मजेशीर जाहिरात

Submitted by मिरिंडा on 12 October, 2016 - 04:36

माझ्या लहानपणी एका फोटो स्टुडिओची मजेशीर जाहिरात केली होती . साधारणपणे
१९६०/६१ साल असेल. ती खालील प्रमाणे होती.

दोन बहिरे एकमेकांना विचारतात :
------------------------------------

पहिला बहिरा: काय ? महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललात वाटत ?

दुसरा बहिरा: छे, छे. महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललोय.

पहिला बहिरा: असं असं . मला वाटलं , महेंद्र फोटो स्टुडिओत फोटा काढायला चाललात की काय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अनु, तेव्हाचा एक पीजे आठवला.
ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेन जर मुंबईत भेटल्या, तर त्या भेटीला काय म्हणाल?
- रूपसंगम Wink

भारी आहे हा
आम्ही त्या जाहितातीतल्या वहिनी असावी जशी परी दिसावी ला वहिनी असावी जशी झिपरी दिसावी म्हणायचो ☺️☺️

घर का सारा काम मुझेही करना पडता है
सफाई भी shopping भी..

फार जुनी नाही पण मला ती महिंद्रा गस्टो ची भयंकर डोक्यात जाणारी जाहीरात आठवली.
"तुझे गस्टो लेना है तो गस्टो ले, गस्टो लेना है तो गस्टो ले"

कोणत्या चॅनेलची आठवत नाही पण बिना जाहिरातीचा सलग पिक्चर दाखवण्याची जाहिरात होती.

त्यात हनिमूनला गेलेल्या कपलच्या मधे मधे लोक येत असतात.

क्या आप दातून करते है.

हॅपीडेन्ट च्या सगळ्याच जाहिराती मस्त होत्या.

फ्लॅश मारणारी म्हैस .

स्ट्रीट लाईट म्हणून हॅपीडेन्ट खाणारे लोक.

विनोदी नाही पण निरमाच्या अंघोळीच्या साबणाची सोनाली बेंद्रेची जाहिरात होती.

सौंदर्य साबून निरमा .

घोडा घेऊन चालणारी सोनाली मस्त दिसायची

पराग साडीची जाहिरात भाग्यश्री पटवर्धन करायची.
अंग्रेजी में कहते हैं व्हेरी गुड पराग साडी
गुजराती में कहते हैं सारो छे पराग साडी
बंगाली में कहते हैं के भालो पराग साडी
और पंजाबी विच कहते हैं
परागन साडी लो.. परागन साडी लो...

प्रत्येक ओळीला त्या त्या प्रकारची साडी नेसलेली असायची.
छान होती जाहिरात.

सॅनिटरी पॅडच्या जाहिराती शाळेत असताना कळत नसत. लम्बवर्तुळाकार पॅड, त्यावर निळी शाई टाकलेली दाखवत आणि फक्त मुलीच दिसत त्यामुळे हे फक्त मुलींनी वापरायचे नॅपकिन असा बराच काळ समज होता. ते निरोधच्या जाहिरातींचेही बरेच कुतूहल असायचे पण त्यात वस्तु दाखवत नसत आणि धावते घोडे, सुंदर स्त्रिया, स्ट्रॉबेरी वगैरे एवढेच दिसे त्यामुळे अंदाज बांधायला अवघड असे. यात काही गोळ्या-औषधे असतील असे वाटायचे.
दारूची थेट जाहिरात करता येत नसल्याने हे सरोगेट जाहिरातींद्वारे ग्लास,म्युजिक सिडी दाखवतात हे पण उशिरा माहित झाले. मॅकडोवेलची ती नम्बर वन यारी आणि बॅगपायपरची खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे या जाहिराती लक्षात राहिल्या कायम.

कोणत्यातरी फँब्रिकची जाहिरात होती... साड्या नेसलेल्या मॉडेल चे फोटो बदलत रहायचे आणि मागे अप्रतिम सारंगी ऐकू यायची.
कोणाला आठवते का ?

पराग साडीची जाहिरात भाग्यश्री पटवर्धन करायची.
अंग्रेजी में कहते हैं व्हेरी गुड पराग साडी
गुजराती में कहते हैं सारो छे पराग साडी
बंगाली में कहते हैं के भालो पराग साडी
और पंजाबी विच कहते हैं
परागन साडी लो.. परागन साडी लो...

प्रत्येक ओळीला त्या त्या प्रकारची साडी नेसलेली असायची.
छान होती जाहिरात.>>>

अजून एक होती अर्चना पुरण सिंह ची. त्यावेळी ती 'वाह! क्या सीन है' कार्यक्रम करयची झी टीवी वर.

दुकानातील सगळ्या बायकांना विचारायची की 'आपने कौनसी साडी खरिदी ?'

सगळ्याजणी पराग साडी म्हणायच्या.

मग ती 'वाह! क्या सीन स्टाइल मध्ये वाह क्या साडी है.

हा धागा वाचताना, खूप नॉस्टॅल्जिक वाटते आहे. अगदी बालपणाचा सुगंध हवेला येतो. स्मृती आणि सुगंध ही २ सेंटर्स मेंदूमध्ये निकट असतात असे वाचलेले आहे. सुगंधाने स्मृती चाळवल्या जातात. पण व्हाईसे व्हर्साही खरे आहे असे दिसते.

Lakshman sylvania बल्ब ची जाहिरात यायची,असरानी होते.कुणाला आठवते का?

Pages