मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे?

Submitted by बोबो निलेश on 25 April, 2014 - 23:11

मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाचायला आवडेल?
केवळ लेखकासाठीच नव्हे, तर विक्रेते, प्रकाशक लेखक वाचक या सर्वांसाठी हा प्रश्न विचारला आहे.

वाचकांना नक्की काय वाचायला आवडेल यामध्ये कुठले विषय आवडतील? कूठल्या घटनांवर लिहिलेलं आवडेल? कुठला जॉनर आवडेल.

खरं तर हा नंदिनी यांनी विचारलेला हा प्रश्न.
http://www.maayboli.com/node/48005?page=1

त्यावर त्यांनी धागा काढावा, असं मी त्यांना सुचवलंही होतं.
पण त्यानी धागा न काढल्यामुळे मी हा प्रश्न hijack केला आहे Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रहस्य कथा, किंबहुना कादंबर्‍या, व्यवस्थित गुंफलेल्या.
दर्जेदार विनादी लेखन. (यात दर्जेदार म्हणजे काय असा पतिप्रश्न आल्यास त्याला पास.)

मला अतिशय उत्तम भाषेत लिहीलेल्या दु:खांतिका ( ट्रॅजेडीज) आवडतात.
स्त्रियांची अबोल दु:खं समजून घेऊन व्यक्त केलेले लेखनही आवडते.

आजकाल बरेचदा असे ऐकायला येते की मराठी लेखक सद्य परिस्थितीनुसार लिहित नाहीत. वास्तव दाखवले पाहिजे. म्हणजे नेमके काय?? ते वाचकांनीच उघड केले तर त्यादृष्टीने विचार करुन लिहिता येईल....हुश्श...:)