किस्से आणि निरीक्षणं (भाग ३) ...अन् बल्ब पेटला.

Submitted by बग्स बनी on 6 March, 2017 - 15:23

नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे?
प्रत्येकाला आपल्या शाळेच्या बऱ्याच आठवणी असतात. आणि त्या आठवणी खरंच खुप अनमोल असतात. प्रत्येकाच्या काही भन्नाट आठवणी असतील यांत शंकाच नाही. खरंतर शाळेचे दिवसच खुप वेगळे असतात. जगातली कुठलीच किंमत देऊन ते परत नाही मिळवता येणार. कधीच नाही.
आज आॅफिसच्या लंच टाईम मध्ये असाच एक शाळेतला किस्सा आठवला, खुप हसलो. तुमच्याशी शेअर करण्याचा मोह नाही आवरला. म्हणुन....

मी ४थी-५ वीत असतानाची गोष्ट, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या होत्या. अभ्यासाचा बराचसा पोर्षन शिक्षकांनी कव्हर केला होता. मी आणि माझा एक मित्र, अवधूत. आम्ही नेहमीच एकत्र असायचो. इयत्ता ३री पासुन ते शाळेच्या शेवटच्या दिवसा पर्यंत, (१० वी). आम्ही एकाच वर्गात एकत्र होतो. आमच्यात बऱ्याच गोष्टींच, सवयींच साम्य होतं. वर्गात आम्ही एकाच बेंचवर बसायचो.....वैगेरे वैगेरे. तर नुकत्याच सुट्ट्या संपल्यामुळे आणि अभ्यासक्रम कमी असल्यामुळे बरेचशे तास (लेक्चर्स) आॅफ असायचे. दोन-तीन शिक्षक तर अजुन रजेवरतीच होते. एकदिवस अशेच चार तास आॅफ गेले. त्या तासांत बराच कालवा, गोंधळ, मस्ती चालु होती. चौथा तास संपल्याची बेल वाजली. आता गणिताचा तास होता. पण कोणालाच तो गणिताचा तास होऊ नये असं वाटत होतं. सुदैवाने अजुन तरी गणिताचे सर वर्गात आले न्हवते. पाचवा तास चालु होऊन ५-१० मिनिटे झाली तरी कोणीही आलं न्हवतं. वर्गात गोंगाट अजुन चालुच होता. मी आणि अवधूत आम्ही आपलं वहीच्या मागच्या पानावर फुल्ली गोळा खेळत होतो. मी आणि माझे इतर काही मित्र ऊंची ने कमी असल्यामुळे शिक्षक आम्हाला नेहमी पहील्या पाच बेंचवर बसवायचे. बऱ्याच वेळाने इंग्रजीच्या टिचर वर्गात आल्या, आम्हाला कोणालाच आज तरी शिकायचं न्हवतं. म्हणुन सगळ्यांचे चेहरे पडले. कदाचित टिचरांना देखील कंटाळला आला असावा, म्हणुन त्या म्हणाल्या. सगळ्यांनी इंग्रजीची पुस्तकं काढा, आणि पेज नंबर सांगितला. मला आता आठवत नाही पेज नं. जिथपर्यंत मला आठवतंय ती एक गोष्ट होती मे बी ॲलिस...असंच काहीसं. त्या म्हणाल्या, मी धडा वाचते, तुम्ही मनातल्या मनांत वाचन करा. मी आणि अवधूत एकमेकांकडे बघु लागलो. खरंतर त्या टिचर थोड्याश्या गावंढळ होत्या त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला गावठीपणा लगेच जाणवायचा. आता तुम्ही इमॅजिन करू शकता की गावठी टोन मधलं इंग्लिश कसं असेल. त्यामुळे मी आणि अवधूत त्यांच्या बोलण्याचा, इंग्रजी उच्चारांचा अर्थ काढुन, जोक्स करून जाम हसायचो. टिचरांवर नाही, शब्दांवर. आॅलरेडी मागच्या आॅफ तासांमध्ये आम्ही इतके हसलो होतो, इतके हसलो होतो की आता रडायचं बाकी होतं. त्यात आता हा तास. त्या टिचर बोलायच्याच अशा की हसु आवरायचं नाही. समजा आता इंग्रजी शब्द असेल "LOOKED" तर त्या उच्चारायच्या "लुकडं" Happy किंवा "SCHOOL" तर त्या उच्चारायच्या "इस्कुल"..... Happy
टिचर धडा वाचु लागल्या, आख्खा वर्ग शांत होता. सगळे आपले माना खाली घालुन वाचत होते. काही खरंच वाचत होते, काही मस्ती तर काही झोपले होते. मी आणि अवधूत मात्र नेहमी प्रमाणे हसत होतो. कारण अवधूत तोंडातल्या तोंडात त्यांच्या मागे प्राॅम्टिंग करत होता. जवळ जवळ अर्धा धडा वाचल्यावर एक शब्द आला, "MUD" (मड्=चिखल). पण त्यांचा उच्चार असा होता. "मडं". आम्हाला जाम हसायला आलं. कसंबसं हसु दाबून आम्ही पुन्हा एेकु लागलो. टिचर पुस्तकात बघुन धडा वाचत वाचत वर्गात प्रत्येक रांगेतुन फिरत होत्या. थोड्यावेळाने दुसरा शब्द आला, "SMOOTHLY" (स्मुथली=हळुवार). पण त्यांचा उच्चार "इस मुतली". अर्थात, आता हसुच आवरेनासं झालं होतं. पण तरी पण आम्ही अगदी जिवानिशी कंट्रोल करत होतो. आमची अवस्था खुप बेकार झाली होती. मोकळे पणाने हसताही येत न्हवतं, आतल्या आत हसुन हसुन पोटातही दुखू लागलं होतं. डोळे अक्षरक्षः लाल होऊन पाणावलेले, नाकातून पाणी येऊ लागलं. मग उगाचच पेन खाली पाडून तो उचलायचा बहाना करून जितकं हसतां येईल तितकं हसायचो. हे आणि असे बरेचशे शब्द वारंवार त्यांच्या उच्चारात यायचे. आम्ही पुर्णतः असहाय्य झालो होतो. हास्याचा पारा चढत होता. आमची चुळबुळ वाढली होती. टिचरांनी आम्हांला हेरले. कदाचित त्यांनी हे आधीच नोटीस केलं असावं. झालं, टिचरांनी वाचन थांबवले. आम्हाला उठवलं. "तुम्ही, काय रे?" सगळे आधी टिचरांकडे, मग आमच्याकडे बघु लागले. "हो हो तुम्ही दोघं. स्टॅण्ड अप" आमच्याकडे पाहत म्हणाल्या. "काय चाललंय? मी मघासपासून बघतेय तुम्हांला, काय आहे हसण्यासारखं? जरा आम्हांला पण सांगा?" काय? मी जोक सांगतेय का? का माझ्या चेहऱ्यावर लिहलाय? टिचरांनी बडबड सुरू केली, आख्खा वर्ग आमच्याकडे बघत होता. खुप इन्सलटिंग सिच्युएशन होती. पण ते महत्वाच न्हवतं, आम्ही अजुनही हास्याच्या नशेत होतो. आमची अवस्था अजुनही तशीच होती. आम्ही माना खाली घालुन बिनलाज्यासारखं अजुन हसत होतो. अगदी नाकपुड्या तनुन, कंट्रोल करत. आता तर टिचर सुद्धा आमच्या जवळ आल्या होत्या. आम्ही अजुनही माना खाली घालुन उभे होतो. टिचरांनी पुन्हा विचारले, "काय? काय झालंय इतके दात काढायला? " वरती बघा....मग एकदम सिरीयस होऊन हळु हळु वर बघायचं. पण मध्येच अवधूत चा कंट्रोल सुटला, सगळाच नाही पण थोडासा, त्याच्या तोंडाचा आवाज झाला. मी परत हसु दाबत झटकन् मान खाली घातली. टिचर आता चांगल्याच रागावल्या होत्या, त्या जोरात कडाडल्या. काय होतं हसण्यासारखं? तेवढ्यात अवधूत म्हणाला, टिचर मी नाही हाच हसवतोय मला. आता त्यांचा मोर्चा माझ्या कडे वळला. काय सांगुन हसवत होतास? काय रे? मी म्हणालो, नाही टिचर काही नाही. " चला मुख्यधापकाकडे..." तितक्यात अवधूत म्हणाला "नाही टिचर मी नाही हा", चला बाहेर, वर्गाच्या बाहेर व्हायचं. चला चला लवकर...टिचर म्हणाल्या. मी मान खाली घालुनच म्हणालो, मी नाही हाच , तुम्ही वाचत होता तेव्हा तो शब्द होता ना? स्मुथ... इतक्यात आवाज आला. फुर्रर्रर्रर्रर्र.....अवधुतचा बांध सुटला होता. तो मोठ्याने हसत होता, मी वर पाहीलं, मला काहीच समजलं नाही, आवाज कसला होता? मग मी अवधुत कडे पाहीलं. तर इतकावेळ दाबून ठेवलेले हसु अचानक बाहेर पडल्यामुळे त्याच्या नाकातला सगळा शेंबुड बाहेर पडला होता, अक्षरक्षः शेंबडाचा फुगा आला होता (बल्ब पेटला). त्याचे ओठ पुर्णपणे शेंबडाने भरले होते, आणि काहीसा शेंबुड टिचरांच्या साडीवरही उडाला होता. त्याची ती अवस्था पाहुन अखेरीस मी ही मौन सोडले. अख्ख्या वर्गात एकच हश्या पिकला होता. इतक्यात मधल्या सुट्टीची बेल झाली. ताड्ताड, टिचर वर्गाच्या बाहेर निघुन गेल्या.........अन् अखेरीस बल्ब पेटला. Happy Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या शाळेतले ईंगजीचे सरहि असंच अफाट ईंगजी बोलायचे. बेंचखाली जाउन गुपचुप हसणे, शिक्षकांनी पकडल्यावर एकमेकांवर ढकलणे पण नेहमीच. पण शेवटचा पॅरा वाचुन यक्क झालं.

कधी कधी आपण हास्याच्या इतके अधीन होतो की मग सतत छोट्या-छोट्या गोष्टीवर हसु येतं, मग प्रसंग कीतीही गंभीर असु द्या, हसणं काही कंट्रोल होत नाही, माझ्याबाबतीत नेहमी असंच घडतं......

कधी कधी आपण हास्याच्या इतके अधीन होतो की मग सतत छोट्या-छोट्या गोष्टीवर हसु येतं, मग प्रसंग कीतीही गंभीर असु द्या, हसणं काही कंट्रोल होत नाही, माझ्याबाबतीत नेहमी असंच घडतं......>>>>हो,पण मला अस वाटत की,जशी परिस्थिती असेल तशी रियॅक्शन द्यायला हवी...
गंभीर परिस्थितीत कसं हसू वाटतं तुम्हाला???

हो,पण मला अस वाटत की,जशी परिस्थिती असेल तशी रियॅक्शन द्यायला हवी...
गंभीर परिस्थितीत कसं हसू वाटतं तुम्हाला???.....>>>>> मी अगदी सहमत आहे, जशी परिस्थिती असेल तशी रिॲक्शन द्यायला हवीच. माहीत नाही, पण एकदा का हास्याच्या प्रवाहात अडकलो की मग इच्छा असुनही मी स्वतःला थांबवु शकत नाही. मग सिच्युएशन कशी ही असुद्या. माझ्या या स्वभावामुळे मी बऱ्याचदा गोत्यात आलोय. लहानपणी जेव्हा माझ्याकडून चुका व्हायच्या. अस्सल सातारी असल्यामुळे, ओरडा कमी आणि शिव्याच जास्त मिळायच्या, पण त्यावेळी सुद्धा त्या शिव्या ऐकुन मला हसु यायचं, मग जिथे ओरडा खाऊन भागणार होतं, तिथं मला मार मिळायचा. का हसलास म्हणुन. एकदा असंच रात्री दिड वाजता मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला, मी झोपायच्याच तयारीत होतो. तिला कसलं तरी स्वप्न पडलं होतं. आणि तिला तिच्या आईची आठवण येत होती. कारण त्या वेळेला ती हाॅस्टेल मध्ये राहण्यास होती. तिने मला तिचं स्वप्न सांगितलं, नेहमी प्रमाणे मी थोडासा हसलो, आणि तिला समजावणार इतक्यात फोन कट झाला. दोन दिवस ती माझ्याशी बोलली न्हवती. शेवटी डझनभर मस्का लावुन मनवावं लागलं, तो भाग वेगळाच. बऱ्याचदा काहींकडुन असेही ऐकु आले की मी सिरीयस नाही, परिस्थितीची जाण नाही...वैगेरे वैगेरे. पण याचा अर्थ असा नाही की मी अभावनिक आहे, किंवा मला परिस्थितीची जाण नाही. आहे, उलट इतरांपेक्षा जास्त आहे असं म्हणालात तरी चालेल. रस्त्यावर प्रवास करताना बऱ्याच घटना घडतात, जसं की ॲक्सिडेंट वैगेरे...त्यावेळेस बऱ्याचदा मी मदतीसाठी धावुन जातो. खरंतर आपण जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती नुसार रहावच असं नाही, असं माझं तरी मत आहे. गंभीर होऊन काय मिळतं? मनावर ओझं, विचारांची गर्दी, किंवा गैरसमज. परीणामी आपण स्वतः याचा त्रास स्वःतालाच करून घेतो, ज्याने आपला मुड खराब होतो. चेहऱ्यावर रिॲक्शन न दाखवता कृतीतून रिॲक्ट होणे या वर मी विश्वास ठेवतो. राहीला प्रश्न हसण्याचा, तर नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती एका छोट्याश्या स्माईल मुळे बदलु शकते. आणि असं बऱ्याचदा घडलंय. आणि हसण्यासाठी वेळकाळ असतो, असं मला मुळीच नाही वाटत. हास्याने बऱ्याच नेगेटीव्ह गोष्टींचा, विचारांचा निचरा होतो. नाही का???

या विषयावर माझ्याकडे बोलायला भरपूर आहे, मी ते सेप्रेटली लिहण्याचा प्रयत्न करीन.

आयला माझे नाव आता कश्याला ईथे ..
येऊद्या तुमचे किस्से कृती निरीक्षण हनुमान..
ते LOOKED लुकडं भारी. माझा शाळेत एक मित्र होता. म्हणजे आहे अजूनही. त्याचे नाव मोडक होते. मी त्याला मोडकं बोलायचो.
एखादी लंगूर के हाथ मे अंगूर टाईप्स जोडी पाहिली की मी त्यांना `कडक आणि कडकं' असे बोलायचो Happy
किस्से वाचले की असे काही काही आठवते..