीत आहे

मग आत्ता होतेय ती ह्या अ‍ॅवॉर्डची चर्चा नाहीतर काय आहे?! दरवर्षीच होते. 
>>>>>>
या पेक्षा जास्त चर्चा तर काहीही श्री मालिकेचीही होते हो. मला अपेक्षित असलेली चर्चा म्हणजे माहौल बनेल. त्या पुरस्कारांनाही शाहरूख नावाचा ब्राण्ड प्रसिद्धी मिळवून देईल. चर्चा घडवायला अश्या वादग्रस्त निर्णयाची गरज पडणार नाही. लोकांना गरज नसतानाही चर्चा करायला आवडेल.

असो, बाकी शाहरूखला आजवर मिळाला नाही हे मात्र खरेच आश्चर्यजनक आहे. त्यात सैफ, अक्षय सारख्यांना मिळूनही त्याला अजून वाट बघावी लागतेय हे आणखी खेदजनक आहे.

कासव' ला सुवर्ण कमळ देणारे जुरीच जर अक्षय कुमारला बेस्ट ऍक्टर ठरवत असतील तर बेकार जुरी डिसीजन म्हणता येणार नाही ना?
>>>>>>>>

पण एखाद्या विशिष्ट कॅटेगरीतील विशिष्ट पुरस्कारासाठी सेटींग तर नक्कीच म्हणता येईल ना...

तुमचा मुद्दा असा आहे की एका कॅटेगरीत योग्य निवड करणारे ज्युरी दुसरया कॅटेगरीत चुकीची निवड कसे करू शकतील. जो योग्य म्हणू शकतो. पण हा वर उल्लेखलेला सेटींगचा मुद्दा लक्षात घेतला तर तो मुद्दा बाद होतो.

बाकी कासव मी पाहिला नाही त्यामुळे तो निर्णयही योग्यच आहे असे सांगू शकत नाही. तसेच नुसते कासव बघणेही गरजेचे नाही तर त्याच्या स्पर्धेतील ईतर चित्रपट बघणेही गरजेचे. ते न बघता कोणीच हे मत देऊ शकत नाही.

अक्षय कुमारबाबतही रुस्तम पाहिला नसल्याने मी ठाम काही बोल्लो नाही. पण त्याच्या मर्यादा ठाऊक आहेत. आणि त्यापेक्षा चांगले अभिनय परफॉर्मन्स या वर्षी पाहिले आहेत.

अजय च्या शिवाय सारख्या महाबंडल चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बोला आता
>>>>>>>

काय बोलता??
नक्की कोणता पुरस्कार मिळाला?

शा खा ला चक दे , स्वदेश बद्धल मिळू शकला असता..
अमीर ला सरफारोश, रंग दे बसंती, लगान, तारे जमीन , दंगल बद्धल...

आता अक्षय ला मिळालाय, आश्चर्य नाही वाटणार सलमान ला मिळाला पुढच्या वर्षी तर...

Pages