चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16

चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... Happy
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई

ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक

विकी पेज इथे पाहाता येईल

ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

3D मध्ये आली होती ती काही एपिसोड.. मिनलची मैत्रीण म्हणून.. नाव विसरले..>>>>> बरोबर . गुड मेमरी. नाव लक्षात येत नाहीये मात्र

तो वयाचा गोंधळ आणि इतर आचरट सीन्स( म्हातारी वैजू घरी येणॅ), आणि इतर सोडले तर मला तरी तरूणपणाचे दिघे आवडले.

आणि त्या तरूण पणीच्या नळी आणि बंडी वन्स मस्त वाटल्या. ते भाग मस्त होते. नयना आपटे सारख्या असतात की म्हातार्‍या ओरडून बोलणार्‍या, सतत तुलना करणार्‍या, साडेचा सोस असणार्‍या. आपल्याकडे लक्ष द्यावे म्हणू गोंधळ घालणार्‍या... माझ्या मावशीची सासू ९३ वयात सुद्धा नवीन नवीन प्रकार मागायची म्हायला. दुसर्‍या कोणाची साडी (नातेवाईक बाईचीच) पाहिली की तुला मेलीला नाही दिसत चांगली, मला दे. मी काय उद्या मरेन तेव्हा आजच हौस करु दे असे म्हणत ९८ वर्षे गेली भेळ खावून.

ती नयना आअपटे अभिनय सुद्धा चांगला करते बोक्याच लग्न ठरवताना...

जुने सीन्स वाटतात त्या काळातले पण नानी त्या काळात म्हणुन भारीच मॉड दिसतात. एकुणातच बोक्याने मालुला फारच गंडवले आहे आयुष्यभर. तरी मालुताई सर्व सोडुन देत आहेत. जरा नवर्याला चांगले झापलेले दाखवले पाहिजे.

प्रभावळकरांची व्यक्तिरेखा मिश्किल किंवा खोडकर न वाटता आगाऊ आणि बायकोला सदोदित कमी लेखणार्‍या नवर्‍याची वाटते. ओरिजिनल नाटक कसं होतं किंवा कोणत्या काळातलं होतं ते माहित नाही. पण आजकाल असल्या व्यक्तिरेखा पाहून चिडचिड होते. :रागः

>> जुने सीन्स वाटतात त्या काळातले
बिलकुल नाही.... खुप फ्लॉज आहेत
किमान साठ वर्षापूर्वीचे सीन दाखवताना महाबळेश्वरहून डायरेक्ट फोन केलेले दाखवले आहेत.... अरे बाबांनो ट्रंक कॉल असायचे त्याकाळी.... नुसते काळे डायलवाले फोन दाखवले म्हणून जुना काळ वाटत नाही, बाकी गोष्टीही सांभाळाव्या लागतात
तो टेण्या साठ वर्षापूर्वी (म्हणजे १९६० च्या दशकात) टीशर्ट घालून फिरताना दाखवलाय!

एकुणातच बोक्याने मालुला फारच गंडवले आहे आयुष्यभर. तरी मालुताई सर्व सोडुन देत आहेत. जरा नवर्याला चांगले झापलेले दाखवले पाहिजे.>>> झी मराठी च्या सर्व सिरियल्स मध्ये हेच तर दाखवताहेत सध्या, नवरा अत्याचारी, तरी बायको त्याला काही बोलत नाही. अपवाद फक्त खुकखुचा. तिथे उलट आहे, बायको नवर्यावर अत्याचार करतेय.

महाबळेश्वरच हॉटेल पण त्याकाळच्या मानाने फारच मॉडर्न वाटत., फोन तर काय घरी पण दाखवलाय, त्याकाळी असे घरोघरी फोन होते तरि का?

तो टेण्या साठ वर्षापूर्वी (म्हणजे १९६० च्या दशकात) टीशर्ट घालून फिरताना दाखवलाय! >> माझ्याही हे लक्षात आलं होतं.

टेक्निकली १९६० साल दाखवताना फार चुका दाखवल्यात. पण सिरीयल इंटरेस्टींग.

एकुणातच बोक्याने मालुला फारच गंडवले आहे आयुष्यभर. तरी मालुताई सर्व सोडुन देत आहेत. जरा नवर्याला चांगले झापलेले दाखवले पाहिजे >>> शेवटी ती मोठठा धक्का देऊन चितपट करेल त्याला असं मला वाटतं. बिग सरप्राईज.

सुकन्या फार सुंदर काम करतेय, प्रभावळकर यांच्यापेक्षाही सरस. नानी धमाल.

शेवटी ती मोठठा धक्का देऊन चितपट करेल त्याला असं मला वाटतं. बिग सरप्राईज.>> +१११.
मालूच पण काही तरी प्रकरण असेल जे तिने इतके वर्ष लपवले असेल. मजा येतेय मालिका बघताना . मला तरी आवडते. डोक्याला ताप नाही. त्यांच्या तरुण वयातली पण सगळेजण चांगले काम करताहेत Happy

मला जुने मालू आणि राजाभाउ आवडतात .
मालु मस्तच आहे .

सासू-सूनेचे पण मस्त दाखवलं आहे . वरणपोळी आणि पांढरी कढीच्या वेळेला नानी तिच्यावर चिडतात .
मालूही त्यांची मनापासून माफी मागते . त्या तिला व्यवस्थित समजावतात .

सर्वच कलाकार आजचे आणि साठच्या दशकातले उत्तम अभिनय करतायत.
खुप दिवसांनी निख्खळ विनोद पहायला मिळतोय. गजर्याची आठवण होते .
कॉमेडीची बुलेट... हवा येउ द्या... नी दर्जेदार विनोद विसरायला लावला.

कॉमेडीची बुलेट... हवा येउ द्या... नी दर्जेदार विनोद विसरायला लावला.>>>अगदी. हवा येउ द्या आता बघवत नाही.

सासू-सूनेचे पण मस्त दाखवलं आहे >> हो. दोघीही नाही पटले तर बोलून दाखवतात पण त्यांच्या नात्यात कटूता बिलकूल नाही.

>>शेवटी ती मोठठा धक्का देऊन चितपट करेल त्याला असं मला वाटतं. बिग सरप्राईज.--- असेच होवो.
>>>सासू-सूनेचे पण मस्त दाखवलं आहे >> हो. दोघीही नाही पटले तर बोलून दाखवतात पण त्यांच्या नात्यात कटूता बिलकूल नाही.------- + १

किश्या (जुना) दिसला की मला त्याचे वॅक्सिंग करावेसे वाटते. निदान अंगभर कपडे तरी द्यायचे त्याला.

सासू-सूनेचे पण मस्त दाखवलं आहे . वरणपोळी आणि पांढरी कढीच्या वेळेला नानी तिच्यावर चिडतात .
मालूही त्यांची मनापासून माफी मागते . त्या तिला व्यवस्थित समजावतात .>>>>>>>>> +१००

टेक्निकल चुका असूनसुद्धा मालिका आवडते आहे.

अक्षरशः धमाल सिरियल. मला सर्वात जास्त नानी आवडली. काय बेअरिंग आहे, जबरदस्त.
सुकन्याच्या वाढदिवसाला प्रेमाने साडी देतात तो प्रसंग फारच छान होता. त्यातून त्यांचं तिच्याबद्दलचं प्रेम दिसत होतं.
आणि नैना आपटे बोक्या बोक्या म्हणतात ते जाम धमाल वाटतं Lol

ती तरूणपणीची मालू काय मस्त अभिनय करते, बारीक-सारीक भावना पण मस्त दाखवते....त्या गौरी, मानसी ला दाखवायला हवे हे, २-३ एक्स्प्रेशन्स पलिकडे कधी गेल्या नाहीत त्या दोघी...

तरूणपणीची मालू >>> येस्स्स सॉलीड आहे.

हे लोक्स कधी येणार च ह ये द्या मधे. ती नकटी येऊन गेली. मी ही टीम आली की बघणार आहे.

तरूणपणीची मालू एकदम गोड आहे आणि मस्त अभिनय करते आहे. परवा चिडली होती तेव्हा नाकपुड्या वगैरे मस्त फुगवल्या होत्या. एकूणच ही मालिका पहायला मजा येते आहे.

Pages