चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16

चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... Happy
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई

ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक

विकी पेज इथे पाहाता येईल

ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या मालूच्या बेबी वन्संपुढे मालूच्या कजाग सासू बाई पण हतबल होताना दाखवल्येत . तू पुरणपोळी खायचीच नाही असं ती सांगतेय. एकंदर मालूच्या कजाग सासूला पुरणपोळी खायला मिळण्याकरता भयंकर सामना करावा लागतोय तर Lol

होना, त्या नलीने फार आगाऊपणा केला.

त्या काळी इतकं ओपनली कोणी बोलत असेल असं नाही वाटत. पांचट वाटला मला एपि. ह्या काळात पण बहीण भावाला असं सांगत नसेल, वहीनीला सांगेल. असं वाटतं मला.

माझ्या आजोबां डायबिटीएस मुळे १९७८ ला गेले.
त्य्याकाळी कॉमन न्हवता जितका आता आहे व माहित असते. असो.
सिरियलचा काळ १९६७ चा वगैरे दाखवलाय ५० वर्षे लग्नाला झाली म्हणताहेत.
तसेही वयांची गणित , काह्री डीटेलिंग( चाळीत घरीच फोन वगैरे) चुकली आहेत ह्या सिरियलीत.
---
मला तरुण मालू आवडते. आणि प्रियदरशन.
ती मालूची मुलगी आणि जावई बेकार आहेत.
तो बंडी वन्सचा भाग मस्त होता मात्र.
बाकी, अधे मधे पांचट भाग असतात.

>>>होना, त्या नलीने फार आगाऊपणा केला.<<<

असतात हो अश्या आगावु नणंदा. माझी वडीलांची मोठी चुलत बहिण (माझी आत्या) आईला बरेच टाकून बोललेली मी (मुलगी) झाले तेव्हा आणि आईला दुसर मुल नको आता असे तिला कळले तेव्हा.
एक मुलगा होवु दे मग काय ते ऑपरेशन करा म्हणून.
आई ला तेव्हा राग आणि आश्च्र्य दोन्ही वाटले तेव्हा. नको तेवढई लुडाबुड आणि आगावुपणे बोलणे ते हि माझ्या बाबांसमोर . बाबा लहान आणि एकत्र कुटुंबात वाढलेले लहानपणी तेव्हा त्या मोठ्या चुलत्बहिणी खूपच दादागुरी आणि आगावु होत्या बोलण्यात(इति इतर नातेवाईक).

असतील नणंदा आगाऊ . नाही असं नाही पण अख्खा एपिसोड खर्च केला त्यांनी . एकच आपलं कधी मूल जन्माला घालणार ?

त्या वरून माझ्या मामीचा किस्सा आठवला वेगळाच जो तिनेच अगदी रंगवून रंगवून सांगितला . लग्न गावाला झालं. घरातच. सगळे जवळचे /दूरचे नातेवाईक आले होते. घर मोठ्ठ त्यामुळे चिक्कार नातेवाईक सामावले गेले . लग्न लागलं . आधीची रात्रीची जागरण /लग्नाची दगदग हिला काही झेपलं नाही. सकाळी उठली तर जाग्रणानी आणि कसल्या कसल्या कारणांनी हिला नेमक्या सकाळ सकाळी उलट्या झाल्या . दोन तीनदा . अगदी धावत धावत वगैरे जाऊन उलट्या करून आली . तेव्हा मात्र घरातले सगळे नातेवाईक विचित्र नजरेने बघायला लागले . मामी सांगते त्यांना मनात वाटलं असेल " अरे कालच तर लग्न झालं आणि आज लगेच हिला उलट्या सुरु ? Lol

भयानक एपी होता कालचा, आम्ही थोडासाच बघीतला जेवताना आणी ते असले संवाद एकुन बदलला चॅनेल.>>>>सेम हिअर.................

शनिवारचा चांगला होता. शुक्रवारी एक डायलॉग मात्र आवडला नानींचा मला एरवी एपि नाही आवडला तरी, की मला नात होऊदे आणि माझ्या मुलींसारखी नको, मालूसारखी होऊदे. सो स्वीटना.

ते एका एपि सोड मध्ये दिलीप आणि सुकन्या काहीतरी नळी बद्दल आठवून एकत्र हसतात व झिम्मा खेळल्यासारख्या टाळ्या देतात ते फार गोड वा टले. त्यांना त्या काळात सहजीवन असे नाहीच. व कसली ती सासू त्यातही ती जोडी सूख शोधत असते ते खूप छान वाट्ते बघायला. आताच्या पब्लिकला असे रेस्ट्रिक्षन्स माहीतही नसतील. तिची ती सासुरवास होणा री शेजारीण पण बघून कसे तरी होते. काय लाइफ होते तेव्हा.

मालुला मुळातच काही स्वतः च्या ईच्छा, आकांक्षा होत्या असे दाखविलेले नाही. आणि बोका अगदी इम्मॅच्युर. मग इतर लोक हस्तक्षेप करणारच.

बाकी सिरिअल्स पेक्षा छान वाटतेय पहायला ही एक. थोडे १९/२० आहेत पण चलता है.
बोक्या, माली (तरूण आणि म्हातारे) चौघेही मस्त दाखवलेत. नानीही मस्त... काय तो आवाज अन लहेजा.

बाकी मालिकांमध्ये जी खुन्नस आणि कटकारस्थानं दाखवतात त्यापेक्षा हे कधीही छान, काही कमींसकट... Happy

रच्याकने, म्हातार्‍या मालिचं सुरुवातींच्या भागात ओठ हलवण्याचं दाखवलेलं ते आता बंद झालेलं आहे...

रच्याकने, म्हातार्‍या मालिचं सुरुवातींच्या भागात ओठ हलवण्याचं दाखवलेलं ते आता बंद झालेलं आहे...

माबो वरचे प्रतिसाद दिग्दर्शकाने वाचले असतिल Happy

काल तरुण मालू आणि बोक्याचे सवांद मस्त होते आणि त्या हंड्रेड इयर्स वाल्या नानी तर भन्नाटच . अजूनही सगळ्यात इंटरेस्ट साड्या काय वॉटस्पॉट काय आणि त्या लॅपटॉप वरून नातवाशी पण बोलतात मला पैसे पाठव यावं नि त्याव . प्रेमात आहे मी नानीच्या . जरा आरडाओरडी जास्त करतात पण चालतंय कि Happy

नानी मस्त...त्यांचं ते बोटांनी स्वाईप करणं ही मस्त! बोक्या म्हणे की १०१ वर्षांच्या बाईला व्हॉटसप अलाऊड नाही.....! Happy

बोक्या म्हणे की १०१ वर्षांच्या बाईला व्हॉटसप अलाऊड नाही.....!>> त्यावर ती विचारते कि त्यांना कसे कळणार माझे वय?, तर ते वयाचा दाखला मागतात म्हणे Lol

मजा आली. नानी भारी बेरकी. प्रियदर्शन मस्तच काम करतो. ती तरुण मालु तर क्लास आहे. काळाचे भान चुकवायला नको होते या लोकांनी. पण त्याकडे जरा कानाडोळा करु. Happy

नानी डोक्यात जाते. नयना आपटे या बाईंना अभिनेत्री का म्हणावं (त्यात त्याना गेल्या वर्षी पद्मश्री मिळाली!) हा प्रश्न मला नेहमीच पडतो.

नानी डोक्यात जाते>>जुनी म्हणत असाल तर सहमत. ती नयना आपटेंसारखी आहे.

पण म्हातारी नानी भारी आहे. (जरी अजुनही हातातले फेकुन मारत वगैरे पटत नसले तरी) साधारण ८०-९० चा पुढे वय गेल्यावर डोके सटकते व अशीच लाऊड होतात काही मंडळी. हायपर असतात, हट्टी असतात. ते अगदी अचुक उभे केले आहे.

Pages