हिरवी मिरची - शेंगदाणा चटणी

Submitted by नलिनी on 4 April, 2017 - 04:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाजलेले व सोललेले शेंगदाणे
लसूण : आवडीप्रमाणे हवा तेवढा
हिरवी मिरची : १०-१२ ( आवडीनुसार कमी अधिक)
मिठ : चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

मिठ, मिरची, लसूण मिक्सरला वाटून घ्यायचे.
ह्यात दाणे घालुन दाणे अर्धेच मोडतील ह्या बेताने मिक्सर चालवायचे.
कढईत २-३ चमचे तेलावर हि चटणी खमंग परतून घ्यायची.

ShengadanaChutney

वाढणी/प्रमाण: 
हे खाणार्‍याच्या तिखट खाण्याच्या क्षमतेवर ठरेल.
माहितीचा स्रोत: 
आजी, आई, काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

ही खलबत्यात कुठुन करायची मिक्सरपेक्षा! आणि मग परतायची अजून स्वादिष्ट लागते! Happy

पाकृ बद्दल अनेकानेक धन्यवाद. यापूर्वी गावांतून तव्यावर परतलेली आणि तिथेच भरडलेली अशी अस्सल गावरान चटणी अनेकदा खाल्लीये पण नक्की कशी करतात माहित नव्हतं. मी खाल्लेल्या चटणीत कधी लसूण नव्हता पण ठीके. दोन्ही प्रकारे आता करून बघेन. मला फार आवडते ...

धन्यवाद सर्वांना!

वरदा, तो रगडा (ठेचा) .
तव्यावर चमचाभर तेल टाकून १०-१५ मिरच्या टाकायच्या. अरत परत करत त्या भाजायच्या. तवा खाली उतरवून त्यावर चवीनुसार मिठ टाकायचे आणि तांब्याने / ग्लासने/ फुलपात्र्याने त्या मिरच्या रगडायच्या. हवंतर परत एकदा तवा गॅसवर ठेवून परतायचे.
चुलीवर तापलेले लाल सायीचे दूध व त्यात भाकर चुरून व सोबत तोंडी लावायला हा ठेचा.

मस्त.. मी पहिल्यांदा बाँम्बेव्हायकिंग या मायबोलीकराच्या आईच्या हातची खाल्ली ( त्या जुन्नरच्या ) नंतर मी करतो. पण माझ्या चटणीत शेंगदाणे जास्त आणि मिरच्या कमी असतात Happy