चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16

चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... Happy
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई

ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक

विकी पेज इथे पाहाता येईल

ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नानीचा 'व्हॉट्स्पॉट' हा शब्द भारी आवडला आहे. Lol
नानी आणि मालूचे नाते खूप सुरेख दाखवले आहे. किती माया करतात नानी मालूवर!!! आणि मालूही ते जाणून नानींच्या फटकळ बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते.:)

त्या बोक्याच्या बहिणी काय आलटून पालटून सारख्याच माहेरी येत असतात काय, जुन्या काळात.

बाय द वे ते टण्या आणि ती मंदा यांचं का नाही मार्गी लागलं.

अजुन एका कारणासाठी आवडतेय ही मालिका, सगळीच पात्रं घडाघडा बोलतात...हे अगदीच अपवादात्मक आहे असं म्हणायचं ! नाहीतर बाकीच्या मालिकांमध्ये एखादं पात्र नुस्तं बोलत राहतं बाकीचे गपगुमान ऐकत राहतात...

बाय द वे ते टण्या आणि ती मंदा यांचं का नाही मार्गी लागलं.>> मंदीचं लग्न ठरला ना ग . म्हणून टण्या आपला ब्रह्मचारी Happy

हो का, थँक्यु सुजा. ते बोक्याला नावं ठेवणं चाललं होतं. ते बघितलं होतं. पुढे काही कळलंच नाही.

कालचा अजून एक प्रसंग आवडला.

मालू, बोक्या आणि नळी साठी जेवायची थांबते आणि ते दोघं बाहेरूनच भारपूर खाऊन आल्यामुळे (नळी - ७ बटाटेवडे आणि बोक्या - १/४ बटाटावडा ....... Happy ), मालूला एकटच जेवायला लागणार होतं, त्यावर नानीचा उपाय आणि डायलॉग लाजवाब होता.

बिच्चारा बोक्या सारखा मारंच खात असतो, आधी त्याचे बाबा मारायचे त्याला मग आई. बायको मात्र छान मिळाली त्याला.

मस्त चाललेय मालिका . मला जाम आवडतेय. टाइम पास. त्या नानांच्या कारकिर्दीत रोजच सगळेजण त्या आजीला प्रदक्षिणा घालतात कि काय ? . त्या नानांची आई भिजलेल्या सशासारखी बसलेली होती आणि नाना तिचे पाय काय धुतात. तुम्ही आम्हाला जन्माला घातलंत म्हणून आम्ही या भूतलावर आलो काय म्हणतात आणि मग प्रदक्षिणा Lol

आजचा नानीचा डायलॉग, ''मरायबिरायची नाही हा मी तुमच्यासाठी, एकतर तुम्हाला जीव द्या, वर तुमच्यासाठी जीव द्या, याला काय अर्थ आहे?" Lol

बाय द वे, त्या जुन्या अभिनेत्री शांता आपटे ह्या नयना आपटे यांच्या मातोश्री.>>> नयना आपटे, माणिक वर्मांची मुलगी आहे, शांता आपट्यांची नाही.

नाही, माणिक वर्माच्या मुली भारती आचरेकर, वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि एक डॉक्टर आहे त्या ह्या क्षेत्रात नाहीत. मागे ह्या सर्व एकत्र होत्या टीव्हीवर.

नयना आपटे हि माणिक वर्मा यांची मुलगी नाही. माणिक वर्मांच्या चार मुली. भरती आचरेकर, वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि अरुणा जयप्रकाश . त्या माणिक वर्माच्या मुलगी नाहीत. नयना आपटे ह्या शांता आपटे यांना त्यांच्या लग्नाच्या आधी झालेली मुलगी आहेत असं वाचतेय

ती यंग मालू, सायली फाटक आहे. मला स्नेहा फाटक वाटली होती.

मनवा नाईकने उखाणा नीट नाही घेतला. कसं बोलत होती. अजून एक भाग हवा होता या टीम बरोबर. नयना आपटे छान दिसत होत्या पण त्यांच्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं बहुतेक. कारण ते सारखं तिथे बोट लावत होत्या.

नयना आपटे छान दिसत होत्या पण त्यांच्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं बहुतेक >> हो का ? लक्षात नाही आलं
खरंच धन्यवाद सगळ्या टीमला . अशी एकादी निखळ मनोरंजक मालिका पाहिजेच अधून मधून Happy

मनवा नाईक खूप छान दिसत होती.>> ही चांगली सिरीयल दिली त्यासाठी मात्र धन्यवाद तिला आणि पुर्ण टीमला.>> +१०१

Pages