"रईस"च्या निमित्ताने - अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2016 - 03:42

कालच रईस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला,
आणि किती तरी वर्षांनी दिवार, अग्नीपथ, त्रिशूल, डॉन, वगैरे वगैरे अ‍ॅंग्री यंग मॅन अमिताभपटातील कचकचीत डायलॉगच्या जवळपास जाणारे काहीतरी सापडले.
ईथे चेक करा - ऐकल्याशिवाय मजा नाही
https://www.youtube.com/watch?v=J7_1MU3gDk0

..

"अम्मीजान कहती थी, कोई धंदा छोटा नही होता., और धंदे से बडा कोई धर्म नही होता.
अब यही मेरा कलमा है. और यही मेरा मजहब !!"

..

"अम्मी जान ने कहा था
कभी किसी का दिल मत तोडना,
ईसलिये दिल को छोडकर..
सब कुछ तोड डाला "

..

नवाझुद्दीन - जिसको तू धंदा बोलता है ना, क्राईम है वो. धंदा बंद कर ले, वरना सांस लेना मुश्कील कर दूंगा..
शाहरूख - गुजरात की हवा मे व्यापार है साहेब. मेरी सांस तो रोक लोगे, लेकीन ईस हवा को कैसे रोकोगे !

(ईथे अमिताभचा अग्नीपथ आठवला - हवा तेज चलता है दिनकर राव.. टोपी संभालो, उड जायेगा - https://www.youtube.com/watch?v=eD0e5imsX10 )

..

"जो धंदे के लिये सही, वो सही.. जो धंदे के लिये गलत, वो गलत.. इससे ज्यादा कभी सोचा नही."

..

अतुल कुलकर्णी - ज्यादा उंचा मत उड.. कट जायेगा.
शाहरूख - अगर कटनेका डर होता ना, तो पतंग नही चढाता... फिरकी पकडता.

..

नवाझुद्दीन - एक दिन नाक मे नकेल डालके खीचके लेके जाऊंगा मै तुझे यहासे..
शाहरूख - सबूत ले आईये..... ले जाईये..... रईस हाजिर है !

..

"बंदूक की गोली और मियांभाई की बोली
जब चलती है ना,
दुश्मन डरता बाद मे है
मरता पहले है .."

,,

"बनियेका दिमाग और मियाभाईकी डेअरींग .. !!!"

..

"आ रहा हू ..."
शेवटच्या दृश्यातील शाहरूखचा डोळा बघण्यासारखा! - पुन्हा एकदा अमिताभचा सरकार ! आठवला

page final.jpg

-_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_--

तर दोन काळातील सुपर्रस्टार्सची तुलना करणे या फिल्म ईंडस्ट्रीला नवीन नाही. अमिताभने ज्याला धक्का दिला त्या राजेश खन्नाशी त्याची तुलना व्हायची. ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारची आणि अमिताभची तुलना व्हायची. पुढे जाऊन शाहरूख खान आणि दिलीप कुमार यांच्यात साम्य शोधत त्यांचीही तुलना झालेली आपण पाहिले आहे. पण या सर्व तुलनेत सर्वाधिक हिटस मिळालेली चर्चा म्हणजे अमिताभ बच्चन विरुद्ध शाहरूख खान!

आणि त्याला कारणही तसेच आहे .........

अमिताभनंतर अचानक सुपर्रस्टारपदाची जागा रिकामी झाली. अमिताभची स्वत:ची सेकंड इनिंग सुरू व्हायची होती. पन्नाशीच्या जवळ आलेला अमिताभ सुपर्रस्टार म्हणवणे तर दूर, पण एक फ्लॉप नट म्हणून ओळखला जाऊ लागला होता. तसेच त्यानेच उंचीवर नेऊन ठेवलेले सुपर्रस्टार पद मिळवायला अनिल कपूर, संजय दत्त वा जॅकी श्रॉफ, सनी देओलसारखे त्यावेळचे नट समर्थ नव्हते. याचवेळी बॉलीवूडच्या क्षितिजावर आमीर, शाहरूख आणि सलमान नावाचे तीन खान उगवले. तरुणाईच्या बदलत्या अपेक्षा पुर्ण करण्यात यशस्वी ठरल्याने बघता बघता सर्वांना मागे सारून पुढे गेले. त्यातही त्या पिढीची रोमॅंटीक चित्रपटांची आवड ओळखून तिथे आपली छाप पाडणारा शाहरूख खान सुपर्रस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला.

‘कुछकुछ होता है’ आणि ‘हम तुम्हारे है सनम’ सारख्या चित्रपटांतून शाहरूखच्या सहाय्यक अभिनेत्याची भुमिका करणारा सलमान खान तेव्हा शाहरूखच्या स्पर्धेतही नव्हता. तसेच उत्तमोत्तम चित्रपट देणार्‍या आमीर खानने शाहरूखला टक्कर न देता आपले वेगळे स्थान बनवणे पसंत केले. परिणामी शाहरूखचे सुपर्रस्टारपद काही काळासाठी अबाधित होते. आणि जोपर्यंत त्याचा रोमॅंटीक चित्रपटांचा पत्ता चालणार होता तोपर्यंत त्याला धोकाही नव्हता. पण तेव्हा त्यालाही कल्पना नसेल की अमिताभच आपली सेकंड इनिंग सुरू करत स्वत:च पुन्हा या स्पर्धेत उभा राहणार आहे.

शाहरूख विरुद्ध अमिताभ - सर्वात मोठा सुपर्रस्टार कोण!

पहिल्यांदाच ही चर्चा दोन वेगळ्या पिढीतील कलाकारांची एकाच काळात काम करताना होत होती. गंमत म्हणजे दोघेही आपापल्या जागी सुपर्रस्टार म्हणून ओळखले जात असल्याने याचा फायदा दोघांच्याही लोकप्रियतेला होत होता. जोहार आणि चोप्रा मंडळींनी ती पुरेपूर कॅश देखील केली. यांच्या कैक चित्रपटात हे दोघे आमोरेसामोरे आले. आधी मोहोब्बते मध्ये यांची टक्कर झाली. जिथे दोघांनाही साजेसे रोल दिले गेले होते. अमिताभला परंपरा प्रतिष्ठा अनुशासन सारखे कडक शब्द असलेले डायलॉग दिले गेले होते. पण शाहरूखसाठी ती भुमिका म्हणजे घरचे मैदान असल्याने तो सरस ठरला होता. पुढे कभी खुशी कभी गम हा चित्रपट करण जोहारने शाहरूखलाच डोळ्यासमोर ठेवून बनवला असल्याने तो त्यानेच एकहाती खाल्ला होता. वीरझारा मध्ये कुठेही या दोघांची जुगलबंदी दाखवायचा अट्टाहास नव्हता, तर कभी अलविदा ना कहना मध्ये दोघांचे एकत्र कितपत शॉट होते हे देखील आठवत नाहीये. तो पिक्चर फ्लॉप जाण्याचे हे देखील एक कारण होते. याऊपर शाहरूखच्या पहेलीत अमिताभ पाहुणा कलाकार होता, तर अमिताभच्या भूतनाथमध्ये शाहरूखची छोटीशी भुमिका होती. एकंदरीत मोहोब्बतेचा काही प्रमाणात अपवाद वगळता हे दोन्ही महानायक खर्‍या अर्थाने एकमेकांना भिडलेच नाहीत, जसे शक्तीमध्ये दिलीप कुमार आणि अमिताभ यांची टक्कर झाली होती.

शाहरूखने मात्र हात दाखवून अवलक्षण की काय म्हणतात तसा प्रकार करायचा नेहमीच प्रयत्न केला. आधी अमिताभने गाजवलेल्या कौन बनेगा करोडपतीचे शिवधनुष्य पेलायच्या निमित्ताने, तर नंतर डॉन चित्रपटाच्या रिमेकमध्ये.
मला मात्र एक शाहरूख फॅन म्हणून त्याच्या या धाडसाचे नेहमीच कौतुक वाटले. अमिताभने "डीडीएलजे" किंवा "दिल तो पागल है" हे चित्रपट केलेत असे डोळ्यासमोर आणले तर मला नक्की काय म्हणायचेय हे समजेल. ज्या चित्रपटांनी अमिताभ घडवला तिथे हात टाकणे म्हणजे आत्महत्या करणे असे असूनही त्याने बरेपैकी यश मिळवले. तुलनेत दिलीपकुमारचा देवदास करण्यात कमी रिस्क होती कारण त्या चित्रपटाची शैली त्याला साजेशी होती आणि त्याने त्या भुमिकेची लाजही राखली.

एक किंग ऑफ रोमान्स आहे, तर दुसरा अ‍ॅक्शन का बेताज बादशाह !
या दोघांची तुलना करता जे निकष लावाल त्यानुसार तुम्हाला एकाचे पारडे वर तर एकाचे खाली दिसेल.
प्रत्यक्षात दोघांचे जगभरात चिक्कार फॅन्स आहेत. दोघांनी आजवर कित्येक अ‍ॅवार्ड्स मिळवलेत.
दोघे पडद्यावर असतात तेव्हा पडदा व्यापून उरतात. दोघे स्टेजवर असतात तेव्हा तो काबीज करतात.
एकाने सेकंड इनिंग आपल्या अदाकारीच्या ताकदीने यशस्वी करून दाखवली आहे,
तर दुसर्‍याने आज रईस मधून त्याची झलक दिली आहे !
मी या दोघांचा फॅन आहे, मी या दोघांचा ऋणी आहे Happy

- ऋन्मेष

page 1_0.jpg

तळटीप -
१) सदर लेखातील मते ही माझी लहानपणापासूनची वैयक्तिक मते आहेत आणि ती कुठल्याही परीस्थितीत बदलली जाणार नाहीत.
२) लेख ईतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखकाच्या परवानगीची गरज नाही, मात्र माझ्या नावासह शेअर करावा ही विनंती.
धन्यवाद ....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> लेख ईतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखकाच्या परवानगीची गरज नाही, मात्र माझ्या नावासह शेअर करावा ही विनंती. <<

पण तुझं नाव काय ?
(माबोवरचा मनुष्य जोपर्यंत मला फेबु किंवा इतरत्र दिसत नाही, तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची खात्री मला पटत नाही !)

रईसची कथा अब्दुल लतीफ ह्या गँगस्टरच्या आयुष्यावर बेतली आहे, त्यामुळे जिज्ञासा म्हणतेय त्याच मार्गाने जाणार हा चित्रपट!! इथे अब्दुल लतीफची माहिती आहे.

बाकी शाखा आणि बच्चन दोन्हीत not interested.

शाहरूख एका डॉनची भुमिका करतोय आणि शाहरूखच्या फॅन क्लब पेक्षा त्याचा हेट क्लब मोठा असल्याने जनमाणसात त्या डॉनची प्रतिमा खराबच होणार आहे.

कर्णावती (अहमदाबाद) के कुख्यात बुटलेगर अब्दुल लतीफ़ के जीवन पर बनी फ़िल्म 'रईस' का ट्रेलर आज रिलीज हुआ हे . अब्दुल लतीफ़ जो की एक निहायती कमीना , धोकेबाज़ और कोमवादी इंसान था , हर साल आषाढी बिज पर निकलने वाली जगन्नाथ जी की रथयात्रा पर हमले करवा के दंगे भड़काता था , जिसके जीते जी अहमदाबाद में कभी भी शांति नहीं रही , शहर के युवाओ को जिसने उस समय शराबी - नशेड़ी बना दिया था , और शराब के धंधे में अपना वर्चस्व जमाने के लिए जिसने कई खून भी कर डाले थे और जिसके ऊपर धमकी देना , हत्या की कोशिश करना , हत्या करना , गैंगवार और कोमवादी दंगे कर के शहर में दहशत फेलाना , फिरोती वसूलना जेसे कई अपराधिक मामले थे और जिसका एनकाउंटर करना पड़ा ऐसे शराब बेचने वाले अब्दुल लतीफ़ के जीवन से भला क्या कोई सिख मिल सकती हे ......????

इस फ़िल्म को भद्र समाज में दिखाकर एक तरीके से युवाओ और समाज को दिशाहीन करने का और गुन्हाओ का रास्ता चुनने का सूचन किया गया हे ... *अब्दुल लतीफ़* जेसे गुन्हेगार के जीवनचरित्र को दर्शाना ही शाहरुख़ खान और निर्माता - निर्देशक के निम्न विचारो का प्रतिबिम्ब दिखाता हे ।

में एक भारतीय होने के नाते ये शपथ लेता हु के गुजरात के इस गुंडे के जीवन पर आधारित फिल्म को देखने नहीं जाऊगा और टिकिट के 200 रुपये बचाके किसी जरूरतमंद को दान करूँगा ।

जय हिन्द

(माबोवरचा मनुष्य जोपर्यंत मला फेबु किंवा इतरत्र दिसत नाही, तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची खात्री मला पटत नाही !)
>>>>

नशीब सरकारने आधारकार्ड ऐवजी फेसबूक अकाऊंट नाही गरजेचे केले.

नशीब देवाची भक्ती करताना आपण त्याच्यासमोर अश्या अटी घालत नाही.

तरी माझे आहे फेबू अकाऊण्ट. पण कधी मधीच एक्टीवेट करतो. नाहीतर डिएक्टीवेट होत पडून असते. कारण तुम्हाला तर माहीत आहेच की मला माझ्या पर्सनल लाईफचे प्रदर्शन मांडायला आवडत नाही Happy

कारण तुम्हाला तर माहीत आहेच की मला माझ्या पर्सनल लाईफचे प्रदर्शन मांडायला आवडत नाही
>>
Rofl

मुळात मला जे माहीत आहे ते सर्व बाजुला ठेवून फक्त ऋन्मेष बद्दल बोलूयात :
१) मुंबईला रहातो
२) सध्या एक गर्लफ्रेंड आहे, पुर्वी बर्‍याच होत्या (एक-एक)
३) पिंट्या नावाचा शेजारी आहे
४) एमएनसी मधे कामाला आहे
५) आईवेडा आहे
६) ब्रॅण्डेड रुमाल वापरतो
७) सई, शाहरुख, स्वप्निल, अतिफचा फॅन आहे
८) शिवसेना सपोर्टर आहे
९) प्रत्येक गोष्टीत अंडे टाकून खायची सवय आहे
१०) लेडिज अ‍ॅण्ड जेण्ट्स सलून मधे जाऊन आलाय
११) देव मानत नाही तरिही नास्तिक नाही
१२) घरी आईच्या बाहेर गर्लफ्रेण्डच्या धाकात आहे
१३) ऑफिसच्या वॉट्स अप ग्रूप ने पकलाय
१४ ) ऑफिसमधल्यांना चुकुन अंड्याचा केक खाऊ घातल, तरीही वाचलाय
१५ ) बॉसचा लाडका आहे Uhoh
१६) ४-५ वाईट सवयी आहेत आणि त्याचा याला अभिमान आहे म्हणून त्यावर लेखही लिहिलेत

हुश्श्स! दमले. बाकीच्यांनी भर घाला आता

रीया, आपली पोस्ट वाचून मलाच कित्येक ठिकाणी अगदी अगदी झाले Happy

@ धागा, नुकत्याच हाती आलेल्या बातम्यांनुसार श्री राज ठाकरे यांच्याशी सेटींग लागली आहे. वर्गणीचा आकडा मात्र यंदा बाहेर आला नाही.

राज तुमचा फोटो दिसत नाहीये.
मलाच तांत्रिक अडचणींमुळे दिसत नाहीये की कोणालाच दिसत नाहीए?

अनाठायी तुलना आहे. रईसच्या निमित्ताने तर नाहीच नाही. मला वाटलं दोघांच्या भूमिका आहेत यात किंवा रईस अमिताभच्या सिनेमावर बेतलेला आहे.

अमिताभ बच्चनचे त्याच्या कारकिर्दीच्रकिअत्त्युच्च पातळीवरचे सिनेमे आणि शाहरूख खानचे सिनेमे यात तुलना केली जाऊ शकत नाही. शाहरूखचे सिनेमे दुस-या कुणाला मिळाले असते तर कदाचित जास्त चाललेही असते. कुछ कुछ होता है मधे समलान, आमीर किंवा अगदी अक्षयकुमार सुद्धा चाललाच असता. शाहरूख खान बद्दल बरंच ऐकलं आणि वाचलेलंही आहे. त्याने सुरुवातीला चांगल्या दिग्दर्शकांकडे काम केलं. ते सिनेमे चांगले असल्याचा फायदा झाला. पण पडेल सिनेमे शाहरूखने एकट्याच्या खांद्यावर चालवलेत असं उदाहरण नाही. अमिताभकडे ती क्षमता होती. अमिताभच्या नावावर अतिशय टुकार सिनेमे चालले आहेत. डॉन हा त्यातलाच एक. अमिताभपट असल्याने त्याचा रिमेक झाला आणि अमिताभपटाच्या जिवावर शाहरूख खानच्या एका भाकरीची सोय झाली.

माझा मामा अमिताभचा डाय हार्ड पंखा होता. तो म्हणतो कि अगदी टुकार सिनेमा जो एवीतेवी फ्लॉप झालाच असता तो फक्त अमिताभच्या नावावर पाच सहा आठवडे तरी टिकायचा. हल्ली सिनेमा कसा आहे हे कळायच्या आतच गल्ला भरत असल्याने सिनेमा चांगला असण्याचे, हिट होण्याचे निकष ठरवणे अवघड आहे. मार्केटिंगच्या जोरावर चालतात सिनेमे.

अपवाद कहाणी, गँग्ज ऑफ वासेपूर अशा सिनेमांचा.

तीन खानांमध्ये तुलना केली तरी शाहरुख सर्वात तोकडा पडतो.

अमीर खानचा सरफरोश मधला पोलिस अधिकारी
सलमान खानचा गर्व प्राईड अ‍ॅन्ड ऑनर मधाअ पोलिस अधिकारी

या दोघांच्या तुलनेत

शाहरुख खानचा वन टू का फोर मधला रोल कसा वाटतो?

सध्या तरी इतकीच तुलना करतोय

कारण,

अमिताभच्या जंजीर पर्यंत शाहरुख कधीच पोचू शकणार नाही.

रोमँन्टीक वगैरे ठीक आहे पण कुठल्याही अभिनेत्याने एकदा तरी वर्दीतल्या दमदार व साहसी पोलिस अधिकार्‍याची भूमिका निभावल्याशिवाय त्याचं स्टारडम कधीच सिद्ध होत नाही. शाहरुख अशा रोलमध्येही टूकारपणाच करतो.

कुछ कुछ होता है मधे समलान, आमीर किंवा अगदी अक्षयकुमार सुद्धा चाललाच असता
>>>>>
त्यात सलमान खान होताच. पण साईड हिरो होता. शाहरूखच्या जागी शाहरूखच हवा होता. अन्यथा तो एक पडेल चित्रपट होता. करण जोहारचे तेव्हाचे चित्रपट शाहरूखला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिले जायचे. अन्यथा ते साधारणच होते.

अमीर खानचा सरफरोश मधला पोलिस अधिकारी
सलमान खानचा गर्व प्राईड अ‍ॅन्ड ऑनर मधाअ पोलिस अधिकारी
या दोघांच्या तुलनेत
शाहरुख खानचा वन टू का फोर मधला रोल कसा वाटतो?
>>.>>>>>>>
पोलिस अधिकारी म्हणून मला तीनही साधारण वाटले.
शाहरूख पोलिसापेक्षा आर्मी नेव्ही च्या युनिफॉर्ममध्ये चांगला वाटतो.

रोमँन्टीक वगैरे ठीक आहे पण कुठल्याही अभिनेत्याने एकदा तरी वर्दीतल्या दमदार व साहसी पोलिस अधिकार्‍याची भूमिका निभावल्याशिवाय त्याचं स्टारडम कधीच सिद्ध होत नाही.
>>>>
हे म्हणजे वकीलाने कोर्टात केस जिंकायला स्वत:चा नवीन कायदाच निर्माण करण्यासारखे झाले Happy

मुद्दा तो नाही.
शाहरूख चांगल्या बॅनरच्या सिनेमांमुळे तरला. कुछ कुछ होता है हा सिनेमा चालला असताच. गाणी सुरेख आहेत. शिवाय त्या वेळी बिनडोक सिनेमांच्या टोळधाडीत हे सिनेमे वेगळे वाटत .

जोहर, चोप्रा , कुंदन शाह वगैरें. बादशाह आणि अनेक सिनेमे का पडले ?
बाकि तुझं पण शाहरूख बद्दलचं हेच मत असावं असं मला वाटतं. फक्त अगं अगं म्हशी स्टान्स घेतलाहेस ! खरं ना हे ?

चला. शुभरात्री !

वर्दीतल्या दमदार व साहसी पोलिस अधिकार्‍याची भूमिका निभावल्याशिवाय त्याचं स्टारडम कधीच सिद्ध होत नाही.>>>

छान विनोद करतात राव. म्हणजे ऋषी कपूर नामक अभिनेत्याला कधीच "स्टारड्म" लाभला नाही असे म्हणावे लागेल. अनिल कपुर, शम्मी कपूर, राज कपूर अगदी देवानंद बाबत ही असेच म्हणावे.

मनातली जुनी मळमळ बाहेर काढण्यासाठी इतरांवर कैच्याकै मुर्ख वाक्य फेकणे ही कट्टेकरींची स्टाईल आपण कधीपासून आत्मसात केली?

शाहरूख चांगल्या बॅनरच्या सिनेमांमुळे तरला. 
>>>>
या चांगल्या बॅनरच्या सिनेमांना शाहरूखच का हवा असायचा? त्याचा कोणी फिल्म ईंडस्ट्रीमध्ये गॉडफादरही नव्हता.

{{{अनिल कपुर, शम्मी कपूर, राज कपूर अगदी देवानंद बाबत ही असेच म्हणा}}}

अनिल कपूर - करिअरच्या सुरुवातीलाच राम लखन आणि उत्तरार्धात २४.

शम्मी कपूर - (सुपरस्टार ?)

राज कपूर - (सुपरस्टार ?)

देव आनंद - सीआयडी, जॉनी मेरा नाम, शरीफ बदमाश, छुपा रुस्तम, वॉरंट पासून ते अव्वल नंबर पर्यंत बरेच आहेत.

वीर रस हा नवरसांमधला महत्त्वाचा रस आहे. अभिनयात तो एकदातरी दाखविल्याशिवाय आम जनतेच्या मनावर गारुड घालता येत नाही. अगदी राजेश खन्नानेही द ट्रेनमध्ये पोलिस अधिकारी रंगविला आहेच. शाहरुखने आजवर असे काम कधी सिरीयसली केलेले मी तरी पाहिलेले नाही. त्याने सुरुवातीला सिरीयसली रोल्स केलेत पण ते बाजीगर सारखे बहुतांशी नकारात्मकच होते. सत्याकरिता गंभीरपणे लढणारा नायक प्रेक्षकांना जास्त जवळचा वाटतो - जसा जंजीरचा अमिताभ. तसाही हा निकष साठ सत्तरच्या दशकानंतर मुंबईतली आणि त्यानंतर उर्वरित देशातील गुंडगिरी वाढल्यानंतर जनतेला वाटू लागला. जे आपल्याला जमत नाही पण करायची अतीव इच्छा आहे ते पडद्यावरील नायकाने करावे - दुष्टांचं निर्दालान.

हा निकष इथे मांडल्याबद्दल खालची गलिच्छ वाक्ये लिहिण्याची आवश्यकता का पडली?

{{{ मनातली जुनी मळमळ बाहेर काढण्यासाठी इतरांवर कैच्याकै मुर्ख वाक्य फेकणे ही कट्टेकरींची स्टाईल आपण कधीपासून आत्मसात केली? }}}

अशी भाषा कट्ट्यावरची आहे असे म्हणता मग तुम्ही कट्टेकरी आहात काय? नसल्यास ही भाषा तुम्ही कुठून आत्मसात केलीत?

ज्यात वाईट शब्द आहेत अशी तुमचीच वाक्ये कॉपी पेस्ट केली आहेत अजून तरी वाईट शब्दांकरिता मी माझी डिक्शनरी उघडली नाहीये. तरी मला तसे करायला भाग पाडू नका.

रामलखन मधे करड्या भुमिकेत अनिल कपुर? Biggrin अजुन एक हास्यास्पद प्रतिसाद

देवानंद "पोलीस युनिफॉर्म" मधे क्वचितच दिसला आहे.
आणि सलमान गर्व मधे बेस्ट वाटला ? अरे रे रे.. तो तर डब्यातल्या डब्यात गेलेला टुक्कार चित्रपट होता.

सरफरोश मधे आमिर खान एकदा ही पोलिस युनिफॉर्म मधे नाही.

तुम्हीच चुकिची उदाहरण दिली आहे. आता त्यावर स्पष्टीकरण अजुन हास्यास्पद दिले आहे.

वर्दीतल्या दमदार व साहसी पोलिस अधिकार्‍याची भूमिका निभावल्याशिवाय>>> हे तुमचेच वाक्य १० वेळा वाचुन पुन्हा प्रतिसाद लिहा

अरे शाहरूखच्या धाग्यावर शाहरूख नावाचा एवढा मोठा वादग्रस्त विषय समोर असताना आपसात भांडू नका Happy

अभिनय सिद्ध करण्यासाठी तुम्ही अमुकतमुक प्रकारचे रोल केले पाहिजेत असे बोलू शकता. सुपर्रस्टार तो होतो जो चालू ट्रेण्ड बदलतो. अमिताभचा एंग्री यंग मॅन ट्रेंडच सनी, जॅकी, संजय दत्त, अनिल कपूर वगैरे पुढे घेऊन गेले. बदलला तो शाहरूखने. त्याचे स्टारडम तिथेच सिद्ध झाले.

Police officer I liked in movies
Amitabh - Zanjeer
Ajay Devgn - Gangajal, Singham

म्हणुन तुमच्याशी प्रतिवाद केला नाही. तर तुम्ही केलेल्या चुका दाखवल्या आहे. कळलं का.
असे ही कट्टेकरांना मुद्द्यातून चुका दाखवल्या तर ते त्यांच्याकडे उत्तर द्यायला मुद्देच नसतात मग ते व्यक्तिगत होतात हे माहीत आहे.

चुका दाखवल्या की मागच्या मागे पाय लावून पळून जाणारे तुम्ही. एका प्रतिसादात म्हणायचे वर्दीत असणारे कलाकार.. अणि तिथेच ज्यांनी युनिफॉर्म पुर्ण चित्रपट घातलाच नाही अश्या चित्रपटांची नावे द्यायची..

हे काम मुर्खच करू शकतो.

वर्दीतली भूमिका म्हणजे पोलिस अधिकारी , कस्टम अधिकारी, लष्करी अधिकारी इ,
ही भूमिका वठवताना सिनेमात ते वर्दीतच दाखवले पाहीजेत असं काही नाही. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जॅकी श्रॉफ यांना अशा भूमिका छान वाटतात. पण दिलीपकुमार यांनी केवळ अभिनयाच्या जोरावर शक्ती मधली भूमिका संस्मरणीय केली आहे. या लिस्टीतल्या अमिताभ आणि दिलीपकुमार यांच्याकडे कुठलाही रोल करण्याची क्षमता होती अमिताभ रोमँटीक भूमिकेत थोडा कमी पडतो हे माझे मत.

Pages