कधीतरी एखाद्या रविवारी आळसावलेल्या संध्याकाळी हॉटेलातून आपण ऑर्डर करतो. जेवढे जमेल तेवढे खातो. उरलेसुरले फ्रीजमध्ये टाकतो. सोमवारच्या जेवणाची सोय म्हणून..
पण जर ऑर्डर केलेले जेवण मांसाहारी असेल आणि घरात सोमवारचे कोणी खाणारे नसेल तर ते मोजकेच मागवले जाते आणि तेव्हाच्या तेव्हाच संपवले जाते.
पण तरीही काही पदार्थ असे असतात जे आपल्या इच्छेविरुद्धही उरतातच,
आणि असाच एक पदार्थ म्हणजे चिकन ट्रिपल शेजवान राईस. ज्यातील राईस हा घटक चायनीज रसायनांची चटक लागल्यामुळे पुर्ण संपवला जातो. पण त्याची ग्रेव्ही मात्र नेहमीच शिल्लक राहते. तिचे काय करायचे हे समजत नाही. त्यातले चिकनचे पीस आपण सारेच खाऊन संपवलेले असतात. उरलेली ग्रेव्ही आपल्या घरच्या पांढर्या भातासोबत खाण्यात मजा नसते. बरं चपातीसोबत खावे अशीही काही तिला मसालेदार चव नसते. तरीही चटपटीत चवीचा हा पदार्थ फेकून द्यायला जीवावर येते. शेवटी पैसे याचसाठीच तर एक्स्ट्राचे मोजलेले असतात. मग काय करावे हा विचार करत ती फ्रिजमध्ये तशीच पडून राहते. आणि चार दिवसांनी फेकून दिली जाते. म्हणजे आमच्याकडे तरी नेहमी असेच होते. आजवर व्हायचे. पण थॅन्क्स टू पिंट्या, यापुढे असे होणार नाही.
अशीच एक शिल्लक राहिलेली ग्रेव्ही विदाऊट चिकन पीस पिंट्या घेऊन आला आणि त्याच्याच कल्पनेनुसार आम्ही त्या पासून नूडल्स तयार केल्या. थोडेसे कोबीपत्ते त्या ग्रेव्हीमध्ये आधीपासूनच होते. हलकासा कांदा चिरून आम्ही टाकला. एखादा चिकनचा पीस शिल्लक असता तर त्यालाही किसून टाकता आले असते असे वाटले खरे, तसेच यात आणखी काय टाकून रंगत वाढवता येईल याचीही खलबते आम्ही केली. त्यानुसार पुढच्यावेळी आणखी भारी बनेल हे नक्की. पण काही का असेना, एका टाकाउ जिन्नसापासून एका चवदार खाद्यपदार्थाची निर्मिती आम्ही केली एवढे मात्र खरे 
तुमच्याकडे ही ग्रेव्ही संपवायची काही आयड्या असेल तर प्लीज शेअर, आमच्याकडे आणि पिंट्याकडे हा चि ट्रि शेजवान राईस वरचेवर मागवला जातो, त्याची निव्वळ म्यागी बनवून तरी कितींदा खायची 

धन्यवाद हो सायो! तुमच्यामुळे
धन्यवाद हो सायो!
ऋन्मेष च्या प्रत्येक धाग्याला प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी. निगेटिव्ह का असेना.
धागा उघडून वाचायचे कष्ट तरी घेतात त्या.
तुमच्यामुळे आम्हाला आमच्या ग्रूपच्या मेंबरांचा अंदाज आला. >>>> सायोपण मेंबर आहे.
बाकी मलाही अॅड कराच. भारी करमणूक होते ऋन्म्याचे धागे वाचून.
आठ
आठ
चारों तरफ गोपियाँ बीच मे
चारों तरफ गोपियाँ बीच मे कन्हैया
भान, भारीच. मला मेलीच्या
भान,
भारीच.
मला मेलीच्या लक्षातच नाही आलं.
वेलकम टू ऋफॅक्ल सायोडार्लिंग!
अहो भान आणि साती, प्लीज,
अहो भान आणि साती, प्लीज, प्लीज, मला नका ना टाकू तुमच्या सामा फॅन क्लब गृपात. तुमच्यात झिंज्या उपटण्यासारखी भांडणं न लागता खेळीमेळीने रहावंत अशी इच्छा आहे.
बाय द वे ऋ, पिंट्याला कळव हा
बाय द वे ऋ, पिंट्याला कळव हा त्याच्या मायबोलीवर दोन फॅन आहेत ते. मी आणि स्वस्ति.
स्वारी हं रुन्म्या बाळा दोन
स्वारी हं रुन्म्या बाळा दोन दिवस यायलाच जमलं नाही ..झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.>> + १००००
मोजतोय ना ...
अहो भान आणि साती, प्लीज,
अहो भान आणि साती, प्लीज, प्लीज, मला नका ना टाकू तुमच्या सामा फॅन क्लब गृपात. तुमच्यात झिंज्या उपटण्यासारखी भांडणं न लागता खेळीमेळीने रहावंत अशी इच्छा आहे. >>
खरं आहे.
कुठल्याही ग्रूपात अशी भांडणे लावण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे यात आम्हांला कोणताही संदेह नाही बरं!
अखिल माबो असंबा असंतोषाची जननी आहां आपण!
मंजूताई, तुम्ही आत्ताच
मंजूताई,

तुम्ही आत्ताच 'आठ'वला होतात.
>>अखिल माबो असंबा असंतोषाची
>>अखिल माबो असंबा असंतोषाची जननी आहां आपण!>> थॅन्क्यू अम्मा फॉर द काँप्लिंमेंट. तरी तुमची काड्या लावायची किताब मला नको असल्याने मी आपली दुसर्या नंबरवरच रहाते. कसं?
साती, तरीच मला एवढ्या उचक्या
साती, तरीच मला एवढ्या उचक्या लागत होत्या
मंजूताई! सायो, जाऊदे
मंजूताई!

सायो, जाऊदे हो!
दुसरा नंबरही काही वाईट नाही.
ए तुम्ही दोघी गब्बसा बरं..उगा
ए तुम्ही दोघी गब्बसा बरं..उगा धाग्याला शंबरीला न्यायचं म्हणून धप्पा धप्पा खेळताये ते...!
रीया, तुला गॉसिपचा कंटाळा
रीया, तुला गॉसिपचा कंटाळा आलाय हे खरंच कळलं.
(No subject)
अजुन २४ बाकी आहेत , होऊदे
अजुन २४ बाकी आहेत , होऊदे खर्च , चिकन हाय घरचं
या धाग्यावर लोकांचे प्रेम आणि
या धाग्यावर लोकांचे प्रेम आणि प्रतिसाद बघून मला आजही चिट्रिशे राईस मागवायची इच्छा होतेय. पण आज चिट्रिशे ऐवजी वेट्रिशे राईस मागवायचा विचार करतोय. जेणेकरून शिल्लक ग्रेव्हीपासून बनवलेल्या नूडल्समध्ये काजूबदाम टाकत त्याचा दर्जा वाढवता येईल.
अर्र, हे म्हणजे मिसळीतल्या
अर्र, हे म्हणजे मिसळीतल्या उसळी ऐवजी बोंबलाचे कालवण कि! :d
मिसळीला बोंबलाचे कालवण ऑड
मिसळीला बोंबलाचे कालवण ऑड झाले. पण अंड्याचे बेस्ट लागते. कालवण म्हणजे उकडलेल्या अंड्यांचे नाही तर कांद्याचे कालवण उकळून त्याला छान उकळी फुटली असतानाच त्यात वरून अंडी फोडून टाकायची. एक गोळा बनून शिजतो आणि काही लक्तरे कालवणात मिसळून त्याला अंड्याचा फ्लेवर देतात. जर शाकाहारी पर्याय हवा असेल तर नुसते कांद्याचे कालवण प्लस भावनगरी गाठ्या.
ऋ, तुस्सी महान हो!
ऋ, तुस्सी महान हो!
कांद्याचे कालवण उकळून त्याला
कांद्याचे कालवण उकळून त्याला छान उकळी फुटली असतानाच त्यात वरून अंडी फोडून टाकायची. एक गोळा बनून शिजतो आणि काही लक्तरे कालवणात मिसळून त्याला अंड्याचा फ्लेवर देतात. >> हा पदार्थ माझ्या साबा करतात. (इथे बर्याच घरात केला जातो. ) भाकरीसोबत छान लागतो.
हो, आमच्या घरीपण करतात
हो,
आमच्या घरीपण करतात रत्नागिरीला.
मी पण करते. नाईक तुम्ही
मी पण करते.
नाईक तुम्ही कुठले?
साती ताई मला वाटलेलंच
साती ताई मला वाटलेलंच तुम्हाला माहित असणार ते.
१०० पोस्ट पर्यंत जाण्य्साठी
१०० पोस्ट पर्यंत जाण्य्साठी माझी ही एक +१ ची पोस्ट

बाकी ऋन्मेऽऽष नुडल्स खाणेबल दिसतायेत खरं
दिनेशदा जर नंबर १ असतील माबोशेफ मधे तर तुही शेवटुन नंबर १ आहेस नक्की.
हा पदार्थ माझ्या साबा
हा पदार्थ माझ्या साबा करतात>>> + १ माझ्या सा.बा ही.तिखट तर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र सही लागतो हा प्रकार ही.
शेवटून नं १!
शेवटून नं १!

कुठलाही मांसाहारी पदार्थ, भले
कुठलाही मांसाहारी पदार्थ, भले ते अंडे का असेना, तिखट नसणे ही कल्पनाही मी सहन करू शकत नाही.
भातासोबतही ते अंड्याचे कालवण छान लागते. त्यातला पिवला पिवला भाग मी भातात कुस्करतो आणि सफेद अंडे तोंडाला लावतो. जर कालवण तिखट नसले तर त्या पिवळ्याने आणखी फिकट बनते.
अवांतर - ही पोस्ट मी धागा शंभरला न्यायला नाही लिहित आहे. मला कल्पना आहे ती आता केवळ एक औपचारीकता उरली आहे. मला आवडते माझ्या आवडीच्या खाद्यपदार्थांबद्दल लिहायला.
कुठल्याही स्पर्धेत शेवटून
कुठल्याही स्पर्धेत शेवटून नंबर एक असणाऱ्यांचे मला फार कौतुक वाटते. कारण त्यांनी शेवटचा क्रमांक मिळेल आणि आपले हसे होईल या भितीवर मात करून स्पर्धेत उतरायची हिंमत केली असते
आपले हसे होईल या भितीवर मात
आपले हसे होईल या भितीवर मात करून स्पर्धेत उतरायची हिंमत केली असते>>> तुच रे तुच...हे असे काही एक्स्प्लेशन देऊ शकतोस
बर हे प्रतिसाद तुझा धागा १०० ला जाण्य्साठीच आहे बरं
Pages