अश्विनी मला थोडी माहिती आहे त्यानुसार काही सांगितल तर चालेल का? बघा उपयोग होतोय का ते..
देवघराची रचना शक्यतो पंचायतनाप्रमाणे असावी.. पंचायतनात आपल्या कुलस्वामीची (पुरुष दैवत) मूर्ती हि मधोमध असावी व इतर देव त्याच्या बाजुने असावेत. उदा. तुमच कुलदैवत जर शिव अवतारांपैकी असेल तर शंकराची पिंडी ही मधोमध ठेउन इतर देव त्या बाजुने असावे. याला शिवपंचायतन अस म्हणतात. परंतु बहुसंख्य घरातुन गणेशपंचायतन फॉलो होत असल्याच दिसत.. यात गणपतीची मूर्ती मधोमध आणि बाकीचे देव बाजुने.
आता प्रश्न स्त्री दैवत आणि पुरुष दैवतांच्या जागा.. पंचायतानात जे दैवत मधे असेल त्याच्या उजव्या हाताला पुरुष देवतांच्या मूर्ती ठेवाव्या आणि डाव्या हाताला स्त्री देवतांच्या मूर्ती ठेवाव्या..
लिंबुकाका, अतृप्त वरील माहितीत काही बदल असतील तर नक्की सुचवा..
Submitted by मुग्धटली on 7 September, 2015 - 03:33
अश्विनी, मला ज्ञात असलेल्या मर्यादित माहिती नुसार......
>>>>>>> आपल्या देव्हार्यात एक गणपती, एक अन्नपुर्णा, एक शंकराची पिंडी (किंवा शाळुंका व अडणी), एक बाळकृष्ण, एक शंख आणि अडणी, एक घंटा, एक गंगेचा गडू व अजून एखाद दुसरी तसबीर असते. माझ्याकडे दत्तमुर्तीही आहे. <<<<<<<<<
यांची संख्या किती असावी याबद्दल मला फारसे माहीत नाही, पण बाळकृष्ण जास्त संख्येने चालतात. पिंडी व शंख एकेकच असावेत. अन्नपुर्णाही जास्त चालतात. गणपतीबाबत संख्येचे बंधन असावे, मला माहित नाही.
>>>>> तर, ह्या सगळ्याची मांडणी देव्हार्यात कशी करायची असते? <<<<<<<
ही मांडणी प्रामुख्याने, आपल्या घराण्यात पुढील पैकी कोणते पंचायतन आहे, त्यावरुन ठरते. = विष्णु पंचायतन, शिव पंचायतन, सूर्य/रवि पंचायतन, देवी पंचायतन, गणेश पंचायतन.
पंचायतनात, विष्णु, गणेश, शिव, देवी व सूर्य या देवता येतात. या व्यतिरिक्तच्या देवता देवघराच्या शक्यतो उत्तर दिशेला मांडाव्यात.
सर्वसाधारणतः माझ्या पहाण्यात महाराष्ट्रापुरते विष्णु पंचायतन जास्त प्रचलित दिसते. बाकी पंचायतने मला तरी बघायला मिळाली नाहीत, पण ती असतात.
पैकी विष्णु पंचायतनाची मांडणी अशी की आपण पूर्वेकडे तोंड करुन बसलो आहोत, तर देवांचे तोंड पश्चिमेकडे असेल, मध्यभागी विष्णु, विष्णुचे मागचे बाजूस, आपल्या उजव्या हाताला (आग्नेय दिशेस) गणेश, तर मागेच विष्णुचे डावीकडे (इशान्य दिशेस) शिव (पिंडी), विष्णुचे पुढील बाजुस आपल्या उजवी कडे नैर्ह्यूत्य दिशेस सूर्य, तर डावीकडे (वायवेस) देवी.
बाकी पंचायतनांच्या मांडणीचे पुस्तकातील पान स्वतंत्र देईन.
>>>>>>>> मला फार पुर्वी आमच्याकडे सत्यनारायण सांगायला आलेल्या एका गुरुजींनी स्त्री देवतांच्या मुर्ती गणपतीच्या एका बाजूला व पुरुष देवतांच्या दुसर्या बाजूला (डावी की उजवी ते आठवत नाही) ठेवायच्या असे सांगितले होते. स्त्री देवतांच्या मुर्तींमध्ये घरातल्या सुनांच्या अन्नपुर्णा असतात आणि पुरुष देवतांमध्ये बाळकृष्ण, शंकराची पिंडी व अजून दत्तमुर्ती वगैरे असल्यास असतात.<<<<<<
आधी वर सांगितल्याप्रमाणे, पंचायतनाचे उत्तर दिशेस बाकी देवता ठेवाव्यात असे माझे मत आहे.
>>>>> ही कासवाकृती अडणी व त्यावरील शंख कसा ठेवायचा असतो? कासवाचं मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा? <<<<<<<
शंखाचा निमुळता चोचीसारखा/पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करुन ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरुन ठेवुनच्या देवपुजेकरता घेऊ नये. तो निव्वळ "शंखध्वनी" करताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी.
शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफुल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.
पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. (वेळ अन ताकद कुणालाय उगाळत बसायची? शिवाय चंदनही किति महाग आहे?) तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवुन केलेले गंध शंखासाठी वापरू नये.
>>>>>> एकंदर नित्याची देवपूजा कशी करायची हे तुम्हा दोघांपैकी किंवा अजून कुणी सविस्तर सांगावे म्हणजे ज्यांना हवे त्यांना उपयोग होईल. <<<<<<<
नित्याची देवपुजा, पंचोपचारे वा षोडशोपचारे करता येते.
पंचोपचारामधे गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य...
षोडशोपचारामधे आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान ( पंचामृत, अभिषेक वगैरे जास्तीचे), वस्त्र+यज्ञोपवित, गंध, हळदकुंकू/परिमल द्रव्य, पुष्प+पत्री, धूप, दीप, नैवेद्य - फळ, तांबूल, दक्षिणा, प्रदक्षिणा - नमस्कार व शेवटी मंत्रपुष्प-आरती-प्रार्थना......
वरील माहितीकरता वे.शा.सं. कृ.म. बापटशास्त्री यांचे "सर्व देवपूजा" या पुस्तकाचा आधार घेतला असे. (नशिबाने ब्यागेत आत्ता बरोबर होते ते पुस्तक.).
Submitted by limbutimbu on 7 September, 2015 - 05:03
>>>>> डाव्या हाताला स्त्री देवतांच्या मूर्ती ठेवाव्या.. >>> ह्म्म. वामांगी रखुमाई.... धन्यवाद मुग्धटली. <<<<<<<
शास्त्राधारे नव्हे तर निव्वळ माझ्यामते, व अनुभवानुसार.......
विष्णुचे बाबतीत, जर लक्ष्मीची मूर्ति बाजुला ठेवायची असेलच, तर विष्णुचे उजव्या हातास ठेवावी. जसे की तुम्ही जोडीने पुजाकरतेवेळी बसता. त्यावेळेस लक्ष्मी नवर्याचे म्हणजे विष्णुचे उजव्या हातास बसुन नवर्याचे "देण्याचे" कामात सहभागी असते.
तर नवरा जेव्हा काही घेण्याचे काम करतो (अभिषेके पत्नी वामतः) , तेव्हा डावीकडे बसते.
अर्थातच, अनुभवानुसार, ज्यांचे कुलदैवत "लक्ष्मीकेशव" आहे, त्यांची पारंपारिक आर्थिक स्थिती व ज्यांचे कुलदैवत "केशवलक्ष्मी" आहे, त्यांचि परिस्थिती यात स्पष्ट फरक आढळतो.
मात्र यावर माझा अभ्यास व्हायचा आहे. सबब माझे वरील मत पूर्णतः ग्राह्य न धरता केवळ विचारार्थ ठेवावे.
सहसा पंचायतनातील देवांच्या मूर्तिंसोबत त्यांच्या जोडिदारांच्या मूर्तिही ठेवण्याचा प्रघात नाही, त्या अध्यार्हुत असतात.
Submitted by limbutimbu on 7 September, 2015 - 05:12
लिंबुकाका, मी कुठेतरी वाचलय अस की स्त्रीदेवतांच्या मूर्ती मध्ये असलेल्या मूर्तीच्या डाव्या हाताला ठेवाव्या... नक्की पुस्तक कोणत ते आठवत नाही, पण शास्त्र असे सांगते किंवा संपुर्ण चातुर्मास या दोन पैकीच कशाततरी वाचलय.
Submitted by मुग्धटली on 7 September, 2015 - 05:17
पंचोपचारामधे गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य...>>> एवढंच जमतं सकाळी. रोज देवांना अंघोळ घातली जाते हेच खूप माझ्याकडे नंदी पण आहे. तो मी पिंडीकडे तोंड करुन (आपल्याकडे पाठ करुन) देवांच्या पितळेच्या तबकातच ठेवते.
घंटा आणि गंगेचा गडू आपल्या डावीकडे ना?
Submitted by अश्विनी के on 7 September, 2015 - 05:55
>>>>> घंटा आणि गंगेचा गडू आपल्या डावीकडे ना? <<<<<
हो, माझ्याकडे गंगा/कलश देवघराच्या इशान्य कोपर्यात ठेवलेले आहेत. तर घंटा देवांचे पुढील बाजुस डावीकडेच असते, शंख उजवीकडे अस्तो.
एनिवे..... काल परवा सत्यनारायण पूजा सांगताना, सहजच विसोबा खेचर/नामदेव यांचेदरम्यानची एक संदर्भ कथा द्यावी लागली. त्या कथेचा मतितार्थ इतकाच, की इश्वर चराचरात भरलेला आहे. पण म्हणुन देवांना कसेही कुठेही बेशिस्त पणे ठवावे असेही नाही.
सहज आठवले म्हणुन सांगितले.
Submitted by limbutimbu on 7 September, 2015 - 06:59
अश्चिग, अरे देवाचं खरं स्थान देव्हार्यापेक्षा आपल्या हृदयात असायला हवं हे माहित असल्याने मी महिन्यानमहिने रोज नुसता हात जोडून गेले तरी मला डाचत नाही. एखाद्या दिवशी हात जोडायचा राहिला तरी डाचत नाही. हा! पण ज्या दिवशी अगदी आपल्या हृदयातला भगवंताचाही विसर पडतोय असं जाणवेल तेव्हा मात्रं नक्की डाचेल
घरात देव (दोन देव्हार्यातले दोन सेट) आहेत आणि आता बाबा नसल्याने माझ्या व बाबांच्या देवांची रोज पूजा मला करायची आहे तर जे करायचं ते नीट करायचं ह्या भावनेने विचारलंय ते मी. जसं ऑफिसचंही कुठलं काम जास्त चांगल्या रितीने कसं करता येईल हे आपण बघतो ना, तसंच
Submitted by अश्विनी के on 10 September, 2015 - 02:05
केश्वे, ही पोस्ट फार आवडली
मलाही स्वतःला एखाद्या दिवशी मंदिरात जायला जमलं नाही तर जरास वाईट वाटतं. आता तुझं ज्या दिवशी अगदी आपल्या हृदयातला भगवंताचाही विसर पडतोय असं जाणवेल तेव्हा मात्रं नक्की डाचेल हे वाक्य लक्षात ठेवेन.
शास्त्र असे सांगते! ( पुर्वार्ध व उत्तरार्ध) हे वेदवाणी प्रकाशनचे पुस्तक एफएक्यु स्वरुपाचे आहे. त्यात बहुतेक अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या मते धर्म रुढीपरंपरा याचा पुनर्विचार केला पाहिजे. कालसुसंगत असे व्यवहार्य पर्याय दिले पाहिजेत. आता गणेशोत्सवात धार्मिक भावना या नावाखाली ज्या त्रासदायक व कालबाह्य रुढी परंपरा गतानुगतिक पद्धतीने पाळल्या जातात त्यात बदल करण्यास सुरवात स्वतःपासून केली पाहिजे. उदा. गणेशमुर्तीचे विसर्जन घाणेरड्या पाण्यात न करता त्याच्या ऐवजी सुपारी हे गणपतीचे प्रतिक म्हणुन त्याचे विसर्जन वाहत्या पाण्यात करण्यास हरकत नाही. अनेक धर्मविधित सुपारीला गंध लावून ते गणेशाचे प्रतिक म्हणुन पुजेत ठेवले जाते.
अनेक सार्वजनिक मंडळांनी हे केल्यास नद्यांचे प्रदूषण कमी होईल.
निर्माल्याचे विसर्जन न करता कलशात टाकल्यास त्याचे खत करणारे प्रकल्प आहेत.
व्यक्तिगत आचरणात जरी मी रुढी परंपरा कर्मकांड पाळत नसलो तरी मी धार्मिक व सनातनी वातावरणातच वाढलो आहे.त्या काळात मी ते पाळत ही होतो.
Submitted by प्रकाश घाटपांडे on 14 September, 2015 - 23:43
मला एक विचारायचे आहे कि आमच्या घरी गणपती बसल्यावर सा.बा. म्हणतात की झाडुने झाडुन नाही काढायचे, तर कापडाने झाडायचे. असे का? पण त्याचे कारण बहुधा त्यानाही माहीत नसावे. खरच असे करायचे असते का? मी विचार केला त्यानुसार मन्दिरात पण झाडुन काढतातच कि आणि झाडू हा देखिल गवतापासुन बनवलेला असतो .... पण मग असे का???
बहुतेक 'झाडू बर्याच घाण ठिकाणून फिरुन आलेला असतो आणि त्याचा स्पर्श देव आलेले असताना घरात नको' म्हणून असेल.
एक नवा डेडिकेटेड झाडू आणून फक्त देवाच्या वेळी घरात वापरला तर कापडापेक्षा चांगला परफॉर्मन्स मिळेल.
मला देव्हारा बदलायचा आहे. सध्याचा लाकडी देव्हारा बदलुन सन्गमरवरी घ्यायचा आहे. सन्गमरवरी देव्हारा चालतो का? कळस नसलेला सन्गमरवरी देव्हारा घ्यायचा विचार आहे.
>>> मला एक विचारायचे आहे कि आमच्या घरी गणपती बसल्यावर सा.बा. म्हणतात की झाडुने झाडुन नाही काढायचे, तर कापडाने झाडायचे. असे का? पण त्याचे कारण बहुधा त्यानाही माहीत नसावे. खरच असे करायचे असते का? मी विचार केला त्यानुसार मन्दिरात पण झाडुन काढतातच कि आणि झाडू हा देखिल गवतापासुन बनवलेला असतो .... पण मग असे का??? <<<<
१) सहसा, पाहुणे आल्यावर घराची साफसफाई/झाडूमारणे वगैरे करीत नाहीत. ते येण्याचे आधीच करतात्/करावी. गणपती पाहुणा आलाय, त्यासही हाच नियम लागु. अर्थात, दहा दिवस घरात केरवारे करुच नयेत असेही नाही, तो अतिरेक आहे. दीड दिवसाचा गणपती असताना हे केले तर चालुन जाईल कदाचित.
२) आपल्याकडे पद्धत आहे (जुन्या लोकांना माहित आहे) की पाहुणा गेल्यावरही लगेच झाडु घेऊन केर काढायला घेत नाहीत. ही प्रथा होम/हवना नंतर आवर्जुन पाळली जाते. पुजा/होमहवन झाल्यानंतर उत्तरपुजा करुन देवताविसर्जन केल्यावर, नंतर साफसफाई करताना ती फडक्याने करतात, झाडुने नाही.
३) याप्रमाणेच या सारखीच अजुन एक प्रथा आहे (अलिखित नियम) की जेवणाची पंगत बसलेली असेल, एखाद्याचे जेवण झाले तर तो इतरांकरता थांबतो, थांबणे अशक्य असल्यास कुणा बसलेल्या ज्येष्ठाची परवानगी घेऊन उठतो. इथवर ठीक आहे, पण बहुतेक सगळे उठुन गेले असताना मोजके एखाद दोन जणांचे जेवण अजुनही चालले असेल, तर बाकीच्यांचि रिकामी पाने/उष्टीखरकटी त्या एकदोन जेवणार्यांचेच समोर उचलण्यास सुरुवात करीत नाहीत. त्यांचेही जेवण पुर्ण होऊन ते उठले की मगच उष्टीखरकटी निस्तरतात.
४) ही उष्टीखरकटी निस्तरताना कधीही "झाडू/केरसुणी" वापरीत नाहीत, तर हाताने/बोळ्याने/शेणाच्या गोळ्याने खरकटे टीपुन घेतात व पुसतात्/सारवतात. अन्न हे परब्रह्म मानले गेल्याने खरकट्यातील अन्न उचलण्यास देखिल झाडू वापरीत नाहीत. हाच भाव कदाचित पुजा/हवना नंतरच्या साफसफाईमागे असावा, कारण त्यानंतर पडलेला "कचरा(?)" हा बहुधा अक्षता/ फुले/मोहरी इत्यादीचाच असतो. क्वचित प्रसंगी दर्भ/समिधा/गोवरी यांचा कचरा. पण तिथेही झाडू वापरीत नाही़त. किंबहुना "आशिर्वादपर " टाकलेल्या अक्षता "कचरा" कशा काय होऊ शकतील, हा भावही त्यामागे असावा.
५) हे केलेच नाही तर काय बिघडेल असा प्रश्न कुणास पडलाच, तर काहीही बिघडणार नाही असे उत्तर. जसा भाव तसा देव. इंग्रजी पद्धतीच्या काटेचमच्याच्या जेवणात डाव्या हातातच काटेचमचा पकडला नाही किंवा जपानी/चिनी पद्धतीत दोन काड्यांनी गिळण्यासाठी भाताची शिते तोंडात भिरकावली नाहीत तर काय बिघडले यास जे उत्तर तेच इथेही लागु.
असो.
Submitted by limbutimbu on 19 October, 2016 - 07:57
धन्यवाद सर्वान्च्या प्रतिसादाबद्द्ल. खूप छान माहीती मिळाली. आमच्याकडे गणपती गौरी बरोबर विसर्जन होत असल्याने 6-7 दिवस कापडाने पुर्ण खोल्या दिवसातुन 2-3 वेळा साफ करावेच लागते. म्हणुन एक जिज्ञासा होती म्हणून म्हट्ले मायबोलीशिवाय याचे अचुक उत्तर कुठे मिळणार. १) सहसा, पाहुणे आल्यावर घराची साफसफाई/झाडूमारणे वगैरे करीत नाहीत. ते येण्याचे आधीच करतात्/करावी. गणपती पाहुणा आलाय, त्यासही हाच नियम लागु. अर्थात, दहा दिवस घरात केरवारे करुच नयेत असेही नाही, तो अतिरेक आहे. दीड दिवसाचा गणपती असताना हे केले तर चालुन जाईल कदाचित.>>>> हो ती साफसफाई - सम्पुर्ण घर, भिन्ती वगरे अगोदरच साफ करुन घेतो.
अश्विनि दिक्षित, संगमरवरी देव्हारा फार सुंदर होईल, लाकडापेक्षा. जरा मेंटेंन करायला लागतो पण वर्थ इट. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बनवूनही घेऊ शकता. अतिशयच जड असतो पण...
अश्विनी मला थोडी माहिती आहे
अश्विनी मला थोडी माहिती आहे त्यानुसार काही सांगितल तर चालेल का? बघा उपयोग होतोय का ते..
देवघराची रचना शक्यतो पंचायतनाप्रमाणे असावी.. पंचायतनात आपल्या कुलस्वामीची (पुरुष दैवत) मूर्ती हि मधोमध असावी व इतर देव त्याच्या बाजुने असावेत. उदा. तुमच कुलदैवत जर शिव अवतारांपैकी असेल तर शंकराची पिंडी ही मधोमध ठेउन इतर देव त्या बाजुने असावे. याला शिवपंचायतन अस म्हणतात. परंतु बहुसंख्य घरातुन गणेशपंचायतन फॉलो होत असल्याच दिसत.. यात गणपतीची मूर्ती मधोमध आणि बाकीचे देव बाजुने.
आता प्रश्न स्त्री दैवत आणि पुरुष दैवतांच्या जागा.. पंचायतानात जे दैवत मधे असेल त्याच्या उजव्या हाताला पुरुष देवतांच्या मूर्ती ठेवाव्या आणि डाव्या हाताला स्त्री देवतांच्या मूर्ती ठेवाव्या..
लिंबुकाका, अतृप्त वरील माहितीत काही बदल असतील तर नक्की सुचवा..
देवाला नारळ वहाताना कसा
देवाला नारळ वहाताना कसा वहावा?
शेंडी आपल्याकडे की देवा कडे?
शेंडी आपल्याकडे की देवा कडे?
शेंडी आपल्याकडे की देवा कडे? >>>> देवाकडे.
डाव्या हाताला स्त्री
डाव्या हाताला स्त्री देवतांच्या मूर्ती ठेवाव्या.. >>> ह्म्म. वामांगी रखुमाई.... धन्यवाद मुग्धटली.
बाकीची माहिती मात्त्र ते
@अश्विनी के अतृप्त सारख्या
@अश्विनी के
अतृप्त सारख्या आयडींनी जरा खालील गोष्टींवर लिहावे ही विनंती. >> अत्ता बिझ्झि आहे.. रात्रि लिहितो उत्तर.

अश्विनी, मला ज्ञात असलेल्या
अश्विनी, मला ज्ञात असलेल्या मर्यादित माहिती नुसार......
>>>>>>> आपल्या देव्हार्यात एक गणपती, एक अन्नपुर्णा, एक शंकराची पिंडी (किंवा शाळुंका व अडणी), एक बाळकृष्ण, एक शंख आणि अडणी, एक घंटा, एक गंगेचा गडू व अजून एखाद दुसरी तसबीर असते. माझ्याकडे दत्तमुर्तीही आहे. <<<<<<<<<
यांची संख्या किती असावी याबद्दल मला फारसे माहीत नाही, पण बाळकृष्ण जास्त संख्येने चालतात. पिंडी व शंख एकेकच असावेत. अन्नपुर्णाही जास्त चालतात. गणपतीबाबत संख्येचे बंधन असावे, मला माहित नाही.
>>>>> तर, ह्या सगळ्याची मांडणी देव्हार्यात कशी करायची असते? <<<<<<<
ही मांडणी प्रामुख्याने, आपल्या घराण्यात पुढील पैकी कोणते पंचायतन आहे, त्यावरुन ठरते. = विष्णु पंचायतन, शिव पंचायतन, सूर्य/रवि पंचायतन, देवी पंचायतन, गणेश पंचायतन.
पंचायतनात, विष्णु, गणेश, शिव, देवी व सूर्य या देवता येतात. या व्यतिरिक्तच्या देवता देवघराच्या शक्यतो उत्तर दिशेला मांडाव्यात.
सर्वसाधारणतः माझ्या पहाण्यात महाराष्ट्रापुरते विष्णु पंचायतन जास्त प्रचलित दिसते. बाकी पंचायतने मला तरी बघायला मिळाली नाहीत, पण ती असतात.
पैकी विष्णु पंचायतनाची मांडणी अशी की आपण पूर्वेकडे तोंड करुन बसलो आहोत, तर देवांचे तोंड पश्चिमेकडे असेल, मध्यभागी विष्णु, विष्णुचे मागचे बाजूस, आपल्या उजव्या हाताला (आग्नेय दिशेस) गणेश, तर मागेच विष्णुचे डावीकडे (इशान्य दिशेस) शिव (पिंडी), विष्णुचे पुढील बाजुस आपल्या उजवी कडे नैर्ह्यूत्य दिशेस सूर्य, तर डावीकडे (वायवेस) देवी.
इशान्य---- |------------------पूर्व--------------------| आग्नेय
------------ |-----------------------------------------| --------
------------ |शिव------------------------------गणेश| --------
------------ |-----------------------------------------| --------
उत्तर------- |-----------------विष्णु------------------|-- दक्षिण
------------ |-----------------------------------------| --------
------------ |देवी---------------------------------सूर्य| --------
------------ |-----------------------------------------| --------
--वायव्य---|-----------------पश्चिम-----------------| नैर्ह्यूत्य
बाकी पंचायतनांच्या मांडणीचे पुस्तकातील पान स्वतंत्र देईन.
>>>>>>>> मला फार पुर्वी आमच्याकडे सत्यनारायण सांगायला आलेल्या एका गुरुजींनी स्त्री देवतांच्या मुर्ती गणपतीच्या एका बाजूला व पुरुष देवतांच्या दुसर्या बाजूला (डावी की उजवी ते आठवत नाही) ठेवायच्या असे सांगितले होते. स्त्री देवतांच्या मुर्तींमध्ये घरातल्या सुनांच्या अन्नपुर्णा असतात आणि पुरुष देवतांमध्ये बाळकृष्ण, शंकराची पिंडी व अजून दत्तमुर्ती वगैरे असल्यास असतात.<<<<<<
आधी वर सांगितल्याप्रमाणे, पंचायतनाचे उत्तर दिशेस बाकी देवता ठेवाव्यात असे माझे मत आहे.
>>>>> ही कासवाकृती अडणी व त्यावरील शंख कसा ठेवायचा असतो? कासवाचं मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा? <<<<<<<
शंखाचा निमुळता चोचीसारखा/पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करुन ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरुन ठेवुनच्या देवपुजेकरता घेऊ नये. तो निव्वळ "शंखध्वनी" करताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी.
शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफुल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.
पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. (वेळ अन ताकद कुणालाय उगाळत बसायची? शिवाय चंदनही किति महाग आहे?) तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवुन केलेले गंध शंखासाठी वापरू नये.
>>>>>> एकंदर नित्याची देवपूजा कशी करायची हे तुम्हा दोघांपैकी किंवा अजून कुणी सविस्तर सांगावे म्हणजे ज्यांना हवे त्यांना उपयोग होईल. <<<<<<<
नित्याची देवपुजा, पंचोपचारे वा षोडशोपचारे करता येते.
पंचोपचारामधे गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य...
षोडशोपचारामधे आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान ( पंचामृत, अभिषेक वगैरे जास्तीचे), वस्त्र+यज्ञोपवित, गंध, हळदकुंकू/परिमल द्रव्य, पुष्प+पत्री, धूप, दीप, नैवेद्य - फळ, तांबूल, दक्षिणा, प्रदक्षिणा - नमस्कार व शेवटी मंत्रपुष्प-आरती-प्रार्थना......
वरील माहितीकरता वे.शा.सं. कृ.म. बापटशास्त्री यांचे "सर्व देवपूजा" या पुस्तकाचा आधार घेतला असे. (नशिबाने ब्यागेत आत्ता बरोबर होते ते पुस्तक.).
>>>>> डाव्या हाताला स्त्री
>>>>> डाव्या हाताला स्त्री देवतांच्या मूर्ती ठेवाव्या.. >>> ह्म्म. वामांगी रखुमाई.... धन्यवाद मुग्धटली. <<<<<<<
शास्त्राधारे नव्हे तर निव्वळ माझ्यामते, व अनुभवानुसार.......
विष्णुचे बाबतीत, जर लक्ष्मीची मूर्ति बाजुला ठेवायची असेलच, तर विष्णुचे उजव्या हातास ठेवावी. जसे की तुम्ही जोडीने पुजाकरतेवेळी बसता. त्यावेळेस लक्ष्मी नवर्याचे म्हणजे विष्णुचे उजव्या हातास बसुन नवर्याचे "देण्याचे" कामात सहभागी असते.
तर नवरा जेव्हा काही घेण्याचे काम करतो (अभिषेके पत्नी वामतः) , तेव्हा डावीकडे बसते.
अर्थातच, अनुभवानुसार, ज्यांचे कुलदैवत "लक्ष्मीकेशव" आहे, त्यांची पारंपारिक आर्थिक स्थिती व ज्यांचे कुलदैवत "केशवलक्ष्मी" आहे, त्यांचि परिस्थिती यात स्पष्ट फरक आढळतो.
मात्र यावर माझा अभ्यास व्हायचा आहे. सबब माझे वरील मत पूर्णतः ग्राह्य न धरता केवळ विचारार्थ ठेवावे.
सहसा पंचायतनातील देवांच्या मूर्तिंसोबत त्यांच्या जोडिदारांच्या मूर्तिही ठेवण्याचा प्रघात नाही, त्या अध्यार्हुत असतात.
चैतन्य... तुमची 7 August,
चैतन्य... तुमची 7 August, 2014 - 08:39 ची प्राणप्रतिष्ठापनेवरील पोस्ट छान आहे.
लिंबुकाका, मी कुठेतरी वाचलय
लिंबुकाका, मी कुठेतरी वाचलय अस की स्त्रीदेवतांच्या मूर्ती मध्ये असलेल्या मूर्तीच्या डाव्या हाताला ठेवाव्या... नक्की पुस्तक कोणत ते आठवत नाही, पण शास्त्र असे सांगते किंवा संपुर्ण चातुर्मास या दोन पैकीच कशाततरी वाचलय.
ओके मुग्धटली, मी देखिल शोधुन
ओके मुग्धटली, मी देखिल शोधुन पहातो संदर्भ, मग ठरवूयात डावी की उजवी कडे ठेवायचे ते.
(No subject)
धन्यवाद लिंबूभाऊ
धन्यवाद लिंबूभाऊ
पंचोपचारामधे गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य...>>> एवढंच जमतं सकाळी. रोज देवांना अंघोळ घातली जाते हेच खूप
माझ्याकडे नंदी पण आहे. तो मी पिंडीकडे तोंड करुन (आपल्याकडे पाठ करुन) देवांच्या पितळेच्या तबकातच ठेवते.
घंटा आणि गंगेचा गडू आपल्या डावीकडे ना?
थॅक्स
थॅक्स
>>>>> घंटा आणि गंगेचा गडू
>>>>> घंटा आणि गंगेचा गडू आपल्या डावीकडे ना? <<<<<
हो, माझ्याकडे गंगा/कलश देवघराच्या इशान्य कोपर्यात ठेवलेले आहेत. तर घंटा देवांचे पुढील बाजुस डावीकडेच असते, शंख उजवीकडे अस्तो.
एनिवे..... काल परवा सत्यनारायण पूजा सांगताना, सहजच विसोबा खेचर/नामदेव यांचेदरम्यानची एक संदर्भ कथा द्यावी लागली. त्या कथेचा मतितार्थ इतकाच, की इश्वर चराचरात भरलेला आहे. पण म्हणुन देवांना कसेही कुठेही बेशिस्त पणे ठवावे असेही नाही.
सहज आठवले म्हणुन सांगितले.
> मी रोज व्यवस्थित पूजा करते,
> मी रोज व्यवस्थित पूजा करते, फक्त अश्या एक दोन बाबतीतच कन्फ्यूजन आहे. मनापासून पूजा करत असल्याने चुका होत असतील तरी मनाला डाचत नाहिये.
इतका दृढ विश्वास असतांना कन्फ्यूजन डोकं वर करूच कसं शकतं
याच्या पुढची स्थिती मनापासून काही न करताही ते मनाला न डाचणं. लिंबुकाकांनी याबद्दल इतक्यातच कुठेतरी लिहिलं होतं - अद्वैतावस्था ...
अश्चिग, अरे देवाचं खरं स्थान
अश्चिग, अरे देवाचं खरं स्थान देव्हार्यापेक्षा आपल्या हृदयात असायला हवं हे माहित असल्याने मी महिन्यानमहिने रोज नुसता हात जोडून गेले तरी मला डाचत नाही. एखाद्या दिवशी हात जोडायचा राहिला तरी डाचत नाही. हा! पण ज्या दिवशी अगदी आपल्या हृदयातला भगवंताचाही विसर पडतोय असं जाणवेल तेव्हा मात्रं नक्की डाचेल
घरात देव (दोन देव्हार्यातले दोन सेट) आहेत आणि आता बाबा नसल्याने माझ्या व बाबांच्या देवांची रोज पूजा मला करायची आहे तर जे करायचं ते नीट करायचं ह्या भावनेने विचारलंय ते मी. जसं ऑफिसचंही कुठलं काम जास्त चांगल्या रितीने कसं करता येईल हे आपण बघतो ना, तसंच
केश्वे, ही पोस्ट फार आवडली
केश्वे, ही पोस्ट फार आवडली
मलाही स्वतःला एखाद्या दिवशी मंदिरात जायला जमलं नाही तर जरास वाईट वाटतं. आता तुझं ज्या दिवशी अगदी आपल्या हृदयातला भगवंताचाही विसर पडतोय असं जाणवेल तेव्हा मात्रं नक्की डाचेल
हे वाक्य लक्षात ठेवेन.
शंख केव्हा आणि कुठे वाजवावा /
शंख केव्हा आणि कुठे वाजवावा / वाजवू नये याबाबत काही संकेत आहेत का?
शास्त्र असे सांगते! (
शास्त्र असे सांगते! ( पुर्वार्ध व उत्तरार्ध) हे वेदवाणी प्रकाशनचे पुस्तक एफएक्यु स्वरुपाचे आहे. त्यात बहुतेक अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या मते धर्म रुढीपरंपरा याचा पुनर्विचार केला पाहिजे. कालसुसंगत असे व्यवहार्य पर्याय दिले पाहिजेत. आता गणेशोत्सवात धार्मिक भावना या नावाखाली ज्या त्रासदायक व कालबाह्य रुढी परंपरा गतानुगतिक पद्धतीने पाळल्या जातात त्यात बदल करण्यास सुरवात स्वतःपासून केली पाहिजे. उदा. गणेशमुर्तीचे विसर्जन घाणेरड्या पाण्यात न करता त्याच्या ऐवजी सुपारी हे गणपतीचे प्रतिक म्हणुन त्याचे विसर्जन वाहत्या पाण्यात करण्यास हरकत नाही. अनेक धर्मविधित सुपारीला गंध लावून ते गणेशाचे प्रतिक म्हणुन पुजेत ठेवले जाते.
अनेक सार्वजनिक मंडळांनी हे केल्यास नद्यांचे प्रदूषण कमी होईल.
निर्माल्याचे विसर्जन न करता कलशात टाकल्यास त्याचे खत करणारे प्रकल्प आहेत.
व्यक्तिगत आचरणात जरी मी रुढी परंपरा कर्मकांड पाळत नसलो तरी मी धार्मिक व सनातनी वातावरणातच वाढलो आहे.त्या काळात मी ते पाळत ही होतो.
चोर ओटी कशी भरायची? काय काय
चोर ओटी कशी भरायची? काय काय पदार्थ करतात, कोणती वस्त्रे देतात? कोणत्या महिन्यात करायची असते ? कोणी अगदी सुरुवाती पासून माहिती देऊ शकेल काय
पौर्णिमा १८ तारखेला उ.
पौर्णिमा १८ तारखेला उ. रात्री ०४.४० ला चालु आणि १९ तारखेला उ. रात्री ०४.२६ ला संपनार म्हणजे नक्की किती वाजता (date, time - am/pm) कोणी सांगु शकेल का?
जर १८ ला सकाळी चालु होतात आणी १९ ला सकाळी संपतात तर कॅलेंडरमध्ये १९ का दाखवत असावेत
मला एक विचारायचे आहे कि
मला एक विचारायचे आहे कि आमच्या घरी गणपती बसल्यावर सा.बा. म्हणतात की झाडुने झाडुन नाही काढायचे, तर कापडाने झाडायचे. असे का? पण त्याचे कारण बहुधा त्यानाही माहीत नसावे. खरच असे करायचे असते का? मी विचार केला त्यानुसार मन्दिरात पण झाडुन काढतातच कि आणि झाडू हा देखिल गवतापासुन बनवलेला असतो .... पण मग असे का???
बहुतेक 'झाडू बर्याच घाण
बहुतेक 'झाडू बर्याच घाण ठिकाणून फिरुन आलेला असतो आणि त्याचा स्पर्श देव आलेले असताना घरात नको' म्हणून असेल.
एक नवा डेडिकेटेड झाडू आणून फक्त देवाच्या वेळी घरात वापरला तर कापडापेक्षा चांगला परफॉर्मन्स मिळेल.
अनु, आमच्या कडे पण कोकणात
अनु, आमच्या कडे पण कोकणात देवघर साफ करायचा एक वेगळा डेडिकेटेड झाडू असतो
मला देव्हारा बदलायचा आहे.
मला देव्हारा बदलायचा आहे. सध्याचा लाकडी देव्हारा बदलुन सन्गमरवरी घ्यायचा आहे. सन्गमरवरी देव्हारा चालतो का? कळस नसलेला सन्गमरवरी देव्हारा घ्यायचा विचार आहे.
>>> मला एक विचारायचे आहे कि
>>> मला एक विचारायचे आहे कि आमच्या घरी गणपती बसल्यावर सा.बा. म्हणतात की झाडुने झाडुन नाही काढायचे, तर कापडाने झाडायचे. असे का? पण त्याचे कारण बहुधा त्यानाही माहीत नसावे. खरच असे करायचे असते का? मी विचार केला त्यानुसार मन्दिरात पण झाडुन काढतातच कि आणि झाडू हा देखिल गवतापासुन बनवलेला असतो .... पण मग असे का??? <<<<
१) सहसा, पाहुणे आल्यावर घराची साफसफाई/झाडूमारणे वगैरे करीत नाहीत. ते येण्याचे आधीच करतात्/करावी. गणपती पाहुणा आलाय, त्यासही हाच नियम लागु. अर्थात, दहा दिवस घरात केरवारे करुच नयेत असेही नाही, तो अतिरेक आहे. दीड दिवसाचा गणपती असताना हे केले तर चालुन जाईल कदाचित.
२) आपल्याकडे पद्धत आहे (जुन्या लोकांना माहित आहे) की पाहुणा गेल्यावरही लगेच झाडु घेऊन केर काढायला घेत नाहीत. ही प्रथा होम/हवना नंतर आवर्जुन पाळली जाते. पुजा/होमहवन झाल्यानंतर उत्तरपुजा करुन देवताविसर्जन केल्यावर, नंतर साफसफाई करताना ती फडक्याने करतात, झाडुने नाही.
३) याप्रमाणेच या सारखीच अजुन एक प्रथा आहे (अलिखित नियम) की जेवणाची पंगत बसलेली असेल, एखाद्याचे जेवण झाले तर तो इतरांकरता थांबतो, थांबणे अशक्य असल्यास कुणा बसलेल्या ज्येष्ठाची परवानगी घेऊन उठतो. इथवर ठीक आहे, पण बहुतेक सगळे उठुन गेले असताना मोजके एखाद दोन जणांचे जेवण अजुनही चालले असेल, तर बाकीच्यांचि रिकामी पाने/उष्टीखरकटी त्या एकदोन जेवणार्यांचेच समोर उचलण्यास सुरुवात करीत नाहीत. त्यांचेही जेवण पुर्ण होऊन ते उठले की मगच उष्टीखरकटी निस्तरतात.
४) ही उष्टीखरकटी निस्तरताना कधीही "झाडू/केरसुणी" वापरीत नाहीत, तर हाताने/बोळ्याने/शेणाच्या गोळ्याने खरकटे टीपुन घेतात व पुसतात्/सारवतात. अन्न हे परब्रह्म मानले गेल्याने खरकट्यातील अन्न उचलण्यास देखिल झाडू वापरीत नाहीत. हाच भाव कदाचित पुजा/हवना नंतरच्या साफसफाईमागे असावा, कारण त्यानंतर पडलेला "कचरा(?)" हा बहुधा अक्षता/ फुले/मोहरी इत्यादीचाच असतो. क्वचित प्रसंगी दर्भ/समिधा/गोवरी यांचा कचरा. पण तिथेही झाडू वापरीत नाही़त. किंबहुना "आशिर्वादपर " टाकलेल्या अक्षता "कचरा" कशा काय होऊ शकतील, हा भावही त्यामागे असावा.
५) हे केलेच नाही तर काय बिघडेल असा प्रश्न कुणास पडलाच, तर काहीही बिघडणार नाही असे उत्तर. जसा भाव तसा देव. इंग्रजी पद्धतीच्या काटेचमच्याच्या जेवणात डाव्या हातातच काटेचमचा पकडला नाही किंवा जपानी/चिनी पद्धतीत दोन काड्यांनी गिळण्यासाठी भाताची शिते तोंडात भिरकावली नाहीत तर काय बिघडले यास जे उत्तर तेच इथेही लागु.
असो.
धन्यवाद सर्वान्च्या
धन्यवाद सर्वान्च्या प्रतिसादाबद्द्ल. खूप छान माहीती मिळाली. आमच्याकडे गणपती गौरी बरोबर विसर्जन होत असल्याने 6-7 दिवस कापडाने पुर्ण खोल्या दिवसातुन 2-3 वेळा साफ करावेच लागते. म्हणुन एक जिज्ञासा होती म्हणून म्हट्ले मायबोलीशिवाय याचे अचुक उत्तर कुठे मिळणार. १) सहसा, पाहुणे आल्यावर घराची साफसफाई/झाडूमारणे वगैरे करीत नाहीत. ते येण्याचे आधीच करतात्/करावी. गणपती पाहुणा आलाय, त्यासही हाच नियम लागु. अर्थात, दहा दिवस घरात केरवारे करुच नयेत असेही नाही, तो अतिरेक आहे. दीड दिवसाचा गणपती असताना हे केले तर चालुन जाईल कदाचित.>>>> हो ती साफसफाई - सम्पुर्ण घर, भिन्ती वगरे अगोदरच साफ करुन घेतो.
अश्विनि दिक्षित, संगमरवरी

Pages