चिकन ट्रि-पल शेजवानची शिल्लक ग्रेव्ही कशी संपवावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2016 - 10:35

कधीतरी एखाद्या रविवारी आळसावलेल्या संध्याकाळी हॉटेलातून आपण ऑर्डर करतो. जेवढे जमेल तेवढे खातो. उरलेसुरले फ्रीजमध्ये टाकतो. सोमवारच्या जेवणाची सोय म्हणून..
पण जर ऑर्डर केलेले जेवण मांसाहारी असेल आणि घरात सोमवारचे कोणी खाणारे नसेल तर ते मोजकेच मागवले जाते आणि तेव्हाच्या तेव्हाच संपवले जाते.
पण तरीही काही पदार्थ असे असतात जे आपल्या इच्छेविरुद्धही उरतातच,
आणि असाच एक पदार्थ म्हणजे चिकन ट्रिपल शेजवान राईस. ज्यातील राईस हा घटक चायनीज रसायनांची चटक लागल्यामुळे पुर्ण संपवला जातो. पण त्याची ग्रेव्ही मात्र नेहमीच शिल्लक राहते. तिचे काय करायचे हे समजत नाही. त्यातले चिकनचे पीस आपण सारेच खाऊन संपवलेले असतात. उरलेली ग्रेव्ही आपल्या घरच्या पांढर्‍या भातासोबत खाण्यात मजा नसते. बरं चपातीसोबत खावे अशीही काही तिला मसालेदार चव नसते. तरीही चटपटीत चवीचा हा पदार्थ फेकून द्यायला जीवावर येते. शेवटी पैसे याचसाठीच तर एक्स्ट्राचे मोजलेले असतात. मग काय करावे हा विचार करत ती फ्रिजमध्ये तशीच पडून राहते. आणि चार दिवसांनी फेकून दिली जाते. म्हणजे आमच्याकडे तरी नेहमी असेच होते. आजवर व्हायचे. पण थॅन्क्स टू पिंट्या, यापुढे असे होणार नाही.

अशीच एक शिल्लक राहिलेली ग्रेव्ही विदाऊट चिकन पीस पिंट्या घेऊन आला आणि त्याच्याच कल्पनेनुसार आम्ही त्या पासून नूडल्स तयार केल्या. थोडेसे कोबीपत्ते त्या ग्रेव्हीमध्ये आधीपासूनच होते. हलकासा कांदा चिरून आम्ही टाकला. एखादा चिकनचा पीस शिल्लक असता तर त्यालाही किसून टाकता आले असते असे वाटले खरे, तसेच यात आणखी काय टाकून रंगत वाढवता येईल याचीही खलबते आम्ही केली. त्यानुसार पुढच्यावेळी आणखी भारी बनेल हे नक्की. पण काही का असेना, एका टाकाउ जिन्नसापासून एका चवदार खाद्यपदार्थाची निर्मिती आम्ही केली एवढे मात्र खरे Happy

तुमच्याकडे ही ग्रेव्ही संपवायची काही आयड्या असेल तर प्लीज शेअर, आमच्याकडे आणि पिंट्याकडे हा चि ट्रि शेजवान राईस वरचेवर मागवला जातो, त्याची निव्वळ म्यागी बनवून तरी कितींदा खायची Happy

schejwan myagi.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रर्रर्रर्रर्र ! मी राहिली की ऋन्मेष फॅन. Happy

अरेरे लाज वाटतेय मला ऋन्मेष फॅन म्हणायची, ९२ प्रतिसादानंतर उगवली मी Sad Proud

वा!

सस्मित, क्रिकेटींग टर्म आहे. एखादा फलंदाज नव्वद धावा पार करून गेला, शतकाच्या जवळ आला, तर त्याचे हातपाय चालेनासे होतात. या अवस्थेला नर्वस नाईटीज असे म्हणतात.
सचिन काही वेळा नव्वदीत बाद झाल्याने त्यावर हि टिप्पणी व्हायची. पण प्रत्यक्षात तो तसा होता का वादाचा विषय आहे. छेडलाच तो वाद तर धागा २०० वर जाईल Happy

निल्सन, उलट तुम्ही माझ्या लकी नंबर ९ ला आलात >> आहाहा! मै तो खुशीसे झुम गई Proud

अरे वा तुझा पण लकी नंबर ९ का? माझा आणि माझ्या नवर्‍याचापण Happy

ओके. क्रिकेटमधलं असंत का? नव्वदी - नाईन्टीज. ह्म्म.
तु नाईटीज लिहिलंस. मला काय वेगळंच वाटलं.

आम्हा लैंगिकदृष्ट्या असमाधानी लोकांच्या हातून हे नेहमीच असले शब्द अनवधानाने लिहिले जातात, आणि आमचे हसे होते Sad

चला झोपतो आता जरा, इथे झाले शंभर, संध्याकाळी फ्रेश होऊन नवीन धागा काढायचा आहे.

नर्वस नाईटीज!
मला वाटलं या शब्दाचा आणि त्या 'असमाधान' धाग्याचा काही संबंध आहे का?
Wink

सस्मित,
ऋन्मेष की यादमें मी आज 'डिअर जिंदगी' बघणार आहे.
गेल्या आठवड्यात 'ऐ दिल है मुश्कील पाहिला'

सगळ्या भाऊगर्दीत फक्त आणि फक्त शाहरुखचा ताहिर आवडला.
'मुझे सबासे बेइंतहा मुहब्बत करने के लिए सबा की ही जरुरत नहीं!'

वाह वा!

बाकी सगळे सीन्स या एकाच कॅमिओ अपिअरन्सपुढे तेल लावत गेले.

साती Happy

डीयर जिंदगी मी आलिया आणि शाखा दोघांसाठीही बघणार आहे. शाखा बर्याच दिवसांनी बघावासा वाटतोय.

मॅगी नूडल्स ग्रेवीमध्ये टाकताना टेस्ट मेकरसकट टाकल्या होत्या ना? ते उरलं असेल तर त्यात आणखी एक धाग्याचं पोटेन्शिअल आहे. Wink

अगंबै,
धागा काढणारा आणि त्याची ग्रेव्ही राहिली बाजूला आणि भलतीच फ्रेण्डली ग्रेव्ही शिजली होय इथे .

(डोकं अजिबातच चालेना म्हणून विचारून टाकते, असंबा म्हणजे काय ? )

अमेरिकास्थित संपन्न बायका! >>> LOL

म्हणजे मला असंबा समजून आदळ आपट होत होती कि काय सुरूवातीला ? Lol
(जमली बै स्मायली )

नाही,
तुम्ही अमेरिकेत असलात तरी असंबा व्हायला तुम्हाला एका विशिष्ट ग्रूपचे सदस्यत्त्व घ्यावे लागते.

तुम्हाला तो ग्रूप माहित नाही म्हणजे तुम्ही असंबा नाही.

नको बाई. ना मी अमेरिकेत आहे , ना संपन्न. इथल्या रांगेत उभी राहून आणि रांगेचे फोटो टाकून बेजार झालेय तेव्हढे पुरे आहे मला.
(आता फक्त पुण्यातल्या घरात प्रवेश करतानाचा फोटो टाकायचा राहिलाय).

Pages