नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

आठ नोव्हेंबर २०१६ ला चलनबंदीच्या स्वरूपात अस्मानी नाहीपण जी सुलतानी देशावर कोसळली त्याचा वैयक्तिक आयुष्यावर, कौटूंबिक कार्यप्रसंगांवर काय परिणाम होतोय याविषयी प्रचंड उहापोह मायबोली आणि इतरत्रही झालेलाच आहे.
परंतु या चलनबंदीचा एकंदर उद्योगधंद्यांवर, कुशल /अर्धकुशल कामगारांवर, शेतीवर, शेतीआधारित व्यवसायांवर आणि परकीय गुंतवणूकीवरही काय परिणाम झाला हे पाहिले पाहिजे.

आपल्यापैकी कुणाचे स्वतंत्र उद्योगधंदे असतील, कुणी शेअर बाजारात गुंतवणून करत असेल, कुणी परकीय गुंतवणूकीच्या क्षेत्रात असेल, कुणी इतरांच्या उद्योगधंद्यात सहाय्यक म्हणून काम करत असेल किंवा कुणी नुसतंच या सगळ्या उलाढालींवर लक्ष ठेवून पुढच्या मार्केट इकॉनॉमीचा अंदाज घेत असेल. तर अशा लोकांनी आपापली मते, निरीक्षणे इथे मांडावीत म्हणून हा धागा. भारतीय/अभारतीय अर्थपंडितांची मते सुद्धा मांडता येतील.

(कृपया या धाग्यावर मे २०१४ पासूनचे सगळे काढायची गरज नाही. आठ नोव्हेंबर २०१६ नंतरच्या आर्थिक घडामोडी इतकेच या धाग्याचे परिप्रेक्ष्य आहे.)
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बा विठ्ठला, अरे त्यातिल एक वाक्य "पंच" या स्वरुपाचे वाटले म्हणून डकवली हो पोस्ट......
>>>> आता "जागते पहारे" नावाने किती केंद्र/राज्ये / पालिका/झेडप्यांच्या नावाने धागे काढणार, कोण काढणार ते ठरवुन घ्या,<<<<

Pages