आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy काय हे कृष्णा, देव बदलला ते सांगायचे ना. मी यमुना आठवत राहिले.

७१४. मराठी -- उत्तर
या विठुचा, गजर हरिनामाचा, झेंडा रोविला
या संताचा, मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल

घ्या... अक्षयनी पण लिहिले आताच... द्या अक्षय पुढची अक्षरे..

७१५ मराठी
ध ध त ध
न न ह प उ
उ न घ म
प द अ झ झ
ल स भ न न

क्लू
(२००७-२०१२)
संगीत :- मराठी जोडगोळी
गायक :- जोडगोळी पैकी एक
चित्रपट :- लोककले वर आधारित
गीत :- बहुतेक सगळी गाणे आता हाच गीतकार लिहतो

अजय अतुल असावे
लोककलेवर आधारित नटरंग सिनेमा पण त्यात अशी अक्षरे असलेले कोणते गाणे असावे?? मला २-३ गाणी ठाऊक पण अक्षरे ही नाहीत..

पहिली ओळ तबल्याचे बोल वाटताहेत. आता हं इतके क्ल्यू वाचल्यावर... (आधी धुके वाटले होते)
नटरंगच असेल त्याचे शीर्षकगीत बघा एकदा... न न आहेत अक्षरांत

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत उभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पखवाज देत आवाज
झनन झंकार लेऊनी स्त्रीरूप भुलवी
नटरंग नटरंग नटरंग

गीत—गुरु ठाकूर

साॅरी! मी अजय-अतुलच्या गाण्यांची प्लेलिस्ट चाळत होतो!सापडलं नि लिहिलं लगेच!
कृष्णाजी पुढचे गाणे आपणच द्या अता!

सॉरी असं काही नाही सत्यजित... वैयक्तिक घेउ नका प्लीज.
माझी मीच थांबते लिहायची... असं कोणी जवळपास ओळखलं असेल तर...
तसा नियम नाहीये आणि गरज पण... खेळ आहे, मजेत घ्यायचा
आणि उद्या मी नाहिये... नवीन कोडे आणि क्ल्यू देत बसायला, म्हणून पण टाळले...
द्या पुढची अक्षरे..

वैयक्तिक नाही हो काही! मी जसं गाणं सापडलं,लगेच लिहिलं नि पोस्ट! ईतका विचार नाही केला काही! 'अजय-अतुल' नंतरच्या पोस्टस वाचल्याच नव्हत्या मी! मी गाणं पोस्टलं तेंव्हा पेज रिफ्रेश झालं नि मी नंतरच्या पोस्ट वाचल्या!
हुश्श@ टायपिंग!

ओके मग ठीक आहे.
हो, पान रिफ्रेश व्हायला वेळ झाला की पोस्ट उशीराच दिसतात हल्ली...
नेमके मी लिहिले आणि तुमची उत्तराची पोस्ट पण आली... मग मलाच वाटले की उगाच लिहिले... तुम्हाला कसे वाटेल वाचून वगैरे...
द्या कोणीही.. नाहीतर दोघेही द्या १-१.

क्यू
चित्रपट :- नायिकाप्रधान पोस्टरवर आधारित
नायिका :- अप्सरा आली फेम
संगीत : संगीतकाराच्या नावातच राज

७१६. मराठी

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना

क्लु या चित्रपटाचा जो संगितकार आहे त्याच नावाचा संगितकार सध्या मराठित आहे आनि त्याचे लाइव्ह शोज खुप गाजलेत.

काबुलीवाला—
ओ या क़ुर्बान
वो आँखें थी दिलबर की या नर्गिस-ए-मस्ताना
देखे हुए उस बुत को अब हो गया ज़माना
ओ सबा कहना मेरे दिलदार को
दिल तड़पता है तेरे दीदार को
ओ सबा कहना ...

Pages