मजेशीर जाहिरात

Submitted by मिरिंडा on 12 October, 2016 - 04:36

माझ्या लहानपणी एका फोटो स्टुडिओची मजेशीर जाहिरात केली होती . साधारणपणे
१९६०/६१ साल असेल. ती खालील प्रमाणे होती.

दोन बहिरे एकमेकांना विचारतात :
------------------------------------

पहिला बहिरा: काय ? महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललात वाटत ?

दुसरा बहिरा: छे, छे. महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललोय.

पहिला बहिरा: असं असं . मला वाटलं , महेंद्र फोटो स्टुडिओत फोटा काढायला चाललात की काय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोबु सायकले ~ Happy

आओ चले हम
लेकर अपनी
टोबु सायकले
अपनी टोबु सायकले
अपनी टोबु सायकले

इम्रानियन्स यातला क्युट बच्चा इम्रान हाश्मी आहे असे म्हणतात. खखोइजा! Proud

जब घर कि रौनक बढानी हो
दिवारों को जब सजाना हो..
नेरोलॅक...नेरोलॅक..

काही काही जाहिरातींची चाल रिदम संगित सगळच फार फार छान वाटत ऐकायला...

चिडिया राणी बडी सयानी अंडे दिये खास
एक अजनबी अंडा लेकीन लुडक के आय पास,
उसमे से निकला कछुआ, पर जय हो पंखोवली मैया, तुने उसे भी गोद लिया,
फिर एक दिन........
आवा रे बाल गोपाल उडने का वखत आ गया, नर्व्ह्सैएगा नहीं!!!!
चालत मुसाफिर उड गई रे उडने वाली चिडिया
ओह मम्मी भैय्या से कहिये वो adopted है उड नहीं पायेंगे
अरे कछुआ भैया भी डोलत है,
बिग बबूल, ई है बडे काम कि चीज

विमानतळावर एका आकर्षक महिलेला पाहून लाईन मारण्याच्या उद्देशाने एअरपोर्टवरचा टाय, टोपी अशा गणवेशातला तरुण ऑफिसरः- पहचाना, हम दोनों एकही स्कूल में थे|
महिला (हसत हसत) :- हां मै तुम्हारी टीचर थी|
{इथे पॉण्ड्स ड्रीम फ्लॉवरमुळे वयस्कर स्त्रीही कशी तरुण दिसते हे काही सेकंदात ड्रीम्फ्लॉवर की ताजगी ही जिंगल ऐकवत दाखविले आहे.)
तरुण ऑफिसर (आपल्या टीचर ओळखल्यावर ओशाळून) :- मॅडम शर्मा?
महिला (त्याच्या डोक्यावर टपली मारत) :- चिंटू सक्सेना, अपनी हरकतोंसे बाज़ नही आओगें|

@ बिपीन चन्द्र, व्वा:!!! पॉन्डस् च्या जाहिरातीचे मस्त वर्णन केलेत. आवडले.

कालनिर्णय द्याना.. अहो कालनिर्णय घ्याना

कालनिर्णय आपो ने... कालनिर्णय लोने

कालनिर्णय दिजीए .. कालनिर्णय लिजीए

BJ BJ B...............J
शर्टिंग के लिये BJ, शुटिंग के लिये BJ
ड्रेस मटेरियल , साडियोंके लिये BJ.......
बाबुभाई जगजिवनदास

hamdard ka tonic sinkara....atwal k to lukda manus paper fekat udi marnara...

कोणाला रुपसंगमची जाहिरात आठवतेय का ?

वहिनी असावी अशी ?????? चंदेरी, तनछोई साडी नेसावी

माझ्या जीवाची राणी अशी ही जशी स्वप्नातली सुंदरी

रुपसंगम नाव बाई साड्यांसाठी घ्यावे

रुपसंगम दादर, आमची कोठेही शाखा नाही Wink

या नंतरच्या जाहिरातीमधे आशा काळे आणि जयश्री गडकर होत्या, बहुतेक विहिणी दाखवल्या होत्या.

@ शब्दाली, हो! हो! मला थोडीफार आठवतेय.

'पानेरी'चीसुद्धा जाहिरात होती. दादरच्या बहुतेक दुकानदारांनी टीव्हीवर जाहिराती केल्या होत्या.

रामण्णा ची जाहिरात आणि डायलॉग आमच्या घरात पण फेमसेय ( अजुनही) >> सेम टु सेम

'पोरी, पावणं आलं बघ!'>>> Happy

मला आजही ते "धारा" तेलाची जाहिरात आवडते. "जलेबी......". Happy

अरे कोणाला मधले शब्द आठवतायत का?
"माथेरान में कहा रहोगे?
रॉयल हॉटल, रॉयल हॉटल
xxxxxxx, खाना मजेदार,
रॉयल हॉटल , माथेरान"

जो बीवी से करे प्यार, वह प्रेस्टीज से कैसे करे इन्कार

ही जाहीरात बेकायदेशीर होती. यात नवरे लोकांच्या भ्याड मानसिकतेचा फायदा उचललेला होता. आपण बायकोवर प्रेम करतो हे दाखवण्यासाठी त्या वेळी नव-यांना मनाविरूद्ध प्रेस्टीज विकत घ्यावा लागे. यात प्रॉडक्टच्या क्वालिटीपेक्षा भय हा फॅक्टर महत्वाचा असल्याने जर कोर्टात कुणी गेलं असतं तर प्रेस्टीज कंपनीला अद्दल घडली असती.

पण कोर्टात कोण जाणार ?
म्हणून राहीलं.

मेन विल बी मेन मला नाही आवडल्या फारशा. काहीतरी नविन, कल्पक सुचून काढलेल्या जाहिराती पेक्षा, अशा प्रकारच्या विनोदांची आजकाल चलती आहे, त्या थीमवर काहीतरी काढुया असे ठरवून काढलेल्या जाहिराती वाटल्या मला त्या.

त्या पेक्षा एक थीम पकडून आजतकच्याच ना बहुतेक, पूर्वी जाहिराती यायच्या. जुन्या जमान्यातलं गाणं आणि त्या जमान्यातील वेशभूषा आणि संवाद असलेल्या काही जाहिराती होत्या त्या, त्या आवडल्या मला.

एस्सेल वर्ल्ड मे रहूंगा मैं घर नहीं जाऊंगा मैं
Whirlpool फ्रिज च्या पण मस्त असायच्या, आईस आईस बेबी.
फेवीकॉलच्या पण क्रियेटीव्ह होत्या, एक बाळ सारखं ऊठतं जागेवरून मग आई त्याला फेवीकॉलच्या डब्यावर बसवते कि झालं काम Happy

जब मै छोटा बच्चा था. बडी शरारत करता था
मेरी चोरी पकडी जाती, जब रोशनी देता बजाज.
क्या रन्गीन जवानी थी, एक राजा और एक रानी थी
राजा रानी शरमा जाते, जब रोशनी देता बजाज.
अब मै बिल्कुल बुढा हु, गोली खाकर जीता हु.
लेकीन आज भी घर के अन्दर, रोशनी देता बजाज !!!

मस्त होती ही ad. Picturize पण छान केली होती.

एक विमल वॉशिंग पावडरची जाहिरात होती.
दलीप ताहिल झब्बा पायजमा घालून जात असतो.
रस्त्यावरील विमल जाहिरातीच्या मोठ्या पाटीवरील मुलगी मग म्हणु लागते:
सुनो सुनो ए बाबूजी
प्यारे प्यारे बाबूजी
कहा चले, किधर चले?
कपडे क्यों है मैले धुले?

मैले ? मैन तो अभी लॉन्ड्रीमें धुलवाए!

मग ती डोळा मारुन हात करते आणि त्याचे कपडे मग लख्ख पांढरे शुभ्र दिसू लागतात. पुढे विमल वॉशिंग पावडर बद्दल काहीतरी - जे आता आठवत नाही.

दुसरी:
बाबा घरी येतात, वाळत टाकलेले शुभ्र कपडे पाहून थक्क होतात.
मुलगी: आई बाबांना ते गाणं म्हणुन दाखवू?
बाबा: कुठलं गाणं बेटा?
"सातशे सत्त्यांशीची शुभ्र धुलाई
कपड्यांना देई ........"
७८७ धुलाई बारची जाहीरात.

जय सोप ची जाहिरात आठवतीय का कोणाला?
पहेला प्यार लाये जीवन में बहार असे शब्द होते हिरवणी मैत्रिणीनं बरोबर tution ला जात असते एक मुलगा मागून सायकलवरून येतो आणि तिच्यावर मोगाऱ्या च्या फुलांचा वर्षाव करतो. आमच्या वेळची मुलींची आवडती जाहिरात होती.
मेलं आम्ही कितीदा रस्त्याने गेलो फुलांचा वर्षाव सोडा एक साधं फूल पण कोणी नाही दिलं

एक सोनाली बेंद्रे ची होती तिचा मित्र दरीत पडण्याच्या बेतात असतो आणि ही बया लिम्का प्यायला मिळावं म्हणून त्याला तशात विचारते 'छुट्टा हैं? ' Lol

आणखी एक कसल्याशा च्युईंगम ची. त्यात गुंडांची टोळी एकाला खाली फेकते आणि तिथे असलेला एक नमुना म्हणतो " भाईसाहब आपका शू लेस........ खुल गया है Proud जो आया वो जाएगा.. '___ खाओ, जुबान को लगाम लगाओ.'

आधीच्या जाहिराती खरंच छान असत.
आजकालच्या जाहिराती, डेरी मिल्क च्या तर अजिबात आवडत नाहीत.. इतकं तोंड भरवून मोठी मुलं मुली खात असतात ते.
तसेच एक किसमी ची पाहिली आहे का जाहिरात ?कार्टून चैनल्स वर आणि ती पण.

हो ती मुलगी म्हणते किस मी आणि तिचे वडील तिथून गेल्यावर तो करतो गालावर पण तरी ते मुलं लहान वाटले अशी जाहिरात करायला.

Dairy milk silk च्या खास नाहीत आता जाहिरात पण गाणं आवडलं
Kiss me close ur eyes n miss me
I can read ur lips on ur finger tips
I can feel ur smile come on my lips
And happiness in ur eyes
Kiss me .. miss me

Pages