Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता विक्रांत इशाला मीच
आता विक्रांत इशाला मीच सांभाळणार असं म्हणत होता. त्याचा हट्ट मला बालिश वाटला.
जरी मो ला ते मूल नको होतं, आणि जन्माला आल्यावर सांभाळायचं नव्हतं तरी आता कोर्ट कायद्याने ते मूल कदापिही विक्रांत ला देणार नाही, ते मूल आईकडेच जाणार, अगदी आई वेडी आहे असं वगैरे सिद्ध केल्याशिवाय, किंवा वकिलांनी एक्सेप्शनली वेगळा मुद्दा/वाद विवाद माण्डल्याशिवाय मुलाची कस्टडी बाबाला मिळत नाही.
मुळात तो बाबा कुठाय?
मुळात तो बाबा कुठाय? घटस्फोटाचं कारण तेच आहे ना?
पण त्याचा हा स्टँड पहिल्यापासूनचा आहे. मोनिका तर सईल आणि मानसीच्या संसारासाठी रेडिमेड बाळ द्यायलाही तयार आहे.
कागदोपत्रीचा बाबा हो तो.
कागदोपत्रीचा बाबा हो तो.
मोनिका तर सईल आणि मानसीच्या संसारासाठी रेडिमेड बाळ द्यायलाही तयार आहे. >> हे कधी घडलं?
मग शिरेलीत उरलं काय दाखवायला?
पण मला वाटतंय हे नतद्रष्ट झी वाले सईल आणि मा चे लग्न मोडणार... :नामुबा:
पण मला वाटतंय हे नतद्रष्ट झी
पण मला वाटतंय हे नतद्रष्ट झी वाले सईल आणि मा चे लग्न मोडणार>>> डेफीनेटली दक्षे. वि मा ची तर स्टोरी आहेना, आता त्या पाठीमागे झी वाले. ओढून ताणून दोघांना एकत्र आणणार.
मला वाटते सिरिअल चे नाव
मला वाटते सिरिअल चे नाव "खुलता कळी खुलेना" हे एक रूपक आहे,
यांच्या आयुष्यात कळी खुलयाला लागली की ती कोमेजते,
- लग्न झाले, आयुष्य सेट झालं3 वाटत असताना मो ची बातमी कळली.
- मा चा साखरपुडा होणार होणार वाटत असताना बॉम्ब पडला,
- आता झी वाले अश्याच कळ्या बनवत राहणार आणि खुडत राहणार.
जाऊ दे...खूप ज्ञान झाडले
"भले ते बाळ माझं नसेल तरी ते
"भले ते बाळ माझं नसेल तरी ते माझ्या बायकोच मूल आहे आणि त्याची आई त्या बाळाला सांभाळायला सक्षम नाहीये . आर्थिक दृष्ट्याही आणि मानसिक दृष्ट्याही "ह्या कारणास्तव विक्रांत ईशाला दत्तक घेईल हवं तर . नाहीतरी मोनिकाला मी ऍबॉर्शन करायला नकार दिला आणि तिला ते नको असलेले मुलं जन्माला घालायला लागलं या कारणास्तव त्याच मन त्याला खात आहेच त्यामुळे ईशाची संपूर्ण जबाबदारी विक्रांत घेईल असं वाटतंय . इकडे मानसी पण सलील बरोबर च लग्न तिच्या वागण्याने फिस्कटवेल आणि शेवटी ईशाला मावशी च्या रूपात आई मिळेल आणि मालिका द एन्ड
आणि मो चं काय होईल असं
आणि मो चं काय होईल असं तुम्हाला वाटतं मग?
मो नेहमीप्रमाणे काड्या
मो नेहमीप्रमाणे काड्या घालायचा खूप प्रयत्न करेल . बाळ न देण्यासाठी आणखीन बरचं काही. दळवींचे दिवाळं वाजवण्याची जबाबदारी आहे ना तिच्यावर.दळवींचे दिवाळं काढण्याकरता ती खूप प्रयत्न करेल . आत्या तिचे प्रयत्न हणून पडेल शेवटी मो हरेल आणि गप्प बसेल. हरेल आणि मग कदाचित वेडी पण होईल तिच्या आततायी आणि आक्रमक स्वभावाने . पराभव सहन होणार नाही तिला आणि वेडी होईल
बापरे
बापरे
मग काय तर
मग काय तर
आणि मीन व्हाईल, ईशाला कोण
यांचं बरंय बुवा.. ईशा आपली परस्पर सांभाळली जात्येय !! सईल, क्रांत, तै, अज्जी, या नावांच्या रांगेत ईशा नाव बरं........स्वरांनीच सुरु केलं!
आमच्या कडे तर अर्धा दिवस
आमच्या कडे तर अर्धा दिवस बाळाला कुठे ठेवायचे तर सतरा प्रश्न पडतात >> हो ना . पण मालिका वाल्यांच तस नसत त्यांना कसलेच प्रश्न नसतात. नाहीतर वास्तवाशी काही संबंध नाही अशीच ते सुरवातीला पाटी टाकतात पण . तिकडे गौरी आणि शिव पटापट बनारस - मुंबई करताहेत त्यांना ट्रांसफर पण मिळते झटपट
हो ना. वर सगळ्यांनीच माझ्या
हो ना. वर सगळ्यांनीच माझ्या मनातलं लिहिलंय त्यामुळे फक्त
मम!
आजकाल मला मोनिकाची एंट्री
आजकाल मला मोनिकाची एंट्री झाली की धडकीच भरते एकदम!
सध्या काय सुरू आहे? मी २-३
सध्या काय सुरू आहे? मी २-३ दिवस पाहिलिच नाहिये
सध्या काय सुरू आहे? मी २-३
सध्या काय सुरू आहे? मी २-३ दिवस पाहिलिच नाहिये>>>
दक्षिणा, अजून एक महिना पंधरा दिवस नाही पाहिली तरी हरकत नाही! फारसे काही कळायला त्रास होणार नाही!
किशोर
माझ्या फेसबुक पेज वर मी हे
माझ्या फेसबुक पेज वर मी हे सगळे अंदाज वर्तवले आहेत त्याला मालिकेचे दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी लाईक केले आहे .
म्हणजे माझे अंदाज खरे ठरणार कि काय ? मी वर्तवलेले अंदाज ( जे आधीच लिहिले आहेत )
विक्रांतचा सध्याच्या स्थितीत असा विचार दिसतोय "भले ते बाळ माझं नसेल तरी ते माझ्या बायकोच मूल आहे आणि त्याची आई त्या बाळाला सांभाळायला सक्षम नाहीये . आर्थिक दृष्ट्याही आणि मानसिक दृष्ट्याही "ह्या कारणास्तव विक्रांत ईशाला दत्तक घेईल . नाहीतरी "मोनिकाला मी ऍबॉर्शन करायला नकार दिला आणि तिला ते नको असलेले मुलं जन्माला घालायला लागलं" या कारणास्तव त्याच मन त्याला खात आहेच त्यामुळे ईशाची संपूर्ण जबाबदारी विक्रांत घेईल असं वाटतंय . इकडे मानसी पण सलील बरोबर च ठरलेलं लग्न तिच्या वागण्याने फिस्कटवेल आणि मालिकेच्या शेवटी ईशाला मावशी च्या रूपात आई मिळेल. खुलता खुलता कळी खुलेलंच
पण त्या आधी मोनिका थोडीच स्वस्थ बसतेय ? ती या सगळ्या प्रकरणात नेहमीप्रमाणे काड्या घालायचा खूप प्रयत्न करेल . बाळ न देण्यासाठी आणखीन बरचं काही. दळवींच दिवाळं वाजवण्याची/ काढण्याची जबाबदारी आहे ना तिच्यावर. दळवींच दिवाळं काढण्याकरता ती खूप प्रयत्न करेल . विक्रांतची आत्या तिचे सगळे प्रयत्न हाणून पाडेल आणि शेवटी मोनिका हरेल आणि गप्प बसेल . गप्प बसली तरी " मी हरले " या कारणास्तव कदाचित ती वेडी पण होऊ शकते . जी माणसं आततायी आणि आक्रमक स्वभावाची असतात त्यांना पराभव सहन होत नाही आणि डोक्यावर परिणाम होऊ शकतो . तसच मोनिकाच्या बाबतीत घडेल आणि मालिका द एन्ड
माझ्या फेसबुक पेज वर मी हे
माझ्या फेसबुक पेज वर मी हे सगळे अंदाज वर्तवले आहेत त्याला मालिकेचे दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी लाईक केले आहे >>> लेखकाला पुढे काय कराव ते सुचत नसेल .
तुमच्यामुळे त्याना पुढच्या कथेची दिशा मिळाली , म्हणून खुश झाले दिग्दर्शक
तुमच्यामुळे त्याना पुढच्या
तुमच्यामुळे त्याना पुढच्या कथेची दिशा मिळाली , म्हणून खुश झाले दिग्दर्शक >>>> म्हणजे दिग्दर्शकाची खळी खुलली तर ..........
स्वस्ती अगदी अगदी माझ्या
स्वस्ती अगदी अगदी माझ्या डोक्यात हेच आलं सुजा ची पोस्ट वाचून.
आयती लिहिलेली कथा किंवा शेवट मिळाला की या लोकांना
झी च्या सिरियल निवड समितीचे
झी च्या सिरियल निवड समितीचे सभासद काय पिउन सिरियल निवडत असावेत?
ती या सगळ्या प्रकरणात
ती या सगळ्या प्रकरणात नेहमीप्रमाणे काड्या घालायचा खूप प्रयत्न करेल . बाळ न देण्यासाठी आणखीन बरचं काही. >>
काल मोनिका अनाथाश्रम शोधत असताना दाखवली होती.
ती ईशाला अनाथाश्रमात सोडेल आणि कुठे सोडले ते सान्गणार नाही.म्हणजे सर्व जण हवालदील. यात दोन चार भाग सहज जातील. मग कुठे ईशाचा शोध लागेल.
एक विचारायचे आहे. मी क्वचितच
एक विचारायचे आहे. मी क्वचितच काही प्रतिसाद लिहिते. पण प्रत्येक वेळी 'सम्पादन' असे लिहून येते. असे का ?
एक विचारायचे आहे. मी क्वचितच
एक विचारायचे आहे. मी क्वचितच काही प्रतिसाद लिहिते. पण प्रत्येक वेळी 'सम्पादन' असे लिहून येते. असे का ? >> तुम्हाला दिलेल्या प्रतिसादात काही बदल करायचे असल्यास तुम्ही ते संपादित करू शकता म्हणजे बदल करू शकता
मानसीचे उच्चार भयाण आहेतच पण
मानसीचे उच्चार भयाण आहेतच पण बॉडी लंग्वेज पण मेंगळी आहे़.. गदागदा हलवावीशी वाटतं.. आणि केस कापताना न्हावी कसं पाणी मारतो तसं तिच्यावर पाण्याचे हबके मारावे आणि केस पण खसाखसा विस्कटून ताजंतवानं करावं...
त्या ईशा ला दूध वगैरे काही
त्या ईशा ला दूध वगैरे काही लागत नाही का?
मानसीचे उच्चार भयाण आहेतच पण
मानसीचे उच्चार भयाण आहेतच पण बॉडी लंग्वेज पण मेंगळी आहे़.. गदागदा हलवावीशी वाटतं.. आणि केस कापताना न्हावी कसं पाणी मारतो तसं तिच्यावर पाण्याचे हबके मारावे आणि केस पण खसाखसा विस्कटून ताजंतवानं करावं...>>>+१११
अगदी मनातल बोललात........
आता एवढ सगळ्याना कळलंच आहे तर
आता एवढ सगळ्याना कळलंच आहे तर मं कोणालाहि हा प्रश्न पडत नाही का की मोनिकाला जाब विचारावा की कोणाचं मूल आहे हे ?? कोणीच कस विचारीत नाही ?? निदान तिच्या आजी आजोबांनी तरी.. मानसीला सेटल करायची जेवढी घाई त्यानी दाखविली मग आत मोनिका आणि सो कॉल्ड मुलाचा बाप शोधुन त्यांना सेटल करून द्या ना... की सगळ्यांना एवढी खात्री आहे की मोनिका अशा मुलीन्पैकी आहे की ज्याचा ऐतराज पिक्चर मध्ये करीना प्रियंकाला सांगताना उल्लेख करते ???(सूद्न्यास सांगणें न लागे ) कारण मेन प्रश्न तिथूनच सुरू होतो ना पण लेखक किंवा कोणीही ब्र् हि काढत नाहीयेत.. मालिका किंवा पिक्चर हे समाजाचा आरसा असतो म्हणतात पण हे अस खर आयुष्यात घडण अशक्य आहे (म्हणजे एवढ मूल झाल्यावर पण पेरेन्ट्स ना बाप माहीत नसण..निदान भारतात तरी अजुन एवढ पुढारलेले मला कोणी माहीत नाही बा ?? )..किंवा सरळ मग हि फिक्शन किंवा सायन्स मालिका आहे अस डिक्लरे करा..मग लेखक पण सुटले आणी मायबाप प्रेक्षक पण.. हुउश..दमले मी एवढ मराठी टायपिंग करून...
अरे किती छळवाद चालवलाय त्या
अरे किती छळवाद चालवलाय त्या सलील चा .....आता पुन्हा त्याची आई कशी काय तयार झालीये लग्नाला ??
अजून किती पाणी घालणार आहेत ......जर शेवटी वि आणि मा च च जुळणार आहे तर ..आवरा यांना
Pages