मजेशीर जाहिरात

Submitted by मिरिंडा on 12 October, 2016 - 04:36

माझ्या लहानपणी एका फोटो स्टुडिओची मजेशीर जाहिरात केली होती . साधारणपणे
१९६०/६१ साल असेल. ती खालील प्रमाणे होती.

दोन बहिरे एकमेकांना विचारतात :
------------------------------------

पहिला बहिरा: काय ? महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललात वाटत ?

दुसरा बहिरा: छे, छे. महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललोय.

पहिला बहिरा: असं असं . मला वाटलं , महेंद्र फोटो स्टुडिओत फोटा काढायला चाललात की काय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बजाज सनी ची सुरुवातीची एक अ‍ॅड होती त्यात एक मुलगी बोरिंग कपडे घालून, अगदी स्टुडीअस वगैरे दाखवली आहे. आणि मग तिला आवडणार्‍या मुलाला इम्प्रेस करायला ती काही मिनीटांत मेकोव्हर करून आपल्या सनीवरून झोकात त्या मुलाच्या समोर जाते वगैरे. तिचं मेकोव्हरचं सामान (कपड्यांसहित) सनीच्या डिकीत दडवलेलं असतं. मस्त अ‍ॅड होती ही.

'जळणाला लाकूडची ' >>>
जळणाला लाकूड
गुरांना चारा
गाठीला पैका
घरच्या घरी , सामाजिक वनीकरण येता दारी

पोरी ए पोsरी पावण आलं बघ.... Lol हे वर्ल्ड फेमस आहे.
आणि हा आहे राजू. नाक स्वच्छ कान स्वच्छ... ही आठवते का? कसली होती?

ये ढेर से कपडे मै कैसे धो ऊ
अच्छा साबुन कौनसा लाऊ
कपडो को जो उजला बना दे
उमर बढा दे, चमक लाये
कोई बता दे मुझे तो कोई बता दे

धनटक का डबल बी साबून लाईये..

आकाशवाणी सांगली वर एका चहाची अ‍ॅड होती.

सुवासिनीने कुकवाला आनी मर्दानी चहाला नाय न्हनू नये..
१. आम्ही ..... चहाच पितो
२. मग आम्ही काय ऊन पाणि पितो काय आम्ही बी आमच्या आबा आज्यापासुन .... चहाच पितो
३. म्ग हुन जाउद्या की...

त्या चहाचे नाव काय आठवत नाही.

जळणाला लाकुड गुरांना चारा गाठीला पैका घरच्या घरी,,,,,, सामाजिम वनीकरण येता दारी........

>>>>>>

शादी ? और
तुमसे ?
कभी नही

` दीपिकाजी , आप तो वो मेहेंगीवाली.. . लेती थी' `वोही सफेदी , वोही झांक कम दामोंमे मिले; तो कोइ ये क्युं ले, वो ना ले?'
`भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे?'

नया घर.. नयी मिसेज.. वा सुनिल बाबू बढिया है

आय लव यू रसना..

पुरब से सुर्य उगा..फला उजियाला.
जागी हर दिशा. जागा जग सारा..

Sylvania Laxman बल्बस् और ट्युबस् च्या जाहिरातीत मला वाटतं 'पेंटल' हे कलाकार होते.

आणि ती जाहिरात!!!
'वाघ बकरी चाय' चहाचं नांव असं असू शकतं? Rofl

उजळ लोकांची दुनिया उजळ
सनलाईट साबणाची, दुनिया उजळ..
आजीकडून नातीने, शिकल्या गोष्टी उजळ,
सनलाईट साबणाची दुनिया उजळ!

किती मस्त चाल होती या जहिरातीची..

***

झुळ्झूळ वाणी,
खेळवा पाणी
आणायचं कुणी?
सांगतो राणी!
फिनोलेक्सने आणलं पाणी
शेतं पिकली सोन्यावाणी

ही जाहिरात / लिरिक्स नंतर थोडीथोडी बदलली, पण मूळ जाहिरातीची सर नाही..

` दीपिकाजी , आप तो वो मेहेंगीवाली.. . लेती थी' `वोही सफेदी , वोही झांक कम दामोंमे मिले; तो कोइ ये क्युं ले, वो ना ले?'
>>

ओह ओह दिपीकाजी.. आईये आईये.. लिजिये आपका सब सामान तैयार..
हा.. पर ये नहीं वो..
पर आप तो वो मेहेंगीवाली टिकीया..
लेती थी.. पर वहीं सफेदी, वहीं झाग.. अगर कम दामोंमे मिले; तों कोई यें क्युं ले, वो ना ले?
वा वा दिपीकाजी.. मान गये..
किसें?
आपकी पारखीं नजर और निरमा सुपर.. दोनोंको.

यातल्या दोन्ही कलाकारांचे आवाज मला प्रचंड आवडायचे. त्यामुळे जशीच्या तशी लक्षात आहे. Happy

भारती आचरेकर यान्ची 'पान पसन्द' ची एक जाहीरात होति(शब्द आथवत नाहीत). जलाल आगाची पान परागची एक जाहीरात होति. ज्यात जलाल आगा एका पार्टीत येतो, सगळ्याना पान पराग वाटतो, मग उन्च माणुस विचारतो और मुझे? मग जलाल आगा एक पान पराग लड देतो वगैरे...
मोती साबणाची जाहीरात दिवाळीच्या आधी येणारी...
रुह अफजाची जाहीरात ज्यात् सर्बाताचे अन शेकचे ग्लास भरलेले दाखवतात.

Lifebuoy ची जाहिरात
'तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफबॉय... लाइफबॉय है जहां... तंदुरुस्ती है वहां.. लाइफबॉय...'

डीडी सह्याद्री वर एक किटकनाशकची जाहिरात यायची, त्यातला भाला घेतलेला, मावळ्याच्या वेषातील घोडेस्वार जाम आवडायचा.

वाघ बकरी चाय' चहाचं नांव असं असू शकतं? >>> म्हणजे काय?? आहेच असे नाव. क्न्सेप्ट दोघे एकत्र चहा घेताहेत असा म्हणे. भारतात नं. ३ ची कंपनी आहे. व्हेरी फेमस इन गुजरात.. अमदावादेत हेक्वॅ आहे.

राम राम दौलतराव,
राम राम,

सखु, च्या टाक पावन्यास्नी
जी...

नग...

अवो, सुवासिनीने कुकवाला आनी मर्दानी चहाला नाय न्हनू नये..

आमी आम्च्या आबा आज्या पासन मगदुम चहाच पितो

मग आम्ही काय ऊन पाणि पितो काय आम्ही बी आमच्या आबा आज्यापासुन मगदुम चहाच पितो

मग होउन जाउदे .. डबल
आस्स..

"बया बया बया बया! वैतागली ह्या काड्यापेटीला
निम्मी काड्यापेटी घातली तरी चूलच पेटंना"

"आगं आसल्या काड्यापेटीच्या नादाला लागण्यापरीस ध्यानात ठेव - खार छाप अनिल माचीसच वापर!

एका काडीत चूल-स्टोव्ह-गॅस समदं झक्कास पेटतया."

दूध दूध दूध दूध...
पियो ग्लास फुल दूध
गर्मी में डालो दूध में आईस, दूध बन गया वेरी नाईस
पियो डेली वन्स ऑर ट्वाईस, मिल जायेगा टेस्टी सरप्राईज..
दूध दूध दूध दूध...
पियो ग्लास फुल दूध

दूध है मस्त इन एव्री सीजन
पिओ दूध फॉर हेल्दी रीझन
रहोगे फिर फिट अ‍ॅण्ड फाईन
जिओगे पास नाइन्टीनाईन
पिओ ग्लासफुल!

Pages