कालच रईस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला,
आणि किती तरी वर्षांनी दिवार, अग्नीपथ, त्रिशूल, डॉन, वगैरे वगैरे अॅंग्री यंग मॅन अमिताभपटातील कचकचीत डायलॉगच्या जवळपास जाणारे काहीतरी सापडले.
ईथे चेक करा - ऐकल्याशिवाय मजा नाही
https://www.youtube.com/watch?v=J7_1MU3gDk0
..
"अम्मीजान कहती थी, कोई धंदा छोटा नही होता., और धंदे से बडा कोई धर्म नही होता.
अब यही मेरा कलमा है. और यही मेरा मजहब !!"
..
"अम्मी जान ने कहा था
कभी किसी का दिल मत तोडना,
ईसलिये दिल को छोडकर..
सब कुछ तोड डाला "
..
नवाझुद्दीन - जिसको तू धंदा बोलता है ना, क्राईम है वो. धंदा बंद कर ले, वरना सांस लेना मुश्कील कर दूंगा..
शाहरूख - गुजरात की हवा मे व्यापार है साहेब. मेरी सांस तो रोक लोगे, लेकीन ईस हवा को कैसे रोकोगे !
(ईथे अमिताभचा अग्नीपथ आठवला - हवा तेज चलता है दिनकर राव.. टोपी संभालो, उड जायेगा - https://www.youtube.com/watch?v=eD0e5imsX10 )
..
"जो धंदे के लिये सही, वो सही.. जो धंदे के लिये गलत, वो गलत.. इससे ज्यादा कभी सोचा नही."
..
अतुल कुलकर्णी - ज्यादा उंचा मत उड.. कट जायेगा.
शाहरूख - अगर कटनेका डर होता ना, तो पतंग नही चढाता... फिरकी पकडता.
..
नवाझुद्दीन - एक दिन नाक मे नकेल डालके खीचके लेके जाऊंगा मै तुझे यहासे..
शाहरूख - सबूत ले आईये..... ले जाईये..... रईस हाजिर है !
..
"बंदूक की गोली और मियांभाई की बोली
जब चलती है ना,
दुश्मन डरता बाद मे है
मरता पहले है .."
,,
"बनियेका दिमाग और मियाभाईकी डेअरींग .. !!!"
..
"आ रहा हू ..."
शेवटच्या दृश्यातील शाहरूखचा डोळा बघण्यासारखा! - पुन्हा एकदा अमिताभचा सरकार ! आठवला

-_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_---_-_--
तर दोन काळातील सुपर्रस्टार्सची तुलना करणे या फिल्म ईंडस्ट्रीला नवीन नाही. अमिताभने ज्याला धक्का दिला त्या राजेश खन्नाशी त्याची तुलना व्हायची. ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारची आणि अमिताभची तुलना व्हायची. पुढे जाऊन शाहरूख खान आणि दिलीप कुमार यांच्यात साम्य शोधत त्यांचीही तुलना झालेली आपण पाहिले आहे. पण या सर्व तुलनेत सर्वाधिक हिटस मिळालेली चर्चा म्हणजे अमिताभ बच्चन विरुद्ध शाहरूख खान!
आणि त्याला कारणही तसेच आहे .........
अमिताभनंतर अचानक सुपर्रस्टारपदाची जागा रिकामी झाली. अमिताभची स्वत:ची सेकंड इनिंग सुरू व्हायची होती. पन्नाशीच्या जवळ आलेला अमिताभ सुपर्रस्टार म्हणवणे तर दूर, पण एक फ्लॉप नट म्हणून ओळखला जाऊ लागला होता. तसेच त्यानेच उंचीवर नेऊन ठेवलेले सुपर्रस्टार पद मिळवायला अनिल कपूर, संजय दत्त वा जॅकी श्रॉफ, सनी देओलसारखे त्यावेळचे नट समर्थ नव्हते. याचवेळी बॉलीवूडच्या क्षितिजावर आमीर, शाहरूख आणि सलमान नावाचे तीन खान उगवले. तरुणाईच्या बदलत्या अपेक्षा पुर्ण करण्यात यशस्वी ठरल्याने बघता बघता सर्वांना मागे सारून पुढे गेले. त्यातही त्या पिढीची रोमॅंटीक चित्रपटांची आवड ओळखून तिथे आपली छाप पाडणारा शाहरूख खान सुपर्रस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला.
‘कुछकुछ होता है’ आणि ‘हम तुम्हारे है सनम’ सारख्या चित्रपटांतून शाहरूखच्या सहाय्यक अभिनेत्याची भुमिका करणारा सलमान खान तेव्हा शाहरूखच्या स्पर्धेतही नव्हता. तसेच उत्तमोत्तम चित्रपट देणार्या आमीर खानने शाहरूखला टक्कर न देता आपले वेगळे स्थान बनवणे पसंत केले. परिणामी शाहरूखचे सुपर्रस्टारपद काही काळासाठी अबाधित होते. आणि जोपर्यंत त्याचा रोमॅंटीक चित्रपटांचा पत्ता चालणार होता तोपर्यंत त्याला धोकाही नव्हता. पण तेव्हा त्यालाही कल्पना नसेल की अमिताभच आपली सेकंड इनिंग सुरू करत स्वत:च पुन्हा या स्पर्धेत उभा राहणार आहे.
शाहरूख विरुद्ध अमिताभ - सर्वात मोठा सुपर्रस्टार कोण!
पहिल्यांदाच ही चर्चा दोन वेगळ्या पिढीतील कलाकारांची एकाच काळात काम करताना होत होती. गंमत म्हणजे दोघेही आपापल्या जागी सुपर्रस्टार म्हणून ओळखले जात असल्याने याचा फायदा दोघांच्याही लोकप्रियतेला होत होता. जोहार आणि चोप्रा मंडळींनी ती पुरेपूर कॅश देखील केली. यांच्या कैक चित्रपटात हे दोघे आमोरेसामोरे आले. आधी मोहोब्बते मध्ये यांची टक्कर झाली. जिथे दोघांनाही साजेसे रोल दिले गेले होते. अमिताभला परंपरा प्रतिष्ठा अनुशासन सारखे कडक शब्द असलेले डायलॉग दिले गेले होते. पण शाहरूखसाठी ती भुमिका म्हणजे घरचे मैदान असल्याने तो सरस ठरला होता. पुढे कभी खुशी कभी गम हा चित्रपट करण जोहारने शाहरूखलाच डोळ्यासमोर ठेवून बनवला असल्याने तो त्यानेच एकहाती खाल्ला होता. वीरझारा मध्ये कुठेही या दोघांची जुगलबंदी दाखवायचा अट्टाहास नव्हता, तर कभी अलविदा ना कहना मध्ये दोघांचे एकत्र कितपत शॉट होते हे देखील आठवत नाहीये. तो पिक्चर फ्लॉप जाण्याचे हे देखील एक कारण होते. याऊपर शाहरूखच्या पहेलीत अमिताभ पाहुणा कलाकार होता, तर अमिताभच्या भूतनाथमध्ये शाहरूखची छोटीशी भुमिका होती. एकंदरीत मोहोब्बतेचा काही प्रमाणात अपवाद वगळता हे दोन्ही महानायक खर्या अर्थाने एकमेकांना भिडलेच नाहीत, जसे शक्तीमध्ये दिलीप कुमार आणि अमिताभ यांची टक्कर झाली होती.
शाहरूखने मात्र हात दाखवून अवलक्षण की काय म्हणतात तसा प्रकार करायचा नेहमीच प्रयत्न केला. आधी अमिताभने गाजवलेल्या कौन बनेगा करोडपतीचे शिवधनुष्य पेलायच्या निमित्ताने, तर नंतर डॉन चित्रपटाच्या रिमेकमध्ये.
मला मात्र एक शाहरूख फॅन म्हणून त्याच्या या धाडसाचे नेहमीच कौतुक वाटले. अमिताभने "डीडीएलजे" किंवा "दिल तो पागल है" हे चित्रपट केलेत असे डोळ्यासमोर आणले तर मला नक्की काय म्हणायचेय हे समजेल. ज्या चित्रपटांनी अमिताभ घडवला तिथे हात टाकणे म्हणजे आत्महत्या करणे असे असूनही त्याने बरेपैकी यश मिळवले. तुलनेत दिलीपकुमारचा देवदास करण्यात कमी रिस्क होती कारण त्या चित्रपटाची शैली त्याला साजेशी होती आणि त्याने त्या भुमिकेची लाजही राखली.
एक किंग ऑफ रोमान्स आहे, तर दुसरा अॅक्शन का बेताज बादशाह !
या दोघांची तुलना करता जे निकष लावाल त्यानुसार तुम्हाला एकाचे पारडे वर तर एकाचे खाली दिसेल.
प्रत्यक्षात दोघांचे जगभरात चिक्कार फॅन्स आहेत. दोघांनी आजवर कित्येक अॅवार्ड्स मिळवलेत.
दोघे पडद्यावर असतात तेव्हा पडदा व्यापून उरतात. दोघे स्टेजवर असतात तेव्हा तो काबीज करतात.
एकाने सेकंड इनिंग आपल्या अदाकारीच्या ताकदीने यशस्वी करून दाखवली आहे,
तर दुसर्याने आज रईस मधून त्याची झलक दिली आहे !
मी या दोघांचा फॅन आहे, मी या दोघांचा ऋणी आहे 
- ऋन्मेष

तळटीप -
१) सदर लेखातील मते ही माझी लहानपणापासूनची वैयक्तिक मते आहेत आणि ती कुठल्याही परीस्थितीत बदलली जाणार नाहीत.
२) लेख ईतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखकाच्या परवानगीची गरज नाही, मात्र माझ्या नावासह शेअर करावा ही विनंती.
धन्यवाद ....
आता तूही कथानक माहित नसताना
आता तूही कथानक माहित नसताना नि चित्रपट रिलीज होण्याआधीच "रईस सुद्धा शोले सारखा ईतिहास घडवतो का हे बघणे रोचक" हे बोललायसच कि.
माझ्या धाग्यावरचा एक प्रतिसाद वाढला >> धन्य आहेस बाब. इथे भेटलास, .....
चित्रपट रिलीज होण्याआधीच "रईस
चित्रपट रिलीज होण्याआधीच "रईस सुद्धा शोले सारखा ईतिहास घडवतो का हे बघणे रोचक" हे बोललायसच कि.
>>>>
अर्थात ती उपरोधाने केलेली गंमत होती
शोले चा ईतिहास घडवणे ही फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आजच्या तारखेला.
शाहरूख स्वत:च्या डीडीएलजेचा ईतिहास पुन्हा नाही घडवू शकणार ..
मला डॉन २ मधला शाखा आवडला
मला डॉन २ मधला शाखा आवडला होता.
मी धन्य आहेच, पण तुम्हाला एक
मी धन्य आहेच, पण तुम्हाला एक वाईट सवय आहे. पोस्ट टाकल्यावर काही सुचले तर नवीन प्रतिसादात न लिहिता टाकता त्यातच घुसडता. याने प्रतिसाद संख्या घटते ते घटतेच, पण मधल्या काळात ती पोस्ट वाचून झाली असल्यास आता आणखी काय अॅडले हे शोधावे लागते.
डीडीएलजे आणि शोले बॉलिवूड
डीडीएलजे आणि शोले बॉलिवूड मधील माईलस्टोन आहेत.
मला डॉन २ मधला शाखा आवडला
मला डॉन २ मधला शाखा आवडला होता. >>>
मला डॉन आवडला असे बोलणारे बरेच लोकं भेटतात. किंवा कदाचित मला तो आकडा बरेच वाटत असेल. कारण मी स्वतः मोठ्या मुश्कीलीने डॉन १ पुर्ण बघू शकलो होतो. कदाचित सतत ते डोक्यात श्या कश्याला अमिताभच्या पिक्चरचा रिमेक केला, ज्यात अमिताभ सरस आहे, उगाच तोंडावर पडला ना, वगैरे डोक्यात चालू असल्याने असेल की मी त्याचा एक स्वतंत्र पिक्चर म्हणून आस्वाद घेऊ शकलो नाही.. अगदी मला शाहरूखने एखाद्या शो मध्ये डॉनचा डायलॉग मारणेही फार केविलवाणे वाटते.. ते त्याने नको करावे असे वाटते.. आणि डॉन २ म्हणाल तर मी बघायची हिंमतही केली नाही.. टिव्हीवर लागला तर सुर्यवंशम दिसल्यावर जसे चपळाईने टीव्हीच बंद करून टाक्तो त्यापेक्षाही घाईने चॅनेल बदलतो..
अमिताभ आणि शारुख मधे तुलना?
अमिताभ आणि शारुख मधे तुलना?
पण मधल्या काळात ती पोस्ट
पण मधल्या काळात ती पोस्ट वाचून झाली असल्यास आता आणखी काय अॅडले हे शोधावे लागते. >> आता आम्ही नाही का बापडे तूझ्या नवीन बाफामधे इथे शा.खा नि सईची लिंक कुठे लावली आहे ते शोधतो. थोडा त्रास तूही सहन कर
>>या डायलॉग वरून असे वाटतेय
>>या डायलॉग वरून असे वाटतेय की मार्लन ब्रँडो हे अमिताभपेक्षा कोणीतरी सरस होते स्मित
कोण आहेत? ईंग्लिश का ?<<
येईच प्राॅब्लेम है रे बाबा तुम्हारा; अच्छी ॲक्टिंग कभी देखी (समझी) नहि औक बकवास ॲक्टिंग के फॅन होगये हो...
बकवास ॲक्टिंग के फॅन होगये
बकवास ॲक्टिंग के फॅन होगये हो...
>>>
हा हा, नाही. मी शाहरूखच्या अॅक्टींगचा फ्यान नाहीये. त्यापेक्षा चांगले अॅक्टर त्याच्या आसपास बरेच आहेत. आणखी लांब कश्याला जा. या रईसमध्येच नवाझुद्दीन एक आहे. पण चित्रपट शाहरूखलाच खायचा आहे. त्याला पर्याय नाही
मला शाहरूख आवडतो ते,
स्टाईल म्हणा किंवा एक्स फॅक्टर म्हणा, कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर, विनोदाचा लाजवाब टायमिंग, बोलके डोळे, अफलातून ड्रेसिंग सेन्स...
याऊपरही कैक गुण आहेतच. स्क्रीन प्रेझेंस, अभिनयातील सहजता, सौंदर्याबाबत गालावरची खळी म्हणा, तसेच तो भारी डान्सर नसूनही पडद्यावर चांगला दिसेल असा नेमका नाच जमवतो, काही नाही तर त्याचे बाह्या पसरवणे एक त्यालाच शोभते. तो एक स्टाईल आयकॉन आहे. चारचौघात वावरताना कसे वावरावे किंवा आपण जे काम करतो ते आपल्याला कुठे मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रेजेंट करायची वेळ आली तर कसे आत्मविश्वासाने करावे यासाठी मी त्याला फॉलो करतो, त्याचा आदर्श ठेवतो.
<< चारचौघात वावरताना कसे
<<
चारचौघात वावरताना कसे वावरावे किंवा आपण जे काम करतो ते आपल्याला कुठे मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रेजेंट करायची वेळ आली तर कसे आत्मविश्वासाने करावे यासाठी मी त्याला फॉलो करतो, त्याचा आदर्श ठेवतो.
>>
आदर्श बदलो दिनकरराओ, हवा तेज चल्ता है!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=1LFO31-v4bw&list=RDJFRKRqSSbf8&index=28&...
हे ईथून बघा.
या छोट्याश्या प्रसंगात तुम्हाला शाहरूखच्या तीन गोष्टी दिसतील
१) सेन्स ऑफ ह्युमर
२) त्याची स्वतःवर विनोद करायची बिनधास्त खिलाडू वृत्ती
३) जो है समा कल हो ना हो .. त्याची आयकॉनिक स्टाईल !
घिसीपिटी गोष्ट हे फारच पटलेले
घिसीपिटी गोष्ट हे फारच पटलेले दिसते आहे ऋन्मेऽऽष ला! गुड
शाखा बेस्ट DDLJ "ए इसको ले के
शाखा बेस्ट DDLJ "ए इसको ले के जावो रे" वाला सीन.
मला डॉन आवडला असे बोलणारे
मला डॉन आवडला असे बोलणारे बरेच लोकं भेटतात. किंवा कदाचित मला तो आकडा बरेच वाटत असेल. कारण मी स्वतः मोठ्या मुश्कीलीने डॉन १ पुर्ण बघू शकलो होतो. कदाचित सतत ते डोक्यात श्या कश्याला अमिताभच्या पिक्चरचा रिमेक केला, ज्यात अमिताभ सरस आहे, उगाच तोंडावर पडला ना, वगैरे डोक्यात चालू असल्याने असेल की मी त्याचा एक स्वतंत्र पिक्चर म्हणून आस्वाद घेऊ शकलो नाही.. अगदी मला शाहरूखने एखाद्या शो मध्ये डॉनचा डायलॉग मारणेही फार केविलवाणे वाटते.. ते त्याने नको करावे असे वाटते.. आणि डॉन २ म्हणाल तर मी बघायची हिंमतही केली नाही.. टिव्हीवर लागला तर सुर्यवंशम दिसल्यावर जसे चपळाईने टीव्हीच बंद करून टाक्तो त्यापेक्षाही घाईने चॅनेल बदलतो..
>> अगदी अगदी.
मला डॉन आवडला असे बोलणारे
मला डॉन आवडला असे बोलणारे बरेच लोकं भेटतात. किंवा कदाचित मला तो आकडा बरेच वाटत असेल. कारण मी स्वतः मोठ्या मुश्कीलीने डॉन १ पुर्ण बघू शकलो होतो. कदाचित सतत ते डोक्यात श्या कश्याला अमिताभच्या पिक्चरचा रिमेक केला, ज्यात अमिताभ सरस आहे, उगाच तोंडावर पडला ना, वगैरे डोक्यात चालू असल्याने असेल की मी त्याचा एक स्वतंत्र पिक्चर म्हणून आस्वाद घेऊ शकलो नाही.. अगदी मला शाहरूखने एखाद्या शो मध्ये डॉनचा डायलॉग मारणेही फार केविलवाणे वाटते.. ते त्याने नको करावे असे वाटते.. आणि डॉन २ म्हणाल तर मी बघायची हिंमतही केली नाही.. टिव्हीवर लागला तर सुर्यवंशम दिसल्यावर जसे चपळाईने टीव्हीच बंद करून टाक्तो त्यापेक्षाही घाईने चॅनेल बदलतो..>>>>>+१०००
ह्या असल्या डॉनच्या वाटेस जात नाही.
जिज्ञासा, मी शाहरूख आणि फ्यान
जिज्ञासा, मी शाहरूख आणि फ्यान क्लब तर्फे आपले आभार मानतो. आपल्या त्या वादग्रस्त पोस्ट मुळे चित्रपटाची हवा व्हायला सुरुवात झाली आहे. लोकं त्याची शोलेशी तुलना करून आपसात भांडू लागले आहेत
ऋन्मेऽऽष, माझी पोस्ट
ऋन्मेऽऽष, माझी पोस्ट वादग्रस्त नव्हती आणि नाही. मात्र धागा पेटता ठेवण्याचे तुझे कौशल्य वादातीत असल्याने तू माझ्या पोस्टचा संबंध (अकारण) शोले शी जोडून मोकळा झालास!
सगळ्या चांगल्या गोष्टींची हवा होत नाही आणि हवा झालेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असते असे ही नाही! तेव्हा चालू दे
हाडामासाचा अभिषेक म्हणजे
हाडामासाचा अभिषेक म्हणजे
खरेतर कोणत्याच दोन कलाकारांची
खरेतर कोणत्याच दोन कलाकारांची तुलना करू नये. काही सिनेमे आणि त्यातील कॅरॅक्टर्स आपल्याला इतकी आवडलेली असतात; त्यातील छोटे छोटे तपशील सुद्धा डोक्यात बसलेले असतात. तिथे मग दुसर्या कलाकाराची कल्पनाही सहन होत नाही. पुष्कळ वेळा आपण अभिनेत्याच्या नाही तर कॅरॅक्टरच्या प्रेमात असतो. अमिताभ बच्चननी कभी कभी सारखे रोमँटीक सिनेमेसुद्धा केलेच की. कभी कभी मध्ये शाहरुख आणि डीडीएल्जे मध्ये अमिताभ बच्चन हे दोन्ही आपल्याला सहन होणार नाही (कोणी कोणाचाही कितीही फॅन असला तरीही). मला अमिताभ बच्चन आवडतो पण तरीही लाल बादशाह किंवा मृत्युदाता सारखे चित्रपट आणि त्यातील अमिताभ हे दोन्ही असह्यच!!!
अमिताभ बच्चनचे अष्ट्पैलुत्व हा त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे (अमिताभ बच्चननी वाईट चित्रपट/भूमिका केल्या नाहीत असे मुळीच नाही) जो शाहरुख मध्ये नाही असे मला वाटते. अर्थात हे अष्ट्पैलुत्व सिद्ध व्हायलासुद्धा अमिताभ बच्चन ह्यांना सेकंड इनिंगची वाट पहावी लागली.
ऋन्मेऽऽष, माझी पोस्ट
ऋन्मेऽऽष, माझी पोस्ट वादग्रस्त नव्हती आणि नाही. >> हो खरंय, मला मिडीयामध्ये जॉईन व्हायला हवे
@ कभी कभीचा रोमांटीक अमिताभ >>> मला तो त्यातही कधी सहन झाला नाही. मजबूर चित्रपटात तो सीधासाधा दाखवलाय, मग गेअर चेंज करतो. तसे केल्याशिवाय अमिताभची मजा नाही.
अय गबसा सगळे नैतर रईस
अय गबसा सगळे
नैतर रईस रीलीजच्या आधीच डोक्यात जाईल.
राकेश रोशन निर्मित "काबिल'
राकेश रोशन निर्मित "काबिल' आणि शाहरुखचा "रईस" एकाच प्रदर्शित होतोय ना? बाय द वे, ऋन्मेष तुम्ही रईस पडावा म्हणून राकेश रोशन यांच्याकडून कितीची सुपारी घेतलीत?
बिपीनजी, सुर्याच्या तेजापासून
बिपीनजी, सुर्याच्या तेजापासून वाचायला कोणी सुर्याला टोपलीने नाही झाकत तर स्वतःसाठी एखादी सावलीची जागा बघतो
सुर्याच्या तेजापासून वाचायला
सुर्याच्या तेजापासून वाचायला कोणी सुर्याला टोपलीने नाही झाकत तर स्वतःसाठी एखादी सावलीची जागा बघतो >>>> मस्तये हा dialogue
रईसचा आहे का?
अवांतर - रईस हे नाव उलटे
अवांतर - रईस हे नाव उलटे वाचले तर सई र असे होते. पुढचा र रुन्मेशचा स्मित >>
कुणाला कशाचं आणि मळणीला लसणाचं म्हणतात ते काही खोटं नाही.
ज्यांना ट्रंप सारखा टिनपाट
ज्यांना ट्रंप सारखा टिनपाट कचरा नेता आवडतो . त्यांनी जगातले उत्तम. चांगले नेते माहीती नाही अथवा समजून घेतले नाही असे म्हणावे का?
सुलू नाही, शाहरूख हा
सुलू नाही, शाहरूख हा सुपरसितारा असल्याने मीच त्याला सुर्याची उपमा दिली आहे. यात कोणाला कमी लेखायचा हेतू नाही.
रईस चालेल कि नाही माहित नाही
रईस चालेल कि नाही माहित नाही .
पण अश्या प्रकारच्या लिंक्स यायला सुरुवात झाली आहे
अवांतर -- डियर जिंदगीतला शाहरुख खान आवडला होता. होप ते आवडणं यात continue व्हावं
फस्ट्रेशन इंडीअन खरच
फस्ट्रेशन इंडीअन खरच फस्ट्रेशन मधे आहेत त्यांच्या लोकांना मानसिक उपचाराची नितांत गरज आहे.
अरुण गवळीवर सुध्दा चित्रपट येतोय. मग त्यावर ही लोक काय लिहिणार ?
Pages