६४वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेता-अक्षय कुमार

Submitted by टीना on 8 April, 2017 - 13:55

सध्या चालू असलेला गदारोळ बघुन राहावलं नाही म्हणुन हा धागाप्रपंच..

यावर्षीचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'चा पुरस्कार 'रुस्तम' या चित्रपटासाठी 'अक्षय कुमार' याला प्रदान करण्यात आला.. याबद्दल सगळ्यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या.

या विभागातील पुरस्कारकरिता असलेल्या ११ ज्युरींच्या टिमबद्दल सगळ्यांनी बेकार जुरी डिसीजन असे निकष काढलेले दिसत आहे. यात मुख्य असलेल्या 'प्रियदर्शन' ला सर्वांनी टारगेट करुन केवळ अक्षय कुमारला फेवर करायचा म्हणुन त्याला पुरस्कार दिला असे आरोप लोकं त्याच्यावर करत असलेले दिसताहेत.

प्रियदर्शनला याबाबत विचारले असता त्याने दिलेल्या उत्तरात,
१. तुम्ही ज्युरींच्या निर्णयाचा आदर करायला हवा. या पुरस्कारांमधे जनतेचे मत नाही तर ज्युरींचे मत चालते
२. तुम्ही त्या अभिनेत्याच्या अभिनयावर शंका घेत आहात का?
३. जो व्यक्ती (आमिर खान-दंगल) पुरस्कार स्विकारायला नाकारतो अशा व्यक्तिला राष्ट्रपती देत असलेला पुरस्कार नाकारायचा मौका देऊन त्या पुरस्काराचा अपमान करायचा का?
४. ज्युरींना 'अलिगड' वा इतर चित्रपट अपिल झाले नाहीत म्हणजे त्यांचा निर्णय चुक आहे अस म्हणता येईल का?
५. पिकुकरिता अमिताभ बच्चन ला पुरस्कार मिळाला, अजय देवगन ला गंगाजल चित्रपटाकरिता पुरस्कार मिळाला त्यावेळी ज्युरींमधे रमेश सिप्पी अन प्रकाश झा होते तेव्हा त्यांच्यावर असले आळ घेण्यात आले नाही अन माझ्यावर असे आरोप का लावल्या जात आहे?
असे प्रतिवाद केले.

इतर कुठल्याही पुरस्काराबद्दल साशंक नसलेले लोक फक्त या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उठवत असताना माबोकरांच याबाबत काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.

तुम्हाला काय वाटतं ?

तळटिप :
माहिती नाही हा धागा असावा कि नसावा... उगाच भारंभार धागे काढण्याचा माझा स्वभाव नाही पण माझ्या आवडत्या अभिनेत्याबद्दल अन ऐन ऐरणीवर असलेल्या या वादामुळे हा धागा काढलाय..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके, तांत्रिक बाबींबद्दल मिळाला. मग ठीक आहे. गेल्यावेळी तर तांत्रिक बाबींचा विचार करता बाहुबलीला तर पुर्ण चित्रपटाचा पुरस्कार दिलेला. शिवायलाही तसे केले नाही हेच नशीब.

मला आधी नाही आवडायचा, पण आता आवडतो अक्षय, खुप matured acting असते सध्या.

शारुक पेक्शातर खुपच छान आहे. शारुकतर बरेचदा माय नेम इज खान मधुन बाहेरच पडला नाही असा वाटतो कित्येक भुमीकेत

रुस्तम साठी अक्षयला अभिनयाचा राष्ट्रिय पुरस्कार ??? काहीही. लोल.

आता मग सल्लु भाइला पण मिळेल सुलतानसाठी अन शाख्याला रईस साठी.

अमिताभ आणि आमीर कसल्या म्हणे अभिनयाच्या घागरी ओततात सिनेम्यात. वर बरेच जण त्यांची नावं घेताहेत ते.

अलिगढ सारखा सिनेमा आणि मनोज बाजपेयी समोर असताना अमिताभ आणि आमीर पण एलिजिबल नाहीत खरं तर.

अक्षय कुमारला एअरलिफ्ट साठी पुरस्कार मिळायला हवा होता. त्यात त्याने खुपच चांगले काम केले आहे.
अक्षय कुमार GOT WELL DESERVE NATIONAL AWARD BUT IN TOTALLY WRONG FILM.

रामजाने, डुप्लिकेट सारख्या चित्रपटासाठी शाहरुख ला,
आतंक ही आतंक, तलाश, मेला सारख्या चित्रपटासाठी आमिर खान ला.
निशब्द, बुम, रामगोपालवर्माकीआग सारख्या चित्रपटांसाठी अमिताभ बच्चन यांना
राजुचाचा, हिम्मतवाला, रास्कल सारख्या चित्रपटांसाठी अजय देवगण ला
जर पुरस्कार मिळाले असते तरी अशीच टीका झाली असती.

शिवाय च्या visual इफेक्ट्स ची चर्चा चित्रपट रिलीज झाला तेव्हा होती, त्या प्रकारचे इफेक्ट्सच्या जर थोड्याच entries असतिल तर वासरात लंगडी गाय शहाणी ठरते. कोणीच लायक नाही म्हटले तरी टीका होतेच. मागे लता मंगेशकरवर अशीच टीका झालेली.

जुरी बोर्ड एकच असते, त्यात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या विषयाशी संबंधित परितोषिकांवर काम करत असतील पण अंतिम निर्णय सर्वसंमतीने घेत असावेत असा माझा समज आहे. जाणकारांनी माहिती द्यावी.

बाकी सगळे चित्रपट पाहिल्याशिवाय कोण बरे व कोण बुरे याची चर्चा करू नये हे एकदम योग्य.

अक्षय कुमारला एअरलिफ्ट साठी पुरस्कार मिळायला हवा होता. त्यात त्याने खुपच चांगले काम केले आहे.
अक्षय कुमार GOT WELL DESERVE NATIONAL AWARD BUT IN TOTALLY WRONG FILM.>> खरय!!

इथे अक्षय कुमारच्या फॅन्स ला माहीत आहे का कि त्याचा एक चित्रपट भारतातर्फे "ऑस्कर"ला ऑफिशल एन्ट्री म्हणून गेलेला होता ?

करिष्मा कपुर आणि अक्षय कुमार यांचा "जानवर" नावाचा एक चित्रपट होता. तो ऑस्करला भारता तर्फे गेला होता. Wink

आम्ही निव्वळ चित्रपट बघत नाही. त्यांची माहीती सुध्दा ठेवतो हो Happy

एकापेक्षाएक प्रखर राष्ट्रवादी आणि देशप्रेमाने ओतप्रोत, तरूण पिढीवर योग्य ते संस्कार करणारे चित्रपट सातत्याने करणारे आधुनिक भारतकुमार उर्फ अक्षयकुमार यांना त्यांच्या या कामगिरीसाठी आणि सर्व खानांना पुरुन उरेल असा हिंदू सुपरस्टारचा पर्याय उपलब्ध करुन दिल्याबद्दल हा पुरस्कार दिलेला आहे, त्याचा अभिनय वगैरे फालतू गोष्टींशी संबंध जोडू नका.
त्याचप्रमाणे 'अलिगढ'सारख्या कुसंस्कारी आणि चुकीचा संदेश पसरवणार्‍या सिनेमांचा समाजावर अत्यंत भयंकर परिणाम होऊ शकतो त्यामुळे अशा सिनेमात कितीही जीव तोडून काम केले तरी त्याचे कौतुक करुन लोकांची उत्सुकता चाळवणे चूक आहे.

हिंदू सुपरस्टारचा >>> हा शब्द मी बर्‍याच वर्षाने वाचला. या आधी ही उपाधी "ऋतिक रोशन" याला कहो ना प्यार है या चित्रपटाच्या बंपर यशानंतर एका वर्तमानपत्राने / मासिकेने दिली होती. त्यात असा खान विरुध्द रोशन असा काहीसा लेख आलेला. पण नंतर के३जी आल्यावर त्या वर्तमानपत्राची/मासिकेने "युटर्न" घेत अगदी विरुध्दार्थी लेख लिहिलेला.
दोन्ही लेख ते प्रचंड मनोरंजनात्मक होते.

ऑस्कर म्हणजे काय सोने लागले असते त्याला.
ज्यांना फिल्मफेअर मिळवता येत नाही वा मिळत नाही त्यांनी या ऑस्करला भाव देऊन ठेवलाय.

>>ऑस्कर म्हणजे काय सोने लागले असते त्याला.
ज्यांना फिल्मफेअर मिळवता येत नाही वा मिळत नाही त्यांनी या ऑस्करला भाव देऊन ठेवलाय.<<

हो हो बरोबर आहे तुझं; आता लगे हाथ "ऑस्करला ग्लॅमर नाहि, जोवर अ‍ॅकेडमी शारुखला ते चांदिच्या ताटातुन देत नाहि" - हे म्हणुन टाक...

ऑस्करला ग्लॅमर असेना नसेना काय संबंध? ईथे एवार्ड मिळत नाही म्हणून तिथे जायचे याला काय अर्थ? म्हणजे भारतरत्न नाही मिळाला तर ईंग्लण्डमध्ये जाऊन "सर" पदवी मिळवायची आणि म्हणायचे भारतरत्न कोणालाही देतात, ज्याला गोरे लोकं सर बोलतात तोच सरस!

आता तो अंदाज अपना अपना चित्रपट किती हसवतो. आजही बघतो तेव्हा टाईमपास होतो. त्यातील फन्नी डायलॉगही तोंडपाठ असतात. पण हा चित्रपट ऑस्करला पाठवू शकणार नाही. कारण त्या गोरया लोकांना भाषेच्या वा ईतर संदर्भाच्या अडचणीमुळे म्हणा त्यातली मजा समजणार नाही. म्हणून तो चित्रपट रटाळ झाला काय. त्या लोकांना काय आवडेल हे बघून जर उद्या चिय्रपटही बनायला लागले तर भारतीय प्रेक्षकांच्या आवडीचे आणि अभिरुचीचे काय...

ऋन्मेषशी सहमत. काय सोनं लागलंय ऑस्कर ला... गोर्‍यांचे बुटलिकिन्ग आहे ते नुसते.

ऑस्करवर श्वेतवर्णियांचा एकाधिकार आहे, रेसिस्ट आहे ऑस्कर म्हणजे.

अरे. मी फक्त माहीती देण्याकरीता बोललो की ऑस्करला अक्षय कुमारचा सुध्दा चित्रपट गेलेला त्यात त्याने चांगला अभिनय केला होता. पण ही बाब फार कमी लोकांना ठाऊक आहे म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला.

तुम्ही लोकांनी तर ऑस्करच्या मागे हातपाय काय अंघोळ करून मागे लागलात Biggrin
(प्रतिसाद निट वाचायचे कष्ट घेतले असते तर असे झाले नसते म्हणा Wink )

कुठलाही पुरस्कार मॅनेज करता येतो, असं माझं तरी मत आहे. राष्ट्रीय असो की ऑस्कर असो की फिल्मफेअर, पुरस्कार मिळाला म्हणजे ती कलाकृती पुरस्कारयोग्य असेलच असं अजिबातच मला वाटत नाही. कुठल्याही पुरस्कारापेक्षा आपण आपल्या निरीक्षणावर जास्त विश्वास ठेवायला हवा आणि म्हणूनच कुठल्याही पुरस्कारावरच्या इतरांच्या मतापेक्षाही आपण स्वत: विचार करून मत बनवावं.
रा.पु. मिळाला असला, तरी अ.कु.चं 'रुस्तम'मधलं मला तरी वाटत नाही खूप काही ग्रेट होतं. 'अलिगढ'मधला मनोज वाजपेयी, रमन राघव २.०' मधला नवाजुद्दिन व अजून काही नक्कीच खूप सरस होते.

http://dff.nic.in/nfa.asp >> ही साइट बघा, इथे उजवीकडे एक लिंक अजून यायची आहे, ह्या वर्षीच्या एंट्रीजची. ती आली की मग ठरवा कश्याकश्यावर भांडायचे ते.

Pages