चिकन ट्रि-पल शेजवानची शिल्लक ग्रेव्ही कशी संपवावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2016 - 10:35

कधीतरी एखाद्या रविवारी आळसावलेल्या संध्याकाळी हॉटेलातून आपण ऑर्डर करतो. जेवढे जमेल तेवढे खातो. उरलेसुरले फ्रीजमध्ये टाकतो. सोमवारच्या जेवणाची सोय म्हणून..
पण जर ऑर्डर केलेले जेवण मांसाहारी असेल आणि घरात सोमवारचे कोणी खाणारे नसेल तर ते मोजकेच मागवले जाते आणि तेव्हाच्या तेव्हाच संपवले जाते.
पण तरीही काही पदार्थ असे असतात जे आपल्या इच्छेविरुद्धही उरतातच,
आणि असाच एक पदार्थ म्हणजे चिकन ट्रिपल शेजवान राईस. ज्यातील राईस हा घटक चायनीज रसायनांची चटक लागल्यामुळे पुर्ण संपवला जातो. पण त्याची ग्रेव्ही मात्र नेहमीच शिल्लक राहते. तिचे काय करायचे हे समजत नाही. त्यातले चिकनचे पीस आपण सारेच खाऊन संपवलेले असतात. उरलेली ग्रेव्ही आपल्या घरच्या पांढर्‍या भातासोबत खाण्यात मजा नसते. बरं चपातीसोबत खावे अशीही काही तिला मसालेदार चव नसते. तरीही चटपटीत चवीचा हा पदार्थ फेकून द्यायला जीवावर येते. शेवटी पैसे याचसाठीच तर एक्स्ट्राचे मोजलेले असतात. मग काय करावे हा विचार करत ती फ्रिजमध्ये तशीच पडून राहते. आणि चार दिवसांनी फेकून दिली जाते. म्हणजे आमच्याकडे तरी नेहमी असेच होते. आजवर व्हायचे. पण थॅन्क्स टू पिंट्या, यापुढे असे होणार नाही.

अशीच एक शिल्लक राहिलेली ग्रेव्ही विदाऊट चिकन पीस पिंट्या घेऊन आला आणि त्याच्याच कल्पनेनुसार आम्ही त्या पासून नूडल्स तयार केल्या. थोडेसे कोबीपत्ते त्या ग्रेव्हीमध्ये आधीपासूनच होते. हलकासा कांदा चिरून आम्ही टाकला. एखादा चिकनचा पीस शिल्लक असता तर त्यालाही किसून टाकता आले असते असे वाटले खरे, तसेच यात आणखी काय टाकून रंगत वाढवता येईल याचीही खलबते आम्ही केली. त्यानुसार पुढच्यावेळी आणखी भारी बनेल हे नक्की. पण काही का असेना, एका टाकाउ जिन्नसापासून एका चवदार खाद्यपदार्थाची निर्मिती आम्ही केली एवढे मात्र खरे Happy

तुमच्याकडे ही ग्रेव्ही संपवायची काही आयड्या असेल तर प्लीज शेअर, आमच्याकडे आणि पिंट्याकडे हा चि ट्रि शेजवान राईस वरचेवर मागवला जातो, त्याची निव्वळ म्यागी बनवून तरी कितींदा खायची Happy

schejwan myagi.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनि हो, ह प्रश्न तिथे विचारायला हवा होता. चूक झाली. या प्रकारचा प्रश्न आयुष्यात या आधी कधी पडला नसल्याने त्या धाग्याबद्दल कल्पना नव्हती किंवा तसे डोक्यात आले नाही. हल्ली बरेचदा एकटे राहावे लागत असल्याने जेवण्याखाण्याचे प्रश्न पडू लागलेत. हा आणि असे कैक प्रश्न तिथे सोडवता येतील. लिंक बद्दल धन्यवाद.

बंधू ऋण्मेस,

स्वयंपाक शिक रे भाउ.

लय इंपार्टन्ट असतंय ते. ट्रिपल शेजवान राईस मागवणे हेच मुळात चुकीचे आहे. महिन्यातून एकदा मागवलेस तर ठीकेय. उरलेली तथाकथित ग्रेव्ही फेकून देणे हा बेस्ट इलाज आहे.

आपल्याकडे ताटात वाढलेलं स्गळं संपवलंच पाहिजे हा संस्कार आहे, पण तो घरच्या जेवणासाठी आहे.

बाजारातून ऑनलाईण मागवलेल्या जंकफूडला पोटात ढकलशील, तर ते बाहेर काढण्यापायी उद्या कराव लागणारा व्यायाम व डॉक्टर (मला) द्यावे लागणारे पैसे, व तरीही न टाळता येण्यासारखे झालेले नुकसान, या दुष्टचक्रापेक्षा, ती उरलेली ग्रेव्ही फेकून देणे हेच बरे.

बाकी सोच अपनी अपनी.

झाडू हो, बाहेरून वरचेवर मागवायचा नाईलाज आहे सध्या. पण चायनीज आवडत असूनही ते रासायनिक अन्न वाटत असल्याने महिन्या दोन महिन्यातून एकदाच मागवले जाते. त्यासोबत डेडली कॉम्बो म्हणून नाईलाजाने पेप्सी कोकही पिले जाते. म्हणजे डबल घातक. बाकी उरलेले अन्न संपवले जाते ते निव्वळ संस्कार किंवा त्याचे पैसे पडतात म्हणून असे नाही तर उद्या आणखी काही जास्त करायला नको या हेतूने. एकंदरीतच हे चूक आहे याची कल्पना असूनही पुन्हा पुन्हा हे असे वागले जातेच. तरी प्रयत्न करेन हे टाळायचा. नका सांगू रे तरी कोणी इथे कशी संपवायची ही ग्रेव्ही. अ‍ॅडमिन प्लीज उडवून टाका हा धागा. नाहीतर चायनीजचे दुष्परीणाम सांगायला हा धागा वापरा. लोकहो तुम्हीही खाऊ नका ती उरलेली ग्रेव्ही. टाकून देत जा. श्री पहिल्याच पोस्टमध्ये मोजक्याच शब्दात किती नेमके सांगून गेला.

आणि हो, यात कसलाही उपरोध नाहीये

खूप दिवसांनी पिंट्या आला. एनीवे शाकाहारी असल्याने सल्ला नाही देऊ शकत, स्टोरीसह रेसिपी वाचली मात्र.

टर्की डबल आल डेन्टे विथ साल्सा साठी वापरा! एक आगळीच चव येईल, विशेषतः सढळ हाताने ब्रँडी वापरली तर.

अ‍ॅडमिन कशाला हवेत? तूच कर की डिलीट. नाहीतर थांब थोडं. भारतात सकाळ झाली की तुझ्या फॅन क्लबातल्या मैत्रिणी येऊन तुझ्या निरागस जीवाला बरं वाटावं म्हणून ' बरं झालं तू धागा काढलास. आम्हांला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होतो' असं म्हणून तुला हँडल मारतील.

अहो अंजू, एकदा त्या ग्रेव्हीमधील चिकन पीस संपल्यावर जे उरते ते शाकाहारीच असते. फार फार तर जरा गाळून घेतले की झाले. चिकनचा अर्क असा काही त्यात ऊतरला नसतो.

हाहा सायो, ते ही खरेच आहे. कोण कौतुक करते कोण टिका. हजार पैलू असतात आपल्या व्यक्तीमत्वात. काही चांगले काही वाईट. त्यातील ज्या लोकांना जे दिसतात आणि ज्याला ते वेटेज देतात त्यानुसार ते आपल्याबद्दल मत बनवतात. शेवटी आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा जास्त चांगले कोणीच ओळखू शकत नाही.

धाग्याचे म्हणाल तर माझ्यामते आपण स्वत: तो उडवू शकत नाही, तर फक्त संपादीत करू शकतो. तसेच निव्वळ धागाच संपादित करू शकतो पण त्या खालचे प्रतिसाद मात्र तसेच राहतील. त्याने लोकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नक्की काय असावे धाग्यात हे कुतुहल त्यांना दिवसभर काम करू देणार नाही. आधीच काय त्या नोटाबंदीने कमी गोंधळ आहे जे मी आणखी वाढवू..

बाकी ईथे काही पोस्ट पडली नाही तर धागा आपसूक खाली जाईलच. पण ईथे काही नवीन माहीती येणारच नाही असे आपण बोलू शकत नाही. जगात ईतके ज्ञान आणि माहीतीचा साठा आहे की काहीतरी नवीन आणि कामाचे ईथे प्रतिसादात सापडेलच.

जसे की वर नंद्या यांनी सुचवलेले,
टर्की डबल आल डेन्टे विथ साल्सा.. माझ्या आणि पिंट्याच्या पूर्वजांनी देखील कधी या पदार्थाबद्दल ऐकले नसेल. त्यामुळे त्याची रेसिपी जाणून घ्यायला आवडेल. फक्त मी मद्यापासून चार बोटे लांब राहत असल्याने त्यातील ब्रँडी ऐवजी सिकंदर सरबत तेवढे वापरेन.

ऋन्मेष, कित्ती छान धागा!
बरं झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.

झाडु +१
सरळ फेकुन दे. पिंट्याला पण सांग. जास्तीचं काही बनवायला लागु नये म्हणुन असले जंक फुड (रीड: कचरा) खाउ नये. त्यापेक्षा डाळ-तांदुळ, मीठ, हळ्द, मसाला घालुन कुकर लावायचा. अजुनही एकट्या साठी बर्याच रेस्प्या सापडतील. हा पण डा-ता खिचडीत तुला ह्या चिट्रिशे ची चव लागणार नाही.

अशीच एक शिल्लक राहिलेली ग्रेव्ही विदाऊट चिकन पीस पिंट्या घेऊन आला आणि त्याच्याच कल्पनेनुसार आम्ही त्या पासून नूडल्स तयार केल्या
>> ग्रेव्हीपासून नूडल्स कश्या तयार केल्या???? हा तर नोबेल पारितोषिक मिळण्याच्या दर्ज्याचा शोध आहे Happy

बरं झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.>>>>>> सातीतै, Lol

देवकीताई तुम्ही ती पोस्ट कॉपीपेस्ट करून हसलात का? मला वाटले प्लस वन द्याल. आज समजले मला. मायबोलीवर माझी फक्त एकच मैत्रीण आहे .. Sad

देवकी, गपगुमान +१ द्या.
सस्मित, अंकु , नीरा आणि बाकीच्या सगळ्या, कुठे आहात सार्‍याजणी.
मिळूनी सार्‍याजणी +१ द्या.

बरं झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.>> + १००००

या धाग्यावर गर्लफ्रेंड चा उल्लेख कसा काय झाला नाही. Biggrin
नुडल्स ची आयडीया छान आहे.मी पण ट्राय करेन नेक्स्ट टाईम.

बरं झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.>> + १००००

पण मी चिकन खात नाय... अत्ता कसं करायचं Sad

जर तुम्ही चिकन खात नाही तर तुम्ही मागवलेले ट्रिपल शेजवान राईस हे वेजच असणार त्यामुळे हा चिकनचा प्रश्नच उद्भवणार नाही.

कि तुम्हाला असे तर वाटत नाही ना की माझ्या घरची ग्रेव्ही मी तुम्हाला संपवायला देणार आहे .. अहो आपली आपली उरलेली संपवायची आहे

अवांतर -- लेटेस्ट स्कोअर - ३ मैत्रीणी Happy

मी पिंट्या फॅन Wink , त्याच्यासाठी मी पुर्ण रेसिपी वाचली चिकनवाली.

या रेसीपी साठी आता ट्रिपल शेजवान खास करून मागवावं लागेल....
काय् काय करावं लागतं बुवा फॅनक्लबाला..
राधे राधे

@ पिंट्या,
माझ्या सारख्या स्वयंपाकगृहापासून चार बोटे लांबच राहणार्‍या मुलाला तिथे खेचून न्यायचे काम पिंट्याच करतो हे मात्र खरे.

परवाच तो जळालेला कांदा घेऊन माझ्याकडे आला होता. त्याच्या बहिणीने कांद्याची भाजी कुठेतरी पाहिली आणि ती करायच्या नादात कांदा प्लस मसाला असे काहीतरी बनवून जाळले.
त्याला मी या बाबतीत काय मुन्नाभाई वाटतो कल्पना नाही, पण त्यांच्याकडे जे काही गंडते ते तो घेऊन माझ्याकडे येतो. मोठ्या आशेने. की मी काहीतरी करेनच. मग मलाही त्याचे काहीतरी खाणेबल बनवावेच लागते.

तर मी त्यात तीन अंडी अर्धी कच्ची अर्धी फ्राय करून सोडली. चाखून पाहिले तर एक जबरी कॉम्बो झाले होते. फक्त जळालेल्या मसाल्याचा कडवटपणा किंचित जाणवत होता. म्हणून मी त्याला वरूतून आमच्या घरच्या आंबट वरणाचा तडका दिला. थोडासा घट्ट थोडासा पातळ अंड्याचा खीमाच तयार झाला.

बीफोर आणि आफ्टर असे दोन फोटोही काढले. पिंट्यानेच काढले. त्याच्या बहिणीला चिडवायला म्हणून.
सध्या मोबाईल हाताशी नाही, पण नंतर शेअर करतो ते ईथे.
पण काही म्हणा, जो कांदामसाला त्याची बहीण फेकून देणार होती त्यापासून बनवलेल्या पदार्थाला दोघा भावाबहिणींनी टोप धुवायची गरज पडणार नाही असा संपवला Happy

Pages