सध्या चालू असलेला गदारोळ बघुन राहावलं नाही म्हणुन हा धागाप्रपंच..
यावर्षीचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'चा पुरस्कार 'रुस्तम' या चित्रपटासाठी 'अक्षय कुमार' याला प्रदान करण्यात आला.. याबद्दल सगळ्यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या.
या विभागातील पुरस्कारकरिता असलेल्या ११ ज्युरींच्या टिमबद्दल सगळ्यांनी बेकार जुरी डिसीजन असे निकष काढलेले दिसत आहे. यात मुख्य असलेल्या 'प्रियदर्शन' ला सर्वांनी टारगेट करुन केवळ अक्षय कुमारला फेवर करायचा म्हणुन त्याला पुरस्कार दिला असे आरोप लोकं त्याच्यावर करत असलेले दिसताहेत.
प्रियदर्शनला याबाबत विचारले असता त्याने दिलेल्या उत्तरात,
१. तुम्ही ज्युरींच्या निर्णयाचा आदर करायला हवा. या पुरस्कारांमधे जनतेचे मत नाही तर ज्युरींचे मत चालते
२. तुम्ही त्या अभिनेत्याच्या अभिनयावर शंका घेत आहात का?
३. जो व्यक्ती (आमिर खान-दंगल) पुरस्कार स्विकारायला नाकारतो अशा व्यक्तिला राष्ट्रपती देत असलेला पुरस्कार नाकारायचा मौका देऊन त्या पुरस्काराचा अपमान करायचा का?
४. ज्युरींना 'अलिगड' वा इतर चित्रपट अपिल झाले नाहीत म्हणजे त्यांचा निर्णय चुक आहे अस म्हणता येईल का?
५. पिकुकरिता अमिताभ बच्चन ला पुरस्कार मिळाला, अजय देवगन ला गंगाजल चित्रपटाकरिता पुरस्कार मिळाला त्यावेळी ज्युरींमधे रमेश सिप्पी अन प्रकाश झा होते तेव्हा त्यांच्यावर असले आळ घेण्यात आले नाही अन माझ्यावर असे आरोप का लावल्या जात आहे?
असे प्रतिवाद केले.
इतर कुठल्याही पुरस्काराबद्दल साशंक नसलेले लोक फक्त या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उठवत असताना माबोकरांच याबाबत काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.
तुम्हाला काय वाटतं ?
तळटिप :
माहिती नाही हा धागा असावा कि नसावा... उगाच भारंभार धागे काढण्याचा माझा स्वभाव नाही पण माझ्या आवडत्या अभिनेत्याबद्दल अन ऐन ऐरणीवर असलेल्या या वादामुळे हा धागा काढलाय..
आता सरळ सरळ पॉप्युलर
आता सरळ सरळ पॉप्युलर सिनेमांनाच मिळतात की आर्ट फिल्म्स बनतच नाहीत? मिडल ऑफ द रोड सिनेमे तर बनतात. >> बरोबर.
सत्या, शिवा , गँग्स ऑफ वासेपूर असे सिनेमे आहेत. ज्यांचे विषय मेन स्ट्रीम मधे चालेलसे पण हाताळणी पॅररल सारखी असते. हल्ली कंटेंपररी असा उल्लेख होतो.
तुम्ही म्हणता तो बदल अग्नीपथ पासून झाल्याचं दिसतंय.
मग दादासाहेब फाळके पुरस्कार
मग दादासाहेब फाळके पुरस्कार कशासाठी असतो?>>> अनेक पुरस्कार असण्यात काय चूक आहे. अमेरिकेत देखील विज्ञान कथा, कादंबरी ह्या साठी अनेक पुरस्कार आहेत. More the merrier.
एकाही मराठी अभिनेत्याला हा
एकाही मराठी अभिनेत्याला हा पुरस्कार मिळाला नाही की काय असं वाटत होतं. तिघांना मिळालाय. उपेंद्र लिमये - जोगवा , गिरीश कुलकर्णी - देऊळ आणि विक्रम गोखले अनुमती. यांत वाद होण्यासारखं काही नाही.
सैफ, अक्षय, शाहरुखला मिळाला तसा एकदाचा सलमानला पण देऊन टाका.
हिंदी सिनेमात मॅनरिजम, स्टाईल
हिंदी सिनेमात मॅनरिजम, स्टाईल आणि वास्तवापासून दूर नेणारा स्वप्नातल्या जगात ठीक वाटणारा स्टायलीश अभिनय आणला. दिलीप कुमारचा अभिनय प्रचंड स्टायलीश >> तेव्हा मोतीलाल सारखा नैसर्गिक अभिनेता होताच की . नंतर बलाराज सहानी आला. पण हे काही नायक ठरू शकले नाहीत. (बलराज सहानी सीमा मध्ये नायक - लीड रोल मध्ये होता)
उपेंद्र लिमये - जोगवा , गिरीश कुलकर्णी - देऊळ आणि विक्रम गोखले अनुमती. यांत वाद होण्यासारखं काही नाही. > +100
केशवकुल, तुम्ही कधी
केशवकुल, तुम्ही कधी प्रतिसादातलं एक वाक्य उचलून संदर्भ सोडून पतंग उडवायला लागलात?
कलाकाराच्या एकंदर कामगिरीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार असतो. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार हा विशिष्ट चित्रपटातल्या अभिनयासाठी असतो आणि फक्त त्यावरून ठरावा , असा त्या वाक्याचा अर्थ आहे, हे तुम्हांला कळलं नसेल हे असंभव आहे.
की मुद्दाम तुमच्या सरांची कॉपी करताय?
भ्रमर , बेस्ट अॅक्टर इन
भ्रमर , बेस्ट अॅक्टर इन लीडींग रोल ही कॅटॅगरी १९६७ साली सुरू झाली. बलराज साहनी, दिलीपकुमार , अशोककुमार अशांचं बेस्ट या आधी देऊन झालेलं आहे.
उपेंद्र लिमये - जोगवा , गिरीश कुलकर्णी - देऊळ आणि विक्रम गोखले अनुमती. यांत वाद होण्यासारखं काही नाही. > +100
बलराज सहानी>>>दो बिघा जमीन.
बलराज सहानी>>>दो बिघा जमीन. क्लास मूवी!
बलराज सहानी कम्युनिस्ट पार्टीचा कार्ड धारक मेंबर होता. त्याला कसा पुरस्कार मिळणार. का मिळाला होता. कल्पना नाही.
मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट
मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - स्त्री यासाठी पुरस्कार मिळालेल्या मराठी अभिनेत्रींची नावं त्या पुरस्कारापुरतीच ऐकली. (स्मिता पाटील अपवाद)
मिताली जगताप वराडकर - बाबू बँड बाजा - २०१०
उषा जाधव - धग - २०१२
घ्या. केशवकूल, तुम्ही तेच
घ्या. केशवकूल, तुम्ही तेच करताय. अर्धवट वाचताय. दो बिघा जमीन १९५३ चा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्या साठी पुरस्कार १९६७ मध्ये सुरू झाले.
सुपारी घेतलीत की काय?
भरत
भरत
मी वर लिहिले आहे की माझी खात्री नाही. बर झाले की तुम्ही क्लीअर केलेत ते.
पण मी जे वर बलराज सहानी चे नाव घेतले ते भ्रमर ह्यांच्या साठी. दो बिघा जमीन मध्ये तो नायक होता.
त्याच्या साठी पुरस्कार असे नाही, असे मी म्हणत नव्हतो. हे माझे in general मत होते. काही हरकत नाही वर राभु ने तेही स्पष्ट केले आहे.
आणि जर मी सरांची कॉपी करत असेन असे वाटत असेल ते माझ्यासाठी तो सन्मान आहे.
भरत
भरत
डपो.
रानभुली मुळात तो धागा शाहरुख
रानभुली मुळात तो धागा शाहरुख खानला पुरस्कार मिळाला त्याचे अभिनंदन करायलाच काढला होता.
शिर्षक सुद्धा तसेच होते आणि हेडर पोस्ट सुद्धा तशीच आहे.
ज्यांना हे रुचले नाही त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर प्रश्नचिन्ह प्रतिसादात उपस्थित केले.
आता आपल्या आवडत्या कलाकाराचे अभिनंदन करायला काढलेला धागा तुम्हाला सिक वगैरे वाटत असेल तर तुमचे विचार तुमच्यापाशी, आणि माझे माझ्यापाशी..
तसेही हल्ली काळ बदलला आहे. लोकांना सेलिब्रिटीचे ट्रोलिंग करणे नॉर्मल वाटते आणि कौतुक करणे सिक.. माझेच विचार जुनाट असतील. आपले चालू द्या
आता आपल्या आवडत्या कलाकाराचे
आता आपल्या आवडत्या कलाकाराचे अभिनंदन करायला काढलेला धागा तुम्हाला सिक वगैरे वाटत असेल तर तुमचे विचार तुमच्यापाशी, आणि माझे माझ्यापाशी.. >>> हा आचरट पणा आहे. मुद्दामून का ?
लोकांना सेलिब्रिटीचे ट्रोलिंग करणे नॉर्मल वाटते >>> कुणी केलंय ट्रोलिंग ? ज्याने केलंय त्याला जाऊन सांगा. माझा काय संबंध ? आधी पण संबंध नसताना असेच ऐकवलेले आहे.
"कौतुक करणं सिक ">>> कौतुक करणं सिक आहे हे मी कधी म्हटलंय ? जबरदस्ती का प्रतिसाद द्यायला लावायचा ?
या धाग्यात अक्षयकुमारचं नाव आहे म्हणून त्याच्या वर टीका झालेली नाही का ? दोन्ही बाजूंनी उत्तम चर्चा झाली. मी म्हणेन तेच खरं असं कुणी केलं नाही. सेलेब्रिटीचं ट्रोलिंग करायचं कि नाही यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. सेलेब्रिटी माझ्या आयुष्याचा भाग नाहीत, त्यांच्याकडून मला पगार मिळत नाही. ज्यांना मिळत असेल त्यांनी या विषयावर भाटगिरी करावी.
तुम्ही दुसर्यांच्या चर्चेत घुसून मला यात इंटरेस्ट नाही, त्यात इंटरेस्ट नाही म्हणून प्रतिसाद स्किप केले, धागा वाचला नाही म्हणत आधी मायबोलीने केलेला तुमच्यावरचुआ अन्यायाचा बदला घेत असता ना ? त्या वेळी हाच विचार करून गप्प बसता येतं कि नाही ?
आता जिथे जिथे लोकांनी धागा वाचला नाही थेट प्रतिसाद वाचायला आलो,आले असे म्हटले आहे त्याची लिंक देऊ नका नाहीतर उलट सिद्ध होईल त्या धाग्यांची लायकी बघून.
आणि सर्वात महत्वाचं शाहरूखान चा झेंडा आणि त्याला विरोध करायला लावायचा सापळा या गोष्टीचा प्रचंड उबग आला आहे. प्रत्येक वेळी तेच तेच याचा उबग तुम्हाला न येण्याचं तुमचं स्वातंत्र्य आहेच.
हेच सांगायचं टाळलं आणि हा धागा राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडला तर इथे अक्षय विरूद्ध शाहरूख हे विकृत वळण कशाला ? सोडा हे झाड.
आयडी उडवण्यासाठी उकसवताय का ?
ओके
ओके
अपडेट केलेली पोस्ट सुद्धा ओके
अपडेट केलेली पोस्ट सुद्धा ओके
ओके तर ओके.
ओके तर ओके.
आपल्या धाग्यावर समाधान होत नाही बहुतेक
आपल्या धाग्यावर समाधान होत
आपल्या धाग्यावर समाधान होत नाही बहुतेक ###
तिथे दुसऱ्या आयडीच्या प्रतिसादगणिक आपला एक प्रतिसाद डकवून देखील समाधान का होत नसेल ?
समजा आजवर आलेल्या चित्रपटातील
समजा आजवर आलेल्या चित्रपटातील सर्वोत्तम चार सिनेमे असा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार म्हणून द्यायचा असेल आणि त्यासाठी खालील सिनेमे निवडले गेले,
मुघल ए आजम , बाहुबली, मदर इंडीया आणि गुंडा
तर इतर तीन सिनेमांच्या दर्जाबद्दल काय मेसेज जाईल ?
Pages