महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका

Submitted by धनि on 28 November, 2016 - 10:47

आजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.

काळानुरूप महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये आणि भुगोलामध्ये फरक पडत गेलेला दिसतो. पूर्वी खेडोपाड्यांनी बनलेले राज्य आता नगर - महानगरांनी भरलेले दिसते. निम्म्याहून अधिक जनता आता नगरांमध्ये राहताना दिसते. त्यामुळे पूर्वी जिल्हा / ग्रामपंचायतींच्या निवडणूकांना जितके महत्त्व होते तसेच आता नगरपालिकांच्या निवडणुकांनाही आलेले दिसते. माझ्यामते खरा विकास हा आपण राहतो त्या जागी दिसायला लागतो त्यामुळेच या नगरपालिकांच्या निवडणुका भविष्याच्या दृष्टीकोनातून खुप महत्त्वाच्या ठरतात. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना त्यांच्या कल्पना राबवण्याची संधी मिळते आणि नगराला सुषोभीत करून नागरिकांचे जीवन अधिकाधिक आरामदायी कसे करता येईल हे पहाता येते. आणि सत्ताधारी हे करण्यात कमी पडले तर नागरीक त्यांना घरी बसवतात.

तर इतक्या सगळ्या प्रस्तावनेनंतर मी काही डेटा देतो. माझे मूळ गाव संगमनेर ( जि. अहमदनगर). अजुनही घर गावीच आहे आणि घरचे सगळे तिकडेच मतदान करतात. माझ्या ८० वर्षांच्या आजोबांनीही यावेळेसही मतदान केले ! एकूण मतदान ७४.२७ % झाले. ही माझ्या दृष्टीने उत्साहाची गोष्ट आहे. जवळ जवळ ७५ % जनतेने मतदानाचा हक्क बजावला. अजुनही वाढीस वाव आहे पण इतर निवडणुकांमधील ४० - ५० % मतदान पाहून मला ७५ % हे भरपूर जास्त वाटतात. संगमनेर नगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि नगराध्यक्षा ही काँग्रेसच्या निवडून आल्यात.

बाकी एकूण राज्यात बघता ५५ नगराध्यक्ष भाजपाचे, २३ सेनेचे, २१ काँग्रेसचे, १० राष्ट्रवादीचे, आणि २५ अपक्ष किंवा अन्य पक्षांचे असे निवडून आले आहेत. (http://www.loksatta.com/maharashtra-news/live-nagar-palika-and-nagar-par... )

तुम्हाला काय वाटते आणि तुमच्या नगरात काय घडते आहे याबाबत चर्चा करण्याकरता हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या नगरपालिकांत नगराध्यक्ष एका पक्षाचा पण सत्ता दुसर्‍या पक्षाची (?) तिथे कारभार कसा चालतो ? की नगराध्यक्ष फक्त नामधारी पद आहे ?

साती Lol तुमच्या गावचे लिहा की !

जसे मी वरती देखिल म्हणालो - स्थानिक पातळीवरचे निर्णय खुप महत्त्वाचे असतात त्यामुळे गावागावांमध्ये नक्की काय घडले हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

आता संगमनेर मध्ये काही काही सुधारणा झालेल्या दिसत आहेत आणि परत त्याच नगराध्यक्षा निवडून आल्यात म्हणजे जनता थोड्याफार प्रमाणात त्या सुधारणांनी समाधानी आहे असे वाटायला जागा आहे.

असेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय झाले हे त्या त्या गावातील स्थानिकांना जास्ती माहिती असणार.

तर मी कोंकणातली. आता हिकडे बहामनीत रहाते ते सोडा.
आमचं घर जरी ग्रामपंचायत हद्दीत असलं तरी शाळा कॉलेज, पालकांच्या नोकर्‍या आणि अर्धे नातेवाईक शहरात.
त्यामुळे लक्ष होतंच निवडणुकांकडे.
मित्रांनी सांगितल्यानुसार रत्नागिरी शहर नगरपालिकेत १९ जागांवर शिवसेना जिंकलीय.

रत्नागिरीच्या फेमस 'योगिता क्लासेसचे' योगेश (राहुल) पंडिर सेनेतर्फे नगराध्यक्ष झालेत.

काँग्रेसचे राणे आणि शिवसेनेचे केसरकर यांच्यात युद्ध होतं म्हणे .
पण केसरकरच जिंकले.

काँग्रेसने आपली पूर्ण इज्जत रत्नागिरी शहरात तरी घालवली आहे.
मराठा मोर्चानंतर अचानक राष्ट्रवादीत जान येईल का असे वाटलेले.
एक दोन मित्र राष्ट्रवादीकडून उभेही होते. पडले.
Happy
अजून पूर्ण कोंकण विभागाचा रिझल्ट माझ्याकडे आहे.
पण इतर लोक आपापल्या गावाविषयी लिहितात का याची वाट पहाते.

अरे वा ! म्हणजे रत्नागिरीत नविन चेहरा आला आहे असे दिसते ?
बाकी समस्या किंवा मुद्दे काही कळले का तिकडचे ? ( की नेहमीचेच रस्ते, पाणी वगैरे ? )

खरे पहाता तेच महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि भविष्यातही राहणारच (जसजसे नगर मोठे होत जाईल ) त्यामुळे या प्रश्नांवर जे नीट काम करतील ते निवडून येतील असे वाटते.

अरे वा ! म्हणजे रत्नागिरीत नविन चेहरा आला आहे असे दिसते ?
बाकी समस्या किंवा मुद्दे काही कळले का तिकडचे ? ( की नेहमीचेच रस्ते, पाणी वगैरे ? )>> हो. होतकरु तरुण चेहरा. Happy

नवीन मुद्दे वगैरे काही नाहीत. पण आधीच्या भाजपाच्या नगराध्यक्षाने घोर निराशा केल्याने लोक त्याला फार कंटाळली होती. त्यामुळे चांगला पर्याय मिळताच त्याबाजूने मतदान झालं.

होतकरु तरुण चेहरा. >> हे चांगले आहे. आधिकाधिक तरूणांनी राजकारणात येऊन पुढाकार घ्यायला हवा आणि मतदानही भरभरून करायला हवे. निदान स्थानिक राजकारणात तरी तरूणांचा पुढाकार आवश्यक आहे. आपण जिथे राहतो आणि आपले भविष्य जिथे असणार आहे त्या भागाचे निर्णय आपल्या मताने झाले तर चांगलेच आहे.