"रईस"च्या निमित्ताने - अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2016 - 03:42

कालच रईस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला,
आणि किती तरी वर्षांनी दिवार, अग्नीपथ, त्रिशूल, डॉन, वगैरे वगैरे अ‍ॅंग्री यंग मॅन अमिताभपटातील कचकचीत डायलॉगच्या जवळपास जाणारे काहीतरी सापडले.
ईथे चेक करा - ऐकल्याशिवाय मजा नाही
https://www.youtube.com/watch?v=J7_1MU3gDk0

..

"अम्मीजान कहती थी, कोई धंदा छोटा नही होता., और धंदे से बडा कोई धर्म नही होता.
अब यही मेरा कलमा है. और यही मेरा मजहब !!"

..

"अम्मी जान ने कहा था
कभी किसी का दिल मत तोडना,
ईसलिये दिल को छोडकर..
सब कुछ तोड डाला "

..

नवाझुद्दीन - जिसको तू धंदा बोलता है ना, क्राईम है वो. धंदा बंद कर ले, वरना सांस लेना मुश्कील कर दूंगा..
शाहरूख - गुजरात की हवा मे व्यापार है साहेब. मेरी सांस तो रोक लोगे, लेकीन ईस हवा को कैसे रोकोगे !

(ईथे अमिताभचा अग्नीपथ आठवला - हवा तेज चलता है दिनकर राव.. टोपी संभालो, उड जायेगा - https://www.youtube.com/watch?v=eD0e5imsX10 )

..

"जो धंदे के लिये सही, वो सही.. जो धंदे के लिये गलत, वो गलत.. इससे ज्यादा कभी सोचा नही."

..

अतुल कुलकर्णी - ज्यादा उंचा मत उड.. कट जायेगा.
शाहरूख - अगर कटनेका डर होता ना, तो पतंग नही चढाता... फिरकी पकडता.

..

नवाझुद्दीन - एक दिन नाक मे नकेल डालके खीचके लेके जाऊंगा मै तुझे यहासे..
शाहरूख - सबूत ले आईये..... ले जाईये..... रईस हाजिर है !

..

"बंदूक की गोली और मियांभाई की बोली
जब चलती है ना,
दुश्मन डरता बाद मे है
मरता पहले है .."

,,

"बनियेका दिमाग और मियाभाईकी डेअरींग .. !!!"

..

"आ रहा हू ..."
शेवटच्या दृश्यातील शाहरूखचा डोळा बघण्यासारखा! - पुन्हा एकदा अमिताभचा सरकार ! आठवला

page final.jpg

-_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_--

तर दोन काळातील सुपर्रस्टार्सची तुलना करणे या फिल्म ईंडस्ट्रीला नवीन नाही. अमिताभने ज्याला धक्का दिला त्या राजेश खन्नाशी त्याची तुलना व्हायची. ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारची आणि अमिताभची तुलना व्हायची. पुढे जाऊन शाहरूख खान आणि दिलीप कुमार यांच्यात साम्य शोधत त्यांचीही तुलना झालेली आपण पाहिले आहे. पण या सर्व तुलनेत सर्वाधिक हिटस मिळालेली चर्चा म्हणजे अमिताभ बच्चन विरुद्ध शाहरूख खान!

आणि त्याला कारणही तसेच आहे .........

अमिताभनंतर अचानक सुपर्रस्टारपदाची जागा रिकामी झाली. अमिताभची स्वत:ची सेकंड इनिंग सुरू व्हायची होती. पन्नाशीच्या जवळ आलेला अमिताभ सुपर्रस्टार म्हणवणे तर दूर, पण एक फ्लॉप नट म्हणून ओळखला जाऊ लागला होता. तसेच त्यानेच उंचीवर नेऊन ठेवलेले सुपर्रस्टार पद मिळवायला अनिल कपूर, संजय दत्त वा जॅकी श्रॉफ, सनी देओलसारखे त्यावेळचे नट समर्थ नव्हते. याचवेळी बॉलीवूडच्या क्षितिजावर आमीर, शाहरूख आणि सलमान नावाचे तीन खान उगवले. तरुणाईच्या बदलत्या अपेक्षा पुर्ण करण्यात यशस्वी ठरल्याने बघता बघता सर्वांना मागे सारून पुढे गेले. त्यातही त्या पिढीची रोमॅंटीक चित्रपटांची आवड ओळखून तिथे आपली छाप पाडणारा शाहरूख खान सुपर्रस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला.

‘कुछकुछ होता है’ आणि ‘हम तुम्हारे है सनम’ सारख्या चित्रपटांतून शाहरूखच्या सहाय्यक अभिनेत्याची भुमिका करणारा सलमान खान तेव्हा शाहरूखच्या स्पर्धेतही नव्हता. तसेच उत्तमोत्तम चित्रपट देणार्‍या आमीर खानने शाहरूखला टक्कर न देता आपले वेगळे स्थान बनवणे पसंत केले. परिणामी शाहरूखचे सुपर्रस्टारपद काही काळासाठी अबाधित होते. आणि जोपर्यंत त्याचा रोमॅंटीक चित्रपटांचा पत्ता चालणार होता तोपर्यंत त्याला धोकाही नव्हता. पण तेव्हा त्यालाही कल्पना नसेल की अमिताभच आपली सेकंड इनिंग सुरू करत स्वत:च पुन्हा या स्पर्धेत उभा राहणार आहे.

शाहरूख विरुद्ध अमिताभ - सर्वात मोठा सुपर्रस्टार कोण!

पहिल्यांदाच ही चर्चा दोन वेगळ्या पिढीतील कलाकारांची एकाच काळात काम करताना होत होती. गंमत म्हणजे दोघेही आपापल्या जागी सुपर्रस्टार म्हणून ओळखले जात असल्याने याचा फायदा दोघांच्याही लोकप्रियतेला होत होता. जोहार आणि चोप्रा मंडळींनी ती पुरेपूर कॅश देखील केली. यांच्या कैक चित्रपटात हे दोघे आमोरेसामोरे आले. आधी मोहोब्बते मध्ये यांची टक्कर झाली. जिथे दोघांनाही साजेसे रोल दिले गेले होते. अमिताभला परंपरा प्रतिष्ठा अनुशासन सारखे कडक शब्द असलेले डायलॉग दिले गेले होते. पण शाहरूखसाठी ती भुमिका म्हणजे घरचे मैदान असल्याने तो सरस ठरला होता. पुढे कभी खुशी कभी गम हा चित्रपट करण जोहारने शाहरूखलाच डोळ्यासमोर ठेवून बनवला असल्याने तो त्यानेच एकहाती खाल्ला होता. वीरझारा मध्ये कुठेही या दोघांची जुगलबंदी दाखवायचा अट्टाहास नव्हता, तर कभी अलविदा ना कहना मध्ये दोघांचे एकत्र कितपत शॉट होते हे देखील आठवत नाहीये. तो पिक्चर फ्लॉप जाण्याचे हे देखील एक कारण होते. याऊपर शाहरूखच्या पहेलीत अमिताभ पाहुणा कलाकार होता, तर अमिताभच्या भूतनाथमध्ये शाहरूखची छोटीशी भुमिका होती. एकंदरीत मोहोब्बतेचा काही प्रमाणात अपवाद वगळता हे दोन्ही महानायक खर्‍या अर्थाने एकमेकांना भिडलेच नाहीत, जसे शक्तीमध्ये दिलीप कुमार आणि अमिताभ यांची टक्कर झाली होती.

शाहरूखने मात्र हात दाखवून अवलक्षण की काय म्हणतात तसा प्रकार करायचा नेहमीच प्रयत्न केला. आधी अमिताभने गाजवलेल्या कौन बनेगा करोडपतीचे शिवधनुष्य पेलायच्या निमित्ताने, तर नंतर डॉन चित्रपटाच्या रिमेकमध्ये.
मला मात्र एक शाहरूख फॅन म्हणून त्याच्या या धाडसाचे नेहमीच कौतुक वाटले. अमिताभने "डीडीएलजे" किंवा "दिल तो पागल है" हे चित्रपट केलेत असे डोळ्यासमोर आणले तर मला नक्की काय म्हणायचेय हे समजेल. ज्या चित्रपटांनी अमिताभ घडवला तिथे हात टाकणे म्हणजे आत्महत्या करणे असे असूनही त्याने बरेपैकी यश मिळवले. तुलनेत दिलीपकुमारचा देवदास करण्यात कमी रिस्क होती कारण त्या चित्रपटाची शैली त्याला साजेशी होती आणि त्याने त्या भुमिकेची लाजही राखली.

एक किंग ऑफ रोमान्स आहे, तर दुसरा अ‍ॅक्शन का बेताज बादशाह !
या दोघांची तुलना करता जे निकष लावाल त्यानुसार तुम्हाला एकाचे पारडे वर तर एकाचे खाली दिसेल.
प्रत्यक्षात दोघांचे जगभरात चिक्कार फॅन्स आहेत. दोघांनी आजवर कित्येक अ‍ॅवार्ड्स मिळवलेत.
दोघे पडद्यावर असतात तेव्हा पडदा व्यापून उरतात. दोघे स्टेजवर असतात तेव्हा तो काबीज करतात.
एकाने सेकंड इनिंग आपल्या अदाकारीच्या ताकदीने यशस्वी करून दाखवली आहे,
तर दुसर्‍याने आज रईस मधून त्याची झलक दिली आहे !
मी या दोघांचा फॅन आहे, मी या दोघांचा ऋणी आहे Happy

- ऋन्मेष

page 1_0.jpg

तळटीप -
१) सदर लेखातील मते ही माझी लहानपणापासूनची वैयक्तिक मते आहेत आणि ती कुठल्याही परीस्थितीत बदलली जाणार नाहीत.
२) लेख ईतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखकाच्या परवानगीची गरज नाही, मात्र माझ्या नावासह शेअर करावा ही विनंती.
धन्यवाद ....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice

कोण वरचढ ते जावूदे पण चांगल्या TRP चे धागे मात्र तुझेच असतात>>>>+१
रुन्म्या, तुझे पाय कुठे.... नाही नाही बोटं _/\_

मृणाल, याचे श्रेय त्या नावांना, त्या घटनांना, त्या व्यक्तींना ज्यांना मी धाग्यात आणतो. जसे की हेच, शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन. हि आजच्या तारखेची भारतातील दोन सर्वात मोठी नावे. यांना शीर्षकात बघून तुम्हाला धागा ऊघडून बघायचा मोह न होणे अशक्यच Happy

संपदा, मला रईसचे ट्रेलर प्रचंड आवडलेय स्मित >>>> बहुतेकांना आवडले असावी, बहुधा पुन्हा पुन्हा बघितले जातेय. २४ तासांत सव्वा करोड व्यू मिळाले ट्रेलरला !

एकदम खतरा ट्रेलर! मला दाढीवाला शाखा आवडतो. नवाजुद्दिन पण आहे म्हणजे ट्रीटच.
हिरवीण कोणे?

ऋ, तुझा लेख वाचला नाही. कंटाळा केला. नंतर वाटलंच तर वाचेन.

रईसचा ट्रेलर जाम बोअर आहे. किती घिसीपिटी गोष्ट! फारच अपेक्षा होती माझी Sad थिएटर मधे बघण्याचा प्रश्नच नाही टिव्ही वर पण बघवेल की नाही माहित नाही.

हे आयटम साँग कापलं तर बरं होइल. हाहा >>> आताच हाती लागलेल्या न्यूजनुसार पाकिस्तानमध्ये हे गाणे कापून चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तिथे जावा बघायला Happy

अवांतर - रईस हे नाव उलटे वाचले तर सई र असे होते. पुढचा र रुन्मेशचा Happy

किती घिसीपिटी गोष्ट! >>> जिज्ञासा काय गोष्ट आहे? मला तरी ट्रेलर बघून अंदाज नाही आला

ट्रेलर छान आहे. मी यूट्यूब वर कैतरी लावते सात वाजता तर ट्रेलर बघितल्या बघितल्या रुनम्याला मेसेज लिहीला. ह्या वयात असे रोल शोभून दिसतात. फुल्टू मसाला धमाल आहे. २५ च्या वीकांताला मी इजिप्त मध्ये आहे पण तिथे बघीन नाहीतर आल्यावरच्या वीकांताला प्रॉग्राम फिक्स.

शाखा कोणीतरी 'चांगल्या हृदयाचा' काळे धंदे (दारु इ. ची तस्करी) करणारा गुज्जू (बहुतेक). त्याची प्रेमिका माहीरा खान. त्याच्या विरोधात उभा राहिलेला (प्रामाणिक, कर्तव्यदक्ष इ. इ.) पोलीस म्हणजे नवाजुद्दीन आणि ह्या सार्‍या खेळातला बडा मासा (स्वार्थी, धूर्त इ. इ.) राजकारणी अतुल कुलकर्णी. शेवटी आपला नायक काहीतरी कल्याणकारी कृत्य करून मरण पावणार (सौ चुहे खाके..) आणि पवित्र होणार. किंवा नायिकेचा बळी आणि नायकाला उपरती वगैरे वगैरे.
Me: Sounds familiar?
SRK fan: Huh! Wow, never ever heard this before!
Me: Uhoh

शेवटी आपला नायक काहीतरी कल्याणकारी कृत्य करून मरण पावणार (सौ चुहे खाके..) आणि पवित्र होणार.

>>>>

इथेच तर शाहरूख वेगळा ठरतो Happy

शाखा कोणीतरी 'चांगल्या हृदयाचा' काळे धंदे (दारु इ. ची तस्करी) करणारा गुज्जू (बहुतेक). त्याची प्रेमिका माहीरा खान. त्याच्या विरोधात उभा राहिलेला (प्रामाणिक, कर्तव्यदक्ष इ. इ.) पोलीस म्हणजे नवाजुद्दीन आणि ह्या सार्‍या खेळातला बडा मासा (स्वार्थी, धूर्त इ. इ.) राजकारणी अतुल कुलकर्णी. शेवटी आपला नायक काहीतरी कल्याणकारी कृत्य करून मरण पावणार (सौ चुहे खाके..) आणि पवित्र होणार. किंवा नायिकेचा बळी आणि नायकाला उपरती वगैरे वगैरे.
>> ऑनेस्टली मला नाही वाटत अशी कथा असेल. आणि असली तरी सादरीकरण वेगळे आहे. हटके.
तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला आहे का?

एक घिसीपिटी स्टोरी - एका गावात डाकू धुमाकूळ घालत असतात. गावातील एक ठाकूर त्यांना नडतो. डाकू त्याचे कुटुंब संपवून टाकतात. त्यालाही अपंग करून सोडतात. मग तो त्यांचा बदला घ्यायला दोन भाड्याने हिरो आणतो. आणि डाकूंचा बदला घेतो Happy

रईस सुद्धा शोले सारखा ईतिहास घडवतो का हे बघणे रोचक

गंमत म्हणजे योगायोग बघा, तिथेही अमिताभ होता Happy

जिज्ञासा थोडक्यात गुन्हेगार आणि गुन्हेगारी विश्वाचे उदात्तीकरण!!!
>>>

चांगला मुद्दा आहे, माझ्याही मनात पहिली भिती हीच आलेली.
जसे अग्नीपथमध्ये अमिताभने, आणि गुरू मध्ये अभिषेक बच्चनने केलेले तसे काही ईथे शाहरूख करणार का?
मलाहे तसे झालेले नकोय.
पण आता हे चित्रपट रीलिज झाल्यावरच समजेल.

अवांतर - कोणाला राम जाने पाहिला आहे का? त्याचा शेवट आठवतोय का?

ऋन्मेऽऽष, ट्रेलर वरुन गोष्ट कळली नाही म्हणालास ना आत्ताच मग? असो! संपूर्ण सिनेमाभर प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहून शेवटाला काहीतरी वेगळे करण्यापेक्षा जरा वेगळं कथानक असलेला सिनेमा का करत नाही शाखा?

ऋन्मेऽऽष, ट्रेलर वरुन गोष्ट कळली नाही म्हणालास ना आत्ताच मग?
>>>
खरेच नाही समजली. बाकी कथा एका खर्‍या गुन्हेगाराची आहे हे माहीत आहे. त्यामुळे ओरिजिनल आहे बोलू शकतो. एखाद्या गाजलेल्या व्यक्तीचे खरे आयुष्य घिसेपीटे वाटत असेल तर मग त्याने करन जोहार सोबत पुन्हा लार्जर दॅन लाईफ पिक्चर करावेत का?
आणि शेवटाला च काहीतरी वेगळे आहे असेही मला नाही म्हणायचेय. ते फक्त मी लास्ट वाक्य कॉपीपेस्ट केले ईतकेच Happy

बाकी वर अमा यांनी मांडलेला सादरीकरणाचा मुद्दा. तेच मी शोले चे उदाहरण देऊन सांगितलेय.

गुरू मध्ये अमिताभ बच्चनने

गुरुमधे अमिताभ बच्चन ?????? Wink तेवढं बदलुन अभिषेक बच्चन करणार का ?

जिज्ञासा Lol

अतुल कुलकर्णी ... चेरी ऑन केक...>>> हेच जर सनी लिओनीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर .... केक अॉन चेरी Lol

अमुता, धन्यवाद. अमिताभला अभिषेक केले.
धाग्यात सारखे अमिताभ अमिताभ चालू असल्याने चुकून अमिताभ लिहिले गेले.
आणि तसेही मला अभिषेक हे नाव लिहायला भिती वाटते, कारण ईथे काही लोकं ऋन्मेषला अभिषेक करायला टपली आहेत Happy

Pages